महत्वाच्या बातम्या
-
राज्यात कोरोनाचा दुसरा बळी, मुंबईत ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असं असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आणखी एक मृत्यू झाला आहे. मुंबईमध्येहे. एका ६३ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील हा दुसरा मृत्यू आहे.
5 वर्षांपूर्वी -
रुग्णांच्या वैद्यकीय मदतीसाठी आम्ही अंधेरीतील सिंधुदुर्ग भवनची जागा देण्यास तयार - निलेश राणे
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ६३ वर पोहचला आहे. २४ तासांमध्ये ११ रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामधील १० रुग्ण हे मुंबईचे तर एक रुग्ण पुण्याचा आहे. ११ कोरोनाबाधितांमध्ये ८ जण हे परदेशातून आलेले आहेत. तर त्यांच्या संसर्गामुळे इतर तिघांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसंच, राज्यातील ६३ कोरोनाबाधितांमध्ये १३ ते १४ जणांना संसर्गामुळे कोरोना झाला आहे. आपल्या देशात हा विषाणू नव्हता. तो रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत, असे राजेश टोपेंनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
#CoronaVirus : दहावीचा सोमवारचा पेपर पुढे ढकलला
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. सोमवारी होणारा पेपर आता ३१ मार्चनंतर होणार आहे. ३१ मार्चनंतर परिस्थिती पाहून पेपरची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. सोमवारी सामाजिक शास्त्रे पेपर-२ भुगोल, या विषयाचा पेपर होता.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना काळजी! मुंबईकरांचं दुर्लक्ष, समूहात मॉर्निंग वॉक आणि सूट्टीतलं क्रिकेट सुरूच
देशात, तसेच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा ६३ वर पोहोचला: आरोग्यमंत्री
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बाधित रूग्णांची संख्यात आता ६३ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील ५२ कोरोना बाधितांपैकी ४१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत: आरोग्यमंत्री
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई आणि ठाणे येथील कोरोना विषाणू संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी आणखी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. राज्यात आणखी तिघांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. तीनपैकी प्रत्येकी एक जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईतील आहे. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. राज्यात कोरोना विषाणूबाधितांची संख्या आता ५२ झाली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: मुंबई पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर; मनसेकडून मोफत मास्क किट वाटप
कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही याची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारडून कोरोना संदर्भात नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना येत आहे. दरम्यान रत्नागिरीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दणका! आणि पैसे बुडवणाऱ्या बिल्डरने जगताप दांपत्याचे ९ लाख ५० हजार परत केले
राज ठाकरेंच्या अन्याय तेथे लाथ मारण्याच्या आदेशाचं महाराष्ट्र सैनिकांनी पालन केल्याचं पाहायला मिळालं आहे. नवी मुंबई शहरातील कामोठे या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या प्रविण जगताप आणि स्मिता जगताप यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. प्रविण जगताप हे सिवील अभियंता म्हणून स्वतःचा छोटासा व्यवसाय करतात. त्यामुळे व्यवहारात थोडा जरी आर्थिक फटका बसला तर थेट व्यवसाय बंद करावा लागेल अशी स्थिती कायम होती.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला. शुक्रवारी त्यांनी पत्रकारांना याबद्दल माहिती दिली. राज्यात शुक्रवारी सकाळपर्यंत ५२ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जीवनाश्यक वस्तू व्यक्तिरिक्त सर्व गोष्टी ३१ मार्चपर्यंत बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा
अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महानगरातील सर्व खासगी ऑफिसेस बंद राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी बांधलेला मोठा पुतळा बंद आहे; तर नेहरूंनी बांधलेली रुग्णालये २४ तास खुली
जगभरात कोरोना रोगाच्या वृत्ताने थैमान घातले आहे. जिकडे तिकडे कोरोनाचीच चर्चा आणि त्यांसंदर्भात जनजागृती व उपाय करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चीनमधून सुरुवात झालेला हा रोग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये, अनेक संस्थांना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, पर्यटनांच्या ठिकाणांनाही टाळे लागले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना लक्ष्य केलंय.
5 वर्षांपूर्वी -
आई ICU'मध्ये...पण मुलगा निभावतोय सामान्यांप्रति आरोग्यमंत्री म्हणून कर्तव्य
देशात बुधवारी कोरोनाग्रस्त (Covid – 19) रुग्णांची संख्या वाढून हा आकडा आता १७५ पर्यंत पोहोचला आहे. एकीकडे महाराष्ट्रात तब्बल ४९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिका गल्फ देशांमध्ये गेलेल्या तब्बल २६,००० भारतीयांसाठी क्वारंटाइनची सोय करीत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईत धावणारी एसी लोकल उद्यापासून बंद - पश्चिम रेल्वे
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत ४९ वर येऊन पोहचला आहे. अशामध्ये सरकारकडून वारंवार आवाहन करुन देखील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी नाईलास्तव लोकल बंद करावी लागेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: राज ठाकरेंकडून महाराष्ट्र सैनिकांना 'या' मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्रासह देशात करोनाचे रोज नवे रुग्ण वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारांनी करोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही करोनाचा मुकाबला करण्यासाठी मनसे सैनिकांना सात सूचना केल्या आहेत. तसेच राज्यातील नागरिकांनाही दोन आठवडे सांभाळून राहण्याचं, एकमेकांच्या संपर्कात न येण्याचं, गर्दी आणि प्रवास टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
घाबरू नका! ४९ पैकी ४० रुग्ण परदेशातून आलेले, राज्यात मूळ संसर्गाचं प्रमाण कमी आहे
कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज आहे. हे युद्ध विषाणूविरोधात, सर्वांनी सहकार्य करावे: मुख्यमंत्री विषाणूविरोधात आहे. ते लढण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे. तुमच्या सर्वांचे सहकार्य हेच सरकारचे बळ आहे. आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा साठा आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना हे आवाहन केले.
5 वर्षांपूर्वी -
हे युद्ध आहे, सर्वजण मिळून या संकटावर मात करुया - मुख्यमंत्री
करोना व्हायरस हे वेगळ्या प्रकारचं युद्ध आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचना पाळा. घरातच राहा, गर्दी टाळा. स्वत:हून काही बंधने पाळा, असं सांगतानाच हे वॉर अगेन्स्ट व्हायरस असल्याने रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊन नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
5 वर्षांपूर्वी -
आपत्ती व्यवस्थापनाचा एवढा अनुभव असेल तर घेऊन जा त्यांना हुआन, इटली, स्पेनला...भाजपला झोडपलं
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असून रुग्णांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी संसर्ग कमी करणे आवश्यक आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवले तर हे शक्य होणार आहे. यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
पालिकेच्या आकस्मित 'कोरोना' बैठकीआडून ८२८ कोटींची रस्त्याची कामं बँक गॅरंटीशिवाय मंजूर?
मुंबईत ‘कोरोना’चा धोका वाढल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने आकस्मित बैठक बोलावली. मात्र कोरोनाच्या नावाने स्थायी समितीच तब्बल ८२८.२२ कोटीची रस्त्यांची कामे तातडीने मागू लावण्यासाठी कोणत्याही बँक गॅरेंटीशिवाय कंत्राड देण्यात आलं आहे. भाजपने देखील यावरून मोठा विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
गर्दी टाळा सांगणार सरकार अशा गर्दी करून पत्रकार परिषद घेत आहे - सविस्तर वृत्त
भारतामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणखी ११ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत ती १४८ वर पोहचली आहे. यामध्ये २५ परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल