महत्वाच्या बातम्या
-
थोड्याच वेळाच मनसेच्या भगव्या मोर्चाला सुरुवात; पाकिस्तानी-बांगलादेशी हटवा
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक सूची (एनआरसी) यावरून देशभरात प्रचंड वादंग सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे. घुसखोरांविरोधात मनसेच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरूवात होत असून, आझाद मैदानात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
रात्रभर चालणाऱ्या आंदोलनांमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत नाही पण आम्ही...संदीप देशपांडेची टीका
राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ९ फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. परंतु मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे स्वतः राज ठाकरे मोर्चात सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
5 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत खैरे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत: मनसे नेते हर्षवर्धन जाधव
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर मराठवाड्यात जोमानं कामाला लागणार असल्याचं सांगतानाच, जाधव यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. ‘चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं.
5 वर्षांपूर्वी -
मनसेत मेगाभरती; हर्षवर्धन जाधव, सुहास दाशरथे आणि प्रकाश कौडगे यांचा मनसेत प्रवेश
मुंबई आणि देशभरात घुसलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी महामोर्चा आयोजित केला आहे. दरम्यान, या महामोर्चापूर्वी मनसेमध्ये मोठ्या प्रमाण इनकमिंगला सुरुवात झाली आहे. आज कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेचे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन आणि प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.
5 वर्षांपूर्वी -
छेडछाड निंदनीय पण मानसी नाईकने युवासेनेच्या कार्यकर्त्यांचे नाव घेतले नाही: वरुण सरदेसाई
मराठी चित्रपट सृष्टीतील डान्सिंग क्वीन म्हणूनपरिचित असलेल्या अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याचं संतापजनक वृत्त समोर आलं. या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त पसरलं.
5 वर्षांपूर्वी -
मनसेच्या 'भगव्या' मोर्चाआधी मुंबई पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना नोटीस
राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ९ फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. परंतु मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे स्वतः राज ठाकरे मोर्चात सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
5 वर्षांपूर्वी -
युवासेना जिल्हा प्रमुखाच्या कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अज्ञाताकडून गैरवर्तन; तक्रार दाखल
मराठी चित्रपट सृष्टीतील डान्सिंग क्वीन म्हणूनपरिचित असलेल्या अभिनेत्रीसोबत छेडछाड झाल्याचं संतापजनक वृत्त आहे. या प्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मुंबईतील कार्यालयाचे दरवाजे बुधवारपासून पुन्हा उघडणार
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे मुंबईतील शहरातील कार्यालय येत्या बुधवारी म्हणजे १२ तारखेला सुरू होणार आहे. परळीतील कार्यक्रमात मुंबईतील हे कार्यालय सुरु करण्याची जाहीर घोषणा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
थेट जनतेतून सरपंच निवड रद्द; नाराज सरपंच परिषदेचं शिष्टमंडळ कृष्णकुंज'वर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २९ जानेवारीला झालेल्या राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचे ४ निर्णय घेण्यात आले होते. त्यात सरपंचाची निवड, पुणे येथे अध्यापकांसाठी कंपनी कायद्यान्वये प्रशिक्षण संस्था, पीएचडीधारक अधिव्याख्यात्यांची वेतनवाढ आणि तंत्रशास्त्र विद्यापीठातील शिक्षकांची सुधारित वेतनश्रेणी या विषयांचा समावेश होता.
5 वर्षांपूर्वी -
मातोश्री बाहेर मनसेची पोस्टरबाजी; वांद्र्यातील बांगलादेशी-पाकिस्तानी मोहल्ले, अड्डे साफ करा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्र्यातील मातोश्री घराबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरबाजी केली आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमधून थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करण्यात आलं आहे. वांद्र्यात जे काही बांगलादेशी आणि पाकिस्तानी मोहल्ले, अड्डे आहेत ते साफ करा, असं आवाहन या पोस्टरमध्ये केलं आहे. मनसेचे पदाधीकारी अखिल चित्रे यांनी हे होर्डिंग लावले आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपा सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे; त्यांच्या नव्या ‘फुलोत्पादना'ला शुभेच्छा
दिल्लीत काँग्रेसचे अस्तित्व फारसे उरले नाही. भारतीय जनता पक्ष सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत आहे. त्यांच्या या नव्या ‘फुलोत्पादना’ला आमच्या शुभेच्छा! पण केजरीवाल यांनी मागच्या पाच वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली आहेत. देशाच्या राजकारणात हा वेगळा प्रयोग आहे. राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन या प्रयोगाचे स्वागत केले पाहिजे. एक केजरीवाल सगळ्यांना ‘लय भारी’ पडताना दिसत आहेत. दिल्लीचे मतदार सुज्ञ आहेत. त्यांना शहाणपणाचे डोस पाजण्याची गरज नाही असंही सामनातून भारतीय जनता पक्षाला बजावलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महिला सुरक्षेवरून ट्विट; पण त्यातही काँग्रेसच्या काळातील योजना फडणवीसांची असल्याचा उल्लेख
‘महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात चार ऍसिड हल्ल्याच्या घटना घडल्या असून हे दुर्दैवी आहे. त्यामुळे आता आपण आपल्यातील भांडणे विसरुन सुरक्षिततेविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक’, असल्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. वर्धा येथील हिंगणघाट आणि औरंगाबादमधील घटनेवर अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप नगरसेवक मुरजी पटेलांचं नगरसेवक पद लघुवाद न्यायालयाकडून रद्द
मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकनं वाढली आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८१ मधून विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुरजी पटेल यांचं नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा आज लघुवाद न्यायालयात न्यायमूर्ती स्वर्णिता महालेंनी केली. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या संदीप नाईक यांचा नगरसेवकपदाचा मार्ग मोकळा झाला. एकाच आठवड्यात शिवसेनेचं महापालिकेतलं संख्याबळ दोननं वाढलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
रामदास आठवले पलटी मारण्याच्या तयारीत? पवारांसोबत राज्यसभा संदर्भात चर्चा?
राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत केंद्रिय समाजकल्याण राज्यमंत्री आणि आरपीआय (ए) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना भारतीय जनता पक्षाकडून संधी दिली जाणार नसल्याच्या बातम्या बुधवारी माध्यमांत झळकल्या. त्यानंतर आज आठवले यांच्या घरी एनसीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली.
5 वर्षांपूर्वी -
मनसेच्या भगव्या मोर्चात भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या महाअधिवेशनात झेंडा बदलल्यानंतर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका जाहीर केली होती. आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला होता. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चाही काढणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत महिला असुरक्षित; नाईट नाईफ निर्णयावेळी सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते
माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांची छेडछाड काढत विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र महिलांनी कोणतीही तक्रार दाखल न केल्याने फक्त चोरीचा गुन्हा दाखल होत या विकृताची सुटका होण्याची शक्यता आहे. हा व्यक्ती रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर तो हस्तमैथून देखील करत होता. दोन महिलांना पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पण त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. रजिऊर खान असं या विकृताचं नाव आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली: जे कार्ड राज्यात चाललं नाही ते दिल्लीत काय चालणार? राष्ट्रवादीकडून खिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात असून, राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीत ठाण मांडून आहे. तर याच मुद्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात चाललं नाही ‘ते’ दिल्लीत काय चालणार, असा खोचक टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विश्व हिंदू महासभा अध्यक्ष रणजीत बच्चन हत्या प्रकरणी मुंबईतून एकाला अटक
विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना गेल्या रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडली होती. रणजीत बच्चन हे हजरतगंज भागातून मॉर्निंग वॉकला जात असताना मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेलं असताना या हत्येप्रकरणातील एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आलं असून पुढील धागेदोरे लवकरच पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरेंची नवी पिढी; सत्तेमुळे आदित्य यांना अधिक संधी पण अमित यांच्यापुढे केवळ आव्हानं: सविस्तर वृत्त
ठाकरे घराण्यातील नवी आणि तरुण पिढी आता पूर्णपणे राजकारणात उतरली आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन्ही तरुण नेते आज सक्रिय राजकारणात आले असले तरी दोन्ही बाजूंचा विचार करता लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची सर्वाधिक संधी ही आदित्य ठाकरे यांनाच आहे आणि त्याचं मूळ कारण म्हणजे राज्याची आणि राज्यातील महत्वाच्या महानगर पालिकांची सत्ता आज शिवसेनेकडे आहे. त्यात स्वतः उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे स्वतः मंत्रिपदावर हेच कारण आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या कार्यसमितीत CAA विरोधात ठराव; तर मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा; काँग्रेस नाराज
सध्या देशभर CAA वरून आंदोलनं पेटलेली असताना आणि काँग्रेससहित अनेक पक्ष त्या कायद्याला विरोध करत असताना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेस नाराज होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा एकप्रकारे काँग्रेसला धक्का असल्याचं मानलं जातं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे काँग्रेस कसं पाहणार ते पाहावं लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL