महत्वाच्या बातम्या
-
स्वबळाचं वचन मोडणारे उद्धव ठाकरे म्हणतात, 'आमच्या पाठीत वार स्वकीयांनीच केले'
शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीनंतर टीका करणाऱ्यांवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. दरम्यान, शिवसैनिकांकडून हात वर करून स्वबळाचं वचन घेऊन देखील स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच ते पायदळी तुडवलं. त्यानंतर सामान्य मराठी माणसापासून ते विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. साडेचार वर्षानंतर अचानक भाजप आपल्याला पोषक भूमिका घेत असल्याचा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना निवडणुकीला महिना शिल्लक असताना झाला.
6 वर्षांपूर्वी -
राज संधी साधू नाहीत, सेनेने केवळ ३ पेंग्विन व शिववडा दिल्याचं मराठी माणसाला माहित आहे
शिवसेनेने केवळ स्वार्थी आणि संधीसाधू राजकारण केलं आहे. जेव्हा २०१४ मध्ये देशभरात नरेंद्र मोदी यांची लाट होती, तेव्हा शिवसेनेने केवळ स्वतःचा फायदा करुन घेतला. परंतु, जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमत बनत गेलं तेव्हा त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली, अशा शब्दात काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेवर प्रचंड संतापलेला मराठी माणूस राज ठाकरेंसोबत एकवटू शकतो: सविस्तर
काल भाजप शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आणि त्यानंतर मराठी जनमानसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांच्या बद्दल प्रचंड संतापाची भावना निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील साडेचार वर्षांपासून स्वबळ आणि स्वाभिमानाच्या बाता मारणारे उद्धव ठाकरे किती ठाम मताचे आहेत हेच यातून अधोरेखित झालं आहे. केवळ आगामी निवडणुकीत स्वतःची जास्त जागांची सुप्त इच्छा पूर्ण कारण्यासाठीच त्यांनी सामान्य मराठी मतदाराला अक्षरशः मूर्ख बनवलं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेनेला मराठी मताच्या जबर फटका बसण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. सत्ताकाळात डझनभर मंत्र्यांनी विकासाची काहीच कामं केली नाहीत म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हिंदुत्व आणि राम मंदिर असे भावनिक मुद्दे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बाहेर काढले. परंतु, शिवसैनिकांकडून स्वबळाची शपथ घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी स्वतःच शपथ मोडून शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्याचा देखील त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
संजय राऊत व उद्धव ठाकरेंनी फक्त बाता मारून मराठी माणसाला फसवलं
स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अफजलखान ते गळाभेट, धन्य ते राजकारणी आणि मूर्ख ती जनता
केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. भाषणादरम्यान ऐतिहासिक दाखले देताना अफजलखान आणि अफजखानाच्या फौजा अशा भाजप आणि भाजपच्या नेत्यांचे नामकरण करण्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांनी ५ वर्ष खर्ची घातली. परंतु, निवडणुका जवळ येताच ज्यांना अफजखान संबोधलं, त्यांचीच आता हसत गळाभेट घेण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
जय शिवराय! रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र उत्साह
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सजावट आणि रोशनाई करण्यात आली आहे. राज्यात ठिकठिकाणी शिवजयंतीची मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची तयारी देखील जल्लोषात सुरू असल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवनेरीवरही शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप विरोधकांच्या भेटी केवळ जास्त जागा मिळवण्यासाठीची योजना होती?
केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. एरवी शिवसेना सर्वकाही पडद्या आडून करते हा इतिहास असताना, भाजपच्या कडवट विरोधांसोबत भेटीगाठी करून, त्या भेटींची छायाचित्रं जाणीवपूर्वक प्रसिद्ध करून भाजप नैतृत्वाला ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरु होते. त्यात हिंदी भाषिक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपाला जोरदार फटका बसताच शिवसेनेने जागा वाटपाच्या बाबतीत बार्गेनिंग पावर अधिकच मजबूत करण्यास सुरुवात केली होती. त्याचाच प्रत्यय म्हणजे, आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती झाली आणि उद्धव ठाकरेंनी स्वबळाच्या नाऱ्याला तीरांजली देत युतीचा निर्णय जाहीर केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची राम मंदीर मुद्यावरून पलटी; आता 'पहले सरकार फिर मंदिर', सेना-भाजप युती झाली
केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाची नारा देऊन पलटले आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या नावाने घोषणा करत अयोध्या दौरा आयोजित करून मोठी जाहिरातबाजी देखील केली. दरम्यान, भाजपवर दबाव वाढण्यासाठी ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणा दिली. परंतु त्या घोषणेला त्यांनी स्वतःच तीरांजली दिली आहे. आज त्यांनी अयोध्येत मंदिर बनण्यापूर्वीच सरकार बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत भाजपसोबत आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संसार थाटण्याची अधिकुत घोषणा केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: शिवसैनिकांकडून स्वबळाची शपथ घेऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःच शपथ मोडली
केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: शिवसैनिकांनो मला स्वबळाचं बळ द्या, मी त्यांचे दात पाडतो, उद्धव ठाकरे पलटले
केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पटकवता पटकवता भाजपने 'पटवूनच' टाकली: सविस्तर
शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यात आयोजित केलेल्या एका पक्षीय मेळाव्यात शिवसेनेचं नाव न घेता, जे मित्र पक्ष सोबत येणार नाहीत त्यांना ‘पटकून टाकू’ अशी थेट धमकी दिली होती. परंतु, शिवसेनेचा इतिहास अनुभवल्याने त्यांना पटवणे अधिक सोपं असल्याचं जाणवलं आणि भाजपाची टीम शिवसेना नेतृत्वाला राजी करण्यासाठी कामाला लावली होती.
6 वर्षांपूर्वी -
पहिल्यांदा संतप्त वातावरणात वाटण्या आटपून घेतल्या? आता पाकिस्तानवर हल्ल्याची मागणी
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्यावर तोडगा निघाल्याचे प्रसार माध्यमांकडे वृत्त आहे. पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांच्या बटालियनवर झालेल्या भ्याड हल्लात ४० हून अधिक जवान शहीद झाले. त्यानंतर देशभर संतप्त वातावरण असताना भाजप आणि शिवसेनेदरम्यान मातोश्रीवर जोरदार चर्चा सुरु होती. त्यावेळी तापलेल्या वातावरण शिवसेना आणि भाजपने जागावाटपाचा कार्यक्रम आटपून घेतला असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मातोश्रीवर फडणवीसांची युतीबाबत सकारात्मक चर्चा
मुख्यमंत्र्यांनी काल रात्री मातोश्रीवर जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान, सदर बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून भारतीय जनता पक्ष २५ तर शिवसेना एकूण २३ जागा लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राजकीय मतभेद बाजूला ठेवून भ्याड हल्ल्याला चोख प्रतिउत्तर देण्याची हीच वेळ: राज ठाकरे
काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं, ‘पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. ह्या शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून ह्या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे, असं आवाहन केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे उत्तर-भारतीयांची द्वेषी कसं म्हणावं? अविनाश जाधवांमुळे चिमुकली आईच्या कुशीत
महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटली की ते उत्तर भारतीय द्वेषी अशी साधारण भावना प्रसार माध्यमांनीच लोकांच्या मनात बिंबवून ठेवली आहे. मग त्यात चुकीची आणि सत्यता न बघता हिंदी प्रसार माध्यमांनी देशभर त्यांच्याबद्दल नाकाराम्तक बीज रोवली. अगदी महाराष्ट्रात रोजगार हा पहिल्यांदा मराठी मुलांनाच असा आग्रह धरला तरी राज ठाकरेंची गुंडगिरी असे मथळे प्रसार माध्यमांमध्ये सहज पाहायला मिळाले. त्यात हिंदी मीडिया नेहमीच अग्रेसर राहिला, परंतु देशातील इतर राज्यात असे विषय उचलले गेले की कोणतीही वाच्यता हिंदी माध्यमं प्रसारित करत नाहीत, हे वास्तव आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे आणि फडणवीस बेस्ट कपल, केवढा तो एकमेकांवर जीव: धनंजय मुंडे
आज व्हॅलेंटाइन डे असल्याने अनेकजण स्वतःच्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. मात्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फाडावीसांना खोचक टोला लगावला आहे. धनंजय मुंडे यांनी दोघांचा एक फोटो ट्विट करत यांच्याशिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? असा प्रश्न देखील विचारला आहे.
6 वर्षांपूर्वी -
संजय निरूपम हटाओ, मुंबई कॉंग्रेस नेत्यांची दिल्लीत जोरदार मोहीम
आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य काँग्रेसमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आला आहे. मुंबई सर्व वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक मल्लिकार्जुन खरगे यांची आज भेट घेतली आहे. निरुपम यांच्याकडे पक्षाची अन्य जबाबदारी देऊन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्याकडे सोपवावी, असा आग्रह या नेत्यांनी खरगे यांच्याकडे धरल्याचे सांगण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट संपात सामील झालेल्या कामगारांचा पगार कापला
पगारवाढ तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेल्या बेस्ट कामगारांच्या जानेवारी महिन्याच्या पगारात वाढ झाली. परंतु, दुसऱ्या बाजूला बेस्ट प्रशासनाने कामगारांचा संपकाळातील ९ दिवसांचा पगार कापला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आमची ती भेट व जुन्या आठवणी, अन मनसेची भेट ती सेटलमेंट? सेनेचा रडवा प्रचार सुरु होणार?
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने वापरलेलं जुनं तंत्र म्हणजे पक्षीय राजकारणाच्या भेटी गाठी. मातोश्री किंवा मातोश्री बाहेर शिवसेना आणि इतर पक्षीय नेत्यांच्या राजकीय किंवा खासगी भेटीगाठी झाल्या की प्रसार माध्यमांपुढे सहज, औपचारिक आणि जुन्या आठवणी असे शब्द प्रयोग करून विषय टोलवण्यात शिवसेना अगदी तरबेज असल्याचे मागील अनेक घटनांवरून पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणूक; मागे लागलेल्या रोडरोमियोत शिवसेनेला इंटरेस्ट असल्याचे वृत्त?
मागील अनेक दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूकपूर्व सर्व्हेचा धसका घेतल्याचं समजतं. त्यामुळे स्वबळ वगरे बाजूला ठेवून शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचं सूत्र जवळपास ठरल्याचे वृत्त प्रसार माध्यमांकडे आहे. काही दिवसांपूर्वी भाजपकडून जागावाटपावरून येणाऱ्या प्रस्तावावरून प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, ‘रोडरोमियोसारखे आमच्या मागे का लागता? आम्हाला तुमच्यात इंटरेस्ट नाही’, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला फटकारलं होतं. परंतु, सध्याच्या वृत्तानुसार त्याच रोडरोमियोने खुश करणारा प्रस्ताव समोर ठेवल्याने शिवसेनेचा इंटरेस्ट वाढल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO