महत्वाच्या बातम्या
-
अर्णब गोस्वामीवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी
पालघर येथील साधुंचा झुंडबळी तसेच वांद्रे स्थानकाबाहेरील स्थलांतरितांची गर्दी याबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते रद्द करण्याच्या मागणीसाठी गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गोस्वामी यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येते, असे नमूद करत न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने कारवाईस स्थगिती दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
श्वसनासंबंधी २० आजारांसाठी मोफत उपचार | शुल्क आकारल्यास हॉस्पिटलला पाचपट दंड
महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी केले आहेत. श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी मोफत उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर नवनीत राणा यांची कोरोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. नवनीत राणा यांच्या तब्येतीत शनिवारी सुधारणा झाली. त्यांना अतिदक्षता विभागामधून बाहेर हलवले होते. त्यानंतर प्रकृती सुधारल्याने रवी राणा यांना शनिवारी आणि नवनीत राणा यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा यांच्यासह रवी राणा यांची कोरोनाची चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंडियन मेडिकल असोसिएशनकडून राऊतांच्या निषेध | थेट राजीनाम्याची मागणी
‘डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडर बरा’ अशा वक्तव्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका होत आहे. भाजपने त्यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेत माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र संजय राऊत यांनी या प्रकरणावर आपल्या स्टाइलने खुलासा करत भाजपला फटकारून काढले होते.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची महाराष्ट्र सैनिकांना भावनिक साद | काय म्हटलं आहे पत्रात
नांदेडमधील किनवट येथील मनसेच्या शहराध्यक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केली, यावेळी त्याने राजसाहेब माफ करा, अशा आशयाने सुसाईड नोट लिहिली होती. जात आणि आर्थिक यावर राजकारण होत आहे. त्यामुळे पुढील राजकारण मी करु शकत नाही असं सांगत त्याने आत्महत्या केली. यानंतर मनसेच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून सुनील ईरावार याला श्रद्धांजली वाहण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
मंदिर-मशिदीच्या निर्माणावर पैसे खर्च करण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुधारण्याची गरज | किशोरी पेडणेकर
सध्या जगभरावर कोरोनाचं संकट आहे, मुंबईतही कोरोना महामारी आहे. या संकटातून सगळ्यांना एक धडा मिळाला आहे. मंदिर , मशिदी, चर्च, गुरुद्वारा यांच्या निर्माणासाठी जे पैसे खर्च केले जातात त्यापेक्षा आपल्याला आरोग्य यंत्रणा सुधारणा करण्याकडे लक्ष द्यायला हवं असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडले आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशानंतर आता शिव दवाखाने | पण इथे कंपाऊंडर असतील
मी जागतिक आरोग्य संघटनेविषयी WHO केलेल्या वक्तव्याचा आपल्याकडे निषेध होण्याचे कारण नाही. उलट या वक्तव्यासाठी भाजपवाल्यांनी मला पाठिंबा द्यायला हवा. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही WHO वर टीका केली होती. परंतु, ट्रम्प हे पंतप्रधान मोदींचे मित्र आहेत. त्यामुळे भाजपने या मुद्द्यावर मला पाठिंबा द्यायला हवा, असे संजय राऊत यांनी सांगितले. यापूर्वी मोदींनी लंडनला जाऊन अपमान केला होता. आपल्याकडच्या डॉक्टरांना पैसे कमावण्यात रस असल्याचे बोलले होते. मग मोदींनी बोलल्यावर का टीका होत नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
त्यांना डॉक्टरांपेक्षा जास्त कळतं म्हणाले | मग म्हणाले डॉक्टरांना काही कळत नाही - केदार शिंदे
मी डॉक्टरांचा कोणताही अपमान केलेला नाही. शाब्दिक कोटी आणि अपमान यांच्यातला फरक आपल्याला कळायला हवा, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंपाऊडरला डॉक्टरपेक्षा जास्त ज्ञान असते, अशा आशयाचे विधान केले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या काही संघटना आक्रमक झाल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
उलट माझं कौतुक केलं पाहिजे | डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे
‘डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडर बरा’ अशा वक्तव्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका होत आहे. भाजपने त्यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेत माफी मागावी अशी मागणी केली आहे. अखेर संजय राऊत यांनी या प्रकरणावर आपल्या स्टाइलने खुलासा करत भाजपला फटकारून काढले आहे.
4 वर्षांपूर्वी -
योग्य खबरादारी घेऊन मंदिरं उघडली गेली पाहिजेत | राज ठाकरेंची भूमिका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मंदिरे बंद असल्याने पुजारी आणि मंदिराच्या आसपासचे व्यावसायिक नाराज आहेत. अद्यापही मंदिरे सुरु करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने त्र्यंबकेश्वरच्या पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आलं होतं. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी या पुजाऱ्यांनी भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक'वर कोरोनाचा शिरकाव | पवारांची चाचणी निगेटिव्ह
राज्यातील कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस वाढत असून अनेक राजकीय नेत्यांनाही या व्हायरसने लक्ष्य केलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. सिल्व्हर ओकवरील 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी खासदार निलेश राणेंना कोरोनाची लागण | ट्विटरवरून माहिती दिली
माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांना करोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. करोनाची लक्षणं दिसल्यानंतर करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
पार्थने केलेल्या मागणी मागे त्याचे स्वतःचे म्हणून काही विचार असतील | तो परिपक्वच आहे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार याची पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे चांगलीच कानउघडणी केली होती. त्यानंतर पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात हालचालींना वेग आला होता. अखेर, पार्थ यांची समजूत काढण्यासाठी बारामतीत पवार कुटुंबीयांची बैठक झाली.
4 वर्षांपूर्वी -
इंग्रजी चॅनेलचा संपादक तुमचे रोज कपडे उतरवतो तरी सर्व नेते शेपट्या घालुन बसलेत - संदीप देशपांडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची अटक आणि सुटका झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील राजकारण तापू लागलं आहे. महाराष्ट्र सैनिक आणि शिवसेनेच्या नेत्यांदरम्यान खटके उडताना दिसत आहेत आणि त्यातून निरनिराळ्या राजकीय टिपण्या सुद्धा दोन्ही बाजूने होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ठाण्यातील राजकरणात अस्तित्वात असले तरी तोंड न उघडणारे खासदार देखील सध्या प्रकाशझोतात आल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ असं म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावं, आम्ही वाट पाहतोय - अविनाश जाधव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची अटक आणि सुटका झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील राजकारण तापू लागलं आहे. महाराष्ट्र सैनिक आणि शिवसेनेच्या नेत्यांदरम्यान खटके उडताना दिसत आहेत आणि त्यातून निरनिराळ्या राजकीय टिपण्या सुद्धा दोन्ही बाजूने होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ठाण्यातील राजकरणात अस्तित्वात असले तरी तोंड न उघडणारे खासदार देखील सध्या प्रकाशझोतात आल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑक्सफर्ड लसीची मानवी चाचणी | मुंबईतील केईएम आणि नायर हॉस्पिटलची निवड
कोरोनावरच्या ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी आता मुंबईतही होणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी करार झाला आहे. भारतामध्ये ऑक्सफर्डची लस यशस्वी झाली तर त्याचं उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट करणार आहे. कोव्हिशिल्ड या सिरमच्या लसीशीची चाचणी लवकरच भारतात सुरू होणार आहे. देशभरातल्या एकूण १० सेंटरमध्ये १६०० निरोगी लोकांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं | राऊतांच्या त्या विधानाचा भाजपकडून समाचार
शनिवारी संजय राऊत यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या डब्ल्यूएचओ वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळेच कोरोना वाढला आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत गणेशविसर्जनासाठी ऑनलाईन बुकिंगने वेळ घ्यावी लागणार | ही आहे वेबसाईट
मुंबईकरांना आपल्या जवळचे नैसर्गिक तसंच कृत्रिम विसर्जन स्थळही निवडता येणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बुकिंगची व्यवस्था केली आहे. मात्र, हे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. याबाबत महापालिकेने व्यवस्था केली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पालिकेने हे नियोजन केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Independence Day 2020 | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण
‘सुमारे पाऊणशेच्या घरात पोहोचलेले हिंदुस्थानी स्वातंत्र्याचे वयोमान काळाच्या कसोटीवर मोजले तर निश्चितच कमी नाही. स्वातंत्र्याबरोबरच सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी होण्यासाठी कुठल्याही राष्ट्रासाठी हा तसा पुरेसा कालखंड म्हणावा लागेल. एक स्वतंत्र देश म्हणून आपण परिपक्व आणि प्रगल्भ निश्चितच झालो, पण ‘कोरोना’ ते ‘चीन’ या स्वातंत्र्यावरील दुहेरी संकटाचा विचार करता सामर्थ्यशाली आणि स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने आपण किती मजल मारली याचे चिंतन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वांनीच करायला हवे’, असं भाष्य शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यविषयक ज्ञानाचं कौतुक | पण WHO'च्या नादाला लागूनच कोरोना वाढला - राऊत
शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक खासदार संजय राऊत हे सर्वज्ञानी असल्याची कोणतीही शंका आता कोणाच्याही मनात राहिली नसावी. कोरोनासारख्या जग व्यापणाऱ्या संकटावरही त्यांच्याकडे उपाय असावा. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जी ‘वादळी’ मुलाखत त्यांनी घेतली त्यात जागतिक आरोग्य संघटनाही कोरोनासंदर्भात आपला सल्ला घेईल, अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांची तारिफ केली होती. एबीपी माझावर आयोजित ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात या विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजब वक्तव्य केलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो