महत्वाच्या बातम्या
-
तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण
मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर आजतागायत तब्बल सव्वाचार लाखांहून अधिक मुंबईकरांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी साधारण एक लाख मुंबईकरांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यापैकी ७० टक्के करोनाबाधित बरे झाले आहेत. मात्र आजघडीला नवी दिल्लीमध्ये सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या असून चाचण्यांच्या बाबतीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
4 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी सोडणार, पण नियम...
कोरोना संकट आणि आगामी गणेशोत्सव याची सांगड कशी घालायची असा प्रश्न मुंबईतल्या चाकरमान्यांना पडला होता. कारण शिमगा आणि गणेशोत्सव हे कोकणी माणसाचे पारंपारिक आवडते सण आहेत. यासाठी सुट्टी टाकून, खाडे करुन चाकरमानी गावी जातात. सध्या कोरोना संकटामुळे त्यांच्या प्रवासावर सावट आलं होतं. पण आता चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर येतेय.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या अपयशावरुन लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचं भूमिपूजन - बाळासाहेब थोरात
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला होता.
4 वर्षांपूर्वी -
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी आणि बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा
गणपतीसाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना येत असलेल्या अडचणींच्या मुद्द्यावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) राज्य सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी येतात. मात्र, राज्य सरकार बकरी ईद साजरी करण्यासाठी सुविधा देत आहे, अशी घणाघाती टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपाडे यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीतील मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण
देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आता मुंबईच्या पालकमंत्र्यांनाच कोरोनाने ग्रासले आहे. मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी सर्वांच्या मनाला चटका लावून गेली आहे. सध्या त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. परंतु अद्यापही त्याच्या आत्महत्येमागचे ठोस कारण समोर आलेले नाही. सुशांतच्या आत्महत्येबाबतीत आतापर्यंत ३५ जबाब नोंदवण्यात आले आहेत. आता वांद्रे पोलिसांनी दिग्दर्शक आदित्य चोप्रांचा जबाब नोंदवला आहे. तब्बल चार तासांच्या या प्रक्रियेनंतर ते पोलीस स्थानकाबाहेर आले.
4 वर्षांपूर्वी -
अंतिम वर्ष परीक्षा वाद सुप्रीम कोर्टात, न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या मायभगिनी असुरक्षित, दिशा कायद्याचं काय झालं
मुंबईत कोरोनानं थैमान घातलं असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्वारंटाइन सेंटरमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्यात आला होता. पनवेलमधील नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये गुरुवारी रात्री हा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार घडला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बारक्याच्या खांद्यावर कोण बसलाय बघा..शेमड्या शिवसैनिकांना सांगा NCP'वर केस ठोकायला
काल ट्विटरवर #BabyPenguin हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होता. यामध्ये ठाकरे सरकारची थेट मुघल राजशी तुलना करणाऱ्या एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग अधिकच ट्रेंड होऊ लागला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ट्विटर युजर समीत ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. पण यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत का आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता.
4 वर्षांपूर्वी -
यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेचा आग्रह धरुन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नये - आ. रोहित पवार
दरम्यान, या निर्णयाला राहुल गांधी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. याविषयाला अनुसरून राहुल गांची यांनी म्हटलं होतं की, “कोरोना आपत्तीत परीक्षा घेणं चुकीचं आहे. मागील वर्षाच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावे असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. दरम्यान मनुष्यबळ विकास आणि UGC च्या या निर्णयावर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली होती.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमुळे नोकऱ्या गेल्याने मराठी तरुण आत्मविश्वासाने स्वतःच्या उद्योगांकडे
अनपेक्षितपणे आलेले करोना संकट आणि त्यामुळे जाहीर झालेले लॉकडाउन यांमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना चालू असलेला छोटा उद्योग बंद करावा लागला. पण, हातावर हात धरून न बसता, ‘रडायचे नाही लढायचे’, हा निश्चय करून नव्या उमेदीने अनेकांनी लघुउद्योग, घरगुती खाद्यपदार्थ पुरवणारी सेवा, छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. ही पुन्हा शून्यातून सुरुवात असली तरीही हिंमत न हारता आहे त्या परिस्थितीला भिडण्याचे धैर्य अनेकांनी दाखवले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती
मुंबईतील मालाडमध्ये अब्दुल हमीद मार्गावरील मालवणी परिसरात एका चाळीतील दुमजली घर कोसळलं. ही दुर्घटना गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखाली दबून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 6 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
संजय राऊत पवार साहेबांचाच माणूस, नारायण राणेंचं टीकास्त्र
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राणे म्हणाले, “सगळ्यांना माहिती आहे, करोनामुळे देशात व जगात हाहाकार झाला आहे. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. करोनावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात. याविषयी मुलाखतीत मार्गदर्शक केलं असतं, तर मी समजलं असतो की ही भीमटोला मुलाखत यशस्वी झाली. शरद पवारांवर जितकी टीका सामनातून झाली, तितकी कोणत्याही वर्तमानपत्रातून झाली नाही. शरद पवारांविषयी मला आदर आहे, पण सामनातील ही मुलाखत हेच राजकारण आहे,” अशी टीका राणे यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
यापूर्वी ठाकरेंना कोण काय बोललं तर शिवसैनिक जाऊन चोपायचे, आताचे शेंबडे तक्रार करतात
ट्विटरवर #BabyPenguin हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. यामध्ये ठाकरे सरकारची थेट मुघल राजशी तुलना करणाऱ्या एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग अधिकच ट्रेंड होऊ लागला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ट्विटर युजर समीत ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना नेत्याच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करा म्हटलं म्हणून कारवाई?- संजय निरुपम
राजस्थानमधील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्याविरोधात कारवाई केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचीही पक्षातून हकालपट्टी होण्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मी फक्त शिवसेनेवर टीका केली. त्याचा पक्षविरोधी कारवाईशी संबंध काय?, असं सांगतानाच मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली आहे का? असा सवाल संजय निरुपम यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
#BabyPenguin ट्विटवर ट्रेंड, युवासेनेकडून पोलिसात तक्रार दाखल
ट्विटरवर #BabyPenguin हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. यामध्ये ठाकरे सरकारची थेट मुघल राजशी तुलना करणाऱ्या एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग अधिकच ट्रेंड होऊ लागला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ट्विटर युजर समीत ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, थोड्याच वेळात या वेबसाईट्सवर पहा
अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून HSC म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १६ जुलै २०२०, गुरुवारी दुपारी १ वाजता हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन
राज्याच्या पहिला महिला निवडणूक आयुक्त आणि प्रसिद्ध लेखिका नीला सत्यनारायण यांचे आज कोविड-१९मुळे निधन झाले. त्यांच्यावर अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान सकाळी चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती आणि लॉक-अनलॉकच्या गोंधळामुळे गटारीचा सुद्धा निरुत्साह
कोरोना संसर्गामुळे निर्माण परिस्थिती लक्षात घेऊन पालिकेने जवळपास सर्वच धर्मांचा सणांवर निर्बंध घातले आहेत. अगदी गणेश विसर्जनासाठी देखील चौपाट्यांची गरज लागणार नाही अशीच स्थिती आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईमध्ये पाच ठिकाणी अतिरिक्त कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रॅन्टरोड, ताडदेव, मलबार हिल, मुंबई सेंट्रल आणि गिरगाव येथे कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
गुगल आणि जिओ मिळून अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. Jio Platforms Limited चा 7.8 टक्के वाटा Google कडे असेल. अशा प्रकारे आता JPL मध्ये फेसबुक, इंटेल (Intel), क्वालकॉम (Qualcomm) आणि गुगल असे 4 मोठे भागीदार असतील. Google च्या गुंतवणुकीची घोषणा RIL चे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) केली.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती