महत्वाच्या बातम्या
-
राज ठाकरे यांची महत्वाच्या विषयांवर शरद पवारांशी फोनवर चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली होती. राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज ठाकरेंनी भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
विधानपरिषद | उर्मिलाचं संवाद कौशल्य फलदायी ठरणार | शिवसेनेच्या संपर्कात
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उर्मिला मातोंडकरमध्ये उत्तम संवाद कौशल्य असून ती माध्यमांना देखील सुज्ञ प्रकारे तोंड देण्यास सक्षम असल्याचं सर्वानी पाहिलं होतं. त्यामुळे राज्यसभेला प्रियांका चतुर्वेदींनंतर आता विधानपरिषदेच्या तोंडावर उर्मिलाच्या नावाची चर्चा रंगली आहे आणि त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
कंगनाच्या अडचणी वाढल्या | न्यायालयाकडून पोलिसांना चौकशीचे निर्देश
विशिष्ट समुदाय व धर्माविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधाने केली आणि त्या समुदायाचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला, या आरोपांप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत व तिची बहीण रंगोली चंडेल (Kangana Ranaut and her sister Rangoli Chandel) यांची चौकशी करण्याचे अंधेरी न्यायदंडधिकारी न्यायालयाने (Magistrate court in Mumbai’s Andheri) गुरुवारी निर्देश दिल्याने या दोघींच्या अडचणींत आणखी भर पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुंबईतील कोविड रुग्णालयातील आग सतर्क कर्मचाऱ्यांनी विझवली
मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या दहिसर येथील कांदरपाडा परिसरात कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या कोविड रुग्णालयात अचानक आग लागली. यावेळी रुग्णालयातील परिचारिकेने वेळीच प्रसंगावधान दाखवत मोठी दुर्घटना टाळली आहे. कोरोना बाधित रुग्णआंवर उपचारासाठी दहिसर येथील कांदरपाडा रुग्णालयात असलेल्या अतिदक्षता उपचार केंद्रात एका रुग्णाच्या शेजारी असलेल्या वैद्यकीय उपकरणाला अचानक आग लागली. यावेळी घाबरून न जाता आणि प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.
4 वर्षांपूर्वी -
मनसे पदाधिकारी राकेश पाटील यांची हत्या इमारतीमध्ये ग्रिलचे काम घेण्याच्या वादातुन
उल्हासनगर शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षावर अंबरनाथ शहरात झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी सायंकाळी आणखी एका मनसे नेत्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. मनसे अंबरनाथ उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांची तलवारीने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल घडली.
4 वर्षांपूर्वी -
आधी गर्दीच्या विभाजनासाठी तंत्रज्ञानातून उपाय शोधा | राज्य सरकारला सल्ला
सरसकट लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने पश्चिम रेल्वे,मध्य रेल्वेला पत्र पाठविले होते. या पत्राला रेल्वेकडून उत्तर आले आहे. २२ आणि २७ ऑक्टोंबरला राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीचा संदर्भ देऊन, रेल्वेने कार्यालयीन वेळा बदलण्या संदर्भात या पत्रात उल्लेख केला आहे. ज्यामुळे गर्दीच्या वेळी अडचण होणार नसल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. लोकल सुरू झाल्यावर गर्दीचे नियोजन कसे करणार ? अशी विचारणा या पत्राद्वारे रेल्वेने राज्य सरकारला केले आहे. शिवाय लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे यांची लवकर बैठक व्हावी. यामध्ये गर्दी नियोजन संदर्भात तांत्रिक दृष्ट्या मार्ग काढावा असे यात म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे खूपच स्पष्ट बोलतात | त्यांना स्पष्ट बोलण्याची सवय आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एकहाती भगवा फडकला पाहिजे असे म्हटले. त्यावरुन चर्चांना सुरुवात झाली. यावर विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पक्ष वाढवण्यासाठी भगवा एकहाती फडकवा असं बोलणं गैर नाही, सगळेच आपापला पक्ष वाढवत असतात. पण आम्ही प्रत्यक्षात ती कृती करून दाखवतो अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, शरद पवार घराबाहेर पडतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार हेच राज्य चालवतात | उद्धव ठाकरेंना बोलून काहीच उपयोग नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात एकहाती भगवा फडकला पाहिजे असे म्हटले. त्यावरुन चर्चांना सुरुवात झाली. यावर विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पक्ष वाढवण्यासाठी भगवा एकहाती फडकवा असं बोलणं गैर नाही, सगळेच आपापला पक्ष वाढवत असतात. पण आम्ही प्रत्यक्षात ती कृती करून दाखवतो अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, शरद पवार घराबाहेर पडतात असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
लोकांना २००० बिल येत होतं तिथे १० हजार बिल येत आहे | राज्य सरकारला माहिती आहे मग..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज ठाकरेंनी भेट घेतली आहे. यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट | शरद पवारांना भेटण्याचा सल्ला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज ठाकरेंनी भेट घेतली आहे. यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
कलर्सला खऱ्या मराठीची दहशत | राज ठाकरेंकडे मराठीत | मुख्यमंत्र्यांकडे इंग्रजीत माफीनामा
जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारल्याने कलर्स वाहीनीला माफीनामा लिहावा लागलाय. जान सानू यानं देखील बिग बॉससमोर स्वत: च्या कृत्याची माफी मागितली आहे. ही क्लीप वायरल झाल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत कलर्सने २४ तासात माफी न मागितल्यास प्रक्षेपण बंद पाडू असा इशारा दिला होता. त्यानंतर कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपला माफीनामा पाठवला पण या दोन्ही माफीनाम्यात भाषेचा फरक होता. मुख्यमंत्र्यांना पाठवलेला माफीनामा कलर्सने इंग्रजीत तर मनसेला पाठवलेला माफीनामा मराठी भाषेत लिहीला होता. यावरुन मनसेने राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
4 वर्षांपूर्वी -
महाघोषणा | शिवसैनिकांनो महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्यास सज्ज राहा - उद्धव ठाकरे
राज्यात एकहाती शिवसेनेचा भगवा फडकवण्यास सज्ज राहा, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले आहेत. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते, बुधवारी रात्री उशिरापर्यंत उद्धव ठाकरे आणि जिल्हाप्रमुखांची बैठक सुरु होती, रात्री १० वाजता सुरु झालेली बैठक तब्बल १ वाजता संपली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | एका महिलेकडून वर्दीचा अपमान | दुसरीने संयम दाखवल्याबद्दल भरचौकात सत्कार केला
काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली होती. एका महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली होती. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली होती. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी ठोकल्या बेडया आहेत. सादविका रमाकांत तिवारी (वय -30) राहणार मशीद बंदर आणि मोहसीन निजामउददीन खान (26) राहणार भेंडी बाजार यांच्या विरोधात त्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
जान कुमार सानूला बिग बॉसमधून हाकला | शिवसेनेकडून इशारा
सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठी द्वेषी | मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो | मनसे इशारा
सध्या ‘बिग बॉस’चे 14वे पर्व सुरू जोशात सुरू आहे. यात रोज काहीना काही नवे वाद उभे राहत आहेत. स्पर्धकांची आपापसांत रोजची भांडणे सुरू आहेत. आता यात प्रेमाचा त्रिकोण समोर आल्यानंतर नवी खडाजंगी सुरू झाली आहे. गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू आहेत. या वादादरम्यान जान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. यानंतर आता मनसेच्या अमेय खोपकरांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेंग्विन आणि कंगनाच्या खटल्यासाठी मुंबईकर कर भरतात | आता काय शिल्लक आहे
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरुद्धच्या खटल्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल 82 लाख 50 हजार रुपयांचा खर्च केला आहे. माहिती अधिकार कायद्यातंर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारवर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई लोकल ट्रेन | मुंबईकरांसाठी राज्य सरकारकडून सकारात्मक संकेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी बंद असलेली लोकल सेवा सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारने संकेत दिले आहेत. लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आता हळूहळू अनलॉक सुरु झालं असून चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळतो.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत ड्रोनद्वारे हल्ला होण्याची शक्यता | मुंबई पोलिसांकडून महत्वाचा निर्णय
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता होण्याची शक्यता येत आहे. पुढील ३० दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तहेर विभागाने दिली आहे. त्याचवेळी हा हल्ला ड्रोनद्वारे हा हल्ला होण्याची शक्यता असल्याने मुंबई शहरात ड्रोन उडविण्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Go Corona Go नारा देणाऱ्या आठवलेंना कोरोनाची लागण
आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना करोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांना करोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. करोनाची साथ नव्यानेच आली होती तेव्हा गो करोना करोना गो अशी घोषणा दिल्याने रामदास आठवले हे चांगलेच चर्चेत आले होते.
4 वर्षांपूर्वी -
TRP Scam | फॉरेन्सिक ऑडिट सुरू | रिपब्लिकच्या ५ गुंतवणूकदारांना समन्स
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिषेक कोलवडेच्या चौकशीत, रिपब्लिक टीव्ही पाहण्यासाठी वाहिनीच्या मालक, चालकासह संबंधितांनी पैसे पुरविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार त्यांना पाहिजे आरोपी म्हणून घोषित करत, त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. टीआरपी घोटाळ्यात रविवारी अभिषेक कोलवडे उर्फ अजित उर्फ अमित उर्फ महाडिक याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात करण्यात आलेली दहावी अटक आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो