महत्वाच्या बातम्या
-
तोच दरारा! बसेस आणि ईडी कार्यालयाला सुद्धा आजपासूनच सुरक्षा; पोलिसांचा व्याप वाढला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मुंबईतील ईडी विभागीय कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, उद्या चौकशी नक्की किती वेळ होणार हे निश्चित सांगता येत नसलं तरी बाहेरील परिस्थिती बिघडणार नाही यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे. काल पासूनच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी नोटीस बजावल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
एक हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं पीककर्ज माफ: सरकारची घोषणा
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिक अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. तर शेतजमीन देखील नापीक झाली आहे. तसेच शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिक वाहून गेली आहेत. त्यामुळे सरकारने एक हेक्टरपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी काही पिकं घेतली आहेत, त्या पिकांसाठी घेतलेलं कर्ज आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ईडीच्या नोटीसमध्ये 'भेटायला या' एवढाच उल्लेख आहे : उन्मेष जोशी
कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम हटाव आंदोलन राज ठाकरे पेटवणार असल्याने ईडीची नोटीस; समाज माध्यमांवर चर्चा रंगली
कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
सीबीआय-ईडी या स्वायत्त संस्था राहिल्या नसून त्या भाजपाच्या कार्यकर्त्या आहेत: संदीप देशपांडे
कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
देशभरात प्लॅस्टिक बंदी कठोरपणे करा: आदित्य ठाकरे
संपूर्ण देशात प्लॅस्टिकबंदी कायदा करून कडक अंमलबजावणी करा, अशी मागणी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी लागू झाली असून अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु आता ‘सिंगल यूज’ प्लॅस्टिक देशातून हद्दपार करण्याची गरज असून त्यासाठी कठोर कायदा करून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे भाष्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्तांसाठी ११० डबे घेऊन फिरणाऱ्या गरीब तावडेंच्या सौजन्याने एस्सेल वर्ल्ड ऑफर
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी भाजपच्यावतीने बोरिवली विधानसभा मतदारसंघात आज मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे तसेच खासदार गोपाळ शेट्टी मदतफेरीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत बोरिवली विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचे व दिल्लीश्वरांचे लाडके 'लाड' यांनी राज ठाकरेंची भेट घेतली; मूळ कारण गुलदस्त्यात
सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून भारतीय जनता पक्ष महाजानदेश यात्रेत तर शिवसेना जन आशीर्वाद यात्रेला लागले आहेत. सांगली-कोल्हापूरमधील वातावरण सध्या हळूहळू पूर्वपदावर येऊ लागण्याने राजकीय चक्र फिरण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ या वाक्याने भाजपचा घाम काढणारे राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकं काय करणार ते अजून सत्ताधाऱ्यांना माहित नाही.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे ४ वरिष्ठ नेते पडले नाही, त्यांना पाडण्यात आलं : राज ठाकरे
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार त्यांनी मंत्री म्हणून नको होते नेमके तेच लोकं पाडले गेले. अमरावतीमध्ये आनंदराव अडसुळ पडले, शिरुरमध्ये शिवाजी आढळराव पाटील, रायगड अनंत गीते पडले तसेच औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे पडले असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. तसेच काँग्रेसचा एक खासदार जो शिवसेनेत होता आणि काँग्रेसमध्ये गेला नेमका तोच खासदार निवडून आला असंही राज यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
मतांसाठी मालमत्ता करमाफीची घोषणा करत शिवसेनेने मुंबईकरांना टोप्या लावल्याचं उघड
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. पण, ही घोषणा पोकळच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसाधारण कर वगळून मालमत्ता कराची बिले लवकरच करदात्यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे ५०० चौरस फुटांपर्यंतचे घर असलेल्यांना ७० टक्के बिल भरावेच लागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मी त्या महिलेचा हात पकडलाच नव्हता; असं वागणं ही सेनेची संस्कृती नाही: महापौर
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सोमवारी त्यांच्याच मतदारसंघातील महिलेशी असभ्य वागले. त्यांच्या पदाला हे शोभण्यासारखं नसून ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. यापूर्वी देखील त्यांनी मुंबईतील अनेक गंभीर घटनांवर अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक प्रतिक्रिया दिल्याचा इतिहास आहे. डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टींवर देखील ते धादांतपणे खोटं बोलताना मुंबईकरांनी अनुभवलं आहे. काही दिवसांपूर्वी अनेक भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलेले असताना देखील त्यांनी ऑन कॅमेरा ते अमान्य करत प्रसार माध्यमांनाच चुकीचं म्हटलं होतं. मुंबईतील शहरामध्ये घडलेल्या अशा अनेक घटनांवेळी त्यांनी संतापजनक वक्तव्य केली आहेत. त्यात शिवसेनेकडून देखील त्यांच्या गैरवर्तनावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि त्यांना कोणतीही समज देखील देण्यात आलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा इफेक्ट: मुंबईतील शहाजी राजे भोसले संकुलातील स्विमिंग पुल अखेर सभासदांसाठी खुला
मुंबई महापालिकेतील गलथान कारभाराचे आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार अजून एक प्रकरण उजेडात आला होता. मुंबई पालिकेशी संबंधित शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठाण’ सामान्यांच्या पैशाचा चुराडा आणि गैरप्रकार करत असल्याचं महाराष्ट्रनामा टीमने उजेडात आणलं होतं. याच विषयाला अनुसरून आम्ही अंधेरी शहाजी राजे भोसले संकुलाच्या स्विमिंग पुलाची वार्षिक सभासद फीस भरणाऱ्या शंकर येराम यांची आमच्या टीमने प्रत्यक्ष भेट घेतली होती. मात्र हा विषय केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसल्याने, त्यांच्यासारख्या हजारो लोकांनी येथे स्वामिंग पुलाच्या वापरासाठी वार्षिक सदस्यता फीस भरली होती.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: मुंबईकरांनो! समुद्राने तुम्हाला तुमचा सर्व कचरा परत दिला
मुंबईतील क्वीन्स नेकलेस व त्याची ख्याती सर्वत्र आहे. मुंबईची शान असलेल्या ह्या मरीन ड्राईव्ह वर काही दिवसांपूर्वी मात्र एक विचित्र घटना घडली आणि वेळ आल्या नंतर निसर्ग आपलं रूप दाखवून देतोच ह्याची प्रचिती पुन्हा एकदा मुंबईकरांना आली. काही दिवसांपूर्वी मरीन ड्राईव्ह च्या समुद्राने सगळा कचरा बाहेर फेकला. त्या अथांग सागराने मनुष्याने त्यात केलेली सगळी घाण बाहेर फेकली, ह्याचे आश्चर्य सगळ्यांनाच वाटले.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईच्या प्रथम नागरिकाचेच महिलांशी थर्ड-क्लास वर्तन चिंताजनक
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथे जाब विचारणा-या महिलेचा हात पिरगळून तिला अपशब्द वापरल्याबद्दल तत्काळ त्यांच्याविरोधात ३५४ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. मंगळवारी विश्वनाथ महाडेश्वर यांचा उद्दामपणा एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला.
5 वर्षांपूर्वी -
'प्रिय अमित शाह', काश्मीर समस्या सोडवली तशी साकीनाक्याची ट्रॅफिक समस्याही सोडवा
सध्या जम्मू काश्मीरमधील कलम ३७० नंतर सर्वबाजूनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकार देखील ढासळत्या अर्थव्यवस्थेपेक्षा आणि वाढत्या बेरोजगारीपेक्षा भावनिक मुद्यांकडे दुर्लक्ष करून, नागरिकांना देखील त्यावरच केंद्रित करण्याची रणनीती खेळत आहेत. मुळात शहरात राहणाऱ्या लोकांच्या या विषयाला अनुसरून प्रतिक्रिया समजून घेतल्या तेव्हा तिकडे काय सुरु आहे त्यापेक्षा आम्ही राहतो त्या समस्येवर सरकारने बोलावं अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. त्यात चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील मोठी मंडळी देखील वेग वेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यात प्रसिद्ध लेखिका शोभा डे म्हटल्यावर त्या नेहमीच सरकारमधील लोकांना खोचक टोले लगावत असतात.
5 वर्षांपूर्वी -
पावसामुळे आजचा मुंबईतील मनसे पदाधिका-यांचा मेळावा रद्द
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार ? महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार की निवडणुकीवर बहिष्कार टाकणार यावर येत्या सोमवारी खास ठाकरी शैलीत उत्तर मिळण्याची शक्यता होती. आज सोमवारी अर्थात ५ ऑगस्टला वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्याला पक्षाध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते.
5 वर्षांपूर्वी -
आज मुंबईतील पदाधिका-यांच्या मेळाव्यात राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार ? महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार की निवडणुकीवर बहिष्कार टाकणार यावर येत्या सोमवारी खास ठाकरी शैलीत उत्तर मिळण्याची शक्यता आहे,. येत्या सोमवारी अर्थात ५ ऑगस्टला वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्याला पक्षाध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शहाजी राजे भोसले संकुल; स्विमिंग पुल व ललितकला प्रतिष्ठान; गैरप्रकाराच्या संशयावरून जनहित याचिका दाखल होणार
मुंबई महापालिकेतील गलथान कारभाराचे आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार अजून एक प्रकरण उजेडात आलं आहे. मुंबई पालिकेशी संबंधित शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठाण’ सामान्यांच्या पैशाचा चुराडा आणि गैरप्रकार करत असल्याचं उजेडात आलं आहे. याच विषयाला अनुसरून आम्ही अंधेरी शहाजी राजे भोसले संकुलाच्या स्विमिंग पुलाची वार्षिक सभासद फीस भरणाऱ्या शंकर येराम यांची प्रत्यक्ष भेट घेतली. मात्र हा विषय केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसून, त्यांच्यासारख्या हजारो लोकांनी येथे स्वामिंग पुलाच्या वापरासाठी वार्षिक सदस्यता फीस भरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील वाहतूक जवळपास ठप्प होण्याच्या दिशेने
मुंबई आणि परिसरात कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे. आजही दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून आज हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कोलमडली असून रेल्वे रूळही पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूकही कोलमडली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले; पाणी साचल्याने अनेक मार्ग देखील बंद
मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. श्रावण महिना गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पावसानं दडी मारली होती. परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पाऊस पडत असतानाच, वेगाने वाहणा-या वा-यांमुळे पावसाचे टपोरे थेंब मुंबईकरांना चिंब भिजवत आहेत. या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार