महत्वाच्या बातम्या
-
पश्चिम रेल्वे मार्गावर २ महिला विशेषसह ६ फेऱ्या वाढणार
रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. सोमवारपासून (२८ सप्टेंबर २०२०) पश्चिम रेल्वे मार्गावर ५०० ऐवजी ५०६ फेऱ्या (local trip) धावणार आहेत. वाढवण्यात आलेल्या सहा लोकल फेऱ्यांपैकी २ महिला विशेष (Ladies special) आहेत. वाढील लोकल फेऱ्यांमुळे गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंची बदनामी करणाऱ्यांसोबत कशाला जायचे | राऊतांवर सेनेत नाराजी
मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. यावरुन शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर टीका केली आहे. ज्या कारणांसाठी एनडीए स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले हे सत्य स्वीकारुन नवा झेंडा फडकवावा लागेल. सध्या तरी अकाली दल हा एनडीएचा शेवटचा खांबही कलथून गेला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारणही त्यामुळे निस्तेज होताना दिसत आहे, अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी सावध | शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी पोहचले
शनिवारची संध्याकाळ महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासाठी खळबळ उडवून देणारी ठरली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात अचानक झालेल्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन्ही नेत्यांच्या भेटीनं वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले आहेत. संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. या भेटीत त्यांनी संजय राऊत यांना घातलेल्या अटींचाही उल्लेख केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान्यांची लूट आणि राज्यातील मंत्र्यांना ५ महिने वीजबिलंच नाही | मनसेकडून संताप
लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांची जिथे हजारो रुपयांच्या वीजबिलामुळे दमछाक होत होती, तेथे राज्यातील 15 मंत्र्यांना गेल्या 4 ते 5 महिन्यांची वीजबिलं दिली गेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील महिलांसाठी आनंदाची बातमी | प. रेल्वेवर लेडीज स्पेशल ट्रेन सुरु होणार
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईची लाईफ लाईन असलेली रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होतायत. रोडवरील ट्रॅफीक आणि बसच्या धक्काबुक्कीतून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. त्यामुळे ट्रेन लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी सर्व स्तरातून होतेय. दरम्यान मुंबईतील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
5 वर्षांपूर्वी -
समविचारी पक्ष असल्याने युतीत निवडणूक लढवली | आता भाजपशी वैचारिक मतभेदांचा साक्षात्कार?
देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी झालेल्या भेटीबद्दल खुलासा केला. संजय राऊत यांनी म्हटले की, ही बैठक गुप्त नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या भेटीबद्दल माहिती होती. ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्याचा आमचा विचार आहे. त्याविषयीच आम्ही काल चर्चा केली. परंतु, आपली जाहीर मुलाखत घेण्यात यावी, अशी इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याचे राऊत यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस आणि संजय राऊतांची भेट | पण भूकंप शरद पवारच घडवतील - सविस्तर वृत्त
मुंबई, 26 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. TV9 मराठीने याबाबत वृत्त दिलं आहे. मात्र सदर भेट सामनाच्या मुलाखतीसंदर्भात असल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत शूटिंग दरम्यान ड्रग्ज घ्यायचा | साराची NCB'ला माहिती
ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री सारा अली खानची आज चौकशी करण्यात आली. त्यामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांच्या पाठोपाठ सारादेखील एनसीबी कार्यालयात दाखल झाली होती. त्यामुळे आज दीपिका, सारा आणि श्रद्धा या तिघींची एनसीबी चौकशी करकरण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
कांदा निर्यातबंदीतून पाकचा आर्थिक लाभ हा एक घोटाळाच - शिवसेना
‘कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंदी व त्यातून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा एक घोटाळाच मानावा लागेल, पण त्यावर सरकार बोलायला तयार नाही. देशातील कामगार व शेतकरी अशा कोंडीत फसले आहेत की, त्यांना जगणे कठीण झाले आहे. हे सगळे विषय गंभीर आणि चिंताजनक आहेत. देशातला विरोधी पक्ष क्षीण बनला आहे म्हणून सरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये’ असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
5 वर्षांपूर्वी -
दोस्तीत कुस्ती | रकुलने रियावर जवाबदारी ढकलली | रियानेच ड्रग्ज मागितली म्हणाली
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनबाबत आता अनेक धक्कादायकबाबी पुढे येत आहेत. रिया चक्रवर्ती हिने ड्रग्ज मागितल्याची कबुली रकुल प्रीतसिंह हिने दिली आहे. एनसीबीच्या चौकशीत ही कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, आपण कधीही ड्रग्ज न घेतल्याचा रकुलचा दावा आहे. एनसीबीकडून रकुलची पाच तास चौकशी करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
लोकल प्रवाशांना आणखी दिलासा | मध्य रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय
मध्य रेल्वेने अत्यावश्यक कर्मचाऱ्यासाठी धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्या वाढवल्यात. आजपासून मध्य रेल्वेवर ६८ अतिरिक्त लोकल धावणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरी लोकल फेऱ्यांची एकूण संख्या ४२३ इतकी झाली आहे. कोरोनाकाळात लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या आधी पश्चिम रेल्वेनेही लोकल फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांवर गरळ ओकणाऱ्या रिपब्लिकच्या पत्रकारांची पोलिसांमुळेच सुटका
मुंबईत रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं आपल्याला एनडीटीव्ही व एबीपीच्या पत्रकारांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. रिपब्लिकचे पत्रकार प्रदीप भंडारी यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भंडारी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्य बोलण्याची काय किंमत आहे हे बघा असं सांगत एनडिटिव्ही व एबीपीच्या गुंड पत्रकारांनी आपल्याला मारहाण केल्याचं म्हटलं आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये प्रदीप भंडारी यांना इतर पत्रकारांकडून धक्काबुक्की होताना दिसत आहे. प्रदीप भंडारी यांनी ट्विट करत एनडीटीव्ही आणि एबीपीच्या पत्रकारांचा गुंड असा उल्लेख केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - रिपब्लिकच्या पत्रकारांना पब्लिकसमोर चोप | मुंबईकर पत्रकार एकवटले
मुंबईत रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं आपल्याला एनडीटीव्ही व एबीपीच्या पत्रकारांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. रिपब्लिकचे पत्रकार प्रदीप भंडारी यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. भंडारी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्य बोलण्याची काय किंमत आहे हे बघा असं सांगत एनडिटिव्ही व एबीपीच्या गुंड पत्रकारांनी आपल्याला मारहाण केल्याचं म्हटलं आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये प्रदीप भंडारी यांना इतर पत्रकारांकडून धक्काबुक्की होताना दिसत आहे. प्रदीप भंडारी यांनी ट्विट करत एनडीटीव्ही आणि एबीपीच्या पत्रकारांचा गुंड असा उल्लेख केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याला करोनाची लागणी झाली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनानं गाठलं आहे. बुधवारी शिंदे यांनी करोनाची चाचणी केली होती त्यानंतर आजच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
क्रिकेटपटूंच्या पत्नी, स्टार्स ड्रग्जचे सेवन करतात | शर्लिन चोप्राचा मोठा गौप्यस्फोट
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. त्यानंतर सध्या बॉलिवूडमध्ये ड्रग्ज कनेक्शनबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती, ड्रग पेडलर्ससह अन्य जणांना अटक केली आहे. सांगितले जात आहे की अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरोच्या (NCB) रडारवर कमीत कमी 50 हून अधिक सेलिब्रिटी आहेत. यामध्ये बड्या निर्मात्यांबरोबरच दिग्दर्शकांचाही समावेश आहे. अमली पदार्थाबाबत तपास करीत असलेल्या एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोनसह श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि अन्य जणांचा चौकशीसाठी समन्स पाठविला आहे. एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महिनाभर पडणारा पाऊस अवघ्या १२ तासांत | तुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांत मुसळधार पावसाचं धुमशान सुरूच आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडाली. लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली. पण असं असतानाही पाऊस काही थांबवण्याचं नाव घेत नाही.
5 वर्षांपूर्वी -
ड्रग्ज प्रकरण | दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खानला NCB ची समन्स
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहे. पुढील तीन दिवसांत प्रत्येकाला जबाब नोंदवण्यासाठी हजेरी लावावी लागणार आहे. दीपिका पादुकोण मुंबईत नाही, त्यामुळे ती 25 सप्टेंबरला एनसीबीसमोर जबाब नोंदवू शकते. रकुल प्रीत सिंग आणि सायमन खंबाटा यांना उद्या एनसीबीसमोर हजर व्हावे लागेल. श्रद्धा कपूर आणि सारा अली खान 26 सप्टेंबरला एनसीबीसमोर हजर होतील.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई तुंबली | पावसाने गोरगरिबांचे संसार उध्वस्त | पण तरीही ते घरीच
मुंबईत रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे या भागात पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे सेवा, रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. मुंबईतील लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर रस्त्या-रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. तर बेस्ट बसची वाहतूकही वळवण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये लवकरच राजकीय भूकंप | दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर | राष्ट्रवादीची बैठक
भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील, गुलाबराव देवकर उपस्थित आहे. या बैठकीत हा नेता राष्ट्रवादीत आल्यावर त्याचा काय फायदा होऊ शकतो याबाबतची चाचपणी केली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
नेहमीचाच पावसाळा | मुंबईकरांनो शांतता राखा | बदल्या, टेंडरवाटप सुरू आहे - आ. आशिष शेलार
काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील बहुतांश भाग जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB