महत्वाच्या बातम्या
-
उपऱ्या व नाच्या हिंदुत्ववाद्यांनी मंदिरे उघडा आंदोलन पंतप्रधानांच्या घरासमोर करायला हवं होतं
राज्यातील मंदिर उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतल्यापासून नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. आमच्या दबावामुळंच सरकारनं हा निर्णय घेतल्याचं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्षाचे राम कदम, प्रवीण दरेकर यांसारख्या काही नेत्यांनी मंदिरांमध्ये जाऊन याचा आनंद साजरा केला. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून या नेत्यांवर तोफ डागली आहे. ‘भारतीय जनता पक्षाला नक्की काय झालं आहे? महाराष्ट्रातील त्या पक्षाचं डोकं सरकलं आहे का? असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
...तशीच बनवाबनवी 'सरासरी राज्य सरकारने' वीज ग्राहकांसोबत ही केली - आ. आशिष शेलार
वीज बिलाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारने दिलेला शब्द न पाळल्यामुळं आता सर्वसामान्य जनतेसोबतच विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील राज्य सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून सूट किंवा वीजबिल माफी मिळणार नाही, मीटर रिडींगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
भाजपशासित राज्यांमध्ये छटपुजा उत्सव साजरा करण्यावर निर्बंध | भाजप नेत्यांना माहित नाही
कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी छठपूजा साजरी करण्यावर महाराष्ट्र सरकारकडून निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार समुद्र किनारी, नदी किनारी किंवा तलावाच्या काठी हा उत्सव साजरा करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या टीकेवर काँग्रसे प्रवक्ते सचिन सावंत यांनी चोख प्रतिउत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामींनी गरळ ओकलेल्या विषयांना पुन्हा हवा देण्याचा राम कदमांकडून प्रयत्न?
भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालघर जिल्ह्यातील मॉब लिंचिंग प्रकरणी (Palghar Mob Lynching Case) आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केले होते. आमदार राम कदम यांच्या खार येथील निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात होणार होती. मात्र घराबाहेर पडताच पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे. राम कदम यांच्यासह १०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
4 वर्षांपूर्वी -
TRP घोटाळा | रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या प्रिया मुखर्जींची मुंबई पोलिसांकडून तब्बल ५ तास चौकशी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर रिपब्लिकच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून टीआरपी घोटाळ्याच्या तपासाला पुन्हा गती देण्यात आली आहे. काल म्हणजे दिनांक १७ नोव्हेंबर मंगळवारी मुंबई पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या मुख्य ऑपरेटर अधिकारी प्रिया मुखर्जी यांची तब्बल ५ तास कसून चौकशी केल्याचं वृत्त आहे. तत्पूर्वी या घोटाळ्यात एकूण १२ जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये रिपब्लिक वृत्त वाहिनीचे (Republic TV) मुख्य वितरक घनःश्याम सिंग यांचा देखील समावेश आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्यांचा पचका वर्षभरापूर्वी झाला | ते दु:ख विसरायलाच सध्या ते बिहारमध्ये असतात – शिवसेना
महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला नव्हता असे महाराष्ट्रातील फडणवीसांचे पंटर पचकले आहेत. त्यांचा पचका आजपासून वर्षभरापूर्वी झाला व ते दुःख विसरायलाच महाराष्ट्राचे नेते सध्या बिहारला असतात, असे म्हणत शिवसेनेनं भाजपला जोरदार टोला लगावला आहे. महाराष्ट्रातही सगळय़ात मोठा पक्ष विरोधात बसला आहे. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले, पण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेत्याला बिहारातील विजयाचे श्रेय दिले जात आहे याचा आम्हाला आनंद आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सत्तेसाठी लाज आणि हिंदुत्व विकले | मग कार्यकर्त्यांनी दारू विकली तर बिघडले कुठे? - भाजप
माजी मंत्री आणि शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं? पोलीस देखील हफ्त घेत नाहीत का? असं धक्कादायक विधान केले आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. भास्कर जाधवांचं हे विधान 8 नोव्हेंबर 2020 रोजीचं आहे. सध्या त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल देखील होत आहे. तसेच फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका. पहिली म्हणजे मुलींची छेडछाड आणि दुसरी म्हणजे चोरी. ‘बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे’, अशी पुष्टी देखील यावेळी जाधव जोडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब! जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही - निलेश राणे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा आज आठवा स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांच्या स्मारकावरून मनसेचा सवाल | तर शिवसेनकडूनही प्रतिउत्तर
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा आज आठवा स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्मृतीदिन सत्ता गेल्याचं दुःख | म्हणाले बाळासाहेबांची विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray) यांचा आज आठवा स्मृतीदिन. या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील शिवसैनिकांच्या, हिंदूंच्या आणि अनेक राजकीय व्यक्तींच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस सर्व स्तरांतून अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’तून उजाळा देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
उ. महाराष्ट्रात भाजप आधीपासून मजबूत | पवार ५० वर्षांपासून राज्याचे दौरे करत आहेत
अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी सातत्यानं चालू आहे. अशातच आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्यामुळे शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द | काय आहे कारण?
एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपाला धक्के देण्यास सुरुवात केली होती. काही दिवसातच त्यांनी भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणलं आणि भारतीय जनता पक्षाला खान्देशात राजकीय धक्के देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता शरद पवार देखील खान्देशात राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी सज्ज झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
राजकारणाच्या आखाड्यात देवाला ओढण्याचा भाजपाचा नेहमीच प्रयत्न राहिला - सचिन सावंत
कोरोना आपत्तीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मंदिरं तसेच इतर धर्मियांची प्रार्थना स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचा धोका टळला नसला तरी सामान्य लोकांच्या मनातील भीती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. दरम्यान, अनलॉक ५ ची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर राज्य जवळपास पूर्णपणे अनलॉक झालं आहे. त्याला अपवाद केवळ मुंबई लोकल राहिली असून ती सर्वांसाठी खुली झालेली नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिहार हे मोठं राज्य असल्यामुळं भाजपने तसा निर्णय घेतला | दरेकरांचं वक्तव्य
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाअंती एनडीएला सर्वाधिक जागा मिळाल्या होता. राज्यात आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरून भारतीय जनता पक्ष द्वितीय स्थानी तर नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्ष कोणता निर्णय यावर सर्वांचं लक्ष होतं. मात्र एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं. मात्र त्यानंतर भाजपवर उलटी टीका होऊ लागली असून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत आडमुठी भूमिका घेतल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे. परिणामी भाजपच्या नेत्यांकडून यावर स्पष्टीकरण येण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता, कृष्णकुंज | शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून विविध संघटना आणि सामान्य लोकं आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडून मदतीची अपेक्षा करत आहेत. विशेष म्हणजे त्यातील अनेक प्रश्न तडीस देखील लागत असल्याने अशी भेट घेणाऱ्यांची संख्या अजून वाढताना दिसत आहे. शिवसेनेकडे राज्याचं मुख्यमंत्री पद असताना देखील मनसेकडे समस्या घेऊन जाणाऱ्यांची संख्या अजून वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवाजी पार्कचं नामांतर | आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क नावाची पाटी लागणार
मुंबई दादरमधील प्रसिद्ध शिवाजी मैदानाचं नाव अखेर अधिकृतपणे बदलण्यात आलं आहे. यापुढे शिवाजी पार्क मैदान ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’ या नावाने ओळखले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून या मैदानाला अधिकृत पाटी लावण्यात आली आहे. या मैदानाच्या नामांतराचा प्रस्ताव मार्च महिन्यात पालिका सभागृहात मांडण्यात आला होता.
4 वर्षांपूर्वी -
ओबामा यांना भारताबद्दल किती माहिती आहे? | राऊतांचा सवाल
राहुल गांधी (Rahul Gandhi) घाबरलेल्या विद्यार्थ्यासारखे आहेत; ज्याने आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि त्याला शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. परंतु, त्याच्याकडे त्या विषयात प्रावीण्य मिळवण्याची योग्यता नाही किंवा प्रावीण्य मिळवण्यासाठी उत्कटता नाही, असे मत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी राहुल गांधींबद्दल त्यांच्या आत्मचरित्रात व्यक्त केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई लोकल प्रवास | शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
अनलॉक ५ आणि मुंबई लोकलसंदर्भात मोठी महत्वाचं वृत्त समोर आलं आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा द्यावी यासाठी विशेष विनंती पश्चिम आणि मध्य रेल्वेकडे केली होती. सदर मागणी रेल्वे विभागाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करता येणार असून रोजची प्रवासाची दगदग कमी होण्यास मदत होऊ शकते.
5 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिकच्या ५ गुंतवणूकदारांना समन्स जाताच भाजपला जाग आल्याची चर्चा? - सविस्तर
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून भारतीय जनता पक्षातील नेते अर्णब गोस्वामींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आता भाजप नेत्यांचे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीसोबत असलेले कनेक्शन्स समोर येण्यास सुरुवात झाली आहे. अर्णब गीस्वामी यांनी २०१७ मध्ये रिपब्लिक टीव्हीची स्थापना केली होती. त्यामध्ये राजीव चंद्रशेखर यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत स्वतःकडे मोठा हिस्सा घेतला होता. मात्र ३ एप्रिल २०१८ रोजी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपकडून राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली होती. त्याबाबत त्यांनी स्वतः ट्विट केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
भाजपा खा. राजीव चंद्रशेखर रिपब्लिक'मध्ये भागीदार होते | म्हणून फडणवीसांनी ते प्रकरण दाबलं - काँग्रेस
अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून भारतीय जनता पक्षातील नेते अर्णब गोस्वामींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आता भाजप नेत्यांचे अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीसोबत असलेले कनेक्शन्स समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB