महत्वाच्या बातम्या
-
फक्त राज्यात कशाला? लोकसभा निवडणूक सुद्धा होऊन जाऊ द्या: शरद पवार
‘हिम्मत असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक घेऊन दाखवावीच’, असे आव्हान देणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘फक्त राज्याची काय पूर्ण देशाचीच निवडणूक घ्या. आमची काहीच हरकत नाही.’, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
भीमा-कोरेगाव: संभाजी भिडे आणि एकबोटेंनी वेगळं वातावरण तयार केलं: शरद पवार
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेविषयी आज राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. भीमा कोरेगाव आण एल्गार परिषद हे दोन वेगळे कार्यक्रम आहे. यामध्ये उलटसुलट चर्चा होत असल्याचं शरद पवार म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
शीना बोरा हत्या: 'त्यांनी' फडणवीसांना चुकीची माहिती दिली होती: राकेश मारिया
मुंबई पोलीस माजी आयुक्त राकेश मारिया यांनी शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांच्या अचानक झालेल्या बदलीसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. त्यांनी तपासादरम्यान आरोपी पीटर मुखर्जी यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असा मारिया यांच्यावर आरोप होता. पीटर आपली पहिली पत्नी इंद्राणीची मुलगी शीना हिच्या हत्येचे आरोपी आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार भीमा-कोरेगावचा समांतर तपास करणार, लवकरच SIT
महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरलेलं भीमा-कोरेगाव हिंसाचार व एल्गार परिषदेच्या तपासाचं प्रकरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडं देण्यास मान्यता दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारनंही समांतर पातळीवर करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे.
5 वर्षांपूर्वी -
हिंमत असेल तर भाजपने आता लोकसभा निवडणूक घेऊन दाखवावी: नवाब मलिक
भारतीय जनता पक्षाच्या राज्यव्यापी मेळाव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. त्याला आता राष्ट्रवादीने उत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि फडणवीसांवर सडकून टीका केलीय. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे,दिवसभर सत्तेत कसा येऊ याचा विचार करतात, रात्री स्वप्न पडतात अशी टीका त्यांनी केलीय. हिंमत असेल तर भारतीय जनता पक्षाने लोकसभेची निवडणूक घेऊन दाखवावी असं आव्हानही त्यांनी दिलं.
5 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांचा अहमदाबाद दौरा संपल्यावर झोपडपट्ट्या लपविणाऱ्या भिंती पाडणार काय? शिवसेना
प्रे. ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्या देशात येत आहेत. त्यांच्या स्वागतात कोणतीही कसर राहू नये. शेवटी हा राजकीय शिष्टाचार आहे. ‘केम छो ट्रम्प’ने ते खूश होतील, पण ट्रम्प यांना दिल्लीत आधी न उतरवता थेट अहमदाबादेत उतरवून केंद्र सरकारला नक्की कोणता संदेश द्यायचा आहे? प्रे. ट्रम्प यांचा अहमदाबाद दौरा आटोपल्यानंतर झोपडपट्ट्या लपविणाऱ्या भिंती पाडणार काय? हे प्रश्न आहेत. मागे ‘गरिबी हटाव’ या घोषणेवरून बरीच टिंगलटवाळी झाली होती. त्याच घोषणेचे रूपांतर आता ‘गरिबी छुपाव’ या योजनेत झालेले दिसते. नव्या अर्थसंकल्पात त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली आहे काय?
5 वर्षांपूर्वी -
..तर भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी करून काँग्रेसला वेगळं करतील? सविस्तर वृत्त
आजच्या महाविकास आघाडीच्या खेळात शिवसेनेला राष्ट्रवादी त्यातुलनेत पूरक असली तरी भविष्यात थेट काँग्रेसला बाजूला सारून शिवसेना-राष्ट्रवादी इतर छोटे पक्ष ज्यामध्ये समाजवादी पक्ष तसेच आंबेडकरी विचारांचे गट एकत्र येतील अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषक आजही व्यक्त करतात. शिवसेनेला विधानसभेत मिळालेली एकूण मतं ही १ कोटी २५ लाखाच्या घरात आहेत तर राष्ट्रवादीला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९२,१६,९११ असून मतांची टक्केवारी १६.७१ इतकी आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९०,४९,७८९ असून मतांची टक्केवारी १६.४१ इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार हाजी अलीत साकारणार मुघल गार्डन; मेकओव्हरसाठी ३५ कोटी
मुंबईतील महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन स्थळ असलेल्या हाजी अली दर्गाचे नुतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज येथे दिले. हाजी अली दर्गा नुतनीकरण व सौंदर्यीकरणासंदर्भात आज मंत्रालयात अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी दर्गाच्या नुतनीकरण व सौंदर्यीकरणाच्या आराखड्याचे सादरीकरणही करण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
CAA-NRC विरोध मोर्चा: आझाद मैदानात संविधान बचाओ, भारत बचाओ घोषणाबाजी
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)च्या विरोधात मुंबईतील आझाद मैदानात आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. एकूण ६५ संघटना या महामोर्चात सहभागी झाल्या आहेत. ‘संविधान बचाव’चा नारा या मोर्चातून घुमत आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे वृद्धपकाळाने निधन
ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९०व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हिंदमाता येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
CAA विरोधी आंदोलन करणाऱ्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही: हायकोर्ट
‘एखाद्या कायद्याविरोधात कुणी शांततेच्या मार्गानं आंदोलन करत असेल तर त्याला गद्दार किंवा देशद्रोही ठरवलं जाऊ शकत नाही,’ असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नोंदवलं आहे. सीएए विरोधी आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याच्या विरोधात न्यायालयात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठानं हे मत व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
सावरकरांबद्दल लिहिलेलं ते मासिक मागे घेणार नाही; काँग्रेसच्या भूमिकेने शिवसेना पेचात
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका करताना शिवसेनेवरही निशाणा साधला. “काँग्रेसने राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु केली आहे. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला. तर काँग्रेसचं मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपमानित करणारा लेख लिहिला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी”, अशी मागणी फडणवीस यांनी केली. शिवाय सावरकरांचा गौरव राहूद्या पण अपमान तर करु नका, असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार, असा सवालही फडणवीस यांनी विचारला.
5 वर्षांपूर्वी -
मनसेच्या सभांवेळी पोलिसांसंबंधित दिसणाऱ्या गोष्टी पवारांनी 'गांभीर्याने' घेतल्या; खुर्ची पासून सुरुवात
राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण लक्षात घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून शरद पवारांनी बंदोबस्तावेळी होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली आहे. या पत्रात शरद पवार म्हणाले की, जाहीर सभा वा दौऱ्यांच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन व प्रस्थानावेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. इतर वेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. केवळ पोलीस कर्मचारीच नाही तर अशा सभाप्रसंगी पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील तिष्ठत उभे राहतात असं ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मनसेची बांगलादेशींच्या वस्त्यांमध्ये घुसून शोध मोहीम; पण सेना बांद्रयात तरी हिम्मत दाखवेल?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी हिंद्त्वाचा झेंडा उचलून थेट देशातील घुसखोर बांगलादेशी आणि पाकिस्तानींविरुद्ध रणशिंग फुंकलं आहे. मात्र महामोर्चा’नंतर महाराष्ट्र सैनिक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बोरीवली पूर्व चिकुवाडी येथे बांगलादेशी घुसखोर अनधिकृत वस्त्याकरून राहत असल्याचं समजताच स्थानिक महाराष्ट्र सैनिक थेट त्या वस्त्यांमध्ये घुसून कागद पत्रांची झाडा झडती घेत असल्याचं समोर आल्याने स्थानिक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तेथे धाव घेतली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसीतील इमारतीला भीषण आग
अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला भीषण आग लागली. कंपनीच्या दुसऱ्य़ा मजल्यावरील सर्व्हर रुमला आग लागल्याची माहिती आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. ही आग लेव्हल-४ ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिदोरी मुखपत्र वाद; सत्तेसाठी शिवसेना किती काळ लाचार राहणार? - फडणवीस
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका करताना शिवसेनेवरही निशाणा साधला. “काँग्रेसने राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु केली आहे. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला. तर काँग्रेसचं मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपमानित करणारा लेख लिहिला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी”, अशी मागणी फडणवीस यांनी केली. शिवाय सावरकरांचा गौरव राहूद्या पण अपमान तर करु नका, असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार, असा सवालही फडणवीस यांनी विचारला.
5 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्षपदी कायम, मुंबई अध्यक्ष पदी मंगल प्रभात लोढा
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही घोषणा केली. चंद्रकांत पाटील महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद सांभाळतील, तर आमदार मंगलप्रभात लोढा यांनाही पुन्हा मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
फुकट सेवा? सरकारला खरंच 'डेटा यूटिलिझेशन आणि डेटा सेक्युरीटी' हे विषय कळतात का? सविस्तर वृत्त
पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या मुलाच्या कंपनीने मुंबई पोलिसांसाठी अत्याधुनिक पेपरलेस अशी ‘डिजिटाईज्ड नोटशीट प्लस’ प्रणाली मोफत उपलब्ध करून दिली आहे. काही तांत्रिक कारणामुळे ही प्रणाली अद्याप कार्यान्वित झालेली नाही. मात्र विद्यमान पोलीस आयुक्तांच्या मुलाच्या कंपनीला हे काम मंजूर करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी यात नियमबाह्य़ काहीच नाही, अशी प्रतिक्रिया संजय बर्वे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
झेंड्यावरील राजमुद्रेवरून राज्य निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस...पण!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रे संदर्भातील दाखल तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या भगव्या रंगाच्या झेंड्यावर राजमुद्रा आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडसह अन्य काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नोटीस पाठवली असून पक्षपातळीवर यावर तोडगा काढण्याची सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
5 वर्षांपूर्वी -
५ दिवसांचा आठवडा मग पगार ७ दिवसांचा का? मंत्री बच्चू कडू
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर एकीकडे कर्मचारी आनंद व्यक्त करत असतानाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या निर्णयावर निशाणा साधला आहे. ‘पाच दिवसांचा आठवडा मग कर्मचाऱ्यांना 7 दिवसांचा पगार का द्यायचा?’ असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL