महत्वाच्या बातम्या
-
भाजपाध्यक्ष अमित शाह आज मुंबईत, युतीचा निर्णय होणार?
विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज, रविवारी मुंबईत येत असून, गोरेगावमधील नेस्को सभागृहात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
नव्हे नव्हे नवे रस्ते घडवलेत तरी नवा महाराष्ट्र घडेल; सुमित राघवन यांचा आदित्य यांना टोला
स्मार्ट सिटी’च्या वल्गना करत मोफत वायफायसारख्या सुविधा देण्याच्या घोषणा करणाऱ्या मुंबई, ठाणे यांसारख्या शहरांतील रस्त्यांची अवस्था पाहिली तर ‘आपण खेडय़ात तर नाही ना’ असा प्रश्न निर्माण होतो. अशा खड्डेमय रस्त्यांवरून दररोज प्रवास करणारे सर्वसामान्य एकीकडे मिळेल त्या माध्यमातून आपल्या वेदना मांडत असताना मराठी चित्रपट-नाटय़सृष्टीतील कलाकारांनीही यात आपला आवाज सामील केला आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव, चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी यांच्यासह आता अभिनेता पुष्कर श्रोत्री यानेही प्रशासनावर जोरदार टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
२०१४मध्ये राज ठाकरे यांनी ब्लू-प्रिंटमध्ये जे दाखवलं ते गांभीर्याने न घेणारा मुंबईकर आज रस्त्यावर?
मुंबई शहरात सध्या #SaveAarey अभियानाने जोर धरला असून मुंबईकर देखील सरकारच्या पर्यावरण धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. पर्यावरणवादी संस्था, सामान्य मुंबईकर, प्राणी मित्रं ते शाळेतील विद्यार्थी देखील एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील आरे मध्ये सध्या मेट्रो३ संबंधित कारशेड बनवण्याचे काम सुरु असून त्यासाठी हजारो झाडांची कत्तल होणार आहे आणि त्यामुळे येथे आढळणाऱ्या तब्बल २१९ दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती देखील नष्ट होणार आहेत. मात्र आपल्या सरकारला आणि प्रशासनाला तब्बल काहीही दुःख नाही.
5 वर्षांपूर्वी -
आरेचा घात झाला कारण नवीन विकास आराखड्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १६५ हेक्टर जमीन वगळली?
आरे कॉलनी हे जंगल नाही, तसंच ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचाही भागही नाही. केवळ हिरवळ दिसली म्हणजे ते जंगल आहे, तिथं दुर्मिळ झाडं आणि इतर वन्यजीव आहेत असा दावा करणं साफ चुकीचं असल्याचं म्हणत राज्य सरकारनं याचिकाकर्त्यांचा मेट्रो कारशेडला असलेला विरोध पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्ट केलं. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टाला सांगितलं की, आरेतील मेट्रो कारशेडबद्दल हायकोर्टानं २६ ऑक्टोबर २०१८ मध्ये दिलेले आदेश अगदी स्पष्ट आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आरे केवळ हिरवळ; ते जंगल नाही; राज्य सरकारची न्यायालयात माहिती; मुंबईकरांमध्ये संताप
आरे कॉलनी हे जंगल नाही, तसंच ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचाही भागही नाही. केवळ हिरवळ दिसली म्हणजे ते जंगल आहे, तिथं दुर्मिळ झाडं आणि इतर वन्यजीव आहेत असा दावा करणं साफ चुकीचं असल्याचं म्हणत राज्य सरकारनं याचिकाकर्त्यांचा मेट्रो कारशेडला असलेला विरोध पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्ट केलं. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टाला सांगितलं की, आरेतील मेट्रो कारशेडबद्दल हायकोर्टानं २६ ऑक्टोबर २०१८ मध्ये दिलेले आदेश अगदी स्पष्ट आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची मनसे नेत्यांसोबत राजगडवर बैठक; त्यानंतर विभागाध्यक्षांशी; लवकरच निर्णय जाहीर होणार?
निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक तोंडावर असतानाच राज ठाकरे यांची मनसे मात्र ही निवडणूक लढवायची की नाही, याच संभ्रमात आहेत. मात्र आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत मनसेचे पदाधिकारी निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
गॅस गळतीच्या शक्यतेने मुंबईत भीतीचे वातावरण; आपत्कालीन यंत्रणा सज्ज
मुंबईच्या पूर्व उपनगरातील बहुतांश भागात गॅसची दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांमध्ये मोठी घबराट उडाली होती..मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून अग्निशमन दलाकडे तक्रारी आल्या..तक्रारींची दखल घेत अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली तर चेंबूरमध्ये असलेल्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर असल्यानं मनपा अधिकाऱ्यांनी तेथे पाहणी केली.. मात्र ही गॅस गळती नेमकी कुठे झाली याचा अद्याप शोध लागलेला नाही.
5 वर्षांपूर्वी -
मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका आम्हाला पटत नाही: प्रकाश आंबेडकर
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नसल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका पटत नसल्याचेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
ही तर 'सेव्ह-आरे' अभियान हाणून पाडण्याची योजना होती? अशा शिस्तबद्ध घडामोडी घडल्या!
मागील दोन आठवड्यापासून आणि विशेष करून #SaveAarey अभियानाने मुंबईमध्ये निसर्गाप्रती मोठी जनजागृती आणि उठाव होताना दिसला. त्यात सामान्य मुंबईकर, पर्यावरण तज्ज्ञ आणि संस्था तसेच अनेक राजकीय पक्षांनी सहभाग घेतल्याने सत्ताधाऱ्यांची निवडणुकीच्या तोंडावर झोप उडाल्याचं पाहायला मिळत आहे. हट्टाला पेटलेले निसर्गविरोधी सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी मात्र प्रसार माध्यमांच्या प्रश्नांनी मोठ्या गर्तेत अडकले होते. त्यात याच अभियानात हिंदी आणि मराठी चित्रपट श्रुष्टीतील लोकांनी सहभाग नोंदवल्याने प्रसार माध्यमांचे कॅमेरे मोठ्या प्रमाणावर आरे कॉलनीकडे वर्ग झाले.
5 वर्षांपूर्वी -
बोलबच्चन! २०१० ला मेट्रो'ने माझ्या 'प्रायव्हसी'वर आक्रमण; मग त्या २१९ प्रजातींची प्रायव्हसी? - सविस्तर
सध्या मुंबईतील मेट्रो३ च्या कारशेडमुळे मुंबईतील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरून आरेतील कारशेड इतरत्र हलवण्यासाठी आंदोलन करत आहेत. आरे येथे मेट्रो कारशेड बांधण्याबाबत बाधित होणाऱ्या व्यक्तींकडून हरकती सूचना मागिवल्या होत्या, त्यावर ‘झटका डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या ८० हजार तक्रारींबाबत अश्विनी भिडे यांनी शंका व्यक्त केली. कार शेड तिथून हटवा, झाडे तोडू नका, अशा एकाच प्रकारच्या तक्रारी होत्या. खऱ्या तक्रारी असतील तर त्याबाबत काही आक्षेप नाही, परंतु संख्या वाढवून दाखविणे, हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तक्रारी करणारी माणसे आहेत का, अशी शंका घ्यायला वाव आहे. तरीही मेट्रो कारशेडसाठी आरेची जागा का निवडली, झाडे तोडली तर भरपाई म्हणून आम्ही काय करणार आहोत, याबाबत त्या सर्व ८० हजार तक्रारींना उत्तरे दिली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
२०१० मध्ये मेट्रोला विरोध करणारे बच्चन दुसरं सरकार आल्यावर बदलले का? मनविसे उपाध्यक्ष अखिल चित्रे
बॉलिवूड अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोचं कौतूक करत आरेच्या जंगलतोडीला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. त्यानंतर मनसेने त्यांना अप्रत्युत्तर दिलं आहे. जंगल तोडून घरात झाड लावल्यानं जंगल तयार होत नाही, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी व्यक्त केले. २०१० ला मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन सरकार बदलल्यानंतर कसे बदलले असाही सवाल चित्रे यांनी यावेळी केला.
5 वर्षांपूर्वी -
अमिताभ यांचं प्रवास सुलभेतेवरून मेट्रोसंदर्भात ट्विट; अश्विनी भिडेंनी जोडलं 'आरे ऐका ना'सोबत
सध्या मुंबईतील मेट्रो३ च्या कारशेडमुळे मुंबईतील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरून आरेतील कारशेड इतरत्र हलवण्यासाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान सदर प्रकरण वृक्ष कत्तलीवरून मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर आज आरे परिसरातील झाडांच्या कत्तली करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र विषयाचे गांभीर्य आणि मोठ्या प्रमाणावर होतं असलेला विरोध ध्यानात घेता न्यायालयाचा पुढील निर्णय येईपर्यंत संबंधीत विभागाने आरेतील कोणतेही झाड तोडू नये, असे सक्त आदेश न्यायालयाने तोंडी स्वरूपात दिले आहेत. यावर पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
आरेतील झाडांच्या कत्तलींना उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती; न्यायाधीश आरेचा दौरा करणार
सध्या मुंबईतील मेट्रो३ च्या कारशेडमुळे मुंबईतील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर रस्त्यावर उतरून आरेतील कारशेड इतरत्र हलवण्यासाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान सदर प्रकरण वृक्ष कत्तलीवरून मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर आज आरे परिसरातील झाडांच्या कत्तली करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र विषयाचे गांभीर्य आणि मोठ्या प्रमाणावर होतं असलेला विरोध ध्यानात घेता न्यायालयाचा पुढील निर्णय येईपर्यंत संबंधीत विभागाने आरेतील कोणतेही झाड तोडू नये, असे सक्त आदेश न्यायालयाने तोंडी स्वरूपात दिले आहेत. यावर पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
अश्विनी भिडेंना मुंबईकरांच्या नीतीवर शंका; मॅनेज RSS-भाजप'नीतीचं ट्विटरवर गुणगान
कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाप्रमाणेच आरे मेट्रो कारशेडही जाणार, अशी विरोधी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतरही आरेमध्येच कारशेड होईल, दुसरी जागाच नाही, असे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.
5 वर्षांपूर्वी -
जे नाणारचं झालं तेच आरेचं होणार; उद्धव ठाकरेंचा वृक्षतोडीला विरोध
नाणारचं झालं तेच आरेचं होणार असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जोरदार विरोध केला आहे. उद्धव यांनी आज आरेतील वृक्षतोडीवरून भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे, त्यामुळे आगामी काळात आरे कारशेडवरून शिवसेना-भाजपा दरम्यान जुंपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
SaveAarey: पोलखोल; वृक्षतोडीच्या समर्थनार्थ आलेले ते 'मॅनेज' RSS व भाजप कार्यकर्ते: सविस्तर
मेट्रो-३ साठी कारडेपोच्या निमीत्ताने मुंबईतील आरे कॉलनीत हजारो वृक्षांची कत्तल होण्यास सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. कॉलनीतील झाडे वाचविण्यासाठी (मेट्रोच्या विरोधात नाही) भर पावसात हजारो सामान्य मुंबईकर, स्थानिक आदिवासी समाजातील तरुण, विद्यार्थी,पर्यावरणवादी संस्था, तसेच अनेक सामाजिक संस्था आंदोलने करत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
SaveAarey: आदित्य ठाकरे नाही; ते तर 'पप्पू ठाकरे' आहेत: आपच्या नेत्या प्रीती शर्मा
आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेड डेपोवरून सध्या मुंबई शहरातील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर आणि पर्यावरणप्रेमी वृक्षतोडीविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत. त्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेत, राज्यात, दिल्लीत सत्ता असताना केवळ दाखवण्यापुरता विरोध केला जातं असल्याचा आरोप यापूर्वी देखील विरोधकांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मेट्रो ३ : भुयारीकरणाच्या कामादरम्यान बोगद्याचा काही भाग कोसळला; एका कामगाराचा मृत्यू
कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत हे काम करण्यात येत असून सात टप्प्यात हे काम सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी भुयारीकरणाच्या कामादरम्यान अचानक बोगद्याचा काही भाग कोसळला आणि यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. टनल बोअरिंगच्या दरम्यान ही घटना घडल्याचे समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभा : राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली
विधानसभा निवडणूक २ दिवसांवर येऊन पोहोचली आहे आणि शिवसेना – भाजपने पक्षीय यात्रेतून संपूर्ण राज्य पिंजून काढलं आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नेमकं काय चाललं आहे तेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना समजेनासं झालं आहे. आज विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सेनेची स्थायी समिती सुसाट! मुंबई महापालिकेत २ दिवसांत १६०० कोटींचे प्रस्ताव मंजूर
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चार-पाच दिवसांत लागू होण्याची शक्यता गृहीत धरून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने कामे मंजुरीचा सपाटाच लावला आहे. पाचशे कोटी रुपयांच्या दीडशे कामांना सोमवारी मंजुरी देणाऱ्या पालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी आणखी चारशे कोटींच्या ५० हून अधिक प्रस्तावांना हिरवा कंदील दाखवला. यामध्ये रस्ते, जलवाहिन्या दुरुस्तीसह अन्य काही प्रस्तावांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल