15 January 2025 11:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

कुर्बानीनं कोरोना जाणार म्हणजे...प्रविण दरेकरांचा पवारांना टोला

Opposition leader Pravin Darekar, Sharad Pawar, Ram Mandir

मुंबई, २८ जुलै : सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपुजनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला होता. काही लोकांना असं वाटतंय की, राम मंदिर बांधून देशातून कोरोना दूर होईल, अशा शब्दात पवारांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता निशाणा साधला होता.

त्यावेळी ‘शरद पवारांनी राम मंदिराबद्दल जे काही वक्तव्य केले आहे, ते मुस्लीम समाजाला खूश करण्यासाठी केले तर नाही ना? हे पाहावे लागेल’, असं दरेकर म्हणाले होते. तसंच,राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पण, अजून उद्धव ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. ‘अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्या एनओसीची गरज लागणार नाही, ही अपेक्षा आहे, असं म्हणत दरेकरांनी पवारांना टोला लगावला होता.

मात्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. मुस्लिम समाजाचा बकरी ईद सणाला कुर्बानी देण्यासंदर्भात शरद पवार यांनी बैठक घेतली. त्यावर “कुर्बानीने कोरोना जाणार म्हणजे…,” अशी टोला दरेकर यानी लगावला आहे.

त्यानंतर भाजपानं शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आता सध्या बकरी ईदनिमित्तानं कुर्बानीचा विषयीचा विषय चर्चेत असून, शरद पवार यांनी मध्यस्थी करत बैठक घेतली होती. या बैठकीवरून प्रविण दरेकर पवारांना लक्ष्य केलं आहे. “राम मंदिर बांधून करोना जाणार का? असं विचारणारे श. प. कुर्बानीसाठी बैठक घेतात, मुख्यमंत्र्यांना मार्ग काढण्यास सूचना करतात.. कुर्बानीने कोरोना जाणार म्हणजे…,” अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.

 

News English Summary: Leader of Opposition in the Legislative Council Pravin Darekar has again targeted Sharad Pawar over meeting with Muslim community on the occasion of Bakri Eid News Latest updates.

News English Title: Opposition leader Pravin Darekar Criticized Sharad Pawar On Ram Mandir News Latest Updates.

हॅशटॅग्स

#PravinDarekar(14)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x