23 February 2025 1:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

नातवाच्या बोलण्याला किती किंमत द्यायची हे आजोबांनी ठरवायचं आणि नातवाने...

Parth Pawar, Devendra Fadnavis, Sharad Pawar, Ajit Pawar

मुंबई, १२ ऑगस्ट : पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परिणामी शरद पवार यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. ते अपरिपक्व आहेत” अशी प्रतिक्रिया देऊन पार्थ पवारांना राजकीय प्रवासात संपूर्ण आयुष्यभर ऐकावं लागेल असं वक्तव्य केलं असल्याचं म्हटलं आहे.

या वादावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आजोबा आणि नातवामधील हा वाद आहे, तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे. नातवाच्या बोलण्याला किंमत द्यायची की नाही, हे आजोबांनी ठरवायचं किंवा आजोबांना आवडेल, असं वागायचं की नाही, हे नातवाने ठरवायचं आहे,’ असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच सुशांतसिंग राजपूत प्रकरणात शरद पवार यांनी सीबीआय चौकशी करायला हरकत नसल्याचं म्हटलं आहे, ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे, अशी प्रतिक्रियाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांना शरद पवारांनी फटकारल्यानंतर अजित पवार शरद पवारांना भेटायला गेले आहेत. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. यानंतर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला. नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर पार्थ पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला आहे. मला यावर काहीही बोलायचं नाही, असं पार्थ पवार म्हणाले आहेत.

 

News English Summary: This is a dispute between grandparents and grandchildren, it is a question of their home. It is up to the grandchildren to decide whether to value their grandchildren’s speech or not, it is up to the grandchildren to decide whether they want to behave or not.

News English Title: Opposition leader Devendra Fadnavis reaction on Sharad Pawar Parth Pawar controversy News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x