महत्वाच्या बातम्या
-
सुशांत प्रकरणी CBI चौकशीला मी विरोध करणार नाही, पवारांच्या विधानाने अनेकांना आश्चर्य
माझा महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मात्र सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करायची असेल, तर मी विरोध करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
5 वर्षांपूर्वी -
नाईट लाईफ गॅंगला मोठं योगदान देणाऱ्या डिनो मोरियाला पद्म पुरस्कार मिळणार नाही अशी...
वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत 5 कॅबिनेट मंत्री, 2 राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा 9 जणांचा यात समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही - शरद पवार
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतची आत्महत्या दुर्दैवी | पण मीडियातील चर्चा पाहून आश्चर्य वाटत - शरद पवार
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या वडिलांबद्दलचं वक्तव्य | चूक झाली असेल तर विचार करावा लागेल - संजय राऊत
महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं काम काही जण करत आहेत. बदनाम करणारे कोण ते योग्य वेळी आम्ही सांगू, राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका, महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. तसेच मला सुशांतच्या कुटुंबीयांची काय मागणी आहे ते माहिती नाही. मुंबई पोलीस सक्षम आहेत, तेच हे हा तपास करतील. मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन, त्यांच्यावर दबाव आणून कोणाला काही लपवण्याची दुर्बुद्धी सूचली असेल तर ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो, या प्रकरणाला न्याय मिळो, अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
जाहीर माफी मागा | सुशांतच्या नातेवाईकाची संजय राऊतांना कायदेशीर नोटीस
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरुन देशात चांगलंच राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. सुशांतच्या मृत्युप्रकरणात शिवसेना आणि भाजपा ऐकमेकांना लक्ष्य करत आहेत. त्यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुबीयांसंदर्भात एक विधान केले होते. सुशांतच्या वडिलांचे दुसरे लग्न झाल्याचे सांगत सुशांत व त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते, असा दावाही राऊत यांनी केला होता. आता, संजय राऊत यांच्या विधानावरुन सुशांतच्या कुटुंबीयांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेने अवाजवी वीज बिलं माफ करण्याची मागणी केंद्राकडे करावी - ऊर्जामंत्री नितीन राऊत
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळानंतर महावितरण आणि इतरही काही वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाट वीज बिलं देण्यात आली. यासंदर्भात सध्या बरीच नाराजी दिसून येत आहे. पण, वीज बिलांची तपासणी केल्यास मुळात वीज बिलांच्या देय रकमेचा आकडा वाढवलेला नाही, असं मत खुद्द राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लुटमार | ठाकरे सरकार लूटमार रोखण्यात असमर्थ
एकाबाजूला राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांच्या समस्या दिवसांगणिक वाढतच असताना राज्य सरकार कोणतेही निर्णय घेण्यास तयार नाही. केवळ चालढकलीचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे. या कठीण परिस्थितीत भाजपा-महायुती पूर्ण ताकदीनिशी दूध उत्पादकांच्या पाठिशी असून त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, असा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
गोपीनथ मुंडे, न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करा - शिवसेना
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजप ज्या पद्धतीने सीबीआय चौकशीची मागणी करत आहे तशीच गोपीनाथ मुंडे आणि न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचीही करा, असे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आणले जात आहे. त्याबाबत आणि बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे याबाबत एका खासगी वृत्तवाहीणीच्या कार्यक्रमात सावंत बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
केंद्र सांगत जिम सुरु करा | राज्य म्हणतं नको | यांना वेगळी अक्कल आहे का - राज ठाकरे
तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार आहात? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने अजूनही जिम चालकांना जिम सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक राज्यात आंदोलन करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांची कसून चौकशी करा - सुब्रमण्यम स्वामी
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सोमवारी आणखी एक खळबळजनक दावा केला. सुशांतचा मृतदेह रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी नेला जात असताना त्याचा घोट्याखालील पाय फिरलेला (तुटल्यासारखा) होता. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांकडून ही माहिती पुढे आली होती. त्यामुळे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने CBI सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील पाच डॉक्टरांची कसून चौकशी केली पाहिजे. त्याशिवाय, या प्रकरणाचा गुंता सुटणार नाही, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.
5 वर्षांपूर्वी -
एका दगडात दोन पक्षी | एकाच्या नियुक्तीने दोघांचं महत्व कमी होणार? - नाराजीचा सूर
रवींद्र वायकर यांची पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं देखील समोर आलं आहे. आमदारांशी समन्वय ठेवण्यासाठी वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आपली कामं होत नसल्याची शिवसेना आमदारांची तक्रार असल्याने वायकर यांची नियुक्ती करण्याबाबत हालचाली सुरु आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंचा सुशांत प्रकरणाशी काय संबंध | हिंमत असल्यास भाजपने जाहीरपणे त्यांचं नाव घ्यावं
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही असं राऊतांनी म्हटलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
सर्व घरांच्या आत काय होतं त्याची माहिती सार्वजनिक घरगडी सेनेचा अध्यक्षांकडे दिसते
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राजकीय वाद उफाळला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या बेछुट आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणात उडी घेत सुशांतच्या वडिलांबद्दल गंभीर आरोप केला होता. पण, सुशांतच्या मामाने राऊतांचा दावा खोडून काढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांतचे कुटुंबीय संजय राऊत यांच्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राजकीय वाद उफाळला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या बेछुट आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणात उडी घेत सुशांतच्या वडिलांबद्दल गंभीर आरोप केला होता. पण, सुशांतच्या मामाने राऊतांचा दावा खोडून काढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आ. रवींद्र वायकर यांना सरकारमध्ये पुन्हा महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या अगदी जवळचे मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नसल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे ११ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना सीएमओ कार्यालयात समन्वयकाचे पद देण्यात आले होते. तर महाविकास आघाडी सरकारसाठी आपल्या मंत्रीपदाची आहुती देणारे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांना केंद्रातील समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली होती. या दोन्ही पदांसाठी शासकीय लाभ, भत्ते देण्यात येत असल्याचा शासन निर्णयही काढण्यात आला होता. मात्र विरोधकांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उकरून काढला.
5 वर्षांपूर्वी -
BREAKING | न्हावा-शेवा बंदरातून तब्बल १ हजार कोटींचे ड्रग्ज ताब्यात
नवी मुंबईच्या पोर्टमधून १ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. अफगाणिस्तानमधून इराणच्या माध्यमातून इथे ड्रग्ज आणण्यात आले होते. डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलीजन्स ( DRI) आणि कस्टम विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. तस्करांनी हे ड्रग्ज प्लास्टिक पाईपमध्ये लपवून ठेवले होते. हे आयुर्वेदीक औषध असल्याचे ते सांगत होते. ड्रग्ज इम्पोर्टचे कागदपत्र बनवणाऱ्या दोन कस्टम हाऊस एजंट्सना देखील अटक करण्यात आलीय. याशिवाय चार इतर इंपोर्टर आणि फायनान्सर्सना अटक करण्यात आलीयं. दोघांना आज मुंबईत आणलं जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
उलट भाजपमध्ये गेलेले आमदारच पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर - नवाब मलिक
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा पक्षात येण्यासाठी आतूर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधाक दोन्ही एकमेकांचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आलेले आहेत. त्यातच आता नवाब मलिक यांनी आणखी एक दावा केल्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा कोण कोणत्या पक्षात जाणार याची चर्चा सुरु झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारची कोकणातील चाकरमान्यांसाठी नियमावली | परप्रातीयांवर मेहेरबान
गणेशोत्सवासाठी १२ ऑगस्टपर्यंत जे नागरिक एसटी बस किंवा अन्य खासगी वाहनाने कोकणात येतील त्यांना १० दिवस होम क्वारंटाइन करण्यात येईल. त्यासाठी कोरोना चाचणीची आवश्यकता नाही. १२ ऑगस्टनंतर जे नागरिक कोकणात जातील त्यांच्यासाठी कोरोना चाचणी अनिवार्य आहे. ती निगेटिव्ह असेल तरच प्रवासाची परवानगी मिळेल.
5 वर्षांपूर्वी -
युरोपियन देशांप्रमाणे मुंबईत आवाजाचा नुमना घेऊन कोविड -19 टेस्ट करण्याचा प्रयोग
जगभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता ५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. काल दिवसभरात राज्यात तब्बल १२ हजार ८२२ नवे करोनाबाधित आढळले तर २७५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL