महत्वाच्या बातम्या
-
Kashif Khan on Cruise Drug Party | कासिफ खानचा क्रूझ पार्टीतील नवा व्हिडीओ नवाब मलिक यांच्याकडून पोस्ट
FTv चा इंडिया हेड कासिफ खानचा नवा व्हिडीओ पोस्ट करून नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. कासिफ खाननेच क्रूझ पार्टीचं आयोजन केलं होतं. तो त्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी क्रूझवर छापा पडला त्या दिवशी तिथे होता. गर्लफ्रेंडसोबत नृत्य करत होता असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप - नवाब मलिक
गेले तीन आठवडे ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या टार्गेटवर एसीबीचे संचालक समीर वानखेडे होते. पण आता वानखेडेंबरोबर मलिकांच्या ट्रिगर पॉईंटवर भाजप देखील आहे. आर्यन खान ड्रग्ज केसला केपी गोसावीच्या फरार होण्याने एक वेगळं वळण मिळालं. आता त्याच केपी गोसावी आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्याच्या बायकोची एका खाजगी कंपनीत पार्टनरशीप आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. तसंच येत्या विधानसभा अधिवेशनात तो नेता कोण?, हे नावंही जाहीर करेन, असं म्हणत मलिकांनी फटाक्यांची माळ सुरुच ठेवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, आम्ही कोर्टातही जाऊ आणि पुरावेही सादर करु - नवाब मलिक
क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर (Nawab Malik Vs Sameer Wankhede) करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | समीर वानखेडेंना अटकेपूर्वी 3 दिवस आधी नोटीस देणार | राज्य सरकारची हायकोर्टाला हमी
वादात अडकलेले NCB अधिकारी समीर वानखेडेंना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कुठल्याही प्रकारचा एफआयर दाखल करण्यापूर्वी किंवा अटकेची कारवाई करण्यापूर्वी तीन दिवस आधी वानखेडे (Sameer Wankhede) यांना नोटीस दिली जावी. समीर वानखेडे यांच्यावर तूर्तास कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. हायकोर्टाच्या निकालानंतर वानखेडे यांच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
वानखेडेंचे कुटुंब पहिल्यापासून हिंदूच असल्याचं सांगणाऱ्या क्रांती रेडकर यांची माहिती खोटी | डॉ. कुरेशींकडून पोलखोल
एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील डॉ. जाहीद कुरेशी यांची पहिली प्रतिक्रिया पुढे आली आहे. समीर वानखेडे यांचे कुटुंब पूर्वी मुस्लिम होते, अशी माहिती समीर वानखेडेंचे पहिले सासरे डॉ. जाहीद कुरेशी यांनी प्रसार माध्यमाशी बातचीत करताना अनेक खुलासे केले आहेत. आपली नाहक बदनामी होत आहे आणि त्यामुळे सत्य लोकांसमोर मांडणं महत्वाचं असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया देताना (Sameer Wankhede’s Religion Exposed) म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede Under Investigation | 25 कोटीच्या डीलप्रकरणी वानखेडेंच्या चौकशीची राज्य सरकारकडून ऑर्डर
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अखेर राज्य सरकारने चौकशीची घोषणा केली आहे. 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे. सरकारने ऑर्डर काढून 4 अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली (Sameer Wankhede Under Investigation) आहे. एकीकडे नवाब मलिकांच्या आरोपांनी घायाळ झालेले समीर वानखेडे आता राज्य सरकारने लावलेल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
KP Gosavi Detained | फरार आरोपी के पी गोसावीला पुणे पोलिसांकडून अटक
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच तसेच परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला फरार आरोपी के पी गोसावीला आज सकाळी पुणे पोलिसांनी अटक (KP Gosavi Detained) केलीय. कालच संध्याकाळी के पी गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. कालपर्यंत तो शरण आला नाही. अखेर पुणे पोलिसांनी आज त्याला अटक केलंय.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | UPSC मध्ये जात प्रमाणपत्राची पडताळणी नेमकी कशी होते - सविस्तर वृत्त
सिव्हील सर्विस परीक्षांसाठी इच्छुक लाखो-करोडो असतात, त्यामुळे जेव्हा ते सुरूवातीला फॉर्म भरतात तेव्हा त्यांनी ज्या कोटामधून भरलाय त्याच जातीचे ते खरोखर आहेत का याची पडताळणी नाही होत. जे प्रीलीम्स आणि मेन परीक्षा उत्तीर्ण होतात, तेव्हा मुलाखतींच्या वेळी त्यांच्या जातीचा दाखला द्यावा लागतो, याच वेळेला त्यांच्याकडून एक अॅफिडॅविटसुद्धा घेतलं जातं. कायद्यानुसार SC कॅटेगरीमध्ये असल्याचं सांगणारी व्यक्ती हिंदू किंवा शीख असायला हवी. त्यात समीर वानखेडे मुस्लिम असल्याचे अनेक पुरावे समोर येतं आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | अजून एका पंचाचा समीर वानखेडेंवर धक्कादायक आरोप | खोट्या केसेस उभ्या करतात
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा पाय आता अधिक खोलात जाऊ लागला आहे. कारण आर्यन खान ड्रग्स प्रकरणात प्रभाकर सईल या साक्षीदाराने आरोप केलेले असताना आता दुसरीकडे एनसीबीने कारवाई केलेल्या आणखी एका जुन्या प्रकरणातील साक्षीदाराने समीर वानखेडे आणि एनसीबीवर अत्यंत गंभीर (Sameer Wankhede) आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणी तर वाढल्याच आहेत. पण याचसोबत NCB च्या एकूणच कामाच्या शैलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नियमानुसार महत्वाच्या कागदपत्रांवर खरं नाव लिहितात | मग मुलाने निकाह नामावर 'ज्ञानेश्वर' ऐवजी 'दाऊद' का लिहिलं?
मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण हे बनावट होतं असा दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंविरोधात आरपारची लढाई लढत आहेत. ‘समीर वानखेडे यांनी खोटं जात प्रमाणपत्र जोडून केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवली आहे. त्यामुळे मी ट्विटरवर त्यांच्यासंबंधी जे कागदपत्र शेअर केले आहेत ते जर खोटे निघाले तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईल, एवढंच नव्हे तर मी राजकारण देखील सोडून देईल.’ असं वक्तव्य नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Dawood Wankhede Nikah Nama | समीर दाऊद वानखेडेंचा 'निकाह नामा' व्हायरल | पोलखोल सुरूच
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मुंबई एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करीत समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबद्दलची माहिती दिली असून, त्यांच्या कथित निकाहनाम्याची माहिती असल्याचा दावा मलिकांकडून (Sameer Dawood Wankhede Nikah Nama) करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Saamana Editorial | आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी | मग गुजरातमधील 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी?
आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची तोडबाजी तर मग मुंद्रा पोर्टवरील 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? हा सवाल लोकांच्या मनात आला असेल तर तुम्ही काय करणार?, असाही सवाल आजच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) विचारण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Probe The Allegations of Corruption | वानखेडेंवरील खंडणीबाबत आरोपांच्या चौकशीसाठी NCB ची ३ सदस्यीय समिती
क्रुझवरील धाडी प्रकरणी पंचांनीच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्याची एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने गंभीर दखल घेतली असून वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. वानखेडे यांची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार असून त्यासाठीच त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याचं एनसीबीचे मुख्य (Probe The Allegations of Corruption) अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | त्यांनी संघटीतपणे एकत्र येतं कट रचून करोडोची खंडणी शाहरुखकडे मागितली - अॅड. कनिष्ठ जयंत
क्रुझवरील धाडी प्रकरणी पंचांनीच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्याची एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने गंभीर दखल घेतली असून वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. वानखेडे यांची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार असून त्यासाठीच त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याचं एनसीबीचे मुख्य (Sameer Wankhede) अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
Sam Dsouza Secrets | बाजूला बसलेला सॅम डिसोझा नेते, IAS-IPS-NCB अधिकाऱ्यांसाठी मनी लाँड्रिंगचं काम करतो - राऊत
एनसीबीच्या धाडप्रकरणात प्रभाकर साईल या साक्षीदाराने केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट भाजपलाच इशारा दिला आहे. मला धमक्या देऊ नका. नवाब मलिकांनी या प्रकरणात इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली. इंटरव्हलनंतरची गोष्ट मी सांगेन, असं सांगत राऊतांनी भाजप नेत्याचे व्हिडीओही समोर आणण्याचा (Sam Dsouza Secrets) इशारा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
NCB Vs High Profile Bollywood Actors | 'त्या' हायप्रोफाईल ड्रग्ज प्रकरणांत अद्याप आरोपपत्रही दाखल नाही
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्यात आलेल्या छाप्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चर्चेत आहे. आर्यन सध्या मुंबईतील आर्थर रोड (NCB Vs High Profile Bollywood Actors) कारागृहात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede Exposed | एनसीबीकडून शाहरुखकडे 25 कोटीची मागणी | त्यापैकी 8 कोटी वानखेडेंना - पंचाचाच आरोप
एनसीबीच्या पंचानेच समीर वानखेडेंसह एनसीबीवर बॉम्ब टाकला आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडेंना देण्यात येणार (Sameer Wankhede Exposed) होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते, असा दावा या पंचाने केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Raj Thackeray Corona Positive | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल (Raj Thackeray Corona Positive) करण्यात आलं आहे. ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे फक्त राज ठाकरेच नाही तर त्यांच्या आई यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Cruise Drugs Case | जुन्या व्हॉट्सअॅप चॅटचा गैरवापर केला जातोय | आर्यनचा एनसीबीवर आरोप
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आलेल्या आर्यन खानने मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे की, NCB ड्रग्ज जप्त करण्याच्या प्रकरणात त्याला अडकवण्यासाठी त्याच्या जुन्या व्हॉट्सअॅप चॅटचा गैरवापर करत आहे. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात असून त्याचा जामीन अर्ज दोनदा फेटाळण्यात (Aryan Khan Cruise Drugs Case) आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
MAHA TET Exam 2021 Postponed | राज्य टीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली | ही आहे नवी तारीख
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा सलग तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर रोजी होणार ही परीक्षा आता दिवाळीनंतर घेतली जाणार (MAHA TET Exam 2021 Postponed) आहे. परीक्षेची सुधारीत तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA