महत्वाच्या बातम्या
-
मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात; अनेक ठिकाणी पाणी तुंबलं नाही तर फक्त 'साचलं' आहे
मुंबईसह उपनगरांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. काल पहाटेपासून पडणाऱ्या पावसाचा जोर वाढला आहे. गोरेगाव, मीरा रोड, लालबाग, परळ, या ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्ये पाणी महापौरांच्या नजरेतून केवळ ‘साचण्यास’ सुरूवात झाली आहे. अंधेरी, वांद्रे परिसरातही जोरदार पाऊस पडतो आहे. मुंबईतल्या अनेक ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्ये देखील पाणी साचल्याचं वृत्त आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरची उड्डाणं देखील खराब हवामानामुळे थांबवण्यात आली आहेत. मुंबई एअरपोर्टच्या प्रवक्त्याने एएनआयला ही माहिती दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्वतः जागेवरचं भाडं नाकारायचं; अन घरपोच सेवा देणाऱ्या 'उबेर-ओला' बंद करा अशी मागणी?
राज्यातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे महाराष्ट्र सरकार नेहमीच दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्यभरातील रिक्षाचालकांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय आटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने घेतल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रवाशांचे हाल होणार! विविध मागण्यांसाठी रिक्षाचालकांचा उद्यापासून बेमुदत संप
राज्यातील रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे महाराष्ट्र सरकार नेहमीच दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्यभरातील रिक्षाचालकांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय आटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने घेतल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई पालिकेकडून बेकायदा पार्किंगवरून १०,००० दंड वसुलीला सुरुवात
मुंबई महापालिकेतर्फे सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर पर्यंतच्या हद्दीत अवैधरीत्या वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध आजपासून धडक दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. जी दक्षिण विभागात पहिला दंड ठोठावत पहिल्या दिवशी एकूण ५६ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. यापैकी एकूण ९ वाहनमालकांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड भरून वाहने सोडवून घेतली. तर उर्वरित ४७ वाहने महापालिकेच्या ताब्यात असून ती परत देताना दंडासह विलंब शुल्क आकारले जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्लास्टिक कचरा येतो, पण समुद्रकिनारी डंपरने 'डंप' केल्यासारखा चिखल आलाच कुठून?
एका बाजूला दादर-माहीम चौपाटीवरचा रोजचा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाला २०१८ मध्येच लघुनिविदा काढण्याची वेळ आली होती. समुद्रात टाकलेला कचरा भरतीच्या लाटांमधून पुन्हा किनारपट्टीवर येत असल्याने किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेला वर्षभरात कोटय़वधी रुपये खर्च करावे लागतात. माहीम-दादरचा पाच किलोमीटरचा किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी सर्वात कमी बोली लावणाऱया मे. विशाल प्रोटेक्शन फोर्स यांना पुढील सहा वर्षांसाठी तब्बल १२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येणार होते. या कंत्राटानुसार किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी पावसाळय़ात दर दिवसाला ६५ हजार रुपये तर पावसाळय़ानंतरच्या दिवसांत दरदिवशी ३५ हजार रुपये देण्यात येणार होते. दरवर्षी त्यात पाच टक्क्यांनी वाढ करण्यात येणार होती.
6 वर्षांपूर्वी -
मिलिंद देवरा यांचा मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा
मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत आहे. दरम्यान सदर राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी दिल्लीतील 3 वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची शिफारस देखील राजीनामा देण्यापूर्वी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई सीएसएमटी पूल व तिवरे धरण दुर्घटनेत अनेकांचे बळी जाऊनही उद्धव ठाकरे फिरकलेच नाही
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून काही अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण ६ मुंबईकर मृत्युमुखी पडले, तर तब्बल ३१ जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी चुकीचा स्ट्रक्चरल अहवाल दिल्याचा ठपका असलेलस स्ट्रक्चरल ऑडिटर नीरजकुमार देसाई याला अटक करून वेळ मारून घेतली होती. मुंबई महानगपालिकेत सत्तेत असलेली शिवसेना मुंबैकरांप्रती किती असंवेदनशील आहे हे तेव्हाच कळाले जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी किंवा बाधितांना भेटण्यासाठी फिरकले देखील नाही.
6 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानीचे राजू शेट्टी व रविकांत तुपकर कृष्णकुंजवर, विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून पावसाळ्यात देखील सर्व पक्षाच्या नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान आज राज्यातील भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजीपार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीवेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी पक्षाचे नेते रविकांत तुपकर देखील उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
शहर नियोजनाचा अर्थ ते सांगत राहिले; पण मुंबईकर २५ वर्ष 'अर्थ'वेड्या पक्षाच्या प्रेमात तल्लीन? सविस्तर
मागील २ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या पावसामुळे मुंबईतील पायाभूत सुविधांचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पावसाळ्यापूर्वी करोडो रुपये खर्चून १०० टक्के नालेसफाई करण्यात आल्याचा दावा देखील शिवसेनेने सामना वृत्तपत्रातून केला होता. कालच विधानसभेत कॅगचा अहवाल सादर करण्यात आला आणि त्यामध्ये मुंबई महापालिकेतील कारभाराची तसेच नालेसफाई आणि पायाभूत सुविधा उभारण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले होते. दरम्यान, पायाभूत सुविधा कोलमडल्याने विरोधकांपासून ते सामान्य नागरिकांनी सत्ताधारी शिवसेनेवर संताप व्यक्त करत, मागील २५-३० वर्ष शहरात सत्तेत असून देखील इथल्या पायाभूत सुविधा जैसे थे असल्याचा आरोप अनेक सामान्य लोकांनी देखील केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
विरोधक व नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा सामनाच्या अग्रलेखात नेहमीची 'फॅशन' असा उल्लेख
मागील २ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या पावसामुळे मुंबईतील पायाभूत सुविधांचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पावसाळ्यापूर्वी करोडो रुपये खर्चून १०० टक्के नालेसफाई करण्यात आल्याचा दावा देखील शिवसेनेने सामना वृत्तपत्रातून केला होता. कालच विधानसभेत कॅगचा अहवाल सादर करण्यात आला आणि त्यामध्ये मुंबई महापालिकेतील कारभाराची तसेच नालेसफाई आणि पायाभूत सुविधा उभारण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले होते. दरम्यान, पायाभूत सुविधा कोलमडल्याने विरोधकांपासून ते सामान्य नागरिकांनी सत्ताधारी शिवसेनेवर संताप व्यक्त करत, मागील २५-३० वर्ष शहरात सत्तेत असून देखील इथल्या पायाभूत सुविधा जैसे थे असल्याचा आरोप अनेक सामान्य लोकांनी देखील केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॅग रिपोर्टमध्ये शिवसेनेची पोलखोल; कसली नालेसफाई, गटारे प्रचंड गाळाने अजूनही भरलेली
मुंबई शहरांमध्ये पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाल्याच्या थेट दावा सामना वृत्तपत्रातून करण्यात आला होता. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी मुंबई शहरातील नाले आणि गटारांमधील गाळ काढण्यासाठी मोठे टेंडर देखील काढण्यात आले होते. मात्र सत्ताधारी शिवसेनेची आज विधानसभेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या कॅग रिपोर्ट’मध्ये पोलखोल झाली आहे. प्रतितास केवळ २५ मि.मी पडलेल्या पावसाचे पाणी वाहण्याची मुंबईतील गटारांची क्षमता असून मुंबईतील गटारे गाळाने आजही भरली असल्याचे कॅगने आपल्या अहवालात समोर आणले आहे. मुंबईत साचणाऱ्या पाण्यास मुंबई महापालिकेचा ढीसाळ कारभार आणि हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचं कॅगने आपल्या अहवालात उघड केल्याने सत्ताधारी शिवसेना तोंडघशी पडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंकडून महापालिकेच्या भोंगळ कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न
मुंबईची तुंबापुरी झाल्यानंतर अखेर आज आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांच्या समोर प्रकट झाले आणि उणिवा स्वीकारण्यापेक्षा त्यांनी पालिकेच्या कामचुकार कारभाराची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. मागील २ दिवसाच्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पावसाला सुरवात होताच हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अशातच युवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महापालिकेची पाठराखण केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
असलेलं नीट सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला - अजित पवार
सध्या मुसळधार पाऊसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये भिंत कोसळून दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना – भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही तसेच हा सत्तेचा माज आणि सरकारचा बेजबाबदारपणा आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
अनधिकृत बांधकामामुळे अशा घटना घडतात पण त्याला पालिका जबाबदार नाही - संजय राऊत
मुंबई: मालाडमध्ये भिंत कोसळून झालेली दुर्घटना हि महापालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात आहे असं वक्तव्य सेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. संजय राऊत यांच्यामते पावसाळा सुरु होण्या आगोदर उद्धव ठाकरेंनी स्वतः मुंबईभर फिरून नालेसफाईची पहाणी केली होती.
6 वर्षांपूर्वी -
अजब उत्तर! मुंबईत पाणी तुंबलं नाही तर साचलं: महापौर विश्वनाथ महाडेश्वर
पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई झाली असल्याचं स्पष्ट करणाऱ्या शिवसेनाप्रणित मुंबई महागरपालिकेची पावसाळा सुरु होताच पोलखोल झाली आहे. मुंबईमध्ये पावसाला सुरुवात होऊन २-३ दिवस झाले नसताना देखील काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मूंबईतील अनेक भाग पूर्णपणे जलमय झाल्याचं वृत्त आहे आणि त्यासंबंधित व्हिडिओ देखील स्वतः सामान्य नागरिकच समाज माध्यमांवर शेअर करून संतप्त भावना व्यक्त करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
त्या १०० टक्के नालेसफाईतील 'टक्केवारी' नक्की गेली कुठे? सविस्तर
मुंबई आणि शिवसेनेची सत्ता असलेल्या आजूबाजूच्या शहरांमध्ये पावसाळा सुरु होऊन १-२ दिवस उलटले नाहीत तरी जागोजागी पाण्याची गटारं तुंबल्याने लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर पाणी तुंबल्याने प्रवास करणे कठीण झाले असून वाहन देखील अडकून पडली आहेत. विशेष म्हणजे पावसाळा सुरु होऊन १-२ दिवस झाले आहेत आणि म्हणावा तास पाऊस देखील पडलेला नाही, मात्र शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु पावसाळा सुरु होण्यापूर्वी सामना वृत्तपत्रात शिवसेनेकडून १००% नालेसफाईची कामं झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे पावसाच्या पहिल्याच झटक्यात मुंबईतील नालेसफाईच्या कामातील टक्केवारी नक्की गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई: अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक अत्यंत धीम्या गतीने
शहरात रात्रीपासून धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. दरम्यान सायन-पनवेल महामार्गावर नेरुळ येथे उड्डाणपुलाखाली पाणी भरल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे. नेरुळ ते सानपाडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत, जोरदार पावसाने वाशी ,बेलापूर आणि ऐरोली भागतील बस डेपोमध्ये पाणी भरल्याने प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकावे म्हणून आ. नितेश राणे यांच्याकडून कॅव्हेट दाखल
मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या विरोधात काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचे भाष्य केले होते. दरम्यान आमदार नितेश राणे यांनी देखील मराठा आरक्षणावरून पहिल्यापासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. स्वतः नारायण राणे यांनी आघाडी सरकार सत्तेत असताना त्याचा मसुदा तयार केला होता. दरम्यान मराठा आरक्षणाच्या निर्णयाच्या विरोधात एकतर्फी स्थगिती मिळू नये यासाठी आमदार नितेश राणे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकावे यासाठी आमदार नितेश राणे सज्ज झाले असून शनिवारी त्यांनी कॅव्हेट दाखल केले.
6 वर्षांपूर्वी -
मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून बदलापूरच्या हद्दीत शिवसेनेने ढकललं
राज्याची राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांची कित्येक वर्ष सत्ता आहे, त्यांनीच मराठी माणसाला मुंबईतून हुसकावून लावून बदलापूरच्या हद्दीत ढकललं आहे, अशी घणाघाती आणि बोचरी टीका आमदार कपील पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेनेच्या हाती मुंबईची सत्ता आहे, मात्र मुंबई महापालिका स्वतः मराठीत बोलत नाही. मराठीत व्यवहार देखील करत नाही. मराठी भाषेचं आणि मराठी माणसाचं सर्वात जास्त नुकसान मराठी भाषेच्या नावाने सत्तेवर आलेल्यांनीच केल्याचे आरोप यावेळी कपिल पाटील विधान परिषदेत केला.
6 वर्षांपूर्वी -
प्लॅस्टिक बंदीमध्ये फ्लेक्सचा समावेश करावा, नेटकऱ्यांची मागणी - सोशल व्हायरल
प्लॅस्टिकबंदीवर मात्र नेटकऱ्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महाराष्ट्र सरकारला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांच्या मते प्लॅस्टिकबंदीमध्ये फ्लेक्स बॅनरचा देखील समावेश करावा. आज गल्लोगल्ली आणि रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला फ्लेक्सच – फ्लेक्स दिसतात. कुठे भाऊंचा वाढदिवस, कुठे राजकीय अभिनंदन तर कुठे राजकीय श्रेयाच्या नावाने लागलेले फ्लेक्स. इतकंच काय तर आजकाल लोकांनी लहानग्यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स देखील लावायला सुरुवात केली आहे. हे इतरत्र लावलेले फ्लेक्स शहरांच्या सौंदर्यात डाग होताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO