महत्वाच्या बातम्या
-
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलं! समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. हा मार्ग ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मनसेचं नेतृत्व अन कार्यकर्ते सुद्धा सक्षम; पण पक्षातील नेते मंडळींचे कार्यक्रम काय? सविस्तर वृत्त
मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काही हालचाल सुरु नव्हती. मात्र राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. सर्वाधिक जागा जिंकून भाजपा विरोधी बाकांवर बसले आहे. त्यामुळे एकंदर राज्यातील राजकीय परिस्थितीत मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली; सोबत ओबीसी समाजाचे नेते देखील
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ खडसेंशी चर्चा करण्यास सांगितल्याचंही बोललं गेलं. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने खडसेंच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी उत्सुकता वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचा अपमान छोट्या-मोठ्या गोष्टीं? भाजपा - शिवसेना यांनी एकत्र यायला हवं: मनोहर जोशी
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले तर उत्तम होईल, पण सध्या दोन्ही पक्ष त्या मानसिकतेत नाहीत, असं मनोहर जोशी म्हणाले. मनोहर जोशी यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही यावेळी नमूद केलं.
5 वर्षांपूर्वी -
पार्टटाइम गृहमंत्री गेले; मुख्यमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचारांसंदर्भात तातडीची बैठक बोलावली
देशभरात सध्या महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांनी मोठ्याप्रमाणावर तोंड वर काढलं आहे. मात्र राज्यात मुख्यमंत्री पदासहित गृहमंत्री पद देखील सांभाळणारे हे केवळ पार्टटाइम गृहमंत्री असल्याचा आरोप विरोधकांनी नेहमीच केला होता. कारण, देशभरात महाराष्ट्र राज्य महिला विषयक गुन्ह्यांमध्ये द्वितीय क्रमांकावर असल्याचं राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१७ मध्ये दिलेल्या अहवालात स्पष्ट झालं होतं. तसाही राज्याला गृहमंत्री आहे हे सामान्य माणसाला फडणवीस सरकारच्या काळात कधी माहीतच नव्हतं.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राने जनतेच्या जीवनावश्यक मुद्यांवर लक्ष द्यावे, नको त्या प्रश्नांत लोकांना भरकटवू नका: मुख्यमंत्री
लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. ‘लोकसभेत जे झालं, ते विसरून जा. राज्यसभेत जेव्हा विधेयक मांडले जाईल तेव्हा शिवसेनेची भूमिका सर्वांपुढं येईलच,’ असं शिवसेना संसदीय पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
उद्या खडसेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी भेट झाल्यास भाजपाला जय महाराष्ट्र निश्चित होणार
भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. मंत्रीपदी निवड झाल्यानंतर आज प्रथमच भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन झाले. त्यानंतर भुजबळ फार्म येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस पुन्हा यावेत म्हणून पुण्यवान आ. कदमांनी केदारनाथला प्रार्थना केली होती; आता भाजपचा महापौर?
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ भारतीय जनता पक्षावर आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांवर लक्ष्य केंद्रीत करत आढावा बैठका घेण्यास सुरवात केली आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानं भारतीय जनता पक्षाचा तिळपापड झाला आहे. भारतीय जनता पक्ष शिवसेनेला जमेल तिथं आव्हान देण्याची शक्यता आहे. अनेक वर्षे मुंबई शिवसनेच्या हातात असल्यानं तिथं धक्का देण्याचा भारतीय जनता पक्षाचा इरादा असल्याचं दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भरधाव कारच्या धडकेने तरुणीचा जागीच मृत्यू; मुंबई चुनाभट्टी येथील घटना
काल रात्री एका भरधाव कारने धडक दिल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याने चुनाभट्टी परिसरात जनक्षोभ उसळला आहे. कारमध्ये एकूण ४ तरुण होते आणि ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. मद्यधुंद अवस्थेत असल्याने कारवरील ताबा सुटल्याने त्यांनी रस्त्यालगत चालणाऱ्या तरूणीला धडक दिली. याच तिचा मृत्यू झाला. अर्चना पारठे असे मृत तरुणीचे नाव आहे.
5 वर्षांपूर्वी -
आरे'तील झाडांची कत्तल करणाऱ्या अधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे PoK'वर धाडणार का? सविस्तर वृत्त
आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात आली. केवळ संध्याकाळपर्यंत जवळपास ३५० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड फिरवण्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली होती. विशेष म्हणजे त्यावेळी मोठ्या संख्येने पोलीस सुरक्षाही या परिसरात सज्ज ठेवण्यात आली होती. दरम्यान, पर्यावरण प्रेमींना याची माहिती मिळताच त्यांनी आरेमध्ये धाव घेत झाडं कापण्याला तीव्र विरोध केला होता. मुंबईकरांनी आंदोलनं करत झाडांची कत्तल करण्यास तीव्र विरोध अटकाव केला होता. त्यावेळी सर्व परिस्थितीमुळे रात्रभर आरे’मध्ये अत्यंत तणावाचं वातावरण होते. दरम्यान, उपस्थित पोलिसांनी देखील अनेक आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत थेट न्यायालयात हजर केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
नारायण राणे उद्धव ठाकरेंना वांद्रयात जाऊन उत्तर देणार होते; मग गाडी अडली कुठे?
लोकसभा निवडणुकीनंतर आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात राजकीय युद्ध पेटलं होतं. नारायण राणे यांना शिवसेना सोडून अनेक वर्ष झाली असली तरी उद्धव ठाकरे आणि राणे कुटूंबातील वाद क्षमण्याची शक्यता नाही. विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गमधील प्रचारादरम्यान राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वादाला मोठं तोंड फोडलं होतं आणि त्यानंतर खासदार नारायण राणे देखील संतप्त झाल्याचे पाहायला मिळालं होतं. कारण उद्धव ठाकरे यांनी थेट कोकणात सभा घेऊन नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली होती.
5 वर्षांपूर्वी -
हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचं स्वागत; सरकारने पोलिसांना सहकार्य करावं: आ. प्रणिती शिंदे
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
घटनेची चौकशी करा; घटनांवर पडदा टाकण्यासाठी पोलीस काही लोकांना अटक करतात: डॉ. नीलम गोरे
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार: मुख्यमंत्री
काल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही मागणी केली होती. आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण वर्षे ज्या चाळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घालवली. तिथून जिथे त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय घेतला, जिथून ते वर्ल्ड टेबल कॉन्फरन्सला (गोल्मेज परिषदेला) गेले. जिथे त्यांना छत्रपती शाहू महाराज भेटले. त्या खोलीचे व त्या इमारतीचे राष्ट्रीय स्मारक करावे अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
महापरिनिर्वाण दिन- राज्यपाल, मुख्यमंत्री व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर उसळला
काल गुरुवारी संध्याकाळपासूनच देशातील कानाकोपऱ्यातून भीमाची लाखो लेकरे चैत्यभूमीकडे येण्यास सुरुवात झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ही अलोट गर्दी दादर स्थानकातून हळूहळू चैत्यभूमीकडे सरकत आहे.
5 वर्षांपूर्वी -
नगरविकास खात्यावरून फडणवीस यांनाच 'ठाकरे दणका'; घाई गडबडीतील निर्णयांना स्थगिती
फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळाच्या अनेक तातडीच्या बैठका घेऊन निर्णयांचा सपाटा लावला होता. त्यातल्या नगरविकास विभागाने घेतलेल्या निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिलीय. त्याबाबतचे आदेश आज काढण्यात आलेत. स्थगित केलेले सर्व निर्णय हे नगरविकास विभागाचे असून ते खातं हे देवेंद्र फडणवीसांकडेच होतं. त्यामुळे हा त्यांना दणका असल्याचं मानलं जातंय. ज्या कामांचे आदेश निघाले आणि निधी मंजूर झाला त्याची यादी तातडीने पाठवावी आणि ज्याचे आदेशच निघाले नाहीत त्यावर पुढील आदेशापर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये असे निर्देशही नव्या आदेशत देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लाचार बोलणाऱ्या भाजपच्या 'वाघ'प्रवक्त्याचं कसाब ट्विट?
राज्यात आणि देशात कोणताही नवं सरकार स्थापन झालं की आधीच्या कामासंदर्भात आढावा बैठका म्हणजे नित्याचाच भाग आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठा दिलासा दिल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजित पवार यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. मात्र तोपर्यंत त्यांच्या ट्विट्स’चे स्क्रीनशॉट्स घेतले गेल्याने मोठी अडचण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
दणका! पक्षपात करून भाजप आमदारांना मंजूर केलेल्या अनुदानाच्या कामांवर गंडांतर
नव्या सरकारने फडणवीसांनी तडकाफडकी घेतलेल्या सर्व निर्णयांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेऊन निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यानुसार माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी खा. धनंजय महाडिक, आ. विनय कोरे व सोलापूर जिल्ह्यातील नेते कल्याणराव काळे यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने (Former Chief Minister Devendra Fadnavis) ३१० कोटी रुपयांची बँकहमी देण्याचा निर्णय रद्द करण्याचा विचार उद्धव ठाकरे सरकार (Chief Minister Uddhav Thackeray) आधीच घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी बँक हमी व खेळत्या भांडवलापोटी या २ नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालिन सरकारने मदतीचा निर्णय घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
भाजपमधील आगामी पक्षफुटी झाकण्यासाठी धारावीतील दाक्षिणात्य शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा शो?
राज्यात महाशिव आघाडीने सत्ता स्थापन केल्याच्या धक्क्यातून भारतीय जनता पक्षातील नेते मंडळी अजून सावरताना दिसत नाहीत असंच म्हणावं लागेल आणि त्यामुळे आमच्या पक्षात सर्वकाही आलबेल असल्याचा दिखावा करण्यात येतं आहे. धारावीत मोठ्या प्रमाणावर दाक्षिणात्य लोकांचं साम्राज्यं असून अनेकांचे किरकोळ उद्योग या भागात चालतात. शिवसेनेचा इथे चांगला संपर्क असला तरी तिथला मराठी कार्यकर्ता हा प्रमुख भूमिकेत असतो. तसेच या विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा मतदार मोठ्या प्रमाणावर आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL