महत्वाच्या बातम्या
-
आदित्य ठाकरे ‘वरळी’ विधानसभेतून लढणार हे जवळपास निश्चित
राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे वरळी विधानसभेतून लढणार असल्याची घोषणा आमदार अनिल परब यांनी वरळीतल्या शिवसैनिकांनामध्ये केली आहे. वरळीतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केल्याचे समोर आले आहे. तसेच ‘कामाला लाग‘, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. याआधी युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी देखील इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची मागणी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील गँगरेप प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास करा, राष्ट्रवादीची मागणी
मुंबईतील चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्त्वात आज मुंबईतील चुनाभट्टी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. यानंतर पोलिसांना दिलेल्या निवेदनात आरोपींना तात्काळ अटक करुन या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा, अशी मागणी करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! राम कदमांनी ५ वर्षांत मतदार संघाबाबत सभागृहात एकही प्रश्न विचारला नाही: प्रजा फाउंडेशन अहवाल
राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रासंदर्भात काम करणाऱ्या मुंबईतल्या प्रजा फाउंडेशन मुंबईमधील आमदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. प्रजाने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेल्या अहवालामध्ये मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांपेक्षा शिवसेनेच्या आमदारांची कामगिरी सरस असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पहिल्या ३ आमदारांच्या यादीत भारतीय जनता पक्षाच्या एकाही आमदाराच्या नावाचा समावेश नाही. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे हे सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार असल्याचे प्रजाने आपल्या अहवालात म्हटले आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुंबादेवी मतदारसंघाचे काँग्रेसचे अमीन अमीर अली पटेल असून तिसऱ्या स्थानी मालाडचे आमदार अस्लम रमझान अली शेख यांचा समावेश प्रजाने आपल्या अहवालात केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
'शिव' शब्दाचं राजकारण करणारी सेना कोळी समाजाच्या मुळाशी; 'शीव' कोळीवाडा नष्ट होणार
मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाण यांची हद्दच अजून निश्चित नसल्याने भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने आखलेल्या मुंबईच्या नवीन विकास आराखड्यात मुंबईमधील एकाही कोळीवाड्याचा समावेश करण्यात आलेला नाही. एकूणच परिस्थिती अशी आहे की वरळी कोळीवाड्यानंतर आता सायन कोळीवाड्याला सुद्धा झोपडपट्टी घोषित करण्याच्या हालचाली आधीच सुरु झाल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
मंगल प्रभात लोढांनी ४ मिल घेतल्या, त्यांनाही विचारा पैसे कुठून आणले: संदीप देशपांडे
भारतीय जनता पक्ष स्वतःला ‘वॉशिंग मशीन समजतो काय?’ चंद्रकांत पाटील विचारतात कोहिनूर मिलसाठी पैसे कुठुन आले? अहो मग मंगल प्रभात लोढा यांनी चार मिल घेतल्या. त्यांनाही विचारा ना पैसे कुठून आणले.” असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून केला. भारतीय जनता पक्षाने दोनशे नेते भ्रष्ट आहेत. त्यांची चौकशी का पुढे सरकत नाही. आम्हाला देखील सर्व काढता येते, असा थेट इशाराच त्यांनी भाजपाला यावेळी दिला.
5 वर्षांपूर्वी -
घाटकोपर पश्चिम विधानसभा: लढत मनसेचे 'गणेश' विरुद्ध भाजपाचे 'राम' अशीच रंगणार: सविस्तर
आगामी विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आणि भाजपसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत आयत्यावेळी तत्कालीन मनसेचे आमदार राम कदम यांनी हवेची दिशा ओळखून मनसेला सोडचिट्ठी दिली आणि मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षात बेडूकउडी घेतली होती. वास्तविक मतदासंघात कोणताही भरीव कार्य नसताना त्यांना नशिबाने पुन्हा साथ दिली आणि मोदी लाटेत त्यांची पुन्हा लॉटरी लागली होती. मूळचे भाजपचे पदाधिकारी असताना २००९ मध्ये मनसेच्या लाटेत पहिल्यांदा आमदार झाले आणि २०१४ मध्ये हवा पालटताच भाजपामध्ये जाऊन पुन्हा आमदार झाले हे सर्वश्रुत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेने ईडीच्या फलकाविरोधात बीएमसी 'ए वार्डला' पत्रक सोपवलं; पालिका सत्ताधारी पेचात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नियमाचे आणि कायद्याचे पालन करत ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर राज्यभरातील महाराष्ट्र सैनिक संतापल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या पाठी ईडीचा डाव आखून सत्ताधारी सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र सैनिकांनी केला होता. रस्त्यावर देखील राडा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेण्यात आलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
ड्रामेबाज! दुष्काळात परदेशात पाण्यावर मजा मारून, दहीहंडीला पुरग्रस्तांच्या नावे राम कदमांची चमकोगिरी
भाजप आमदार राम कदम यांनी यंदाची दहीहंडी रद्द केली आहे. राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे भाजपने घेतलेल्या निर्णयाला समर्थन देत राम कदम यांनी हा उत्सव साजरा न करण्याचे यावेळी ठरवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र राम मदम यांनी खिल्ली उडवली आहे. मागील वर्षीच्या दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर नेटीजन्ससह विरोधकांनीही त्यांना चांगलेच धारेवर धरले होते.
5 वर्षांपूर्वी -
लबाड-लांडग-ढोंग-करतंय; पूरग्रस्तांच्या नावाने सोंग करतय: मनसेकडून राम कदमांची खिल्ली
भाजप आमदार राम कदम यांनी यंदाची दहीहंडी रद्द केली आहे. राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे भाजपने घेतलेल्या निर्णयाला समर्थन देत राम कदम यांनी हा उत्सव साजरा न करण्याचे यावेळी ठरवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र राम मदम यांनी खिल्ली उडवली आहे. गेल्या वर्षीच्या दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर नेटीजन्ससह विरोधकांनीही त्यांना चांगलेच धारेवर धरले होते.
5 वर्षांपूर्वी -
मंदी व बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात; उद्धव यांची मोदींच्या आर्थिक धोरणांवर टीका
देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असतानाही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कुठलीही उपाययोजना करत नसल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. ऑटो क्षेत्रातील मंदी, हजारो नोकरदारांवर कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड, शेअर बाजारातील घसरण, डॉलरचा वधारलेला भाव या घडामोडींमुळे अर्थतज्ज्ञही चिंता व्यक्त करत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास भारताची अर्थव्यवस्था खूपच भक्कम आहे, इतर देशांच्या तुलनेत आपला विकासदरही आश्वासक आहे, असा दावा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; मुंबईत दहीहंडी उत्सवातून बडय़ा आयोजकांची माघार
राज्यासह देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आज दिवस भरात मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मात्र, यंदा सामाजिक भान राखत दहीहंडी साजरी करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात दरवर्षी हंड्या फोडण्यासाठी चुरस असते. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जलप्रलय आल्याने आयोजकांनी दहीहंडी उत्सव रद्द केला असून काही आयोजकांनी दहीहंडीमधील रक्कम पूरग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
बीडीडी चाळ पुनर्विकास समितीतून सेनेला डावललं; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर नाराजी
मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या मुंबईतील विविध ठिकाणच्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्पाच्या बाबतीत ३१ ऑगस्टला भेट घेणार असल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. म्हाडाच्या प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात गुरुवारी वांद्रे येथील म्हाडा भवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये ही त्यांनी ही माहिती दिली. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी येत्या २६ तारखेला प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये याबाबतचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असेही सांगण्यात आले. यावेळी शिवसेनेचे इतर आमदारही उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
शासकीय नियम: मनसेकडून ईडीलाच नोटीस; कार्यालयाचा बोर्ड मराठी भाषेत करा...सक्ती आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नियमाचे आणि कायद्याचे पालन करत ईडीच्या मुंबईतील कार्यालयात हजर झाले. त्यानंतर महाराष्ट्र सैनिक चवताळून उठले आहेत. राज ठाकरे यांच्या पाठी ईडीचा डाव आखून सत्ताधारी सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र सैनिकांनी केला होता. रस्त्यावर देखील राडा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेण्यात आलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
#महाराष्ट्रनामा इफेक्ट: शहांचा फॉलोवर ईडी अधिकाऱ्याची काल बातमी देताच तासाभरात FB प्रोफाइल डिलीट
कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे काल सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे गेले होते. दरम्यान, कालच्या चौकशीत नक्की किती वेळ लागणार हे निश्चित सांगता येत नव्हतं तरी बाहेरील परिस्थिती बिघडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागलं होतं. एकदिवस आधीपासूनच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
चिदंबरम ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचे जनक : शिवसेना
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन नाकारण्यात आला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या राउज अॅव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी हा निर्णय दिला.
5 वर्षांपूर्वी -
#ब्रेकिंग: राज यांच्या ईडी समन्सवर स्वाक्षरी करणारा तो अधिकारी अमित शहांचा फेसबुक फॉलोवर?
कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. दरम्यान, आजच्या चौकशीत नक्की किती वेळ लागणार हे निश्चित सांगता येत नसलं तरी बाहेरील परिस्थिती बिघडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. काल पासूनच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
कठीण क्षणी आई, अर्धांगिनी-मुलं सोबत राहिली; यात अंजली दमाणियांचा जळफळाट का? सविस्तर
कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आल्यानंतर ते चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. दादरच्या कृष्णकुंज या निवासस्थानावरुन राज हे सहकुटुंब ईडीच्या कार्यलयात अंदाजे साडे अकराच्या सुमारास दाखल झाले आहेत. राज हे सहकुटुंब चौकशीसाठी गेल्याच्या मुद्द्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे चौकशीला चाललेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असा सवाल दमानिया यांनी ट्विटवरुन विचारला आहे.
5 वर्षांपूर्वी -
संदीप देशपांडेंनी 'ईडी'यट हिटलर' शीर्षक असलेले टी-शर्ट परिधान केले होते
कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात
कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज यांना वाढतं समर्थन पाहून दादुची सावध प्रतिक्रिया? समाज माध्यमांवर चर्चा रंगली
मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने ठाण्यात एका मनसैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. प्रवीण चौगुले असे या आत्महत्या करणाऱ्या मनसैनिकाचे नाव आहे. मनसैनिक चांगलेच खवळले असून ते सत्ताधारी भाजपावर सुडाच्या राजकारणाचा आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची काय भूमिका आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो