महत्वाच्या बातम्या
-
कॉमेडीयन झाले आता केतकी चितळेच्या पोस्टने पुन्हा वाद
अग्रिमा जोशुआनंदेखील कॉमेडी करताना शिवाजी महाराजांवर विनोद केले. याविषयी नेटिझन्सनी संताप व्यक्त केला. अग्रिमा जोशुआने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या असून तिच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियात सुरु झाली. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अग्रिमा जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली. यानंतर तिने लेखी माफीनामा सादर केल्याचे सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनावरील टॉसिलिझीम ४०० एमजी इंजेक्शनचा काळा बाजार
राज्य सरकारने आदेश देवून 24 तासही उलटले नाही तोच पोलीस दलाने आपले कौशल्य दाखवत टॉसिलिझीम 400 एमजी इंजेक्शनच्या काळा बाजारावर धडक कारवाई केली आहे. ठाणे ग्रामीण पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई आहे.
5 वर्षांपूर्वी -
बाप्पाच्या भक्तांना यंदा मंडपात ना दर्शन, ना हार-फुलेही अर्पण करता येणार
सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. भारतातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. तर अनेक धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवही रद्द करण्यात आले. आषाढी वारीही कोरोनाच्या सावटातच पार पडली, तर दहीहंडी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सवावरही कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय अनेक मंडळांनीही घेतला आहे. अशातच यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने नियमावली जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली
राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. अशात राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. महाविकासआघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील विसंवाद समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून अनेक राजकीय हालचाली सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बैठक पार पडणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
युजीसीच्या निर्णयाविरुद्ध आदित्य ठाकरेंची टीका, राहुल गांधींचाही विरोध
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
राजगृह तोडफोड प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राजगृहाला संरक्षण देण्याची आंबेडकरी जनतेची आणि आंबेडकर कुटुंबाची मागणी पूर्ण झाली आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत एकमताने राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
राज्य बोर्डाचा १०वीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा १५ ते २० जुलैदरम्यान
कोरोनाचं संकट आणि त्यामुळे करावा लागलेला लॉकडाऊन यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल खोळंबले आहेत. हे निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान लागणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निकालाबद्दलची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
८ पोलीस शहीद झाले तेव्हा समाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते कुठे होते? - प्रदीप शर्मा
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचं नाही - शरद पवार
उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत शिवसेनेची पद्धत आहे तसंच भाजपाच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची घेतलेली मुलाखत घेतली असून त्यात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. ही मुलाखत शनिवारी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान या मुलाखतीचे प्रोमो संजय राऊत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत आहेत. संजय राऊत यांनी शुक्रवारी अजून एक प्रोमो शेअर केला असून यावेळी त्यांनी पोस्टमध्ये ‘सत्ता ही विनयाने वापरायची असते”, शरद पवार यांची जोरदार मुलाखत असं लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली
राज्यात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. अशात राजकीय घडामोडींनादेखील वेग आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर या बैठकीचं आयोजन केलं आहे. काही मंत्री ऑनलाईन तर काही वर्षा बंगल्यावर उपस्थित रहाणार असल्याची महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांचा कम्युनिटी हेल्थचा वर्कशॉप अन कागदावर 'फोटो लेते रहो'
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता फडणवीस यांची एका फोटोवरून सोशल मीडियावर तूफान खिल्ली उडवली जात आहे. विशेष म्हणजे अमृता यांचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
सारथीला तातडीने ८ कोटींचा निधी देणार; अजित पवारांची घोषणा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सारथीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती पवार यांनी दिली. “सारथी बंद होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार. तसेच उद्याच सारथीला आठ कोटींचा निधी दिला जाईल,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मातोश्री-2 संबंधित व्यवहारावरून काँग्रेस नेत्याचे मुख्यमंत्र्यांवर धक्कादायक आरोप
वांद्रेमधील कलानगर भागातील मातोश्रीजवळच मातोश्री-2 ही आठ मजली इमारत उभारण्यात आली आहे. मातोश्रीजवळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नवी मातोश्री-2 ची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. लवकरच ठाकरे कुटुंब या नव्या इमारतीत राहण्यासाठी जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना आमदार, खासदार, मुख्यमंत्री, सभापती केले. मात्र या सर्वांचा रिमोट कंट्रोल मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या हाती असायचा. अनेक राजकीय हालचाली मातोश्रीवरून घडल्या आहेत. त्याच्या जवळच मातोश्री-2 ही नवी इमारत उभारण्यात आली आहे. मात्र याच मातोश्री २ च्या व्यवहारावरून काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राऊतांची एक मुलाखत घ्या आणि त्याला ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे नाव द्या - फडणवीस
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. मात्र त्याआधी संजय राऊत यांनी या बहुचर्चित मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि शरद पवारांची दिलखुलास उत्तरे पाहायला मिळत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे १०५ आमदार निवडून येण्यामागे शिवसेनेचं सुद्धा योगदान होतं - शरद पवार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. मात्र त्याआधी संजय राऊत यांनी या बहुचर्चित मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि शरद पवारांची दिलखुलास उत्तरे पाहायला मिळत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना योद्धे असा शाब्दिक गौरव करुन त्यांच्या समस्या सुटणार नाहीत - अमित ठाकरे
राज्यात सध्या कोरोनाविरुद्ध निकराची लढाई सुरू आहे. या लढाईत डॉक्टर्स आणि नर्सेस आघाडीवर आहेत. अत्यंत जोखमीचं हे काम असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धे असंही म्हटलं जात आहे. मात्र राज्य सरकार आर्थिक संकटात असल्याने या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली होती. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी या कर्मचाऱ्यांचा पगार पूर्ववत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारनेही अशी मागणी होत असल्याने पगार पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. अमित ठाकरे यांनी नर्सेसच्या पगाराबद्दली फेसबुक पोस्ट लिहून अशीच मागणी केली आहे. थोडी संवेदनशीलता दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजगृह तोडफोड प्रकरणी एका संशयिताला अटक, राजगृहला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण
राजगृहाला संरक्षण देण्याची आंबेडकरी जनतेची आणि आंबेडकर कुटुंबाची मागणी पूर्ण झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत एकमताने राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुढील ३ महिने शिवभोजन थाळी १० वरुन ५ रुपयांवर, मंत्रिमंडळ बैठकीतील ९ निर्णय
महाविकास आघाडी प्रणित ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले. (Maharashtra cabinet Decisions) कोरोना आणि अनलॉकिंगच्या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 9 निर्णय घेण्यात आले. महत्वाचं म्हणजे आणखी तीन महिने शिवभोजन थाळीची किंमत 10रुपयांवरुन 5 रुपयांवर करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांसाठी शिवभोजन थाळी अवघ्या 5 रुपयांत मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान्य लोकं व शिवसैनिकांचाही कोरोनाने जीव जातोय आणि मुख्यमंत्री राजकीय सौदेबाजीत
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. 4 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या मुत्सद्देगिरीला यश आल्याचं म्हटलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
भावाचे ७ नगरसेवक फोडणाऱ्याला या ५ जणांना परत घेताना लाज वाटेल का?
तीन दिवसांपूर्वी चक्क शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि महाविकास आघाडीत भूकंप झाला. पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदार लंके यांचे नेतृत्व स्वीकारले होतं. याशिवाय शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही प्रवेश केला होता.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो