महत्वाच्या बातम्या
-
ते भगवं-पांढरं राहू दे! उद्धव ठाकरेंनी सेनेच्या डझनभर मंत्र्यांच्या कामाचा हिशेब द्यावा: समाज माध्यमं
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात वायफळ मुद्यांना विशेष महत्व देत असून, त्याच मुख्य कारण म्हणजे शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी केलेला विकास शून्य कारभार आणि राजीनामा नाट्याचे प्रयोग याशिवाय दुसरं काहीच केलं नसल्याने, शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या डझनभर मंत्र्यांच्या ५ वर्षातील कारभाराचा हिशेब सामान्य जनतेला द्यावा असे आवाहन समाज माध्यमं करताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत तब्बल २८ कंपन्यांमध्ये भागीदारी - नारायण राणे
कोकणात देखील लोकसभेची धामधूम सुरु झाली आहे असंच म्हणावं लागेल. मुंबईत मराठी माणसांची टक्केवारी कमी झाली, १९६०-६६ दरम्यान मुंबईत मराठी माणूस साठ टक्के होता, पण आज मराठी माणूस केवळ १८ टक्के शिल्लक आहे. मुंबईतला मराठी माणूस कुठे गेला.वसई, बदलापूर, कल्याण याठिकाणी मराठी माणूस निघून गेले. ही स्थिती शिवसेनेनी आणली, उद्धव ठाकरेंची बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. २८ कंपन्यांमध्ये रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीची भागीदारी आहे. हे मी विधानसभेत पुराव्यानिशी मांडले, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा स्पष्ट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुरजी पटेल-केसरबेन पटेल यांच्यासहित ५ नगरसेवकांवर जातीच्या दाखल्या अभावी राजकीय गंडांतर?
जातीच्या दाखल्याअभावी पालिकेतील एकूण पाच नगरसेवकांवर गंडांतर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजज मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांचे खंडपीठ निकाल जाहीर देणार आहेत. त्यामुळे इतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना ३, कॉंग्रेस १ आणि समाजवादी पक्षाच्या १ उमेदवारांना नगरसेवकपदाची मोठी लॉटरी लागू शकते असं म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
‘काँग्रेसमुक्त भारत’ ही भाजपाची फालतू कल्पना: उद्धव ठाकरे
देशातील लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतील आहे. यावेळी उद्धव विविध विषयांना हात घालत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सेना-भारतीय जनता पक्षाची युती, प्रलंबित राम मंदिर, शेतकरी आत्महत्येपासून पक्षांतर करणारे उमेदवार अशा विविध विषयांवर मत व्यक्त केले आहे. परंतु, याच मुलाखतीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अनेक मतांशी सहमती दर्शवली मात्र अनेक विषयांशी असहमती देखील दर्शवली.
6 वर्षांपूर्वी -
टॅक्सचोरीसाठी इतर राज्यांमध्ये नोंदणीकृत केलेल्या गाड्या मुंबईत 'मै भी चौकीदार' अभियानासाठी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैं भी चौकीदार ही मोहिम सुरू केली. त्यानंतर देशभर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र उभे केले गेले. मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला समर्थन देण्यासाठी १० वॉलेंटियर्सच्या वतीने कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
6 वर्षांपूर्वी -
आम्ही “शहाचे” सैनिक वेडे करुन जिवाचे रान: मनसेचा सेनेला टोला
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आज त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान या सोहळ्यासाठी मुंबईहून उद्धव ठाकरेही थेट गांधीनगर या ठिकाणी रवाना झाले. ज्यानंतर उद्धव ठाकरेंवर सर्व स्तरातून टीका जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख अचानक स्वबळावरून पलटले आणि मागील ५ वर्ष मोदी आणि अमित शहा यांना बोचऱ्या शब्दात लक्ष करणारे उद्धव ठाकरे सध्या त्यांच्यावर भलतेच फिदा असल्याचं जाणवतं.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवार - सचिन तेंडुलकर भेट; चर्चांना उधान
देशभरात आगामी लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापत चालले असून निवडणूकांची रणधुमाळी सुुरू आहे.यादरम्यानच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चाना जोरदार उधाण आले आहे. तब्बल ३० मिनिटं दोघांमध्ये सविस्तर चर्चा सुरु होती. असं असलं तरी दोघांच्या भेटीचं कारण अजून समोर आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
दक्षिण मध्य मुंबई: काँग्रेसच्या प्रचारात मनसे पदाधिकाऱ्यांची हेजेरी
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात आज पहाटे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेसला सुखद धक्का दिला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या प्रचारार्थ काढलेल्या संवाद फेरीमध्ये मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील कार्यकर्त्यांसह हजेरी लावली.
6 वर्षांपूर्वी -
अवधूत वाघ यांना जाब विचारून तिथेच त्यांच्या कानाखाली मारु: आमदार बच्चू कडू
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख लावारिस असा करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्यावर आमदार बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडले आहे. अवधूत वाघ याचा डीएनए तपासला पाहिजे, त्याचा डीएनए कदाचित पाकिस्तानचा असावा, तो स्वतःच बेवारसची औलाद आहे, अशा कडक शब्दात त्यांनी अवधूत वाघ यांच्यावर टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
संतापजनक! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलं लावारीस: भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजून एक संतापजनक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख ‘लावारीस’ म्हणून केला आहे. एका ट्विटला उत्तर देताना अवधूत वाघ यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघ यांनी पातळी सोडून केलेल्या या विधानामुळे भारतीय जनता पक्ष अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानावर टीकेची झोड उठली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूर्व विधानसभा: भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष मनोज नायक यांची जबाबदारी वाढली?
मुंबईमधील अंधेरी विधानसभा क्षेत्रात भाजपाची भिस्त असलेले विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल सध्या अनेक विवादास्पद प्रकरणांमध्ये अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच नगरसेवक मुरजी पटेल यांना मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा दंड म्हणजे तब्बल २४ लाख रुपये भरपाई निमित्त देण्यास सांगितले. कारण होतं अनधिकृत होर्डिंग प्रकरणी पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करणे. विशेष म्हणजे मुरजी पटेल यांना लेखी प्रतिज्ञापत्र देणं भाग पडल्याने, भविष्यात लहानशी चूक झाली तरी त्यांचं पद धोक्यात येऊ शकतं आणि मोठी किंमत स्थानिक भाजपाला मोजावी लागू शकते. त्यासोबतच स्थानिक भाजप नगरसेवक मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नी तसेच नगरसेविका केसरबेन पटेल या दोघांवर सध्या जातीच्या प्रमाणपत्रावरून मुंबई उच्च न्यायालयात खटले दाखल आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्व येथील शिवसेना आणि काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत असताना, स्थानिक भाजप मात्र नव्या नैतृत्वाकडे आस लावून आहेत.
6 वर्षांपूर्वी -
PNB बँकेने कर्जबुडव्या म्हणून घोषित केलेल्या धैर्यशील माने यांना सेनेकडून उमेदवारी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पीएनबी घोटाळा आणि देशातून पळ काढणारा निरव मोदी आधीच भाजपची डोकेदुखी ठरलेला असताना, आता शिवसेनेत देखील एक प्रति निरव मोदी असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीला देखील PNB म्हणजे पंजाब नॅशनल बँकेनेच कर्जबुडव्या म्हणून अधिकृतपणे घोषित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आमदार निवडणूक रिंगणात उतरणार
लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी किरीट सोमय्यांकडून मातोश्रीच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसैनिकांचा रोष असलेले ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार सोमय्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अद्याप मातोश्रीवरुन त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेली नाही. निवडणूक जवळ येत असताना, प्रचाराचे दिवस कमी होत असताना ईशान्य मुंबईचे खासदार असलेल्या किरीट सोमय्या यांना धक्का बसला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे: आशिष शेलार
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेते एकमेकांवर टीका करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बारामतीचा पोपट’ असा त्यांचा उल्लेख केला होता. राज ठाकरेंची भाषणं बारामतीहून येतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तेव्हापासून मनसे आणि भाजपा नेत्यांमध्ये डिजिटल युद्ध पेटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोणते दिवे लावले म्हणून युतीच्या अधिक जागा ते सर्व्हेत का येत नाही? नेटिझन्स
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेक ओपिनियन पोल अर्थात सर्व्हे येण्यास सुरुवात झाली असून त्यात महाराष्ट्रात भाजप आणि सेनेला घवघवीत यश मिळणार असं दाखविण्यात आलं आहे. वास्तविक शिवसेनेबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या राज्यातील आणि केंद्रातील डझनभर मंत्र्यांनी, ६३ आमदार आणि १८ खासदारांनी नक्की विकास कामांचे कोणते दिवे लावले आहेत, म्हणून लोकं त्यांना भरघोस मतदान करणार आहेत? अशी चर्चा आता समाज माध्यमांवर रंगू लागली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नातू म्हणाला आजोबा मीच 'पार्थ' मीच लढणार, आजोबांना ताईंची काळजी, दादांना पोराची
मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. जाणते आजोबा नातवडांसमोर मुके.. मुके, आजोंबाच्या डोळयासमोर आता राजकीय धुके.. धुके.. धुके, अशा शब्दात भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी पराभूत होणार: प्रकाश आंबेडकर
नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणारे नितीन गडकरी यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा कमीत कमी ३ लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी दोनशे कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाहीत, असा थेट दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना राज्य सरकारकडून झटका, १ एप्रिलपासून वीज दरात ६ टक्क्याने वाढ
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर १ एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात तब्बल सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे विजबिलात सहा टक्क्यांनी वाढ होईल आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसेल.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, किरीट सोमैयांच्या उमेदवारीला तीव्र विरोध
ईशान्य मुंबईच्या लोकसभा उमेदवारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर आज पुन्हा चर्चा झाली. परंतु आज देखील याबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समोर येत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून भाजपाचे विद्यमान खासदार किरीट सोमैया यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंचे विश्वासघातकी प्रयोग बघत राहण्याशिवाय वनगांच्या हाती काहीच नव्हतं
आज मुंबईच्या ‘मातोश्री’वर जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचे पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश दिला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गावित हे पालघरचे शिवसेनेचे लोकसभा उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, श्रीनिवास वनगांना विचारूनच गावित यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मी अजून थोडे काम करतो व नंतर उमेदवारी मागतो, असे वनगा यांनीच सांंगितल्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल