महत्वाच्या बातम्या
-
मुंबई पोलिसांकडून अर्णब गोस्वामीला अजून एक नोटीस | काय आहे कारण?
बनावट टीआरपी घोटाळ्यात (Fake TRP Scam) अडचणीत आलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी आणखी एक दणका दिला आहे. सीआरपीसीच्या कलम १०८ नुसार त्यांच्यावर कारवाई का करू नये, असा सवाल करत मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जांबावडेकर यांनी अर्णबला १६ ऑक्टोबरला हजर राहण्यास सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
वीज पुरवठा खंडित करून घातपात घडवायचा होता? | ऊर्जामंत्र्यांचं ट्विट
महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झालं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित होण्यामागे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपा आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन | मुंब्रा येथून दोघे अटकेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना धमकीचे फोन येण्याच्या घटना ताजा असतानाच आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना मुंब्रा येथून अटक करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुबईला PoK म्हणणाऱ्यांचे हसत स्वागत करणे माझ्या हिंदुत्वात बसत नाही - मुख्यमंत्री
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( CM Uddhav Thackeray ) यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात इंग्रजीतून खरमरीत पत्र लिहिले होते. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशाच पद्धतीने राज्यपालांना पत्र लिहून उत्तर दिलं आहे. राज्यपाल भगतसिंह यांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाचा विसर पडलाय का? असा सवाल केला होता. याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं म्हटलं आहे. मुंबईला पीओके म्हणणाऱ्यांचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्वात बसत नाही असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यपालच हिंदुत्वावरून राजकीय आखाड्यात | मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना सडेतोड उत्तर
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सोमवारी एक पत्र लिहिलं. या पत्रातून त्यांनी राज्यातील मंदिरं पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. अतिशय खरमरीत रोखानं लिहिलेल्या या पत्रात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाचा मुद्दाही अधोरेखित केला.
5 वर्षांपूर्वी -
सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत
आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला, असे रोहित यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
Mumbai Electricity OFF | आता केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार
मुंबईमधील काल (१२ ऑक्टोबर) खंडित झालेला वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात पूर्ववत करण्यात आला आहे. २००० मेगावॉट पेक्षा जास्त पुरवठा खंडित झाला होता, आता जवळपास सर्वच वीज पुरवठा सुरु झाला आहे. उर्वरित पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत केला जाईल अशी माहिती केंद्रीय उर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी काल दुपारी दिली होती. राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता असे त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
Power Cut | प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई आणि परिसरात सोमवारी अचानक वीज पुरवढा खंडीत झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर अडीच ते तीन तासांनी वीज पुरवढा सुरळीत व्हायला सुरुवात झाली. राज्यात कोरोनाचं संकट असल्याने हॉस्पिटल्समधल्या वीज पुरवढ्याबाबत प्रशासन चिंतेत होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिलेत.
5 वर्षांपूर्वी -
Mumbai Power Cut | BMC Alert | लाइट आली, आता पाण्याचं टेन्शन
मुंबई व उपनगरांतील वीज पुरवठा आज दुपारी सुमारे साडेतीन तास ठप्प होता. युद्धपातळीवर बिघाड दुरूस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असला तरी पाणीपुरवठ्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबई आणि ठाण्यातील नागरिकांना याची मोठ्या प्रमाणात झळ बसणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई व भावी पिढीसाठी गरजेच्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान परवडलं
सरकारच्या या निर्णयामुळे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत. “आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी रुपये आधीच खर्च झालेल, स्थगितीमुळे १३०० कोटी पाण्यात गेले. शिवाय ४००० कोटींचा आर्थिक भार वाढला. कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास २४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवर पडेल. एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडेल. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. ही जनतेची मोठी दिशाभूल आहे,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
Electricity OFF | डिझेलच्या जनरेटवर रुग्णालयात वीज पुरवठा करण्याची कसरत
सोमवारी सकाळच्या सुमारास आठवड्याची सुरुवात झालेली असतानाच आणि ऐन कार्यालयीन कामांना वेग आलेला असतानाच संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. अचानक मुंबई शहरात वीज गेल्यामुळं अनेक कामांमध्ये अडथळे आल्याचं पाहायला मिळालं. पुन्हा रुळावर येणाऱ्या रेल्वे सेवेवरही याचा थेट परिणाम झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आरे वाचवा नाही... आरे वाचवलं | पर्यावरण मंत्र्यांचं मोजक्या शब्दात ट्विट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. यात त्यांनी मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय जाहीर केला. मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड आता आरे काॅलनीऐवजी कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वटिद्वारे यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळं महाराष्ट्राच्या जनतेचं दिवसाला पाच कोटीचं नुकसान - आ. भातखळकर
मेट्रो कारशेडच्या कामाला मागील नऊ महिन्यापासून स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचं दिवसाला पाच कोटी रूपयांचं नुकसान होत आहे. याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, याबाबत त्यांनी चर्चा करणं गरजेचे आहे. असं वक्तव्य कांदिवली पूर्वचे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सगळ्यांच्या एकत्रीत लढ्याला यश | अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकिय जमीनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे. दरम्यान, यावर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीच्या एका निर्णयाने आरेतील २१९ दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजातींना जीवदान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकिय जमीनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Unlock 5 | मुंबई लोकल, मंदिरं, जिम कधी सुरू होणार | मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. त्यावेळी मुंबई लोकल कधी सुरू होणार याविषयी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘राज्यांतर्गंत रेल्वेची वाहतूक सुरू केली आहे. हळूहळू काही गोष्टी सुरु केल्या आहेत. लोकलसाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. कारण मला गर्दी नकोय. सगळ्यांनाच लोकलनं जायचंय. लोकलची संख्या वाढल्यानंतर आपण त्यातून अधिक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ. राज्यांतर्गंत हरिद्वारपर्यंत वाहतूक सुरू झाली आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांचं अशक्य काम उद्धव ठाकरेंनी शक्य केलं | आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकिय जमीनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
TRP Scam | रिपब्लिक चॅनलचे सीईओ विकास खानचंदानी चौकशीसाठी दाखल
टीआरपी घोटाळा (Fake TRP Case) प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेले असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांपुढे रिपब्लिकची धाकधूक | चौकशीला गैरहजेरी | न्यायालतात धाव
टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) शिवा सुब्रमण्यम सुंदरम यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. आज त्यांना मुबई पोलिसांपुढे जबाब नोंदविण्यासाठी हजर राहायचे होते. मात्र मुंबई पोलिसांची आक्रमक कारवाई बघता रिपब्लिक टीव्ही वाहिनीवर देखील दडपण असल्याचं पाहायला मिळालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fake TRP घोटाळा प्रकरण | गुन्हे शाखेकडून आणखी 6 जणांना समन्स
टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेले असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत. रिपब्लिकच्या 4 वरिष्ठ पदावरील व्यक्तींना हे समन्स जारी करण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB