महत्वाच्या बातम्या
-
आमदार सरनाईक मुंबईत दाखल | ईडीच्या कारवाईवर दिली पहिली प्रतिक्रिया
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ईडीने कारवाई नेमकी का केली? याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचं भुयारी गटार कलानगरकडे जातं - आ. नितेश राणे
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीनं छापेमारी सुरु केली आहे. सरनाईक यांच्या दोन्ही पुत्रांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईवरुन शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर शिवसेनेच्या आरोपांना भाजपकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यानंतर आमदार नितेश राणे यांनीही सरनाईकांवर झालेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ईडीची धाड महाराष्ट्रातील 'ऑपरेशन लोटस'चं पहिलं पाऊल असू शकतं - भुजबळ
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई हे महाराष्ट्रातील ‘ऑपरेशन लोटस’चं पहिलं पाऊल असू शकतं,’ अशी शंका व्यक्त करतानाच, ‘कारण काहीही असो, भाजपचा मूळ उद्देश यशस्वी होणार नाही,’ असा ठाम विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. ‘अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या आणि इतर प्रकरणांमध्ये सरनाईक अतिशय आक्रमकपणे बोलत होते. सरकारची बाजू मांडत होते. त्यामुळे ही कारवाई अपेक्षित होती,’ असं भुजबळ म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
हे छापे नसून, केवळ झाडाझडती आहे | ईडीचं स्पष्टीकरण
विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक निघून गेलं आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबई घेऊन येण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांजवळ सर्च ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. तसेच काही राजकारण्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना राणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आरोप – प्रत्यारोप केले होते. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
आगामी काळात मनसेला सोबत घेणार नाही | फडणवीसांचं वक्तव्य
शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sirnaik) यांच्या घरावर ईडीने (Enforcement Department) छापा टाकल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीय. ईडीकडे तक्रारी असतील म्हणून छापे टाकले असतील असे फडणवीस म्हणाले. ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरु नये असेही ते पुढे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
राऊत यांनी १०० लोकांची यादी माझ्याकडे द्यावी | शब्द देतो कारवाई होईल - फडणवीस
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्या घऱी सकाळी ईडीचं पथक दाखल झालं असून शोधमोहीम सुरु आहे. मुंबई तसंच ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी ईडीकडून शोधमोहीम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी तसंच कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचं पथक दाखल झालं होतं. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या (Parvesh Sarnaik and Vihang Sarnaik) घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं होतं. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक रवाना झालं आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे - संजय राऊत
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी प्रकरण | आ. प्रताप सरनाईकांची होती मोठी भूमिका - सविस्तर वृत्त
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार | राज्य सरकारचा निर्णय
मुंबईत मे आणि जून महिन्यातील पाणी कपात (Water reduction) टाळण्यासाठी मनोर इथं समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. वर्षा या शासकीय निवासस्थानी 200 एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मनसे सुपारी घेऊनच काम करतात | नागड्यासोबत उघडा झोपल्यावर काय होतं ते दिसेल - शिवसेना
महाविकास आघाडीची स्थापना करून शिवसेनेच्या पदरात मुख्यमंत्रीपद पडलं आणि भारतीय जनता पक्षाचा राजकीय गेम केल्यानंतर भाजपचे नेते शहरी भागातील मराठी मतांवरून चिंतेत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत अमराठी मतच भाजपच्या केंद्रस्थानी असतील असं राजकीय विश्लेषक मत मांडत आहेत. पण मराठी मतदार हा शिवसेनेचा बेस असल्याने भाजपाला मराठी मतांसाठी दुसरा साथीदार हवा आहे. त्यामुळे मनसे संबंधित निवडणूक पूर्व पुड्या सोडण्यास भाजपकडून सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमली पदार्थ प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष यांना दिलासा | जामीन मंजूर
ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे (NDPS Court grants Bail). किल्ला कोर्टाने 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. अटक झाल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या जामीन अर्जावर आज (23 नोव्हेंबर) सकाळपासून सुनावणी सुरू होती.
4 वर्षांपूर्वी -
तीन तिघाडी, काम बिघाडी असे निष्क्रिय आघाडी सरकार | भाजपचं वीजबिलांवरून आंदोलन
वाढीव वीज बिलाविरोधात भारतीय जनता पक्षाने कल्याणमध्ये आंदोलन केले. या दरम्यान, वीज बिलाची होळी करताना भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की, झटापट झाली. यावेळी आमदारांनी पोलिसांवर दपडशाहीचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
4 वर्षांपूर्वी -
वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडेंसह NCB च्या पथकावर ड्रग्ज विक्रेत्यांकडून हल्ला
बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे करणाऱ्या NCB च्या पथकावर हल्ला झाला आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात ड्रग्ज पेडलर्सला पकडण्यासाठी गेलेल्या NCB च्या पथकावर हल्ला झाला आहे. डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंसह त्यांच्या टीममधील पाच जणांवर यावेळी या पेडलर्सकडून हल्ला करण्यात आला. यात NCB चे दोन अधिकारी जखमी झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
फसलेल्या 'मी पुन्हा येईन' टीमला पहिल्या वर्धापनदिनी माझ्याकडून श्रद्धांजली | खोचक ट्विट
‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..’ हे वाक्य आणि देवेंद्र फडणवीस यांना जेवढं ट्रोल केलं गेलं, तेवढं कदाचित कुणालाच ट्रोल केलं गेलं नसेल. असा एकही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल ज्यावर याचं पारायण झालं नसेल. त्यावर स्वतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन..’ बद्दल खुलासा केला होता.
4 वर्षांपूर्वी -
आमचं परप्रांतियांबाबतचं धोरण मनसे स्वीकारणार नाहीत | त्यांनी धोरण बदलायला हवं तर...
महाविकास आघाडीची स्थापना करून शिवसेनेच्या पदरात मुख्यमंत्रीपद पडलं आणि भारतीय जनता पक्षाचा राजकीय गेम केल्यानंतर भाजपचे नेते शहरी भागातील मराठी मतांवरून चिंतेत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत अमराठी मतच भाजपच्या केंद्रस्थानी असतील असं राजकीय विश्लेषक मत मांडत आहेत. पण मराठी मतदार हा शिवसेनेचा बेस असल्याने भाजपाला मराठी मतांसाठी दुसरा साथीदार हवा आहे. त्यामुळे मनसे संबंधित निवडणूक पूर्व पुड्या सोडण्यास भाजपकडून सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण पत्री पूल गर्डर लॉचिंग | अखेर आगामी KDMC महानगरपालिकेचा इव्हेन्ट पूर्ण
दोन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला गती आली आहे. तुळई बसविणे आणि अन्य कामे डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण करून जानेवारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या पुलावसाठीची तुळई दोन दिवसांत ६० मीटरने पुढे ढकलण्याचे काम साडेसात तासांच्या मेगाब्लॉकमध्ये शनिवार आणि रविवारी करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी - मनसेचं टीकास्त्र
दिवाळीनंतर देशात आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी काल संवाद साधला. लशीवर अवलंबून न राहता, करोनाला रोखण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी, तो आपुलकीचा सल्ला त्यांनी दिला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार ? कुठला नवीन निर्णय जाहीर करणार? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. पण त्यांनी कुठलाही मोठा निर्णय जाहीर केला नाही. उलट पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण पत्रीपूल | चीन जेवढ्या वेळेत हायवे आणि धरणं उभारतं | पण शिवसेना...
फेब्रुवारी २०२० पर्यंत कल्याणचा पत्रीपूल सुरू होणार, इतकंच नाही तर या पुलाच्या बाजूला आणखी एक नवा पूल उभारणार असल्याची पोश्टरबाजी शिवसेनेने २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत केली होती. म्हणजे कोरोनाची देशात कल्पनाही नसताना त्यापूर्वी पत्रीपूल पूर्ण होणार होता असं वचन शिवसेनेने दिलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली होती. पूल जीर्ण झाल्याने नोव्हेंबर 2018 मध्ये हा पूल पाडण्यात आलेला.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब-बारची जास्त चिंता आहे - आ. शेलार
राज्यात ‘अनलॉक’च्या प्राधान्यक्रमावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. ‘मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची चिंता जास्त आहे,’ असा आरोप शेलार यांनी केला. विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्तानं शेलार पुण्यात आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
लव्ह जिहाद हा भाजपचा अजेंडा | लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे - महापौर
उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने, या पार्श्वभूमीवर लवकरच लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याची निर्मिती केली असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. त्यानंतर हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मध्यप्रदेश सरकारदेखील आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीतील भाजप मधील नेतेमंडळी हा कायदा राज्यात आणावा यासाठी पुढे आले आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो