महत्वाच्या बातम्या
-
'तुम्हाला फक्त स्वतःचीच काळजी आहे, पंतप्रधान मोदी साहेब', असे पत्र लिहून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या, राज्य सरकारवरही दोष
Farmer Suicide | कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि तुटलेल्या दशरथ एल. केदारी या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (१७ सप्टेंबर) अभिनंदन केले आणि त्यानंतर तलावात उडी घेऊन आपले जीवन संपवले. केदारी यांनी एक सुसाईड नोटही मागे ठेवली होती, ज्यात लिहिले होते की, “आम्ही काय करू शकतो? तुम्हाला फक्त स्वत:ची काळजी आहे मोदी साहेब. आम्ही भीक मागत नाही आहोत, पण आपल्यामुळे काय बरोबर आहे?, आम्हाला एमएसपी दिली पाहिजे कारण सावकार आम्हाला धमकावत आहेत. शेतकऱ्यांसारखी जोखीम कोणी घेत नाही, आमच्या तक्रारी घेऊन आम्ही कुठे जाऊ?
2 वर्षांपूर्वी -
शिंदे सर्मथकांनी मर्यादा ओलांडल्या, उद्धव ठाकरेंना लक्ष करण्याच्या नादात कदमांनी बाळासाहेबांच्या पत्नीचा अप्रत्यक्ष अपमान केला
Ramdas Kadam | आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेनंतर आज शिंदे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची भांडी घासत असून, वरून बाळासाहेब बघत असतील, तर तेही म्हणत असतील की माझा मुलगा (उद्धव ठाकरे) शरद पवार आणि सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडला, अशा शब्दात रामदास कदमांनी शरसंधान साधलं.
2 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर वेदांता कंपनीसोबतच्या सामंजस्य कराराची तारीख ठरलेली | अखेरच्या क्षणी बेरोजगार तरुणांच्या स्वप्नांचा घात कोणी केला?
Vedanta Project | सध्या वेदांताचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. विरोधकांकडून शिंदे, फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. राज्याच्या उद्योग मंत्र्यांनाच प्रकल्पाबाबत काहीच माहिती नव्हते असा टोला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला होता. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले.
2 वर्षांपूर्वी -
स्वतःच गुजरातची तुलना पाकिस्तानसोबत करणाऱ्या फडणवीसांची आदित्य ठाकरेंच्या प्रतिप्रश्नावर केविलवाणी प्रतिक्रिया, पहा काय म्हणाले
DCM Devendra Fadnavis | काल वेदांता प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की गुजरात हा देखील देशातीलच एक राज्य असून महाराष्ट्राचा भाऊ असे संबोधले जाते. त्यामुळे हा प्रोजेक्ट काय पाकिस्तानला गेला नाही असेही फडणवीस म्हणाले होते. सत्ता परिवर्तनाच्या काळात गुजरातबरोबर संबधित कंपनीशी डील झाली होती. त्यामुळे आगामी दोन वर्षात महाराष्ट्रात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवून राज्य उद्योग-व्यवसायात आघाडीवर आणणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | आमचं सरकार येण्याआधीच फॉक्सकॉनचा निर्णय झाला होता असं सांगणारे फडणवीस फसले, शिंदेंच्या त्या माहितीमुळे खोटं उघड
DCM Devendra Fadnavis | वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भात विषय गाजतोय. अनिल अग्रवाल यांनी सगळं ट्विट करून सांगितलं. पण ३ पत्रकार आहेत जे त्यांच्या संस्थेसाठी नाही तर राजकीय स्वार्थासाठी काम करतात. ज्या दिवशी मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यादिवशी मी CEO एमआयडीसीला बोलावलं आहे. त्यानंतर वेदांताची चौकशी केली. मला त्यांनी सांगितलं की गुजरातकडे वेदांताचा कल आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्ही दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र तोपर्यंत गुजरातकडे आम्ही गेलो आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Vedanta Project | गुजरात आमचा लहान भाऊच आहेत, ते पाकिस्तान थोडेच आहेत, असं सांगताना फडणवीसांची पत्रकारांवरच टीका
DCM Devendra Fadnavis | वेदांता फॉक्सकॉनच्या संदर्भात विषय गाजतोय. अनिल अग्रवाल यांनी सगळं ट्विट करून सांगितलं. पण ३ पत्रकार आहेत जे त्यांच्या संस्थेसाठी नाही तर राजकीय स्वार्थासाठी काम करतात. ज्या दिवशी मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यादिवशी मी CEO एमआयडीसीला बोलावलं आहे. त्यानंतर वेदांताची चौकशी केली. मला त्यांनी सांगितलं की गुजरातकडे वेदांताचा कल आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्ही दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली. मात्र तोपर्यंत गुजरातकडे आम्ही गेलो आहोत.
2 वर्षांपूर्वी -
आपल्याकडील केंद्रीय मंत्रालयाचा राज्याला काय फायदा होतोय हे न सांगता, राणेंनी शिवसैनिक अन गद्दारातील फरक सांगितला
Union Minister Narayan Rane | लघुउद्योग भारती संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये होणार आहे. या अधिवेशनात राज्यभरातून लघुउद्योजक सहभागी झाले आहेत. शहरांसह ग्रामीण भागातील लघुउद्योगांना चालना देण्याच्या अनुषंगाने हे अधिवेशन महत्त्वाचं मानलं जातं आहे. या अधिवेशनात उद्योजक आपल्याला येणाऱ्या समस्या आणि आव्हानं यांचीही चर्चा करतात. कोरोनामुळे दोन वर्षे हे अधिवेशन होऊ शकलंल नव्हतं.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | तरुणांनो तुम्ही भाजीवाला, टॅक्सिवाला, रिक्षावाला ऐकलं असेल, पण ते 'वेदांतवाला' काय आहे भाऊ?, मग हा व्हायरल व्हिडिओ पहा
Video Viral | फॉक्सकॉन-वेदांता संयुक्त भागीदारीतून उभारण्यात येणारा सेमीकंडक्टर आणि फॅब डिस्ले निर्मिती प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. मात्र, गुजरातला गेल्यावरून आता केंद्रातील मोदी सरकारलाही लक्ष्य केलं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केलंय.पत्रकार परिषदेत शरद पवारांनी फॉक्सकॉन वेदांता प्रोजेक्टबद्दल भाष्य केलं. तसेच केंद्रातील सरकारच्या भूमिकेबद्दलही मत मांडलं.
2 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदे हे सकाळी सहावाजेपर्यंत काम करतात, तर मग उठतात कधी?, वेंदाता प्रकल्पावरून अजित पवारांचा खोचक टोला
Vedanta Foxconn Project | वेंदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. विरोधी पक्ष सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. आज या प्रकल्पाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवासेना आंदोलन करत आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येणार असलेला प्रकल्प गुजरातमध्ये पळवल्यानं एक लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने प्रचंड टीका होताच, भाजप नेते गुजरात कसा योग्य आणि महाराष्ट्र कसा चुकीचा सांगण्यास पुढे सरसावले
Vedanta Foxconn Project | आज राज्यभरात युवासेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन (Foxconn) प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या विरोधात सरकारचा निषेध म्हणून युवासेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प गुजरातमध्ये गेला, यामुळे एक लाख तरुणांचा रोजगार गेला, याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यात, शहरात, मुख्य चौकात निषेध मोहीम घेण्यात येणार आहे. ‘शिंदे-फडणवीस या खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला आहे. त्यामुळे आता राज्यातील एक लाख तरुणांचा रोजगार हिरावला जाणार असल्याने आम्ही उद्या, 15 सप्टेंबरला राज्यभरात शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करणार असल्याचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले.
2 वर्षांपूर्वी -
मुंबईची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी संभाळणारे डॅशिंग पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या लेखी आदेशाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून तिलांजली
Mumbai Police | सह पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील हे वेळोवेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तालयात बक्षीस देऊन उत्कृष्ट अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार करत असतात आणि त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात परंतु सार्वत्रिक बदल्या झालेल्या कनिष्ठ अधिकारी व अंमलदारी यांच्या बदली कार्यमुक्ती करण्यासंदर्भातील लेखी आदेश गणेशोत्सवापूर्वीच देऊनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे मनुष्यबळ कमी असल्याचे सांगून बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यास थेट विरोध दर्शवित आहेत.
2 वर्षांपूर्वी -
राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री देऊ न शकलेल्या शिंदे सरकारमधील उद्योग मंत्री म्हणाले, वेदांता पेक्षा मोठा प्रकल्प राज्याला देऊ
Minister Uday Samant | राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नवे सरकार राज्यात आले. जवळपास ही उलथापालथ होऊन तीन महिन्याचा काळ उलटत आहे. मात्र, नवे सरकार येताच जुन्या कामांना स्थगिती देण्यात आली. याशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन खर्चाला मज्जाव केल्याने विकासाला ब्रेक लागला आहे. ऐन पावसाळ्यात सरकारचा गाडा चिखलात रुतल्याची गट निर्माण झाली आहे. त्यातच जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर होत नसल्याने अनेक निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा ताटकळत बसली आहे. एकाबाजूला राज्यातील जिल्ह्यांना पालकमंत्री न देऊ शकलेल्या शिंदे सरकारमधील मंत्र्यांची केविलवाणी वक्तव्य येतं आहेत.
2 वर्षांपूर्वी -
वेदांत प्रकल्प गुजरातला गेला | तरुणांना नोकऱ्यांची गरज, पण शिंदे गट 'हिंदू गर्व गर्जना' यात्रा काढून तरुणांना विचलित करण्यास सज्ज
CM Eknath Shinde | वेदांता लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉक्सकॉन यांनी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प आणि डिस्प्ले फॅब मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी गुजरात सरकारशी सामंजस्य करार केला आहे. वेदांत या प्रकल्पात १,५४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गांधीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | ...तर आजपासून हा आशिष शेलारही कुरेशी आहे, वांद्रे पश्चिमेकडील मुस्लिम मतांसाठी शेलारांनी स्वतःला 'कुरेशी' जाहीर केलं
Viral Video | शिवसेनेवर हिंदुत्वाच्या आडून आगपाखड करणारे भाजपचे अनेक नेते स्वतःच त्यांच्या राजकीय ट्रॅपमध्ये अडकल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय जनता पक्षाचे मुंब अध्यक्ष आशिष शेलार यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावरुनच आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच काँग्रेसकडूनही या व्हिडीओवरुन शेलारांवर निशाणा साधण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाडू-पेढ्याची तुला नाकारल्याचं बघून भुमरेंच्या कार्यकर्त्यांनी लगेच लाडू पेढे पळवले
CM Eknath Shinde | पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या निमित्ताने मंत्री संदीपान भुमरे यांनी शक्तिप्रदर्शन केले आहे. या सभेत गुवाहाटीफेम शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांनी काय गुन्हा केला, असा सवाल त्यांनी केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होता, आताही शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या नेत्यांवरही त्यांनी टीका केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
नवनीत राणा आणि रवी राणा मुस्लिम धर्मियांच्या दर्ग्यात प्रथा पाळतात आणि आमच्या हिंदूं प्रथांचा अपमान करतात, नेटिझन्सचा संताप
MP Navneet Rana | ठाकरे सरकार सत्तेत असताना राणा दाम्पत्याने मुंबईत मातोश्रीच्या आवारात जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा राजकीय स्टंट केला होता. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे दोन्ही ड्रामेबाज नेते म्हणून आता महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले आहेत. दोघा ड्रामेबाज नेत्यांचा पक्ष भाजपात विलीन करून भाजपच्या तिकिटावर आगामी निवडणुका लढवायच्या असल्याने त्या स्वतःच्या फिल्मी हिंदुत्वाच्या नावाने नवनवीन ड्रामे करत असतात हे आता सर्वश्रुत झाले आहे. आपण जी स्टंटबाजी करतो ती लोकांना कळत नाही असं दोघा पत्नी-पत्नीला वाटू लागलं अशी चर्चा आता समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री पदी शिंदे तर फडणवीस गृहमंत्री | हिंदुत्वाच्या नावाखाली शिंदे गटातील उन्मत्त आमदाराकडून गर्दी असताना गोळीबार
MLA Sada Sarvankar | आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, पोलिसांवर दबाव आणून कुणी गुन्हा दाखल केला असेल तर पोलीस त्याचा तपास करतील असेही सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. या भागातील आमदार असल्याने हा सगळा बदनामीचा प्रकार असल्याचा त्यांनी सांगितले. आपण कामातून मोठे झालेलो आहोत, भांडणे करुन मोठे झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात असे वाद करु नयेत, याची काळजी घ्यायला हवी. पोलिसांना मदत करण्यासाठी, त्यांनी चौकशीला बोलावले तर जाऊ असेही त्यांनी सांगितले.
2 वर्षांपूर्वी -
गणपती विसर्जनावेळी गर्दीत म्यावम्याव करणाऱ्यांना दादर शिवसैनिकांनी शांततेत घेतलं | रात्री उशिरा शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना शाखेतच चोपला
Dadar Shivsena | प्रभादेवीत शिंदे गट-शिवसैनिकांमध्ये पुन्हा राडा झाला आहे. काल रात्री शिंदे गटातील शाखा प्रमुखांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप देण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यानंतर शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. विसर्जनावेळी दोन्ही गट आले आमने-सामने असताना आमदार सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला असला तरी गोळीबाराचा आरोप सरवणकरांनी फेटाळला आहे.
2 वर्षांपूर्वी -
पैठणमध्ये शिंदेंच्या सभेला गर्दी भासविण्यासाठी अंगणवाडी सेविका, प्रकल्प अधिकारी आणि सर्व पर्यवेक्षकांना हजर राहण्याच्या सूचना
CM Eknath Shinde | पैठणमध्ये संदीपान भुमरे यांना नुकत्याच झालेल्या कॅबिनेट विस्तारात रोहयो व फलोत्पादन मंत्रीपद मिळालं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंत्र्यांच्या उपस्थितीसोबत रक्तदानाचा शिबिर देखील आयोजित करण्यात आलं होतं. आपल्या मतदारसंघातील आमदाराला मंत्रीपद मिळाल्याने कार्यकर्त्यांचे उत्सुक्ता अपेक्षित होती. मात्र हजार लोकांची गर्दीची अपेक्षा असताना केवळ शंभर ते दीडशे लोक उपस्थित राहिल्याने शिंदे गटाला विचार पडला होता. विशेष म्हणजे अगदी सामान्य लोकांच्या घरी बारशाच्या कार्यक्रमालाही अधिक लोकं जमतात आणि तेवढीही गर्दी मंत्रिपद मिळ्यानंतरही मंत्री महोदयांना जमवता आलेली नाही. त्यानंतर औरंगाबाद येथील आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाची पुन्हा चर्चा रंगली होती.
2 वर्षांपूर्वी -
Video Viral | राणा दाम्पत्याकडून हिंदू धर्माच्या प्रथांचा भयंकर अपमान, विसर्जनावेळी दोघांनी गणपती बाप्पाची मूर्ती वरून पाण्यात फेकली
MP Navneet Rana | गणेश चतुर्थीपासून सुरू झालेला गणेशोत्सव 10 दिवसांनंतर अनंत चतुर्दशीला संपतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जनही केले जाते. संपूर्ण देशात अनंत चतुर्दशीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. काल 9 सप्टेंबर रोजी शुक्रवारी अनंत चतुर्दशी असल्याने बाप्पाचे विसर्जन देखील हिंदू धर्मातील प्रथेनुसार कसं करावं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- Smart Investment | तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी मिळेल 50 लाखांचा फंड, फायद्याच्या योजनेत बचत करा, खर्चाची चिंता मिटेल
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY
- BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल 45% परतावा, ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग - NSE: BHEL
- Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 10 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल तगडा परतावा - NSE: TATAPOWER
- Car Loan EMI | या दिवाळीत स्वप्नातली कार खरेदी करताय, हे 4 उपाय EMI चं टेन्शन दूर करतील, लवकर फिटेल कर्ज - Marathi News
- Trending Video | फिरायला गेलेले जोडपे अडकले लांडग्यांच्या विळख्यात, पुढे असं घडलं की विश्वास बसणार नाही, पहा व्हिडिओ
- iPhone 16 | आता iPhone 16 खरेदी करा ते सुद्धा 10 हजाराच्या सूटवर, झटपट फोन हातात, इथून करा ऑर्डर - Marathi News