महत्वाच्या बातम्या
-
महाविकास आघाडीतील कुरबुरींबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरु
महाविकासआघाडीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं वृत्त होतं. आज संध्याकाळी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. महाविकासआघाडीतल्या नाराजीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. तसंच लॉकडाऊनबाबतही दोघांमध्ये संवाद होईल अशी माहिती पुढे आली होती.
5 वर्षांपूर्वी -
येत्या ४८ तासांत मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाचा इशारा
मुंबईसह महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान वेधशाळेने दिलेल्या माहिती नुसार मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीवर हा मुसळधार पाऊस कोसळणार आहे. या पावसामुळे आता मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका मिळणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांकडे २ तास मागितले असते तरी त्यांनी सरकारचे अनेक प्रश्न सोडवले असते
तुमच्यात मतभेद आहे हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचं काही खरं नाही.. करोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील ग्राहकांना अवाजवी वीज बिलं, मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जा मंत्र्यांच्या भेटीला
वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी मीटरचे रिडींग न घेता ग्राहकांना आवाजवी बिलं आकारले. त्यामुळे राज्यभरात याबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडाळाने आज (2 जुलै) ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्र्यांना वीज बील कमी करण्याबाबत पत्र दिलं. यावेळी ऊर्जामंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारकडून काही विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीबाबत विचार
कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम महसूलावर झाला असून सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे कसे, असा प्रश्न सरकारला पडला आहे. यामुळे खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांचेही पगार लटकण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर सरकारला कर्ज काढून पगार वाटप करावे लागेल, अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विशेष टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ४ हजार ८७८ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. २४ तासांमध्ये ज्या २४५ मृत्यूंची नोंद झाली त्यातले ९५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १५० मृत्यू हे मागील काळातील आहेत. आज जी करोना बाधितांची संख्या समोर आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ७४ हजार ७६१ इतकी झाली आहे. एकूण केसेसपैकी ७५ हजार ९७९ केसेस या अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज मध्यरात्री ते १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी, कलम १४४ लागू
मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईत कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी लागू असेल. पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असेल. तर सर्वसामान्यांना फक्त आवश्यक कामांसाठी केवळ २ किलोमीटरपर्यंत बाहेर पडता येईल.
5 वर्षांपूर्वी -
यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाचं दर्शन नाही; पण आरोग्यत्सव साजरा होणार
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी या उत्सवातून काढता पाय घेतला आहे. कोरोना व्हायरसचं आव्हान पाहता नाईलाजास्तव आणि समाजहितासाठी म्हणून मानाची मंडळं या निर्णयावर पोहोचली आहेत. यातच आता नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असणाऱ्या लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदाच्या वर्षी हे पर्व साजरा न करण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ताज हॉटेल स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी; मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली
कोरोनाचा संकट डोक्यावर असताना आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. दक्षिण मुंबईतस्थित ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या कराची येथून हा धमकीचा फोन आल्याचं वृत्त समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर ताज हॉटेल बाहेरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत मास्क न वापरल्यास १ हजार रुपये दंड भरावा लागणार
कोविड १९ संसर्गासाठी लागू असलेली टाळेबंदी टप्प्या टप्प्याने शिथील करुन जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न शासनाकडून होत असताना काही नागरिकांकडून कोविड १९ संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरित्या पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: मुखावरण अर्थात मास्कचा वापर व्यवस्थित केला जात नाही. यामुळे सार्वजनिक स्थळं, प्रवास यासह खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने निर्गमित केले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱयांकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महापालिकेचा 'वरुण' गोंधळ आतून तमाशा, पेंग्विनच्या अंड्यातून आत्ता बाहेर आलाय
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसवर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सडकून टीका केली आहे. “पेंग्विनच्या अंड्यातून आत्ता कुठे बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई? हा कोण आम्हाला माफी मागायला सांगणार?”, अशी जहरी टीका अमेय खोपकर यांनी ट्विटरवर केली आहे
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढला, राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्रत लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते.
5 वर्षांपूर्वी -
प्रकृती बिघडल्याने महापौर किशोरी पेडणेकर बॉम्बे रुग्णालयात दाखल
कोरोना विषाणूने संपूर्ण मुंबईला कवेत घेतले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. शहरातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. विशेष म्हणजे पालिकेच्या ‘डी’ वॉर्डमध्ये नियंत्रणात असलेला कोरोना गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. यात चार दिवसांपूर्वी दररोज 30 ते 35 ने होणारी रुग्णवाढ आता मात्र सरासरी 50 झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
वरुण सरदेसाईंना संदीप देशपांडेंचा इशारा, असल्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. विरोधकाकडून आरोग्य सेवेवरून अनेक आरोप केले जात आहे. अशातच मुंबई महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी आपल्या तुमड्या भरत आहेत, कोरोना झाल्यावर तुम्हाला फोडून राहिल्या शिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला होता.
5 वर्षांपूर्वी -
आज रिपोर्ट आला, शिवसेना भवनातील अजून ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर आता थेट शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या दादर येथील शिवसेना भवनातच कोरोनाचा शिरकाव झाल्याचं उघड झालं आहे. सेना भवनातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोविड सेंटरच्या नावाखाली मुंबई महापालिकेच्या वर्क ऑर्डरमध्ये ६ कोटींचा घोटाळा, भाजपचा आरोप
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून मुंबई पुण्यासारख्या शहरांत रुग्णांची वाढ होत आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई पालिकेच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. मात्र, महापालिकेने काढलेल्या वर्क ऑर्डरमध्ये तब्बल ६ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
३० जून नंतर लॉकडाउन उठणार का? मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
३० जूनला लॉकडाउनची मुदत संपते आहे. पुढे काय हा प्रश्न तुमच्या मनात असेल. ३० जून नंतर लॉकडाउन उठणार का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच हे सगळं असंच सुरु राहणार का? तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे. सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. आपण अर्थचक्राला गती देण्यासाठी काही गोष्टी सुरु करतो आहोत. सगळं सुरु केलं म्हणून परिस्थिती सुरळीत झाली असं समजू नका नाहीतर करोन आ वासून बसला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
न घाबरता बाहेर पडा, कोरोनाबाबत अधिक शिक्षित व्हा - आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनाचे संकट जरी असले तरी कोणीही घाबरुन जाऊ नये. नेहमी घबरदारी घेतली पाहिजे. आता आपल्याला कोरोनासोबत जवीनशैलीत बदल करायला हवा. कोरोनाला घाबरुन नका तर कोरोनाला समजून घ्या. कोरोनाबाबत अधिक शिक्षित झाले पाहिजे, असे सांगत कोरोना मृत्यूदर रोखणे मुख्य लक्ष्य आहे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. टोपे हे ‘झी २४ तास’च्या ‘ ई-संवाद – महाराष्ट्र एक पाऊल पुढे’ याखास कार्यक्रमात बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: मनसैनिक रस्त्यावर उतरल्याने उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना कामाचे आदेश दिले
कोरोनाच्या काळात मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या साधन सामुग्रीमध्ये भ्रष्टाचारा संदर्भात मनसेने शुक्रवारी आरोप केल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सध्या कोणतही काम नाही आहे, अशी टीका केली होती. अनिल परब एवढ्यावरच थांबले नाहीत तर,’मनसेला सध्या दुसरं कुठलं काम नाही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कोणताही राजकीय अजेंडा नाही. त्याला मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी उत्तर दिले.
5 वर्षांपूर्वी -
भाषिक-प्रांतीय राजकारणात रस नाही, पण मुंबई पुण्यातील गर्दी रोखणं गरजेचं - गडकरी
कोरोनाचे संकट सरल्यानंतर मुंबई आणि पुणे या शहरांतील लोकसंख्या कमी decongest करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी मुंबईच्या बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी ‘झी २४ तास’च्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे #e_conclave मध्ये बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भविष्यात महाराष्ट्राला व्यापाऱ्याच्या क्षेत्रात कोणत्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत, याचा सविस्तर उहापोह केला.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो