महत्वाच्या बातम्या
-
अनधिकृत फेरीवाले: कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटले दाखल करण्याची गरज?
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३५३ नुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला असून १४ तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे यांनी दिले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याची महापालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप देशपांडे यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता, कोर्टाने त्यांना १४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पालिका अधिकारी कलम ३५३चा गैरवापर करून हुकूमशाही राबवत आहेत? सविस्तर
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३५३ नुसार शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संदीप देशपांडे यांना जामीन नाकारला असून १४ तारखेपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर न्यायदंडाधिकारी पी एस काळे यांनी दिले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याची महापालिका सहायक आयुक्त किरण दिघावकर यांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप देशपांडे यांना कोर्टात हजर करण्यात आलं असता, कोर्टाने त्यांना १४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड
देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्र सिंह तोमर, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे, गणेश नाईक, संजय कुटे, देवयानी फरांदे, देवराव भोईर, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले यांनी अनुमोदन दिले. याद्वारे आता भारतीय जनता पक्षाकडून फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
समुद्रातील पाण्याच्या वाढत्या स्तरामुळं मुंबई शहर नष्ट होऊ शकते: शास्त्रज्ञांचा इशारा
समुद्रातील पाण्याचा स्तर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं जगभरातील बरेच देश संकटात आहेत. हा पाण्याचा स्तर सतत वाढत असल्यामुळं २०५० पर्यंत जगभरातील अनेक शहरांवर याचा विपरीत परिणाम होणार आहे. दरम्यान नुकत्याच एका रिचर्समध्ये याबाबत अभ्यास करण्यात आला. त्यानुसार, पाण्याचा स्तर वाढल्यामुळं जगभरातील १५ कोटी लोकांना याचा फटका बसणार आहे. या १५ कोटी लोकांकडे राहण्याची सोयही नसणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
लवकरच शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा होणार
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय घडामोडीला वेग आला असून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेमध्ये हमरीतुमरी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत काही वेगळा निर्णय घेण्याची वेळ आल्यास काय करावे यासाठी विरोधी गोटातही भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासून आघाडीच्या बाजूनं झुकलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे लेखी आश्वासन हवेः शिवसेना
राज्याच्या सत्तेत समसमान वाटा मिळावा अशी मागणी शिवसेना आमदारांची केली आहे. मातोश्रीवर आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना दिले आहेत. तसेच सत्ता स्थापनेबाबत युतीत जो निर्णय होईल, तो भारतीय जनता पक्षाकडून लिहून घ्यावा अशी मागणीही शिवसेना आमदारांनी केली आहे, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
आज शिवसेना आमदारांची उद्धव ठाकरेंसोबत महत्वाची बैठक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आज आमदारांची बैठक होणार आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेवून उद्धव ठाकरे हे त्यांन मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच भाजपसोबत सत्ता स्थापनेबाबत त्यांची मतंही जाणून घेणार असल्याची चर्चा आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व उमेदवारांसोबत संवाद साधला
महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातर्फे निवडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची आज (२५ ऑक्टोबर) कृष्णकुंजवर बैठक बोलवली आहे. या बैठकीत राज ठाकरे निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांसोबत संवाद साधणार होते. त्यानुसार सकाळी ११ च्या दरम्यान सर्व उमेदवार कृष्ककुंजवर उपस्थित झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना युवा नेते भावी मुख्यमंत्री; वरळीत बॅनर्स झळकले
मुंबईसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. या विजयानंतर शिवसेनेनं सत्तेत समसमान वाटा पाहिजे, अशी भूमिका घेतली असतानाच, आता आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आदित्य यांच्या विजयानंतर त्यांच्या वरळी मतदारसंघात त्यांचे अभिनंदन करणारे बॅनर झळकले असून, ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख त्यावर करण्यात आला आहे. त्यामुळं आता सत्तेत समान वाटा दिला तर, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मातोश्रीच्या अंगणातच काँग्रेसकडून शिवसेनेचा पराभव; महाडेश्वर पराभूत
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा काँग्रेस उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी पराभव केला आहे. झिशान हे ४,२८५ मतांनी विजयी झाले आहेत. झिशान काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना या मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली होती. वांद्रे पूर्वची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान या मतदारसंघात आहे.
5 वर्षांपूर्वी -
माहीम: सहाव्या फेरी अखेर शिवसेनेचे सदा सरवणकर ४६४४ मतांनी आघाडीवर
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
'म मराठीचा म मुलुंडचा' इम्पॅक्ट; मुलुंडमध्ये मनसेची लॉटरी लागण्याची शक्यता: सविस्तर
राज्यातील विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनसेने बराचवेळ उमेदवार निश्चित करण्यात घालवला. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोश आल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात एकूण २० सभा घेतल्या आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथे सह-कुटुंब मतदानाचा हक्क बजावला
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: PMC बँक आणि आरे वृक्षतोडीचा फटका युतीला बसण्याची शक्यता: सविस्तर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्यावेळी पीएमसी बँकेतील गैरव्यवहारांचा आणि आरेतील मोठ्याप्रमाणावरील वृक्ष तोडीच्या मुद्द्यांमुळे भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्यातरी लाखो सामान्य ग्राहकांच्या मनातली आग तशीच धगधगत आहे आणि त्याचे परिणाम प्रत्यक्ष मतदानावर पडतील असं राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
तुमच्या मनातला राग २१ तारखेला व्यक्त करा: राज ठाकरे
मेट्रोमुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होणार आहे. मंदीच्या सावटाचा सर्वाधिक फटका येत्या काळात महाराष्ट्राला बसणार हे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ आर्थिक स्थिती धोक्यात आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करा, मंदीचा येणार म्हणजे अजून लाखो लोकांच्या नोकर्या जाणार आहेत. अनेक बँका बुडणार आहेत, अशी ढासळती अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे?, असा घणाघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रभादेवी येथे आयोजित प्रचार सभेत केला.
5 वर्षांपूर्वी -
कट्टर शिवसैनिक दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांची हकालपट्टी
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातच शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून निवडणूक लढणाऱ्या आमदार तृप्ती सावंत यांची अखेर शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून सावंत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांचा शिवसेनवर संताप; माजी खासदार अडसूळ अध्यक्ष
‘पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’च्या खातेदारांना दिलासा मिळावा यासाठी ‘रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया’च्या गव्हर्नरची भेट घेणारे शिवसेनेचे खासदार ‘सिटी को-ऑपरेटिव्ह बँके’बाबत उदासीन असल्याने या बँकेच्या खातेदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दीड वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही बँकेबाबत तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्र पाठवून निषेध करण्याची मोहीम खातेदारांनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी पीएमसी पाठोपाठ सिटी बँकेचा मुद्दाही निवडणुकीच्या तोंडावर तापणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची उंची मोदींएवढी नाही: किरीट सोमय्या
जळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो न लावण्यावरून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोंदीची उंची मोठी आहे, त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो. त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, असा टोला शिवसेनेला लगावला. लोकसभा निवडणुकीत मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महायुतीला मते मिळाल्याचे सांगत शिवसेनेला सोमय्या यांनी डिवचले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंचं 'केम छो' नंतर 'अय्यो लुंगी', मतांसाठी 'लुंगी हटाव' नाही तर 'लुंगी पहनों'
अमराठी भाषेत होर्डिंग लावल्यामुळे ट्रोल झालेले शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा नेटकऱ्यांना खाद्य दिले आहे. दाक्षित्य पेहरावात प्रचार करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना नेटकऱ्यांनी ‘हटाव लूंगी बजाव पुंगी’ची आठवण करुन दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बाबा मी शर्यतीत पहिला आलो; अंजली दमानियांकडून आदित्य ठाकरेंची खिल्ली
निवडणुकीच्या राजकारणात उतरलेली ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती म्हणून सध्या चर्चेत असलेले व शिवसेनेकडून ‘सूर्ययान’ असं कौतुक झालेले शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाव न घेता जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘बाबा मी धावण्याच्या शर्यतीत पहिला आलो,’ हा विनोद ट्विट करून दमानिया यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातील संभाव्य निवडणूक लढतीवर भाष्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल