महत्वाच्या बातम्या
-
म्हणजे देश येड्यागबाळ्यांच्या हाती आहे असेच दानवेंना म्हणायचे आहे काय
सरकार चालविणे येड्यागबाळ्यांचे काम नाही, असे विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. ते विधान शिवसेनेला चांगलेच खटकलेले आहे. त्या विधानावरुन शिवसेनेने आजच्या (१९ ऑक्टोबर) सामनाच्या अग्रलेखातून रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे तसेच मोदी सरकारच्या आर्थिक कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
संजय राऊत राष्ट्रपती होतील | तेव्हा मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल.....कोणी म्हटलं?
कुणाल कामरा यांचा ‘Shut Up Ya Kunal’ कार्यक्रम नेटिझन्समध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात कामरा हे अनेक राजकीय नेत्यांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना दिसतात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनबद्दल जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा स्वतः कुणाल कामरा यांनी एक ट्वीट केलं होतं. ‘Shut Up Ya Kunal’ च्या दुसऱ्या सीझनचे पहिले पाहुणे म्हणून येण्यासाठी संजय राऊत तयार झाले तरच मी हा कार्यक्रम सुरू करेन, अन्यथा नाही, असं कामरा यांनी या ट्वीट केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिक टीव्हीसाठी पैसे पुरविणाऱ्याला पोलीस कोठडी
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्याबाबत अधिकृत माहिती दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
सोशल मीडियामार्फत दोन गटांमध्ये धार्मिक वैर वाढवणे | PoK वक्तव्य | FIR दाखल होणार
अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
TRP Scam | मुंबई पोलीस ऍक्शनमध्ये येताच अँटी महाराष्ट्र टिवटिव मंदावली
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी त्याबाबत अधिकृत माहिती दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाच्या बंगल्याबाहेर लोकांना पैसे देऊन चिथावणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकाराला अटकपूर्व जामीन
रिपब्लिकन टीव्ही या वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रदीप भंडारी यांच्यावर खार पोलिसांनी आयपीसी कलम ३५३ (मारहाण करणे), १८८ आणि बॉम्बे पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला होता. शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. आर.एम. सदरानी यांनी भंडारी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
5 वर्षांपूर्वी -
बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन नेमकं काय | अन्यथा मुंबई पोलीस - गृहमंत्री
बॉलिवूड आणि ड्रग्स कनेक्शन यावरुन राजकारण देखील तापले आहे. यावर कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. तसेच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही एक महत्वाची माहिती दिली आहे. एनसीबीने तपास केला नाही तर मुंबई पोलीस तपास सुरू करणार, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शन नेमकं काय आहे? याबाबत तपास सुरू आहे. भाजप नेत्यांच्या ड्रग कनेक्शनबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महिलांना शुभदिनी केंद्राकडून आनंदवार्ता नाही | रेल्वे प्रवासाच्या मान्यतेला वेळ लागणार
मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले झाले आहेत. १७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करता यासाठी राज्य सरकारने रेल्वे बोर्डाकडे विनंती केली होती. त्यानुसार सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सेवा सुरु असेपर्यंत सर्व महिला प्रवास करु शकतील असं पत्रात म्हटलं होतं. मुंबई आणि MMR मधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी असं विनंतीत म्हटलं होतं. त्यासाठी Q R कोडची गरज असणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सर्व महिलांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा
उपनगरीय लोकल सेवा आणि मुंबई मट्रो सेवा पूर्ववत कधी सुरू होणार याची लाखो प्रवाशांना प्रतीक्षा असतानाच राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत खूप मोठा निर्णय घेतला होता. मुंबईतील मेट्रोसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या कित्येक वर्षांपासून काही जण रामाच्या नावानं राजकारण करत आहेत - आ. प्रताप सरनाईक
भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभरात घंटा नाद आंदोलन करण्यात आली होती. लॉकडाऊन शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. मात्र मंदिरांचं टाळं काही उघडलं नाही, असा आरोप भाजपने केला होता. या आंदोलनात भाजपसह विश्व हिंदू परिषदही सहभागी होती.
5 वर्षांपूर्वी -
महिला बचत गटातील महिलांचे कर्ज माफ करावं | मनसेची अर्थमंत्र्यांकडे मागणी
महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ करण्याची मागणी मनसेने केली आहे. तसेच बचतगटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या दंडेलशाहीविरुद्ध कठोर पावलं उचलावीत ह्यासाठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. महिला बचतगटांनी मायक्रो फायनान्स कंपनी कडून घेतलेले कर्ज ते वर्षानुवर्षे नियमितपणे फेडत असतांना सध्याच्या काळात या कर्जाची परतफेड ही अशक्य होतं आहे. त्यामुळे संबंधित महिलांचे कर्ज माफ करण्याचे निवेदन मनसेने अजित पवार यांना दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
बॉलीवूड संपवण्याचा डाव आहे | मुख्यमंत्री ठाकरेंकडून थेट इशारा
‘बॉलीवूडला गेल्या काही दिवसांपासून ठराविक वर्गाकडून बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
३ महिन्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती | BARC चा निर्णय
टीआरपी घोटाळ्यानंतर BARCने मोठा निर्णय घेतला आहे. पुढील १२ आठवडे टीआरपी रेटिंग जाहीर केले जाणार नाही, असे BARCने जाहीर केले आहे. मुंबई पोलिसांनी या घोटाळ्याचा आरोप केला होता. दरम्यान, टीआरपी घोळाप्रकरणी रिपब्लिक टीव्हीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.
5 वर्षांपूर्वी -
सँडलवूड ड्रग्ज प्रकरण | विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
ड्रग्ज प्रकरणात आता अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरावरही धाड टाकण्यात आली आहे. सँडलवूड ड्रग्ज प्रकरणात (sandalwood drug scandal) विवेकचा मेहुणा आदित्य अल्वाचं (Aditya Alva) नाव आहे. तो सध्या गायब असल्याने आता त्याच्या तपासासाठी बंगलुरू पोलीस मुंबईत आले आहेत आणि त्यांनी विवेक ओबेरॉयच्या घरात तपास सुरू केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
TRP Scam | तुमचं कार्यालय मुंबई हायकोर्ट जवळच आहे | तिकडे याचिका करा - सुप्रीम कोर्ट
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासाला आव्हान देणारी रिपब्लिक टीव्ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने रिपब्लीकला मुंबई हायकोर्टात दाद मागावी असे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने रिपब्लिकवर टिपणी करत म्हटले की मुंबई पोलीस आयुक्तांच्या मुलाखतीत समजले की तुमचे वरळी येथे एक कार्यालय आहे जे फ्लोरा फाउंटेन जवळ आहे आणि तेथून मुंबई हायकोर्ट जवळच आहे. त्यामुळे तुम्ही तिथून दाद मागावी. त्यानंतर चॅनेलचा वकील हरीश साळवे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेतली.
5 वर्षांपूर्वी -
कॉमेडी हिंदी | मैने मेरी गळती कि माफी मांगते हुवे खुद्द जुर्माना भर दिया - आ. प्रसाद लाड
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (१३ ऑक्टोबर २०२० रोजो) राज्यभरातील मंदिरे खुली करण्यात यावीत यासाठी आंदोलनं केली. मुंबईमध्येही सिद्धीविनायक मंदिरासमोर भाजपाच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते प्रसाद लाड या नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी तोंडावरील मास्क निघाल्याचे आमदार प्रसाद लाड यांना पत्रकाराने निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर लाड यांनी बीएमसी कार्यालयात जाऊन मास्क न घातल्याबद्दल दंड भरला आणि त्याची हिंदीत ट्विटरवरुन दिली. मात्र त्यांचं वाचून समाज माध्यमांवर धमाल रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज भेटीचा पायगुण | उद्यापासून सर्व ग्रंथालये सुरू होणार
उपनगरीय लोकल सेवा आणि मुंबई मट्रो सेवा पूर्ववत कधी सुरू होणार याची लाखो प्रवाशांना प्रतीक्षा असतानाच राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत खूप मोठा निर्णय आज घेतला आहे. मुंबईतील मेट्रोसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | राज्यात ग्रंथालये आणि मुंबईतील मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार
उपनगरीय लोकल सेवा आणि मुंबई मट्रो सेवा पूर्ववत कधी सुरू होणार याची लाखो प्रवाशांना प्रतीक्षा असतानाच राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत खूप मोठा निर्णय आज घेतला आहे. मुंबईतील मेट्रोसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोण आहे ती? नवरा मुख्यमंत्री झाल्यावर बोलू लागली - विशाखा राऊत
मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात लेटरवॉर सुरू झाल्यानं राजकारण तापलं. यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्या. या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काल रात्री उशिरा ट्विट करत उडी घेतली. अमृता यांनी मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यानंतर आता अमृता यांना शिवसेनेच्या महिला आघाडीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना घाई | मुंबई मनपाच्या स्थायी समितीला ६०० मलईदार प्रस्तावांच्या मंजुरीची घाई -सविस्तर वृत्त
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीची पहिली बैठक २१ ऑक्टोबरला आहे. या एकाच बैठकीत कोट्यवधी रुपयांचे ६०० प्रस्ताव झटपट मंजुरीसाठी सादर होणार असल्याचे वृत्त आहे. भाजपने चर्चेशिवाय प्रस्ताव मंजूर करणे चुकीचे असल्याचे सांगितले तर सत्ताधारी शिवसेनेने स्थायी समितीचे अध्यक्ष नियमाला धरुन निर्णय घेतील अशी भूमिका घेतली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL