महत्वाच्या बातम्या
-
सरकार नियमानुसार अर्नबची काळजी घेतेय | राज्यपालांनी जास्त चिंता करू नये - छगन भुजबळ
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी (Anvay Naik Suicide Case) सध्या अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात (Arnab Goswami in Taloja Jail) ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तुरूंगात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्याशी चर्चा केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृती व सुरक्षेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
युती काळातील दुष्काळ | तेव्हा विदेशात खाऱ्या पाण्यावर मजा | आता अर्नबसाठी कदमांची पायपीट
Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. दरम्यान, मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी पोलिस आणि ठाकरे सरकारला दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फटाके फोडण्यास बीएमसीची बंदी | पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही आहे सूट...
मुंबईत शहरात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मुंबई महापालिकेने ((Mumbai Municipal Corporation Ban Crackers during Diwali Festival) बंदी घातली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेनं एक अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर पत्रकानुसार, शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठे फोडण्यास सक्त मनाई घालण्यात आली आहे. कुठल्याही हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, मैदान यांच्या आवारात फटाके फोडण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, खासगी म्हणजेच फक्त घराच्या, इमारतीच्या आवारात १४ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सौम्य स्वरूपाचे फटाके (Permission is granted only during Laxmi Pujan Day) फोडता येणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रिपब्लिकवर झळकण्यासाठी कदमांचे स्टंट | म्हणाले मी तळोजा कारागृहात जातोय
Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. अर्णब गोस्वामींना झालेल्या अटकेवरून भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका सुरू आहे. दरम्यान, मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात आहे. हिंमत असेल तर रोखून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी पोलिस आणि ठाकरे सरकारला दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोलखोल | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला मोदी सरकारची मंजुरी होती | आता कोर्टात याचिका
महाविकास आघाडी सरकारने पर्यावरणाच्या अनुषंगाने आरेतील मेट्रो ३ चा कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईकरांनी या निर्णयावर खूप आंनद व्यक्त केला होता. पर्यावरण प्रेमींनी आणि आरे वाचावा आंदोलनात रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईने देखील राज्य सरकारचे आभार मानले होते. मात्र याला खोडा घातला तो केंद्रातील मोदी सरकारने आणि त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मात्र आता भारतीय जनता पक्षच तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. कारण आता मोदी सरकारचीच पोलखोल झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी प्रमाणेच राम कदम म्हणाले 'कान खोलकर सुन लो'...अगर
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी आज तळोजा कारागृहात करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी पुन्हा राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामींना अटक केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी लाक्षणिक उपोषण केले होते. शुक्रवारी सकाळी आमदार राम कदम हे मंत्रालयाच्या गेटसमोर फुटपाथवर आंदोलनाला बसले, त्यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारवर थेट दडपशाहीचा आरोप केला.
4 वर्षांपूर्वी -
अन्वय नाईक प्रकरण फडणवीस सरकारनं दाबलं होतं | जयंत पाटील यांचा गंभीर आरोप
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांची रवानगी आज तळोजा कारागृहात करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी पुन्हा राज्य सरकारवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, विरोधकांच्या टीकेला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर देताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष केलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. “अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आलेली आहे. राज्य सरकारचा त्यात कोणताही हस्तक्षेप नाही,”अशी भूमिका देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या संवादात अनेक प्रश्न अनुत्तरित | प्रवीण दरेकरांची टीका
दरम्यान, मुंबई मेट्रोची ३ आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला स्थलांतरित करण्यावरून विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहेत. या सर्वांची उत्तरं आमच्याकडे आहे. त्यांना योग्य वेळी आम्ही समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मीठागरांची जमीन आहे असं सांगून विकास कामांच्या प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. जर्मनीच्या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावर विरोधी पक्ष नेते (विधान परिषद) प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मला जेलरने सकाळी मारलं | माईक फक्त रिपब्लिकचे | अर्णब संबंधित तथ्यहीन वृत्त पेरणी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. कालच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याने त्याची चिंता अजून वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्नबसाठी आंदोलनं | तर अन्वय नाईक कुटुंबातील महिलांची भाजप IT सेल'कडून बदनामी
अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना पोलिसांनी अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी तळोजा कारागृहात केली आहे. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देशभर अर्णब गोस्वामींच्या समर्थनार्थ आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामींच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याला राज्य सरकार जवाबदार असेल
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. कालच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याने त्याची चिंता अजून वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामी यांची शाळेतील उपकारागृहातून तळोजा कारागृहात रवानगी
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत प्रत्येक दिवशी वाढ होताना दिसत आहे. कालच अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली असतानाच आता त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतल्याने त्याची चिंता अजून वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत
महाविकास आघाडी सरकार पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. राज्यात कर्तव्यावर असताना कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदत देण्यात आली. कोरोना आपत्तीच्या संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या काही पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे अशा खऱ्या कोविड योध्याच्या कुटुंबियांना डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून आर्थिक मदतीचे धनादेश राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
अर्नबच्या वकिलांनी कोर्टात म्हटले | न्याय दंडाधिकारी न्यायालय मुद्दाम जामीन सुनावणी लांबवतंय
अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याविरोधात गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून अर्णब यांच्यावतीने आज ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मांडत आहेत. तसेच ज्येष्ठ वकील पोंडा अर्णब यांची बाजू मांडत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
गोध्राकांडानंतर भाजप नेत्यासाठी देखील रस्त्यावर न उतरणारे | आज अर्नबसाठी रस्त्यावर
देशातील राजकीय विरोधकांचा एकेरी उल्लेख करुन विचित्र प्रकारे चिखलफेक करणे आणि मनुष्यवधाचा गुन्हा असणाऱ्या व्यक्तीसाठी जोरदार आंदोलन करणे यातून देश अराजकतेकडे जाण्याचा प्रयत्न होत असल्याचा घणाघात आज सामनातून करण्यात आला आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंचा भारतीय जनता पक्षातील नेते आणि समर्थकांकडून अनेकदा एकेरी उल्लेख झाला. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंवर राजकीय चिखलफेक करून त्यांच्या विरोधात मोठ्याप्रमाणावर अभियान सुरु करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
भाजपने टाळलं पण राष्ट्रवादीने वचन पाळलं | खडसे विधान परिषदेवर
राज्यपालांकडून विधान परिषदेत नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी १२ जणांच्या नावांची यादी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे अधिकृतपणे सोपवण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीकडून १२ सदस्यांच्या नावांची निश्चिती करण्यात आली आहे. एनसीपी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून प्रत्येकी ४ जणांची शिफारस करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपची पोलखोल | कांजूरमार्गच्या जागेसाठी फडणवीस सरकारनेच केंद्राकडे प्रस्ताव दिलेला
आरेतील जंगल वाचविण्यासाठी आणि मुंबई शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेत प्रकल्प मुंबईतील कांजूरमार्गच्या जागेवर हलवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर भाजप आणि ठाकरे सरकारमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याच पाहायला मिळालं होतं. धक्कादायक म्हणजे काही दिवसातच कांजूरच्या जागेवर थेट केंद्राने मालकीचा दावा ठोकला आणि वाद चिघळणार याचे संकेत मिळू लागले. विशेष म्हणजे केंद्र सरकार यामध्ये अडथळे आणत असल्याचा संदेश सामान्य लोकांपर्यंत आधीच गेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाकडून विधिमंडळ सचिवांना कारणे दाखवा नोटीस | २ आठवड्यांचा कालावधी
Republic TV’चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने विधिमंडळ सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला सविस्तर उत्तर देण्यासाठी कोर्टाने २ आठवड्यांचा कालावधी विधिमंडळ सचिवांना दिला आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक केली जाऊ शकत नाही, असं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णबसाठी आंदोलनं | भाजपा रिपब्लिकवर स्वतःची फुकट जाहिरात करुन घेतंय - कुणाल कामरा
स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनांची खिल्ली उडवली आहे. त्याला कारण ठरलं आहे ते अर्णब गोस्वामींची झालेली अटक आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून सुरु झालेली आंदोलनं. समाज माध्यमांवर पोस्ट करत त्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब के साथ सारा देश सिर्फ 'पोश्टरपे' | पण राम कदमांसोबत एकच
Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी लाक्षणिक उपोषण केले आहे. आज सकाळी आमदार राम कदम हे मुंबईत मंत्रालयाच्या गेटसमोरच्या फुटपाथवर आंदोलनासाठी बसले, त्यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारवर थेट दडपशाहीचा आरोप केला. मात्र काही वेळांनी स्थानिक पोलिसांनी आमदार राम कदम यांना ताब्यात घेतले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो