महत्वाच्या बातम्या
-
औरंगाबाद; मराठा आरक्षण मोर्चेकऱ्यांची उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी आणि राडा
औरंगाबादेत मराठा आरक्षण मोर्चेकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने मराठा क्रांतिमोर्चातील आंदोलक आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला झाल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
सेन्सेक्स आणि निफ्टीचीही ऐतिहासिक भरारी
शेअर बाजारानं आज नवा उच्चांक गाठला आहे आणि बहुसंख्य बँकांच्या शेअर्सचं मूल्य वधारल्यानं बाजारात ही तेजी पाहायला मिळत आहे. आज मुंबई शेअर बाजाराने पहिल्यांदा ३८,००० अंशांचा टप्पा ओलांडला.
7 वर्षांपूर्वी -
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अवघे मीरा रोड लोटले
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अवघे मीरा रोड लोटले. अमर रहे, अमर रहे कौस्तुभ राणे अमर रहे..!
7 वर्षांपूर्वी -
भाजप आमदार व प्रवक्ते राम कदम'च मोदी भक्तांच्या ट्रॅपमध्ये, फेक व्हिडिओ'मध्ये मोदी व फडणवीसांना टॅग
मुख्य व्हिडिओमध्ये मोडतोड करून फेक व्हिडिओ बनविणे आणि ते वायरल करणे हे समाज माध्यमांवर नित्याचच झालं आहे. परंतु विषय गंभीर तेव्हा होतो जेव्हा एखाद्या पक्षाचा आमदार आणि प्रवक्ते पदावर असलेली जवाबदार व्यक्ती खोट्या गोष्टी समाज माध्यमांवर वायरल करते. तसाच काहीसा प्रकार केला आहे भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी तो सुद्धा ट्विट करत.
7 वर्षांपूर्वी -
मिशन २०१९; मुंबईत भाजपची आधुनिक टेक्नोलॉजीने वॉररूम सज्ज
भाजपने ‘मिशन २०१९’ची जोरदार तयारी सुरू केली असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबईत आधुनिक टेक्नोलॉजीने सज्ज अशी ‘वॉररूम’ सुरू करण्यात आली आहे. याच ‘वॉररूम’मध्ये निवडणुकीची रणनिती आखली जाणार असून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, पंढरपुरात इंटरनेट बंद
मराठा आरक्षणासाठी तसेच विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मात्र या बंद मधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना वगळण्यात आलं आहे. परंतु राज्यात इतर ठिकाणी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सुरक्षेचं कारण पुढे करत पंढपुरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याचं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
बीपीसीएल रिफायनरीच्या हायड्रोक्रॅकर प्लांटमध्ये स्फोट
बीपीसीएल रिफायनरीच्या हायड्रोक्रॅकर प्लांटमध्ये स्फोट
7 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार पलटलं, मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी कायम
नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात निवेदन देऊन मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी असल्याचं मान्य करणारऱ्या राज्य सरकारने काही दिवसातच सुरक्षेच कारण पुढे करत स्वतःचाच निर्णय फिरवला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून विधिमंडळात दिली जाणाऱ्या निवेदनांवर सामान्यांनी किती विश्वास करावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
7 वर्षांपूर्वी -
करार केल्याशिवाय घर सोडायचं नाही - राज ठाकरे
मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे, तरी रहिवाशांचे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने अखेर रहिवाशांनी राज ठाकरेंकडे सर्व प्रश्न आज भेट घेऊन मांडले.
7 वर्षांपूर्वी -
म्हाडाने करार केल्याशिवाय मुंबई 'बीडीडी चाळीं'च्या रहिवाशांनी घर सोडायचं नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी विविध प्रश्नां संदर्भात कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे, तरी रहिवाशांचे अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याने अखेर रहिवाशांनी राज ठाकरेंकडे सर्व प्रश्न आज भेट घेऊन मांडले.
7 वर्षांपूर्वी -
मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले - मल्टिप्लेक्स
मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज मल्टिप्लेक्सचा रिऍलिटी चेक सुरू केला असून, आज लोअर-परेल मधील सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थांना अजुनही अडवले जात असल्यामुळे याला विरोध करत असताना मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
7 वर्षांपूर्वी -
उद्यापासून राज्य सरकारी कर्मचारी तीन दिवसीय संपावर
आज पार पडलेल्या राज्य सरकारी कर्मचारी समन्वय संघटनांच्या बैठकीत १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ३ दिवसीय संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या या संपाचा पहिला दिवस असणार आहे, त्यामुळे सामान्यांची उद्या गैरसोय होण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
गडकरीजी! देशातील सरकारी नोकऱ्यांबद्दल उत्कृष्ट प्रश्न विचारलात: राहुल गांधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी नोकऱ्यासंदर्भात केलेलं वक्तव्य त्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे. कारण त्या वक्तव्यानंतर त्यांनी विरोधकांना आयतीच संधी दिलेली आहे. त्याच विधानाचा संदर्भ घेत राहुल गांधी यांनी ट्विट करत नितीन गडकरींनी आरक्षण आणि सरकारी नोकरीची स्थिती याबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नाबद्दल त्यांना खोचक टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेना पक्ष संघटनेत निवडणूकपूर्व अनेक फेरबदल
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत संघटनात्मक मोठे फेरबदल होण्यास सुरुवात झाली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाईंची कोकण संपर्कप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत असलेली संपूर्ण कोकणाची जवाबदारी काढून केवळ रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग’ची जवाबदारी ठेऊन एकनाथ शिंदेंकडे ठाणे, कल्याण, भिवंडी तसेच पालघरची जवाबदारी देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
गणेश उत्सव आला की सुटले सरकारचे फर्मान : राज ठाकरे
आज नवी मुंबईमध्ये महानगरपालिका कर्मचारी मेळावा पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अनेक गंभीर मुद्यांना हात घातला. लवकरच गणपती उत्सव सुरु होणार असून त्याआधी न्यायालय आणि मुंबई महानगर पालिकेकडून निरनिराळे फार्मन सुटू लागल्याने राज ठाकरेंनी त्या मुद्याला हात घातला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आंदोलना दरम्यान परप्रांतीयांच्या हिंसक प्रकारामुळे नाव मराठा समाजाचं खराब होतंय: राज ठाकरे
आज नवी मुंबईमध्ये महानगरपालिका कर्मचारी मेळावा पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी अनेक गंभीर मुद्यांना हात घातला. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना राज ठाकरे यांनी परप्रांतीयांनी हिंसक घटना घडवून मराठा समाजाचं खराब करण्याचा प्रयत्नं केला असा गंभीर आरोप केला.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; अन्यथा हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही
आज मुंबईमध्ये पार पडलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या नियोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने लवकरच मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही हिवाळी अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
संख्याबळ असलेले विरोधक नव्हे, तर संख्याबळ नसलेले राज ठाकरेच आगामी निवडणुकीत भाजपला उजवे ठरतील: सविस्तर
मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध पोटनिवडणुका, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल आणि भाजपाची घोडदौड पाहता, त्यांच्या समोर आमदार, खासदार असं मोठं संख्याबळ असणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष सुद्धा फिके पडताना दिसत आहेत. तर पदवीधर निवडणुकांचे निकाल हे जवळजवळ निश्चित असतात आणि त्या निवडणुकीचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीशी संबंध जोडणे अवघड आहे. परंतु पदवीधर निवडणुकीत सुद्धा भाजपने कोकणात चमत्कार केला तर नाशिकमध्ये ते गाफील राहिल्याने जागा गमवावी लागली होती.
7 वर्षांपूर्वी -
मनसे'मुळे आमची मत फुटतात हे सेनेचं रडगाणं पालघर, जळगाव व सांगली निवडणुकीत निकाली?
मागील निवडणुकीत म्हणजे २०१४ मध्ये शिवसेनेने मराठी मतदाराला मनसे पासून प्रवृत्त करण्यासाठी, मनसेच्या उमेद्वारांमुळे शिवसेनेची मतं फुटतात असा दावा केला होता. परंतु पालघर लोकसभा पोटनिवडणूक, सांगली-मिरज महापालिका आणि जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निकालामुळे शिवसेनेचा हा दावा पुसला गेल्यात जमा आहे. त्यामुळे या मुद्याचा शिवसेनेला २०१९ मध्ये काहीच उपयोग होणार नाही अशी शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या संकेतस्थळावरील सर्व माहिती मराठीमध्ये प्रकाशित करा, मनसेचा इशारा
मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी नुकताच वक्फ बोर्डाचे राज्यमंत्री विनोद तावडे यांच्याशी वक्फ बोर्ड संदर्भात पत्र व्यवहार केला. वक्फ बोर्ड कडून राज्यसरकारच्या मराठी भाषेत माहिती लोकांना देण्याबाबतच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती यात मांडण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO