महत्वाच्या बातम्या
-
तर मोदींचे सोशल मीडियावरील करोडो फॉलोअर्स अनाथ होतील: खा. संजय राऊत
भाजपच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याचे आदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा विचार करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, रविवारपासून फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम आणि यू-ट्युब सोडण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील भूमिका लवकरच स्पष्ट करेन असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
विद्या चव्हाण यांचा सूनेवरच विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप
नातू हवा म्हणून सुनेचा छळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, आमदार विद्या चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. ‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे कळल्यानंतर माझ्या मुलानं घटस्फोट घेण्याची तयारी सुरू करताच सुनेनं आरोप केले आहेत. कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळं ती असं वागत असून न्यायालयात खरंखोटं सिद्ध होईल,’ असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सर्व मोदी भक्तांनी सुद्धा सोशल मीडिया सोडावा म्हणजे देश शांत होईल - नवाब मलिक
भाजपच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याचे आदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा विचार करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, रविवारपासून फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम आणि यू-ट्युब सोडण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील भूमिका लवकरच स्पष्ट करेन असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
हा डोक्यावर पडला का?; शरद पोंक्षेंवर जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका
दोन दिवसांपूर्वी ‘मी सावरकर’ या कार्यक्रमासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये मोठी गर्दी उसळली होती. अभिनेते शरद पोंक्षे हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते. तत्पूर्वी काही विद्यार्थ्यांनी पोंक्षे यांचा निषेध केला होता. ‘देश गोडसेवादी की गांधीवादी’, ‘गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचे समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षेंचा जाहीर निषेध’, असे फलक घेऊन विद्यार्थी आपला निषेध नोंदवत होते. त्यावेळी स्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी त्या सर्वांना नंतर ताब्यात घेतले होते.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली हिंसाचाराला भाजपच जबाबदार, पवारांची केंद्रावर सडकून टीका
दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपात आत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उडी घेतली आहे. दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर भाजप समाजात तेढ निर्माण करत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाला राज ठाकरेंना सोबत घ्यायचं असेल तर घ्यावे; शिवसेना नेत्याची टीका
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे. आता हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यात रविवारी पुन्हा एकदा भर पडली. भाजपाचे भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. तासभर चाललेल्या या चर्चेनंतर मनसे-भाजपा युतीची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धवजी असल्याने भाजपाला मुंबईत दंगल घडवणं शक्य झालं नाही: आव्हाड
दिल्ली आणि मुंबईत राडा झाला म्हणजे देश संपला. दिल्लीत ज्याप्रमाणे दंगली घडल्या त्याचप्रमाणे मुंबईत सुद्धा दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती, मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याने भाजपला हे शक्य झालं नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
‘ये दिवार तुटती क्यू नही..' असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार- अजित पवार
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ८ वरुन ६० पर्यंत तर आमदारांची संख्या १० पर्यंत जायला हवी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. मुंबईत शिवसेना एक क्रमांकावर तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असली पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीने लढवली जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत शिवसेना पहिल्या तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर हवीः अजित पवार
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या ८ वरुन ६० पर्यंत तर आमदारांची संख्या १० पर्यंत जायला हवी, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. मुंबईत शिवसेना एक क्रमांकावर तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर असली पाहिजे असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या वतीने लढवली जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी -
रश्मी ठाकरे दैनिक सामनाच्या संपादक, सामनाच्या पहिल्या महिला संपादक
आजपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामनाचे संपादकपद ठेवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आता रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादक असणार आहेत. आजपासून त्यांच्याकडे हे पद सुपूर्द करण्यात आलं आहे. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुस्लीम समाजाच्या आरक्षणाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा: मंत्री एकनाथ शिंदे
मराठा, धनगर आरक्षणानंतर मुस्लीम बांधवांनी आरक्षणाची मागणी जोर लावून धरली आहे. मुस्लीम बांधवांना आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सकारात्मक भूमिकेत आहे. शिवसेनेकडूनही आता मुस्लीम आरक्षणाला समर्थन देण्यात आलं आहे. मंत्री एकनाथ शिंदेंनी नवाब मलिक यांच्या घोषणेला दिला पाठिंबा दिला आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा महाविकासआघाडीचा प्रयत्न आहे. ठाकरे सरकार समाजाच्या हिताचे निर्णय घेईल असा विश्वासही यावेळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. एकूणच शिवसेनेचा मुस्लीम आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
आमचं सरकार मुस्लीम समाजाला आरक्षण देणारच: बाळासाहेब थोरात
आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याचे विधेयकात रुपांतर करून कायदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. आमचे सरकार कोर्टात टिकेल असे ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लिमांना आरक्षण देणारच. हीच कॉंग्रेसची भूमिका असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची घोषणा करण्यात आली आहे. आज संजय बर्वे निवृत्त झाले त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर परम वीर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. परम बीर सिंह हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते. आता ते मानाच्या मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी घेत आहेत. परम बीर सिंह यांच्या नियुक्तीमुळे हे महत्त्वाचं पद पोलीस महासंचालक दर्जाचंच ठेवण्यात आल्याचं स्पष्ट आहे.
5 वर्षांपूर्वी -
संधी!..तुम्ही कथा, लघुकथा, कविता, चारोळ्या, भयकथा व बरंच काही लिहिता? आम्ही प्रसिद्ध करू
महाराष्ट्रनामा न्यूज देशभरातील मराठी लेखकांसाठी त्यांच्या आवडीच्या विषयावर लेख लिहिण्याची मोफत संधी देत आहे. लवकरच या सेक्शनचे अधिकृतपणे लॉंचिंग होणार आहे. तुम्ही तुमची आजवरची खालील नमूद केलेल्या सर्व विषयावरील लेखन तसेच भविष्यातील लेखन महाराष्ट्रनामा न्यूज’वर प्रकाशित करू शकता आणि जगासमोर स्वतःची ओळख निर्माण करू शकता.
5 वर्षांपूर्वी -
मुस्लीम आरक्षणाला भाजपचा तीव्र विरोध; फडणवीस आक्रमक
मुस्लिम समाजाला महाविकास आघाडी सरकार लवकरच गुड न्यूज देणार आहे. मुस्लिमांना शैक्षणिक संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील कायदे संमत करणार असल्याची ग्वाही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा - छगन भुजबळ
जनगणनेच्या अर्जात बदल केले जावेत अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वेगळी जनगणना करावी असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसीचा एक वेगळा पर्याय दिला तर जनगणना होऊ शकते असंही यावेळी त्यांनी सांगितलं. यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
सिडकोत २५०० कोटींचा घोटाळा; पारदर्शक 'चौकीदारांच्या' कारभारावर कॅगचा ठपका
सिडको घोटाळ्याप्रकरणी कॅगनं फडणवीस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. या अहवालवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान या प्रकरणाची निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली जळत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे होते? - शिवसेना
राजधानी दिल्लीतल्या हिंसाचारावरुन गृहमंत्री कुठे आहात असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाच्या अग्रलेखामधून विचारण्यात आला आहे. देशाची अर्थव्यवस्था कोसळत असून भडकाऊ भाषणांचे भांडवल आणि त्यांचा बाजार जोरात सुरू असल्याचे अग्रलेखातू नमूद करण्यात आलं आहे. ज्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले, त्या न्यायमूर्तींची बदली केल्याबद्दल सामनामधून टीका करण्यात आली आहे. न्यायालयासही सत्य बोलण्याची शिक्षा मिळू लागली का? असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती द्या, ५००० रुपये मिळवा : मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांची अचूक माहिती देणाऱ्यांना ५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी मनसेचे पोस्टर लावण्यात आले आहेत. महिन्याभरापूर्वी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कात टाकत हिंदुत्त्वाचा नारा दिला. बेकायदा बांगलादेशींना भारतातून हाकला हीच आमची भूमिका असल्याचे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले होते.
5 वर्षांपूर्वी -
तात्याराव! ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं; भाजपची जळजळीत टीका
भारतीय जनता पक्षाने स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांचं व्यंगचित्रं प्रसिद्ध करून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये अत्यंत शेलक्या भाषेत उद्धव ठाकरे अप्रत्यक्षरित्या लक्ष करण्यात आल्याने शिवसेना यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार ते पाहावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार