महत्वाच्या बातम्या
-
कल्याण पत्री पूल गर्डर लॉचिंग | अखेर आगामी KDMC महानगरपालिकेचा इव्हेन्ट पूर्ण
दोन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या पत्रीपुलाच्या कामाला गती आली आहे. तुळई बसविणे आणि अन्य कामे डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण करून जानेवारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या पुलावसाठीची तुळई दोन दिवसांत ६० मीटरने पुढे ढकलण्याचे काम साडेसात तासांच्या मेगाब्लॉकमध्ये शनिवार आणि रविवारी करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी - मनसेचं टीकास्त्र
दिवाळीनंतर देशात आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी काल संवाद साधला. लशीवर अवलंबून न राहता, करोनाला रोखण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी, तो आपुलकीचा सल्ला त्यांनी दिला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार ? कुठला नवीन निर्णय जाहीर करणार? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. पण त्यांनी कुठलाही मोठा निर्णय जाहीर केला नाही. उलट पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.
4 वर्षांपूर्वी -
कल्याण पत्रीपूल | चीन जेवढ्या वेळेत हायवे आणि धरणं उभारतं | पण शिवसेना...
फेब्रुवारी २०२० पर्यंत कल्याणचा पत्रीपूल सुरू होणार, इतकंच नाही तर या पुलाच्या बाजूला आणखी एक नवा पूल उभारणार असल्याची पोश्टरबाजी शिवसेनेने २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत केली होती. म्हणजे कोरोनाची देशात कल्पनाही नसताना त्यापूर्वी पत्रीपूल पूर्ण होणार होता असं वचन शिवसेनेने दिलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली होती. पूल जीर्ण झाल्याने नोव्हेंबर 2018 मध्ये हा पूल पाडण्यात आलेला.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब-बारची जास्त चिंता आहे - आ. शेलार
राज्यात ‘अनलॉक’च्या प्राधान्यक्रमावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. ‘मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड तर, त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची चिंता जास्त आहे,’ असा आरोप शेलार यांनी केला. विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्तानं शेलार पुण्यात आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
लव्ह जिहाद हा भाजपचा अजेंडा | लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे - महापौर
उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने, या पार्श्वभूमीवर लवकरच लव्ह जिहाद विरोधात कठोर कायद्याची निर्मिती केली असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले. त्यानंतर हरियाणा व कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मध्यप्रदेश सरकारदेखील आता लवकरच लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रीतील भाजप मधील नेतेमंडळी हा कायदा राज्यात आणावा यासाठी पुढे आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अजब | स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलनं आणि मतदान करणाऱ्या फडणवीसांचा अखंड भारत'चा नारा
महाराष्ट्रात सध्या कराची स्वीट्सवरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या एका नेत्याने मिठाईच्या दुकानातील मालकाला दुकानाचे नाव पाकिस्तानी शहर असल्याने त्या नावातून ‘कराची’ हा शब्द काढून टाकण्यास सांगितले, यासंदर्भात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, ‘अखंड भारत’ वर आमचा विश्वास आहे. मुंबईत सदर घटना घडल्यानंतर फडणवीस यांनी पीटीआयशी बोलताना हे वक्तव्य केले.
4 वर्षांपूर्वी -
शेलार यांच्या विधानाशी असहमती | सुप्रिया सुळेंना आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही - चंद्रकांत पाटील
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी बोलताना शेलारांनी मराठा समाजातल्या स्त्रियांच्या कर्तृत्त्वावर भाष्य केलं. ‘मोठ्या पदावर मोठ्या मनाच्या व्यक्ती फार कमी असतात. ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ पुस्तकात शरद पवारांच्या आई शारदाबाई यांच्याबद्दल जे लिहिलंय, ते अतिशय प्रेरणादायी आहे. मराठा समाजातली कर्तृत्ववान स्त्री मुख्यमंत्री व्हावी, असं मला वाटतं. तसं होणार असेल, तर त्याला माझं समर्थन आहे,’ असं शेलार म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग | पण श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार
भारत-चीन सीमेवर मागील काही महिन्यांपासून तणाव निर्माण झाला आहे, अशीच परिस्थितीत पाकिस्तानच्या सीमेवर प्रामुख्याने काश्मीरमध्ये आहे. यावेळी भारताने पाकिस्तानप्रमाणे चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज असल्याचा सल्ला शिवसेनेने केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दिला आहे. दरम्यान भारत-पाक सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले, त्यापैकी दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेट्या महाराष्ट्रात आल्या. या शवपेट्या जवानांच्या गावी पोहोचल्या तेव्हा महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे पुढारी काय करीत होते? ते मुंबईत छठपूजेची मागणी करीत होते. त्यातले काही मंदिरे उघडा, मंदिरे उघडा असे शंख फुंकत होते, तर काही जण मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्यासाठी प्रेरणादायी भाषणे ठोकीत होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणूक | आ. भातखळकरांवर जवाबदारी | तर आ. शेलार यांचा राजकीय..?
मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ (Mumbai Municipal Corporation Election 2022) मध्ये होणार असून मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकवण्याचा निर्धार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी बोलून दाखवला आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिंकण्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्यादरम्यान, शिवसेनेवर सातत्याने हल्ले करणारे आमदार अतुल भातखळकर यांच्यावर महत्वाची जबाबदारी देखील सोपविण्यात आली आहे. मात्र फडणवीसांनी आमदार अतुल भातखळकर यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची जवाबदारी देताना मुंबईतील भाजपचे महत्वाचे आमदार आशिष शेलार यांचा राजकीय गेम केल्याची चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीतील कोरोनाचे वाढते प्रमाण | महाराष्ट्रात-दिल्ली प्रवास सेवेबाबत महत्वाचा निर्णय होणार?
दिल्लीतील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबई दिल्ली दरम्यानची हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार याबाबतचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत घेतला जाऊ शकतो. मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई हवाई त्यासोबत रेल्वे प्रवास बंद करण्यासाठीचा पत्र व्यवहार संबंधित विभागांना केला जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार | पालिका आयुक्तांचे आदेश
मुंबईतील कोरोनाबाधितांचा पुन्हा वाढणारा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत संसर्ग लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशांप्रमाणे, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच ठेवण्यात येतील. खरंतर,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप सरकारच्या काळातची CBI'ची अवस्था पानटपरी सारखी झालीय - काँग्रेस
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court of India) सीबीआयला (CBI) एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी ‘भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळातची सीबीआयची अवस्था पानटपरी सारखी झालीय’ असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षावर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला केवळ मुंबईतल्या आर्थिक उलाढाल, शेअर बाजारात आणि जमिनींत रस | शिवसेनेचं प्रतिउत्तर
मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ (Mumbai Municipal Corporation Election 2022) मध्ये होणार असून मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा भगवा फडकवण्याचा निर्धार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (State Opposition Leader Devendra Fadnavis) यांनी बोलून दाखवल्यानंतर त्यावर महाविकास आघाडीतील पक्षांकडून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या या निर्धाराची खिल्ली उडवली आहे तर काँग्रेसने देखील या निमित्ताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
...तर पोलीस कोर्टात जाऊन तिच्याविरुद्ध नॉन बेलेबल किंवा बेलेबल वॉरंट मागू शकतात
अभिनेत्री कंगना राणावत (Bollwood Actress Kangana Ranaut) विरुद्ध दाखल असलेल्या खासगी फौजदारी खटल्याप्रकरणी प्राथमिक चौकशी करून कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिले आहेत. या पोलिस तपासात कंगना रनौतने सहकार्य न केल्यास तीच्या कायदेशीर कारवाईला शक्य असल्याचे असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Senior Lawyer Ujjwal Nikam) यांनी मांडले.
4 वर्षांपूर्वी -
कराची स्वीट्स | दोन पक्षातील दोन 'संजय दृष्टी'चे विचार शिवसैनिकाविरोधात जुळले
मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनीच नितीन नांदगावकरांच्या भूमिकेला फाटा देत, अशा प्रकारची आता मागणी करण्यात काहीच तथ्य नसल्याचे सांगितलं आहे. याचबरोबर ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे कराची बेकरीचं नाव बदलण्याच्या मुद्यावरून आता शिवसेनेतच मतभिन्नता असल्याचं उघडपणे समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
रश्मी ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे लक्ष | आशर प्रोजेक्ट्स डीएम'मध्ये आदित्य ठाकरे पार्टनर - सोमैया
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून धक्कादायक आरोप केले होते. मुंबईच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले होते की, ठाकरे सरकार भूखंडाचं श्रीखंड करणारं सरकार आहे. दहिसर येथील जमीन एका बिल्डरने २ कोटी ५५ लाखात घेतली आणि मुंबई महापालिका ९०० कोटीत ती जमीन विकत घेत आहे.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या शब्दालाही राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही | नांदगावकरांचं टीकास्त्र
वाढीव वीजबिल माफ करावं म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर पवारांना निवेदनही दिलं. त्यावेळी पवारांनी या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करतो म्हणून आश्वासनही दिलं. मात्र, त्यानंतरही काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतंय, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नागरिकांनी घाबरून वाढीव वीजबिलं भरु नयेत | आम्ही ग्राहकांसोबत - मनसे आवाहन
कोरोना काळात आलेली वाढीव वीजबिलं सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा मनसेच्यावतीनं राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा अल्टिमेटम मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची घोर फसवणूक आहे. त्यामुळे सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं, जर वीज मंडळाचे कर्मचारी वीज कनेक्शन कापायला आले तर मनसेचे कार्यकर्ते ग्राहकांसोबत असतील.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणूक | भाजप पुड्या सोडेल पण मनसे पुन्हा तीच चूक करणार? - सविस्तर वृत्त
मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकावण्याचा निर्धार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेला महापालिका निवडणुकीत मात देण्यासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनसे- भाजप युतीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आणि जागतिक टॉयलेट डे | अमृता फडणवीसांच्या विचित्र 'राजकीय' शुभेच्छा
दोनच दिवसांपूर्वी “तिला जगू द्या…” हे गाणं पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे मागणी केली होती. मात्र विषयाचा द्वेष न करता नेटकऱ्यांनी त्यांच्या गायकीवरून आपली तीव्र नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीस यांना समाज माध्यमांवर लक्ष केलं होतं. त्या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर देखील होते. दुसऱ्या बाजूला नेटिझन्सनी अमृता फडणवीस यांच्या एकूण गायकीवर डिसलाईक्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL