महत्वाच्या बातम्या
-
दिल्लीत लष्कराला पाचारण; पण 'हे आमचे लष्कर नाही'; अग्रलेखातून प्रश्न
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) वरून राजधानी दिल्लीत सलग तीन दिवस उफाळलेल्या हिंसाचाराने तब्बल १३ जणांचा जीव घेतला. तर शंभरपेक्षा अधिकजण जखमी झाले. अद्यापही परिस्थिती म्हणावी तशी नियंत्रणात आलेली नाही. एकीकडे अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आलेले असताना,दुसरीकडे दिल्लीत हा हिंचाराचा उद्रेक झालेला होता.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचं प्रशासकीय अज्ञान? रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांच्या विशेष नियुक्त्या रद्द
अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी, तर रवींद्र वाईकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावरील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्ती करण्यात आल्यानंतर दोन्ही लाभाची पदं असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी, तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
अब की बार बाप-बेटे की सरकार; सुधीर मुनगंटीवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
भारतीय जनता पक्षातर्फे आज महाविकास आघाडी सरकारविरोधात पहिल्यांदाच आंदोलन छेडण्यात आले आहे. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आंदोलन पुकारणार होते हे कालच स्पष्ट करण्यात आलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या सर्व घटनांना निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारविरोधा आंदोलन पुकारल्या सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढली म्हणणारे आ. भातखळकर आज ? - सविस्तर वृत्त
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती विषयावरून भारतीय जनता पक्षातील आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात सध्या मुंबईतील भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी २०१९ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात जेव्हा असाच मुद्दा उचलत आक्रमक पवित्र घेतला होता तेव्हा आमदार अतुल भातखळकर यांनी संतापजनक प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपाचा विधानसभेत गदारोळ; आंदोलन छेडण्याची तयारी
मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात झाली. सलग दुसऱ्या दिवशीही भाजपानं शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या जाहीर करण्यात आलेली यादी फसवी असल्याचा गंभीर आरोप केला.
5 वर्षांपूर्वी -
वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी अशा एकूण ५०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत विक्रोळी पश्चिमेकडील कैलास कॉम्प्लेक्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. अकोला पाठोपाठ राज्यातील महत्वाच्या अशा मुंबई आणि उपनगरांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक बंड केल्यानं ‘वंचित’ला हा मोठा हादरा बसल्याचं मानलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांचा भाजपने बकरा केला, त्यांनी अकराच्या गोष्टी करु नये: गुलाबराव पाटील
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार येत्या ११ दिवसांत कोसळले, असं भाकित भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी वर्तवलं आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील अंजुर येथे करण्यात आले असून त्याचा उद्घाटन सोहळा माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील सरकार अकरा दिवसात कोसळेल, असं भाकीत नारायण राणे यांनी केलं होतं. मात्र यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार ११ दिवसात कोसळणार: नारायण राणे
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र येऊन स्थापन केलेलं महाविकास आघाडी सरकार येत्या ११ दिवसांत कोसळले, असं भाकित भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी वर्तवलं आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कपिल पाटील फाऊंडेशन यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन तालुक्यातील अंजुर येथे करण्यात आले असून त्याचा उद्घाटन सोहळा माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्रातील सरकार अकरा दिवसात कोसळेल, असं भाकीत नारायण राणे यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA-NRC: महाविकास आघाडीत धुसफूस, पण फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
महाविकास आघाडी सरकारला तीन महिने झाले पण अजूनही त्यांना सूर गवसलेला नाही. विरोधकांशी संवाद साधण्यासाठी चहापान ठेवलं पण या तीन पक्षांमध्येच विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कर्जमाफी, तूर आणि भात खरेदी, बाजार समिती निवडणुकीतून शेतकऱ्यांना दूर करणं या मुद्द्यावरुन सरकारला घेणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस म्हणाले; जलयुक्त शिवार योजना सरकार बंद जरूर करेल....पण
महाविकास आघाडी सरकारला तीन महिने झाले पण अजूनही त्यांना सूर गवसलेला नाही. विरोधकांशी संवाद साधण्यासाठी चहापान ठेवलं पण या तीन पक्षांमध्येच विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कर्जमाफी, तूर आणि भात खरेदी, बाजार समिती निवडणुकीतून शेतकऱ्यांना दूर करणं या मुद्द्यावरुन सरकारला घेणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
सत्ताधाऱ्यांमध्ये आपसांतच सुसंवाद नाही, मग आम्हाला सुसंवादासाठी का बोलावलं: फडणवीस
महाविकास आघाडी सरकारला तीन महिने झाले पण अजूनही त्यांना सूर गवसलेला नाही. विरोधकांशी संवाद साधण्यासाठी चहापान ठेवलं पण या तीन पक्षांमध्येच विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज भाजपची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कर्जमाफी, तूर आणि भात खरेदी, बाजार समिती निवडणुकीतून शेतकऱ्यांना दूर करणं या मुद्द्यावरुन सरकारला घेणार असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
युवा संवाद; महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा व्हाव्यात- शरद पवार
आज मुंबईत राष्ट्रवादीकडून युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तरुण पिढीसोबत संवाद साधला. युवा पिढीसोबत बोलण्याची संधी मिळाली याचा शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. तुमची पिढी आणि माझी पिढी यामध्ये किती फरक आहे, हे मला पाहायचे आहे. आता माझे वय ८० झाले आहे. मात्र प्रश्न विचारण्याची क्षमता कमी झाली नाही, असं म्हणत पवारांनी त्यांचा आमदारकीचा अनुभव तरुणांना सांगितला. अत्यंत दिलखुलास पद्धतीने पवारांनी तरुणांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
5 वर्षांपूर्वी -
CAA-NRC : उद्धव ठाकरेंचे दोन्ही दगडांवर पाय - आनंदराज आंबेडकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (सीएए) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. यावरूनच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री हे दोन्ही दगडांवर पाय ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
१९७८ मध्ये मी किती पक्षांचं सरकार चालवलं हे मलाच आठवत नाही: शरद पवार
ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे टीकणार आहे त्यात काहीही अडचण येणार नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपी माझाच्या व्हिजन २०२० या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे विचार मांडले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नेपाळचे उद्योग व वाणिज्य मंत्री लेखराज भट्टा यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली
नेपाळचे उद्योग व वाणिज्य मंत्री लेखराज भट्टा यांनी आज कृष्णकुंजवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, या भेटीत इतर कोणत्या विषयांवर चर्चा झाली का याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे सध्या राज ठाकरे यांच्या पक्षाचे राज्य किंवा केंद्रात कोणतंही स्थान किंवा सहभाग नसताना लेखराज भट्टा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA मुद्दा, मुख्यमंत्र्यांच्या 'दिल्ली वारी'नंतर वर्षा निवासवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित आहेत. शरद पवार दुपारी चारच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्लीत मॅरेथॉन बैठका घेतल्यानंतर, आज शरद पवारांसोबत बैठक होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
त्यावेळी बाजूला गर्दी असल्याने मला हात उचलता आला नाही: मंत्री नवाब मलिक
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर २ वर्षापूर्वी गेलो होतो, त्यावेळचा हा व्हिडिओ आहे, मात्र भाजपच्या ग्रुपमधून हा व्हिडिओ व्हायरल करुन माझी बदनामी करण्यात येत आहे असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली होती.
5 वर्षांपूर्वी -
आमचे असंख्य मुस्लिम बांधव महाराजांचा जय जयकार करतात; पण मलिकांचं? व्हिडिओतून प्रश्न उपस्थित
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मनसेच्या महामोर्चावरून टीका करताना मनसेला गांधीवादाचा डोस पाजले होते. तसेच मनसेच्या भूमिकेवर देखील टीका करताना कायदा सुव्यवस्था आणि धार्मिक मुद्यावरून राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र आता तेच मंत्री नवाब मलिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या रडारवर आहेत.
5 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वासाठी! देशप्रेमाची!...पण हा फोटो फेब्रुवारी २०१९ मधील आहे: संदीप देशपांडे
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि ते पहिल्यांदाच सोनिया गांधींची १० जनपथवर भेट घेणार आहेत. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर भाजपशी काडीमोड घेत थेट वेगळी विचारधारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्रीपद मिळवलं. मात्र त्यानंतर सत्ता चालवताना अनेक अडथळे निर्माण होतं आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाविकाआघाडी सरकारमधील राज्यमंत्र्यांची अवस्था ग्रामपंचायत सदस्यासारखी: बच्चू कडू
महाविकासआघाडी सरकारमधील राज्यमंत्र्यांची अवस्था ही कधीच बैठक न होणाऱ्या ग्रामपंचायतीतील सदस्यासारखी झाली आहे. सर्व निर्णय कॅबिनेट बैठकीत होता. त्या निर्णयांची माहिती आम्हीला प्रसारमाध्यमांतून कळते. आम्ही ज्या खात्याचे मंत्री आहोत त्या खात्याबाबतच्या निर्णयांबाबतही आम्हाला माहिती नसते. त्यामुळे राज्यमंत्र्यांचे अधिकार काय हेच आम्हाला कळेना झालंय, अशी भावना महाविकाआघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB