महत्वाच्या बातम्या
-
मुंबईतील नद्यांच्या अवस्थेवर रिव्हर अँथम | आता नागपूरच्या नद्यांचं वास्तव वाचा
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरून टीका करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी राजकारणी नाही, समाजसेविका आहे. जेव्हा आम्ही मुंबईला आलो तेव्हा रिव्हर मार्च ही मोहीम चालवणाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. सचिन गुप्ता आणि जयदीप राणा यांना आऊटसोअर्स करण्यात आलं. हे दिग्दर्शक आणि अशिस्टंट होते. या दोघांनी याआधी सदगुरु यांच्यासाठी गाणं तयार केलं होतं. त्या गाण्यासाठी कोणीही पैसा घेतलेला नाही. मनात आलं असतं तर शाहरुख, सलमानलाही घेतलं असतं,” रोखठोक प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांनी मलिक यांना दिलंय.
3 वर्षांपूर्वी -
Breaking News | देशमुखांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत | परमबीर सिंहांचं चौकशी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र
IPS परमबीर सिंह यांच्यावर ठाणे कोर्ट आणि मुंबईतील किला न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटीच्या वसुलीचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर सिंह यांच्यावर ठाणे आणि मुंबईत खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh in ED Custody | अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख याना काल मध्यरात्री ईडीने 100 कोटीच्या वसुलीप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर अनिल देशमुखांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. अटकेनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून कोर्टात हजर करण्यात (Anil Deshmukh in ED Custody) आलं होतं. यावेळी कोर्टात बराच वेळ युक्तीवाद सुरु होती.
3 वर्षांपूर्वी -
Deglur Bypolls Election | सभांमधून ED, IT'च्या धमक्या देणाऱ्या चंद्रकांतदादा, फडणवीसांना मतदाराने नाकारलं | भाजपचा पराभव
नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी सुरु झाली होती. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. 14 टेबलवर 30 फेऱ्यांची ही मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं होतं.
3 वर्षांपूर्वी -
तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती कुठे आहेत हे आमच्याकडे आहे | स्फोट दिवाळीनंतर होतील - संजय राऊत
एकाबाजूला नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत घेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं. ‘मी काल जे आरोप केले, ते हवेत केले नाहीत. ड्रग्ज पेडलरने गाण्याला पैसे पुरवल्याचा आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी काल माझ्यावर आरोप केले. हे आरोप करताना त्यांनी म्हटलं होतं की, आरोप केल्यानंतर मी माफी मागत नाही.
3 वर्षांपूर्वी -
ड्रग प्रकरणी भाजप गोत्यात आणि सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात येताच अनिल देशमुख यांना अटक?
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्याअगोदर त्यांची 13 तास कसून चौकशी (Anil Deshmukh Arrested) करण्यात आली.
3 वर्षांपूर्वी -
Amruta Fadnavis & Jaideep Rana | लवंगी फुटताच अमृता फडणवीसांच्या गाण्यातून त्या 'फायनान्सरचं' नाव हटवलं
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ड्रग्जप्रकरणावरून आरोपांची माळ लावल्यानंतर भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. फडणवीस यांनी हा आरोप फेटाळून लावला होता. मात्र, मलिक यांच्या आरोपानंतर जयदीप राणाचं नाव मुंबई रिव्हर अँथममधून वगळण्यात आल्याने आश्चर्य (Amruta Fadnavis and Jaideep Rana) व्यक्त केलं जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Extortion King Riyaz Bhati | दाऊदशी संबधित खंडणी किंग रियाझ भाटी सोबतचे फडणवीसांचे फोटो 'या' व्यक्तीकडून ट्विट
देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय आरोप करत नाही. अन् केलेला आरोप कधीच मागे घेत नाही, असा इशाराच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना (Extortion King Riyaz Bhati) दिला.
3 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh in ED Office | अनिल देशमुख ED कार्यालयात चौकशीसाठी दाखल
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आतापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेकदा समन्स बजावले होते. मात्र, असं असूनही ते मागील अनेक महिन्यांपासून या यंत्रणांसमोर हजर होत नव्हते. मात्र आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास अनिल देशमुख हे अचानक मुंबईतील ईडी कार्यालयात (Anil Deshmukh in ED Office) दाखल झाले.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | समीर वानखेडेंच्या मुलांचे फोटो मलिक यांनी शेअर केलेले नसताना वानखेडेंची खोटी माहिती
NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी मोठी खळबळ उडवून दिली. समीर वानखेडेंचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करत त्यांच्या धर्मपरिवर्तनाचा मुद्दाही नवाब मलिकांनी मीडियासमोर आणला. या सर्व घडामोडींनंतर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग (Sameer Wankhede) आयोगाकडे आपली तक्रार केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
लोकांना अटक करुन खटला सुरु असतानाच शिक्षा द्यायची अशीच तपास यंत्रणेची कार्यपद्धती - मुकुल रोहतगी
आर्यन खानला मुंबई हायकोर्टात जामीन मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे भारताचे माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी NCB च्या तपासावर आपलं मत व्यक्त केलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत रोहतगी यांनी आर्खन खान प्रकरणातील न्यायालयीन डावपेचांची बाजू (Mukul Rohatgi express anger over NCB role) उलगडून दाखवली.
3 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede Caste Proof | प्रशासकीय पडताळणी आधीच जातीच्या दाखल्यावर 'सत्यतेची' टिपणी
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची कागदपत्रे मी तपासली आहेत. वानखेडे यांनी धर्मांतर केलं नाही असं सकृतदर्शनी दिसून येतं, असं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचं (Sameer Wankhede Caste Proof) सांगितलं जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Non Bailable Warrants Against Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी
महाराष्ट्रातील मुंबई न्यायालयाने शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि अन्य दोघांविरुद्ध खंडणीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. यापूर्वी ठाणे न्यायालयाने खंडणीच्या आरोपावरून परमबीरविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. नुकतेच गुन्हे शाखेने खंडणी प्रकरणात परमबीरला चौकशीसाठी हजर राहण्याचे (Non Bailable Warrants Against Parambir Singh) आदेश दिले होते. मात्र ते हजर झाले नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
कोणताही दहशतवादी अँगल नसताना आर्यन खान प्रकरण तपास NIA कडे देण्याची तयारी? | नेमका काय बनाव रचणार?
तब्बल 28 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आर्यन खान अखेर घराच्या दिशेनं रवाना झाला. सकाळापासून सुरू असलेली जामीनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आला. आर्यनला घेण्यासाठी शाहरुख खानचा बॉडीगार्ड ऑर्थर रोड तुरुंगाबाहेर गाडी घेऊन हजर होता. बॉडीगार्डसोबत आर्यन खान घरी मन्नतकडे (Aryan Khan Case to NIA) रवाना झाला.
3 वर्षांपूर्वी -
Kashif Khan on Cruise Drug Party | कासिफ खानचा क्रूझ पार्टीतील नवा व्हिडीओ नवाब मलिक यांच्याकडून पोस्ट
FTv चा इंडिया हेड कासिफ खानचा नवा व्हिडीओ पोस्ट करून नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. कासिफ खाननेच क्रूझ पार्टीचं आयोजन केलं होतं. तो त्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी क्रूझवर छापा पडला त्या दिवशी तिथे होता. गर्लफ्रेंडसोबत नृत्य करत होता असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप - नवाब मलिक
गेले तीन आठवडे ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या टार्गेटवर एसीबीचे संचालक समीर वानखेडे होते. पण आता वानखेडेंबरोबर मलिकांच्या ट्रिगर पॉईंटवर भाजप देखील आहे. आर्यन खान ड्रग्ज केसला केपी गोसावीच्या फरार होण्याने एक वेगळं वळण मिळालं. आता त्याच केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. तसंच येत्या विधानसभा अधिवेशनात तो नेता कोण?, हे नावंही जाहीर करेन, असं म्हणत मलिकांनी फटाक्यांची माळ सुरुच ठेवली आहे.
3 वर्षांपूर्वी -
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, आम्ही कोर्टातही जाऊ आणि पुरावेही सादर करु - नवाब मलिक
क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर (Nawab Malik Vs Sameer Wankhede) करण्यात आला.
3 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | समीर वानखेडेंना अटकेपूर्वी 3 दिवस आधी नोटीस देणार | राज्य सरकारची हायकोर्टाला हमी
वादात अडकलेले NCB अधिकारी समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कुठल्याही प्रकारचा एफआयर दाखल करण्यापूर्वी किंवा अटकेची कारवाई करण्यापूर्वी तीन दिवस आधी वानखेडे (Sameer Wankhede) यांना नोटीस दिली जावी. समीर वानखेडे यांच्यावर तूर्तास कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. हायकोर्टाच्या निकालानंतर वानखेडे यांच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
3 वर्षांपूर्वी -
वानखेडेंचे कुटुंब पहिल्यापासून हिंदूच असल्याचं सांगणाऱ्या क्रांती रेडकर यांची माहिती खोटी | डॉ. कुरेशींकडून पोलखोल
एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे. समीर वानखेडे यांचे कुटुंब पूर्वी मुस्लिम होते, अशी माहिती समीर वानखेडेंचे पहिले सासरे डॉ. जाहीद कुरेशी यांनी प्रसार माध्यमाशी बातचीत करताना अनेक खुलासे केले आहेत. आपली नाहक बदनामी होत आहे आणि त्यामुळे सत्य लोकांसमोर मांडणं महत्वाचं असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया देताना (Sameer Wankhede’s Religion Exposed) म्हटलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede Under Investigation | 25 कोटीच्या डीलप्रकरणी वानखेडेंच्या चौकशीची राज्य सरकारकडून ऑर्डर
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अखेर राज्य सरकारने चौकशीची घोषणा केली आहे. 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे. सरकारने ऑर्डर काढून 4 अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली (Sameer Wankhede Under Investigation) आहे. एकीकडे नवाब मलिकांच्या आरोपांनी घायाळ झालेले समीर वानखेडे आता राज्य सरकारने लावलेल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या