महत्वाच्या बातम्या
-
कांजूरमार्ग मेट्रो कारशेड | राज्य सरकारने दर्शवली जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मागे घेण्याची तयारी
मुंबई मेट्रो-३ प्रकल्पासाठी कांजूरमार्ग (Mumbai Metro 3 Kanjur Marg Land ) येथील १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात त्रुटी असल्याने त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा व नव्याने सुनावणी घ्यावी, अन्यथा आम्ही त्या आदेशाची वैधता ठरवू,’ असा इशारा न्यायालयानं दिला होता.
4 वर्षांपूर्वी -
सभागृहात खटला चालवू नका | गोस्वामींवरील गुन्हा सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला नाही - अनिल परब
रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी यांची अटक व कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘खून करणाऱ्यास फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे. पण हे पाकिस्तान नाही. इथं कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा,’ असा टोला फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला.
4 वर्षांपूर्वी -
मला पाडून दाखवा | त्या आव्हानावर अजित दादांचं उत्तर | मुनगंटीवार निरुत्तर
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही सभागृहात सत्ताधारी पक्ष व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. आज अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. याच दरम्यान, आज सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यातील शाब्दिक युद्ध हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
4 वर्षांपूर्वी -
कांजूरमार्ग मुंबई मेट्रो-३ प्रकल्प | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात त्रुटी | कोर्टाकडून हे आदेश
मुंबई मेट्रो-३ प्रकल्पासाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात त्रुटी असल्याने त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा व नव्याने सुनावणी घ्यावी, अन्यथा आम्ही त्या आदेशाची वैधता ठरवू,’ असा इशारा न्यायालयानं दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस काही सुचवूत आहेत का | दरेकरांना ताब्यात घेण्यासाठी फडणवीसांकडे पुरावे असतील तर द्यावेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षांवर देखील जोरदार निशाणा साधला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल उपस्थित केला
4 वर्षांपूर्वी -
TRP scam | रिपब्लिकच्या अडचणीत वाढ | मुंबई पोलिसांकडून सीईओंना अटक
फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Republic TV Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली आहे. Republic TV Fake TRP scam CEO Vikas Khanchandani arrested by Mumbai Police.
4 वर्षांपूर्वी -
देशातील महान आमदार | घाटकोपर स्थित बंगालींना घेऊन प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. याबाबत बोलताना प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच ‘आगीशी खेळू नका’, असा सल्लादेखील त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिशा कायद्याचे नाव बदलून शक्ती करण्यात आले | आता निवडक गुन्ह्यांसदर्भातच कारवाई नको
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक तयार करण्यास आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची तसेच महिलांना आणि मुलींना समाज माध्यमांवरून त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलनात चीन- पाकिस्तानचा हात असल्यास केंद्राने सर्जिकल स्ट्राईक करावा
“हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राला सुप्रीम धक्का | प्रताप सरनाईक कुटुंबियांना ED कारवाईवरून अटक न करण्याचे आदेश
मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena Leader Pratap Sarnike) यांच्यावर अंमलबजावणी संचनालयानं अर्थात (ED) ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा देत ईडीला अटक न करण्याचे आदेश दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला सोडून महाविकास आघाडीत गेले तेव्हाच शिवसेनेचे हिंदुत्वाविषयीचे आचारविचार कळले
मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आज ‘भारत बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर प्रविण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्राने शेतकऱ्यांसाठी आणलेला कायदाच शेतकऱ्यांसाठीचा आत्मा आहे. बंदमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका नाही. ते केवळ राजकीय स्वार्थासाठी हे करत आहेत. परंतु, शेतकऱ्यांना राजकीय पक्षांच्या कथनी आणि करणीतला फरक कळतो, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला | कोणी कामगारांना फसवलं
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मनसे अमराठी लोकांचा द्वेष करतो ही चुकीची समजूत | मनसेची प्रतिक्रिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तृळात सुरु आहेत. यावर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका भारतीय जनता पक्षाला पूरक ठरेल का किंवा त्यांना सोबत घेतल्यास फायदा होईल का? हे आज सांगता येणार नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आमची व्यापक भूमिका आहे. राज ठाकरे यांची मराठी माणसाकरता जी भूमिका आहे ती आम्हाला मान्यच आहे. पण त्याचवेळी आमचं अगदी स्पष्ट मत आहे, मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या हक्काकरता लढलंच पाहिजे. पण त्याच्या हक्काकरता लढणे म्हणजे अमराठी माणसाला वाळीत टाकणे, त्यांच्यावर हल्ले करणं हे आम्हाला मान्य नाही”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना मांडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांसाठी | 9 आणि 10 डिसेंबरला शहरातील 'या' भागात पाणीपुरवठा बंद राहणार
मुंबई महानगरपालिकेने (Brihan Mumbai Mahanagar Palika) सुमारे चार किलो मीटर लांबीची ब्रिटीशकालीन तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे या कामासाठी येत्या 9 व 10 डिसेंबर रोजी एस विभागातील काही परिसरामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत (Water supply will be cut off in some areas of S section on December 9 and 10 for work) आहे. तर, याच दिवशी के पूर्व, एच पूर्व, एल उत्तर आणि जी उत्तर या विभागांमधये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे या सदर विभागातील नागरिकांना 8 डिसेंबर रोजी पाण्याचा पुरेसा साठा करण्याचे तसेच पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे मुंबई महानगरपालिकेने या भागातील सर्व नागरिकांना केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन देशभर जाणार | एनडीए’तून बाहेर पडलेले पक्ष उद्धव ठाकरे आणि पवारांच्या भेटीला
‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या दोन पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा (Prem Singh Chandumajra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मुंबईत आले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेने पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्ये देखील शिवसेना सहभागी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
राऊतांकडून पुन्हा अर्णब गोस्वामी लक्ष | अन्वय नाईक आत्महत्या आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा काय संबंध?
सर्वोच्य न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी दोषमुक्त झाल्याप्रमाणे देखावा केला होता. मात्र त्यांच्या अडचणीत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण रायगड पोलिसांनी देखील पुराव्यानिशी आरोपपत्र नायालयात दाखल केलं आहे. मात्र त्यानंतर अर्णब गोस्वामी देखील पुन्हा सतर्क झाले असून त्यांनी देखील आधीच मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई चांगली जीवनशैली जगण्याची संधी देते | IIT सर्वेक्षण | ट्विटर क्वीनही तोंडघशी
मागील काही महिन्यांपासून कंगना रानौतने व्यक्तिगत विषयावरून मुंबई शहराची अत्यंत वाईट प्रकारे बदनामी केली. अगदी कळस म्हणजे तिने मुंबईला थेट PoK म्हटल्याचं देखील देशाने पाहिलं आणि मुंबईत कसे अत्याचार होतात याचा कपोकल्पित पाढे वाचताना मुंबई पोलिसांना देखील तिने माफिया म्हटल्याने राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. वास्तविक मुंबई शहर आजची देशातील कोणत्याही शहरांच्या तुलनेत सर्वाधिक सुरक्षित आहे हे सर्वश्रुत आहे आणि इथल्या लोकांनादेखील चांगली जीवनशैली जगण्याची संधी मिळते याला सर्वेक्षणातून देखील दुजोरा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | मॅंग्रोव्ह फाउंडेशन मुंबईत 19 पदांची भरती
मॅंग्रोव्ह फाउंडेशन भरती २०२०. महाराष्ट्रातील मॅनग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संरक्षण फाउंडेशनने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून १९ विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक अर्जदारांनी अर्ज ३१ डिसेंबर २०२० रोजी किंवा तत्पूर्वी अर्ज सादर करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात सविस्तर दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक प्रकरण CBI'कडे देण्यासाठी अर्णब गोस्वामींची धडपड | हायकोर्टात अर्ज
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami, editor of Republic TV) यांनी आज मुंबई हायकोर्टात दोन महत्त्वाचे अर्ज सादर केले (Filed two important petitions in the Mumbai High Court today in connection with the Naik suicide case) आहेत. आरोपपत्राची प्रक्रिया तसेच तपास हस्तांतरित करण्याबाबत हे अर्ज आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | मुंबई मंत्रालय सामान्य प्रशासन विभागात 05 जागा
मंत्रालय सामान्य प्रशासन भरती २०२०. महाराष्ट्र सामान्य प्रशासन प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई यांनी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून ०५ राज्य आयुक्त पदांसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार जी.ए.डी. मुंबई भरती २०२० साठी ३० डिसेंबर २०२० किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि जीएडी मुंबई भारतीसाठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB