महत्वाच्या बातम्या
-
महाराष्ट्रनामा न्यूज'साठी तुमचा ब्लॉग लिहा! आम्ही प्रसिद्ध करू तुमचे विचार
महाराष्ट्रातील तरुण तरुणींना लिखाणाची आवड असल्यास ते त्यांचे ज्वलंत विचार आमच्या माध्यमातून दशभर पोहोचवू शकतात. महाराष्ट्रनामा न्यूज तुमचे विचार नक्कीच प्रसिद्ध करेल. लोकशाही पद्धतीने तुमचे व्यक्त करा आणि तुमच्या विचारांना दिशा करून देण्याची सुवर्ण संधी आम्ही तुम्हाला देत आहोत.
7 वर्षांपूर्वी -
मनसेने शेतकऱ्यांसाठी आठवडीबाजार ही संकल्पना सर्वच प्रमुख शहरात राबवावी? सविस्तर
ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या कष्टाने पीक घेतो खरा, परंतु सर्व खर्च वजा करता एखाद्या कृषी उत्पन्न बाजार समितीत त्याच्या हाताला किती पैसा लागतो हे सर्वश्रुत आहे. कवडीमोल किंमती मध्ये विकला गेलेल्या शेतमालात एकतर मूळ दलाल किंवा होलसेल – किरकोळ विक्रेतेच नफा कमवून जातात. परंतु मूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागत नाही हे नित्याचाच आहे. परंतु शहरात मनसे पक्ष अनेक ठिकाणी आठवडीबाजार ही संकल्पना राबवताना दिसत आहे, ज्याचा आढावा आम्ही घेतला होता.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; आक्रमक आंदोलक महिलांनी शिवसेना आमदार मिणचेकरांना बांगड्या दाखवल्या
सर्व पक्षामध्ये मराठा आरक्षणावरून सर्वाधिक नाचक्की शिवसेनेचीच होताना दिसत आहे. आधी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा मोर्चातील आक्रमक कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत अक्षरशः हाकलून दिल होत. आता शिवसेनेचे आमदार मिणचेकर हे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेले असता त्यांना आक्रमक आंदोलक महिलांनी आमदार सुजित मिणचेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हात वर करून बांगड्या दाखवल्या.
7 वर्षांपूर्वी -
६ ऑगस्टपासून मनसेकडून मल्टिप्लेक्समध्ये रिअॅलिटी 'कान'चेक होणार
सरकारच्या निर्णयानुसार मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहेत आणि मल्टिप्लेक्स मालक या नियमाची अंमलबजावणी करत आहेत की नाही याचा मनसे स्वतः ६ ऑगस्टपासून रिअॅलिटी ‘कान’चेक करणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
त्यांना आरक्षणाबद्दल काय समजतं? उद्धव ठाकरेंना फक्त पैशाच्या टक्केवारीची गणितं समजतात
खासदार नारायण राणे काल पासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नारायण राणेंनी चिपळूणमध्ये एक सभा आयोजित केली असता त्यांनी मराठा आरक्षणावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा भूमिकेवर बोट ठेवत शिवसेना पक्ष प्रमुखांवर सडकून टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सत्तेत सामील असणाऱ्या शिवसेनेचा 'बेळगाव प्रश्नी' महाराष्ट्र सरकारला प्रश्न
कर्नाटकच्या कुमारस्वामी मंत्रिमंडळाने बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा आणि कर्नाटक सरकारची आस्थापने बेळगावला वर्ग करण्याचा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे. कर्नाटक सरकारच्या या हालचालींमुळे सीमाभागात रोष व्यक्त करण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्र सरकार यावर काय निर्णय घेणार ते महत्वाचं ठरणार आहे. परंतु शिवसेनेच मुखपत्र असणाऱ्या सामना’मधून बेळगाव प्रश्नी महाराष्ट्र सरकारला प्रश्न करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या मुंबई महानगर पालिके'विरुद्ध राज ठाकरे आणि मुंबईतील गणेश मंडळ एकत्र
मुंबई महापालिकेने लादलेल्या जाचक अटींमुळे गणपती मंडळांना खूप अडचणींचा सामना करावा लागत असल्याने संपूर्ण प्रकरण राज ठाकरे यांच्या दरबारी गेले आहे. आज मनसे अध्यक्ष स्वतः गिरगावच्या खेतवाडीत पोहचले आणि गणेश मंडळांच्या समस्या समजून घेतल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
जुन'मध्ये श्रीमुखात, ऑगस्ट पासून कायदा अंमलात 'मल्टिप्लेक्स'मध्ये MRP दर व बाहेरील पदार्थ घेऊन जाण्यास मान्यता'
२९ जुन रोजी मनसेने मल्टिप्लेक्स मधील खाद्यपदार्थांचे अवाजवी दर तसेच बाहेरील पदार्थ आत घेऊन जाण्यास परवानगी द्यावी यासाठी राज्यभर आक्रमक आंदोलन छेडलं होत. त्यामध्ये मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक सुद्धा झाली होती. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते आणि परंतु मल्टिप्लेक्स मालकांनी न्यायालयाकडे धाव घेत मनसेचं आंदोलन कायद्याने दडपण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयाने सुद्धा मल्टिप्लेक्स मालकांची कानउघाडणी केली आणि सरकारवर सुद्धा ताशेरे ओढले होते.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; आज राज्यभर ‘जेलभरो’ आंदोलन
आज सकाळी ११ वाजता मुंबईतील आझाद मैदानातून मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने जेलभरो’ आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मूंबईच अहमदाबाद होतंय का? महापालिकेत यांना कोण वेळीच आवरणार?
मुंबईमध्ये भाजपचे गुजराती प्रतिनिधी असलेल्या अनेक मतदारसंघात हळुवार गुजरातीकरणाची सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वास्तविक सत्ताधारी शिवसेना सुद्धा या सर्व विषयांवर मूग गिळून शांत आहे. परंतु भविष्यत हा वणवा महाराष्ट्राच्या राजधानीच भाषिक अस्तित्वच धोक्यात आणेल असं तज्ज्ञांचं मत आहे.
7 वर्षांपूर्वी -
NEET प्रवेश प्रक्रिया; विद्यार्थ्यांची ही समस्या कशी सुटली? राज ठाकरेंनी प्रसिद्ध केली चित्रफीत
मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय ‘NEET’ प्रवेश प्रक्रियेचा तिढा स्थानिक विद्यार्थी आणि पालकांसाठी राज्य सरकारच्या अनास्थेमुळे अधिकच किचकट ठरला होता. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून दिल्या होत्या. अखेर त्या लढ्याला न्यायालयामार्फत सुद्धा यश मिळालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
अडचणींचा सामना करणारी गणेशोत्सव मंडळ कृष्णकुंजवर, राज ठाकरे गिरगावातील गणपती मंडळांना भेट देणार
शहरात विविध अडचणींचा सामना करणाऱ्या दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवास्थानी भेट घेतली आहे. या गणेशोत्सव मंडळांनी त्यांना भेडसावत असणाऱ्या सर्व समस्या राज ठाकरे यांच्याकडे मांडल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावर राजीनामा देणाऱ्या हर्षवर्धन जाधवांना उद्धव ठाकरेंनी भेट का नाकारली?
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पहिला राजीनामा देणारे कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंनी मातोश्री भेटीसाठी आले असता त्यांना भेट नाकारली होती. जाधव मुंबईमध्ये आले असता त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वेळ मागितली होती, परंतु उद्धव ठाकरे यांनी जाधवांना भेटण्यास नकार दिला होता. या नकाराचं कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यामागे वेगळेच राजकीय तर्क लावले जात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांनी गर्दी
आज अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईतील प्रभादेवी परिसरातील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांनी बाप्पाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा महत्व लक्षात घेता सिद्धिविनायक मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं करण्यात आले.
7 वर्षांपूर्वी -
आरपीआय आठवले गटात फूट, वेगळा युनायटेड रिपब्लिकन पक्ष स्थापन करणार
भारतीय जनता पक्षाने दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटात उभी फूट पडली आहे. त्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी युनायटेड रिपब्लिन पक्ष या नावाने नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अधिकृत घोषणा ४ ऑगस्ट रोजी नाशिक येथे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा रामदास आठवले आणि भाजप या दोन्ही पक्षांना निवडणुकीपूर्वी धक्का मानला जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता मराठा आरक्षण द्या: उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या आमदारांची बैठक आज मुंबईमध्ये मातोश्रीवर दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे पक्षातील आमदार तसेच खासदारांची मतं जाणून घेतली असून त्यानुसार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जनतेची दिशाभूल? एकाच नाट्यगृहाच भाजप व सेनेकडून वेगवेगळ्या तारखांना दोनवेळा भूमिपुजन
शिवसेना नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावमधील प्रभाकर पणशीकर नाट्यगृहाचे आणि टोपीवाला मंडई तसेच निवासी संकुलासह संयुक्त प्रकल्पाचे भूमिपूजन आज म्हणजे ३० जुलै’ला पार पडले. विशेष म्हणजे त्याच नाट्यगृहाचे आणि टोपीवाला मंडई’चे भूमिपूजन २८ जुलैला भाजपच्या स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते सुद्धा पार पडलं होत.
7 वर्षांपूर्वी -
गोरेगावमध्ये शिवसेना व भाजप'च्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी
मुंबईतील गोरेगावमध्ये पणशीकर नाट्यगृहाच्या भूमिपूजना दरम्यान शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचे वृत्त आहे. आज शिवसेना नेते आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावमधील प्रभाकर पणशीकर नाट्यगृहाचे आणि टोपीवाला मंडई तसेच निवासी संकुलासह संयुक्त प्रकल्पाचे भूमिपूजन होणार होते.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आज स्वतंत्र बैठक
सध्या मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात मराठा क्रांती मोर्चातील आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागतच सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. त्या अनुषंगानेच आज शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आपापल्या आमदारांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या स्वतंत्र बैठक आयोजित केल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत: फडणवीस
मुंबईमध्ये आज मराठा समाजाच्या काही समन्वयकांशी मुख्यमंत्र्यांशी बैठक पार पडली. त्यावेळी चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात ज्या आंदोलकांवर किरकोळ गुन्ह्यांची नोंद झाले ते सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील असा निर्णय घेण्यात आला. परंतु पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO