महत्वाच्या बातम्या
-
पावसामुळे आजचा मुंबईतील मनसे पदाधिका-यांचा मेळावा रद्द
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार ? महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार की निवडणुकीवर बहिष्कार टाकणार यावर येत्या सोमवारी खास ठाकरी शैलीत उत्तर मिळण्याची शक्यता होती. आज सोमवारी अर्थात ५ ऑगस्टला वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्याला पक्षाध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते.
6 वर्षांपूर्वी -
आज मुंबईतील पदाधिका-यांच्या मेळाव्यात राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असणार ? महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार की निवडणुकीवर बहिष्कार टाकणार यावर येत्या सोमवारी खास ठाकरी शैलीत उत्तर मिळण्याची शक्यता आहे,. येत्या सोमवारी अर्थात ५ ऑगस्टला वांद्रयाच्या रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्याला पक्षाध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शहाजी राजे भोसले संकुल; स्विमिंग पुल व ललितकला प्रतिष्ठान; गैरप्रकाराच्या संशयावरून जनहित याचिका दाखल होणार
मुंबई महापालिकेतील गलथान कारभाराचे आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार अजून एक प्रकरण उजेडात आलं आहे. मुंबई पालिकेशी संबंधित शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलात ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठाण’ सामान्यांच्या पैशाचा चुराडा आणि गैरप्रकार करत असल्याचं उजेडात आलं आहे. याच विषयाला अनुसरून आम्ही अंधेरी शहाजी राजे भोसले संकुलाच्या स्विमिंग पुलाची वार्षिक सभासद फीस भरणाऱ्या शंकर येराम यांची प्रत्यक्ष भेट घेतली. मात्र हा विषय केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसून, त्यांच्यासारख्या हजारो लोकांनी येथे स्वामिंग पुलाच्या वापरासाठी वार्षिक सदस्यता फीस भरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील वाहतूक जवळपास ठप्प होण्याच्या दिशेने
मुंबई आणि परिसरात कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे. आजही दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून आज हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कोलमडली असून रेल्वे रूळही पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूकही कोलमडली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले; पाणी साचल्याने अनेक मार्ग देखील बंद
मुंबईसह उपनगरांत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. श्रावण महिना गुरुवारी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी पावसानं दडी मारली होती. परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पाऊस पडत असतानाच, वेगाने वाहणा-या वा-यांमुळे पावसाचे टपोरे थेंब मुंबईकरांना चिंब भिजवत आहेत. या मुसळधार पावसानं सखल भागात पाणी साचलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
त्या ईडी'ला मी घाबरतही नाही: राज ठाकरे
निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम'विरोधात एल्गार! २१ ऑगस्टला विरोधकांचा मोर्चा
निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे. ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
BLOG : ५ रुपये भी बोहोत बडी चीज होती है बाबू!
एखाद्या सर्वसामान्य मुंबईकराला रेसकोर्स मध्ये धावणाऱ्या घोड्याच्या ताशी वेगापेक्षा मुंबई लोकलचा वेग आणि वेळ हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. खरं मुंबईकराच आयुष्य जगायचं असेल तर लोकलमधून प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही. मुंबई लोकल मेरी जान हे जरी खरं असलं तरी बेस्टच्या बस ही मुंबईच्या रस्त्यांची शान आहे. लोकल हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ह्यात शंका नाही.
6 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंचा पाठपुरावा कामी; गर्भवती महिलांना दिव्यांग प्रवाशांच्या डब्यातून प्रवासाची मुभा आणि...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या. तसेच अमित ठाकरे व त्यांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात ३२ सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या. या सूचनांपैकी काहींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दाखवली आहे. त्यांपैकी कोणत्या सूचनांवर कारवाई केली जाईल वा करण्यात आली आहे याबाबतची माहिती अमित ठाकरे यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी घेतली जयंत पाटलांची भेट; ईव्हीएमविषयी चर्चा झाल्याची शक्यता
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता. परंतु विरोधकांकडून भारतीय जनता पक्षाने हा विजय ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून मिळवला असल्याची टीका होत आहे. त्यामुळे विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
नॅशनल पार्क व आरे: अप्रत्यक्ष हा होईना, आदित्य ठाकरेंना ब्लूप्रिंट'मधील राज यांचा तो मुद्दा पटला असावा: सविस्तर
आदित्य ठाकरे यांच्याउपस्थितीत १,१०० एकाच वेळी अकराशे रोपे लावली. या वेळी बोलताना आदित्य म्हणाले, आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगले आहे. आधी पावसाचे इनकमिंग होऊ दे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
आरे कॉलनी: आता वृक्षरोपण करण्यापेक्षा, झाडांची बेसुमार कत्तल होताना कुठे होते? स्थानिकांचा सवाल
आदित्य ठाकरे यांच्याउपस्थितीत १,१०० एकाच वेळी अकराशे रोपे लावली. या वेळी बोलताना आदित्य म्हणाले, आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगले आहे. आधी पावसाचे इनकमिंग होऊ दे, असेही ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या टिकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर असताना शिवसेना- भारतीय जनता पक्षामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांचे पक्ष प्रवेश जोरदार सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. यावर, आमचे खत चांगलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार, असा टोला आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला.
6 वर्षांपूर्वी -
एकनाथ गायकवाड मुंबई कांग्रेसचे नवे कार्याध्यक्ष
मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर गेले काही दिवस अधांतरी असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावर अखेर तोडगा निघाला आहे. मिलिंद देवरांचा राजीनामा मंजूर न करता ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड हे मुंबई काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दलित आणि मराठी माणसाची नियुक्ती करून काँग्रेसने नवा डाव खेळलाय. एकनाथ गायकवाड हे उद्या २८ जुलैला सकाळी ११ वाजता.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनाप्रमुख जयंती ‘सरकारी’ होणार
४० पेक्षा अधिक वर्षे राजकीय कारकीर्द गाजवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती भावी पिढीसमोर चिरंतन रहावी, यासाठी शिवसेनाप्रमुखांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने मुंबई महानगरपालिका सभागृहात उचलून धरली होती. या मागणीला विरोधी पक्षातील सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्यानंतर या प्रस्तावाला अधिकृतपणे मंजुरी मिळाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई आणि उपनगरामध्ये पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात
शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू आहे. तुफान पावसाने मुंबई शहराला रात्रभर अक्षरशः झोडपून काढलं आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शहर आणि उपनगरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानं काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. भांडूप, अंधेरी, दादर, हिंदमाता, वांद्रे, माटुंगा, वडाळा, चर्चगेट या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोस्टल रोड: सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती कायम, सेनेच्या ड्रीम प्रोजेक्ट्ला धक्का
कोस्टल रोडप्रकरणी मुंबई महानगरपालिकेला सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने कोस्टल रोडवर असलेली स्थगिती कायम ठेवली आहे. मुंबई हायकोर्टाने कोस्टल रोड संबंधी दिलेला निर्णय रद्दबातल ठरवण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी नकार दिला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २० ऑगस्ट रोजी पार पडेल असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
कंगनासह ६१ सेलिब्रिटींचं मोदींच्या समर्थनार्थ पत्र, त्या ४९ जणांच्या पत्राला उत्तर
देशातील सद्यस्थितीवरून प्रतिभावंतांच्या वर्गामध्ये दोन गट पडले आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटना आणि श्रीरामाचे नाव घेत होत असलेल्या हिंसाचारावरून संताप व्यक्त ४९ प्रतिभावंतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत संताप व्यक्त केला होता. मात्र आता या ४९ प्रतिभावंतांना ६१ प्रतिभावंतांनी खुले पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पवार साहेब माझ्या हृदयात, पण बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सेनेत: सचिन अहिर
एनसीपी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. स्वत: सचिन अहिर यांनी याबाबतची माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर सचिन अहिर शिवबंधन बांधणार आहेत. त्यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास सचिन अहिर मातोश्रीकडे रवाना झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
MIDC पोलीस स्टेशन: डान्सबार कारवाईत पोलीस आयुक्तांकडून भेदभाव; पोलीस दलात तीव्र नाराजी
मुंबई शहरात अवैध्यरित्या सुरु असलेल्या डान्सबार’वरील पोलीस कारवाई पाठोपाठ त्या स्थानिक ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या निलंबनाच्या कठोर कारवाईमुळे सध्या मुंबई शहर पोलिसांमध्ये दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी (MIDC Police Station) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईट लव्हर्स बारवरील कारवाईनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांची केवळ परिवहन प्रादेशिक विभाग कंट्रोल रूम येथे तात्पुरत्या स्वरूपात बदली करून थेट प्रकरण दडपण्याच्या हेतूनेच ती प्रेरित असलायचं खात्रीलायक वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आलं आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL