महत्वाच्या बातम्या
-
दिवाळीचं औचित्य साधून मी व्यंगचित्रांची एक मालिका घेऊन येत आहे: राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे या दिवाळीत व्यंगचित्रांची एक मालिकाच घेऊन येत आहेत. राज ठाकरे यांनीच स्वतः त्याबाबतची अधिकृत माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ साजरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज सायंकाळी दादरमधील शिवाजी पार्क येथे ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, भारतरत्न सचिन तेंडुलकर तसेच अंजली तेंडुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस आणि एनसीपी'ची लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज जागावाटपासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवास्थानी आज सकाळी ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परंतु, जवळपास अर्ध्या जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये जवळपास सहमती झाली असली तरी सुद्धा काही महत्वाच्या जागांचा तिढा अजूनही कायम आहे असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहा आणि मोहन भागवत यांच्यात भेट, राम मंदिरावर चर्चा?
आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद आदी महत्वाच्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्याकरिता मोदी सरकारवर दबाव आणला असतानाच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईत भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केल्याचे वृत्त आहे. या बैठकीत राम मंदिर तसेच शबरीमला मंदिर अशा मुद्यावर बराचवेळ चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: BMC एल वॉर्डवर मनसेचा मोर्चा, नगरसेवक तुर्डे यांच्यासाठी मनसे मैदानात
मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांच्या वॉर्डात विकास कामं होऊ देत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते सर्वच मैदानात उतरले होते. पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी कुर्ल्यातलं एल वॉर्ड ऑफिस गाठलं. याआधी ज्या कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक संजय तुर्डे यांना ५५ दिवस जेलमध्ये राहावे लागले होते आणि त्या कंत्राटदाराला स्थायी समितीची परवानगी नसताना सुद्धा तो कशी काय मुंबई महापालिकेची कामं करु शकतो, असा सवाल पक्षाच्या नेतेमंडळींनी विचारला.
6 वर्षांपूर्वी -
संजय तुर्डेच्या समर्थनार्थ BMC एल विभाग कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा
संजय तुर्डेच्या समर्थनार्थ BMC एल विभाग कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा
6 वर्षांपूर्वी -
न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिल्यास पुढची १ हजार वर्षे राम मंदिर होणार नाही
सध्या लोकसभा निवडुकीच्या तोंडावर सत्त्ताधारी पक्ष राम मंदिराच्या मुद्यावर आक्रमक होताना दिसत आहे. त्यात केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना विकासाच्या मुद्यावर तोंडघशी पडल्याने त्यांनी केवळ अयोध्येतील राम मंदिरावर मोर्चा वळवला आहे. सत्ताकाळात वाढलेल्या महागाईपासून सामान्यांचं परावृत्त करण्यासाठी शिवसेनेकडून केवळ राम मंदिरावर रोजच प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. त्याचाच प्रत्यय पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या भीतीने भाजपवर पगारी कॉपीकॅट व्यंगचित्रकार दत्तक घेण्याची वेळ? सविस्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. विशिष्ठ विषयाला अनुसरून आणि अचूक संदर्भ जोडून सत्ताधाऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवरून हैराण करून सोडलं आहे. विशेष म्हणजे प्रसार माध्यमं आणि समाज माध्यमांवर त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने सत्ताधारी भाजपची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यात मोदी आणि अमित शहा व्यंगचित्रात नेहमीच केंद्रस्थानी असल्याने समाज माध्यमांवर चांगलाच धुरळा उडत आहे. परंतु, राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्राला व्यंगचित्राच्याच माध्यमातून प्रतिउत्तर देताना भाजपच्या पगारी कॉपीकॅट व्यंगचित्रकारांना विषय आणि संदर्भ याचं प्राथमिक ज्ञान नसल्याचं दिसत असून, त्यात भाजपचीच फजिती होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ संगीतकार व गीतकार यशवंत देव यांचे दीर्घ आजाराने निधन
मराठी संगीत जगतावर अनेक वर्ष आधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ संगीतकार आणि गीतकार यशवंत देव यांचे आज पहाटेच्या सुमारास वयाच्या ९१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आज इस्पितळात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी अभंग, भावगीत, लोकगीत, युगलगीतांना त्यांनी संगीतबद्ध केले. आज सायंकाळीच चार वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्मारकावर २,२९० कोटी खर्च करण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवा ना! राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या “पुतळा” राजकारणावर व्यंगचित्रातून तोफ डागली आहे. ‘तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका अवाढव्य खर्च करुन आमचे पुतळे उभे करण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवा ना’ असा रोखठोक सवाल त्यांनी केला आहे. गुजरातमधील नर्मदा नदीजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यासाठी तब्बल २,२९० कोटी रुपये इतका प्रचंड खर्च करण्यात आल्याने ते खुद्द वल्लभभाईंना तरी कसे पटेल?, असा रोखठोक सवाल मनसे अध्यक्षांनी विचारला आहे.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब अखेरच्या क्षणी म्हणाले होते, उद्धवला सांभाळा! त्याचा अर्थ काल समजला: रोहित पवार
राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याची अजून एक नवी समोर येत आहे. होय! एनसीपीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवार आता सामनातील टीकेला उत्तर देण्यासाठी आणि काकाच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार हे राजकारणातील टाकाऊ माल आहेत, अशी हलक्या भाषेतील टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून रोहित पवार यांनी उद्धव ठाकरेंना रोखठोक प्रतिउत्तर दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईतील खड्ड्यामुळे आई व तिच्या ११ महिन्याच्या बाळाचा मृत्यू
मुंबईतील खड्यांमुळे अजून २ निरपराध प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. प्रवासादरम्यान रस्त्यावर अचानक समोर आलेला खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये आई आणि तिच्या ११ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या मुलाचे पिता सुद्धा जबर जखमी झाले आहेत. गोवंडी प्रवासादरम्यान नुकताच हा अपघात घडला आहे. दुर्दैवी मृत्यू झालेल्या आईचे नाव पूजा आणि ११ महिन्याच्या चिमुकल्याच नाव समर्थ असल्याचं समजतं. तर पिता प्रमोद घडशी हे सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी देवनार पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तब्बल ७९ कोटींचा GST बुडवल्याप्रकरणी मुंबईतून व्यापाऱ्याला अटक
पुणे स्थित व्यापाऱ्याने ७९ कोटींचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आलं आहे. सदर कारवाई जीएसटी कायद्यांतर्गत करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यातील मोदसिंग पद्मसिंह सोढा नामक व्यापाऱ्याला मुंबईतून अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. तब्बल ७९ कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याप्रकरणी सोढा यांना मुंबईतून शुक्रवारी २६ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
सीबीआय प्रकरण; राज ठाकरेंचं मोदींच्या 'वर्मा'वर बोट: व्यंगचित्र प्रसिद्ध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या देशभर खळबळ माजविणाऱ्या सीबीआय मधील घडामोडींवरून मोदींच्या “वर्मावर” नेमकं बोट ठेवलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर या व्यंगचित्राची चांगलीच चर्चा रंगली आहे. आज राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवरून प्रसिद्ध करण्यात आलेलं हे व्यंगचित्र मोदी सरकारच्या सुद्धा “वर्मावर” लागण्याची चिन्ह आहेत.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचं स्मारक ५ वर्षे का रेंगाळले या प्रश्नामुळे उद्धव यांना मिरची झोंबली: अजित पवार
सामनातून झालेल्या टीकेतून शिवसेनेकडून तीच भाषा अपेक्षित होती. परंतु उद्धव ठाकरेंना इतक्या मिरच्या का झोंबल्या ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
अजित पवार या गटारी किड्याला आम्ही किंमत देत नाही: शिवसेना
एनसीपीचे ज्येष्ठ नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेनेने सामना उभा मुखपत्रातून जहरी टीका केली आहे. अजित पवार टीका करताना उद्धव ठाकरे यांना म्हणाले होते की, यांच्या काय तर म्हणे २५ तारखेला अयोध्येला जाणार. काय तिथं दिवा लावणार तिथे! अरे तुला सत्ता असताना तुझ्या बापाचं स्मारक ५ वर्षात करता आलं नाही. आणि तिथं अयोध्येला जाऊन काय करणार आहे?, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. दरम्यान, अजित पवारांची ती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागल्याचे जाणवते आहे.
6 वर्षांपूर्वी -
आरे मेट्रो कारशेड'चा न्यायालयीन मार्ग सुद्धा मोकळा
मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गासाठी मेट्रो-३च्या आरे कारशेडचा न्यायालयीन मार्ग अखेर मोकळा झाला आहे आणि त्यामुळे सरकारला सुद्धा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कार डेपो उभारण्यास आव्हान देणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने अखेर फेटाळली आहे. न्या.एस सी धर्माधिकारी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाकडून आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार एकाच विमानाने मुंबईकडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी संध्याकाळी एकाच विमानाने औरंगाबादहून मुंबईकडे रवाना झाल्याने प्रसार माध्यमांमध्ये पुन्हा चर्चेचा विषय झाला. मात्र तो निव्वळ योगायोग असल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे त्यांचा १० दिवसांचा पश्चिम विदर्भाचा दौरा आटपून काल औरंगाबादमार्गे मुंबईला विमानाने रवाना झाले.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेला उत्तर भारतीयांची मतं आणि हफ्ते, दोन्ही हवे: संदीप देशपांडे
प्रभादेवी येथे काही शिवसैनिकांनी उत्तर भारतीयांना जागेच्या वादावरून जबर मारहाण केली असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच प्रकरणात मनसेने सुद्धा टीका केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उत्तर भारतीयांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीवर अधिकृत प्रतिक्रिया दिली.
6 वर्षांपूर्वी -
जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी कुठं गेले ? अजित पवार
महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाच भयंकर संकट ओढवलं असून त्याला अनुसरून आज एनसीपी पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, जर आज राज्यावर दुष्काळ ओढवला असेल तर जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी नेमके गेले कुठं? असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO