26 December 2024 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा
x

पोलिसांना कायदा शिकवणारे फडणवीस जमावबंदी असताना मोठा मॉब घेऊन पोलीस ठाण्यात | पहा व्हिडिओ-फोटो

Opposition leader Devendra Fadnavis

मुंबई, १८ एप्रिल: मुंबईमध्ये शनिवारी रात्री 12 वाजेच्या जवळपास कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनवर मोठा राजकीय गदारोळ पहालाय मिळाला. मुंबई पोलिसांनी एक ड्रग डिस्ट्रीब्यूशन कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले होते. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आपल्या काही समर्थकांसोबत विलेपार्ले पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. येथे जोन-8 च्या DCP मंजुनाथ शिंगेंच्या ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांचा पोलिस अधिकाऱ्यांसोबत वाद झाला.

सुमारे तासभर पोलिस ठाण्यात राहिल्यानंतर बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री म्हणाले, ‘महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने अचानक रात्री 9 वाजता Bruck Pharma च्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. ही एक अत्यंत लाजीरवाणी घटना आहे. Bruck Pharma च्या अधिकाऱ्याला एका मंत्र्याच्या OSD ने दुपारी कॉल करुन धमकी दिली होती की, तुम्ही विरोधीपक्षाला रेमडेसिविर कसे पुरवू शकता? यानंतर रात्री 10 वाजता पोलिस त्यांना पकडून घेऊन आले’

दरम्यान देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे सर्वणज रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहोचले. जर पोलिसांना माहिती मिळाली तर ते चौकशी करतात. मग या डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? राज्यात कुठेतरी भाजपाची लोकं साठा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. जो साठा आहे तो विकत घेऊन आपण विकू ही भूमिका घेत आहेत. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका घेत आहेत. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात हा मोठा प्रश्न आहे,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे.

धक्कादायक म्हणजे राज्यात आणि मुंबईत शनिवार-रविवार जमावबंदी आणि कडक निर्बंधांचे आदेश असताना देखील फडणवीस तसेच प्रवीण दरेकर यांनी विले पार्ले आणि अंधेरी पूर्वेतून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा जमा केला. त्यानंतर मोठा मॉब घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले होते. फडणवीसांनी स्वतः सर्व कायदे आणि नियम पायदळी तुडवत पोलिसांना कायदा शिकवणारी भाषा केल्याचं व्हायरल झालं आहे.

 

News English Summary: Fadnavis and Praveen Darekar amassed a large contingent of office bearers and activists from Vile Parle and Andheri East, despite orders for Saturday-Sunday curfews and strict restrictions in the state and Mumbai. He then took a large mob and reached the police station. It has gone viral that Fadnavis himself trampled on all the laws and regulations and used the language of teaching law to the police.

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis reached in Vile Parle police station news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x