महत्वाच्या बातम्या
-
पुन्हा मार्मिक 'राजअस्त्र' : संघ, संस्कार, लोकशाही आणि वर्गाबाहेरील २ विद्यार्थी : सविस्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर एकामागून एक मार्मिक अस्त्र डागण्यास सुरुवात केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा दाखल देत, मोदी आणि अमित शहांच्या एकाधिकारशाहीवर मार्मिक टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
डीजेचा आवाज बंदच राहणार, राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात ठाम
डीजे आणि डॉल्बीवरील बंदीबाबत राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात ठाम राहिल्याने तसेच पर्यावरणाला हानिकारक अशा आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या डीजे आणि डॉल्बीला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे अशक्यच असल्याचे ठाम मत न्यायालयात मांडल्याने गणेशोत्सवात देखील डीजेचा आवाज बंदच राहणार हे नक्की झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे राज्यात वित्तीय तूट वाढली : भाजप आमदार भातखळकर
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी वित्त आयोगाला दोषी ठरवत, राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमुळेच वित्तीय तूट वाढल्याचा दावा केला आहे. तसेच राज्य सरकारची पाठराखण करताना भाजपच्या काळातच राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा दावा सुद्धा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
7 वर्षांपूर्वी -
मुंबई - काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण
मुंबई – काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण
7 वर्षांपूर्वी -
लालबाग राजा मुजोर कार्यकर्त्यांची दादागिरी, थेट आयपीएस अधिकाऱ्यावर धावले
गणेश उत्सव संपल्यावर या कार्यकर्त्यांना आजूबाजूची लोक सुद्धा विचारत नसतील, परंतु लालबागचा राजा विराजमान होताच या कार्यकर्त्यांमध्ये आपणच या शहराचे सर्वेसेवा असल्यासारखे भासू लागते. एखादी मालदार पार्टी, दिग्गज उद्योगपती किंवा मातब्बर राजकारणी लालबागच्या राजाच्या भेटीला आले की एकदम त्याच क्षणी हातांच्या माळ गुंफत रॉयल वागणूक दिली जाते. बाकी हेच हात सामान्य भाविकांवर, वृद्ध महिलांवर, पोलीस महिलांवर उगारण्यासाठीच वापरले जातात.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी आधीच सूचित केलेला धोका? यूपी-बिहारींचा थेट राज्यातील 'ओबीसीं'च्या आरक्षणावर दावा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये वाढत जाणारे लोंढे आणि त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण आणि त्यामुळे भविष्यात घडू शकणाऱ्या संभाव्य धोक्यांवर नेहमीच जाहीर भाष्य केलं आहे. परंतु, राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या एका संभाव्य धोक्याला अजून एक पुरावा मिळाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी रेखाटले स्वतः मध्ये रममाण झालेल्या प्र'सिद्धि विनायका'च व्यंगचित्र, होरपळणारी जनता पोरकी
सध्या देशात महागाईपासून अनेक ज्वलंत विषय पेटले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ स्वतःची प्रसिद्धी करण्यातच व्यस्त असल्याचा धागा पकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच प्र’सिद्धिविनायका’च व्यंगचित्र रेखाटलं आहे. देशात अनेक महापुरुष असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये नरेंद्र मोदींवरील चित्रित करण्यात आलेला लघुपट दाखविण्याचे डिजिटल फर्मान सुद्धा सोडण्यात आले होते, त्या मुद्याला सुद्धा राज ठाकरे यांनी हात घातला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई, पुणे आणि नाशिकचे डीजे मालक राज ठाकरेंच्या भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबई, पुणे आणि नाशिकच्या डीजे मालकांनी भेट घेतली. ऐन सणासुदीच्या काळातच बंदी घातली गेल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने, त्यावर काही मार्ग निघण्याचा आशेने डीजे मालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन अडचणी मांडल्या.
7 वर्षांपूर्वी -
मुलुंड - मुंबई - गणेश मंडळांच्या समर्थनार्थ मनसे मैदानात
मुलुंड – मुंबई – गणेश मंडळांच्या समर्थनार्थ मनसे मैदानात
7 वर्षांपूर्वी -
महिलांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या राम कदमांच्या उत्तरावर महिला आयोग कारवाई करणार का?
मुंबई घाटकोपर येथे आयोजित दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपचे आमदार राम कदम यांनी महिला राज्य आयोगाच्या नोटीसीला उत्तर दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान, त्यांचं उत्तर तपासून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
भारिप-बहुजन आणि एमआयएम युती भाजपच्या मदतीसाठी आखलेला डाव : सामना
भारिप-बहुजन आणि एमआयएम युती भाजपच्या मदतीसाठी आखलेला डाव असल्याची टीका सामना मुखपत्रातून करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी हे आगामी निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. मुस्लिम आणि बहुजन ऐक्याची हाक देत आम्ही आमची आगामी निवडणुकीत दाखवून देऊ अशी घोषणा उभयतांकडून करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या वांद्रे शासकीय वसाहतीतील सभेनंतर शिवसेनेला ३ महिन्यांनी जाग, सभा आयोजित?
मुंबई वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील रहिवाशांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली होती. अनेक वर्षांपासून इथे राहणाऱ्या हजारो कुटुंबांना हक्काच्या घरांसाठी झगडावं लागत आहे. वांद्रे येथील शासकीय वसाहत ही मुंबई शहरातील मोक्याचे ठिकाणी असल्याने येथे अनेक राजकारणी डोळा ठेऊन आहेत आणि या रहिवाशांना त्याच ठिकाणी घर मिळतील की नाही याची हमी नाही.
7 वर्षांपूर्वी -
लालबागच्या राजाच्या चरणी महाराष्ट्र सैनिकाचा व्यंगचित्रातून ईव्हीएम हद्दपारीचा नवस
देशभरात अनेक मुद्यांवरून भाजप विरोधी वातावरण असताना सुद्धा भाजप कस काय विजयी होत आहे, यावरून विरोधकांनी ईव्हीएम मशीन मधील तांत्रिक बाजू पुढे करत निवडणूक आयोगापर्यंत भेटीगाठी करून ईव्हीएम’ला तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन तसेच बॅलेटपेपरचा उपयोग करावा, अशी विनंती केली होती.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ; मुंबई महापालिकेची गणेश मंडळांवर धडक कारवाई सुरु, वकील - पोलीस फौजफाटा
मुंबईतील गणेश मंडळांवर मुंबई महानगरपालिकेने मंडप उभारणीसाठी मान्यता घेतली नसल्याचा बडगा उगारला असून थेट मंडप रिकामी करण्याचे आदेश गणेश मंडळांना देण्यात येत आहेत. दरम्यान, कारवाई करताना महापालिकेचे उपस्थित वकील आणि अधिकारी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनाच मंडप उतरविण्यास सांगत असून, तसे न केल्यास कायदेशीर कारवाईच्या सूचना देत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई - सलमान खानच्या घरातील गणपती आरती
मुंबई – सलमान खानच्या घरातील गणपती आरती
7 वर्षांपूर्वी -
नैतृत्वावर आरोप करत घनसावंगी विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
शिवसेनेमध्ये निष्ठावंतांना डावलून पैशाच्या मोबदल्यात उपऱ्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत घनसावंगी विधानसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपूरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या निमित्ताने सेनेला घनसावंगी विधानसभा मतदासंघात फटका बसण्याची शक्यता.
7 वर्षांपूर्वी -
भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप असलेल्या कृपाशंकर सिंग यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री
भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप असलेले काँग्रेसचे नेते आणि माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंग याच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. संपूर्ण कुटुंब भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकल्याने ते भाजपच्या सहज गळाला लागल्याच्या चर्चा सुरु होत्या आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
लाडक्या बाप्पाचं वाजतगाजत आगमन ! सर्वत्र ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष
आज सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं वाजतगाजत घरोघरी आगमन झालं. अवघा महाराष्ट्र भक्तीरसात चिंब नाहून निघाल्याचे चित्र आहे. सकाळपासूनच सर्वत्र ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करत घरोघरी गणरायाचं आगमन झालं. तसेच मुंबई, पुणे, नाशिक आणि राज्यातील विविध शहरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याने सर्वत्र प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
नागराज, आर्ची-परशाचा मनसे चित्रपट सेनेत प्रवेश
सैराट चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेले नागराज मंजुळे, आर्ची आणि परशा’ने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेत प्रवेश केला असून, त्यांनी रीतसर प्राथमिक सदस्यत्व सुद्धा स्वीकारलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या ‘सैराट’ टीमचा ग्रामीण भागात प्रोमोशनसाठी उपयोग होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आर्ची आणि परशा’चा ग्रामीण महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग असल्याने त्याचा फायदा पक्षाला आणि मनसेच्या चित्रपट श्रुष्टीतील दबदब्याचा फायदा या तिघांना सुद्धा भविष्यात होऊ शकतो अशी चर्चा आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीत, मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL