महत्वाच्या बातम्या
-
प्लास्टिक आडून, राज ठाकरेंना चुचकारून २०१४ सारखी व्यूहरचना आखली जात आहे? सविस्तर
रामदास कदमांची आजची प्लास्टिक बंदीच्या विषयाला विसंगत प्रतिकिया पाहिल्यास प्लास्टिक आडून राज ठाकरें विरुद्ध २०१४ सारखी फलदायी ठरलेली व्यूहरचना आखली जात आहे. रामदास कदमांची वक्तव्य पाहिल्यास त्यामागील बोलविते धनी दुसरेच कोणी असल्याचा अंदाज येतो. शिवतीर्थावरील सभेपासून ते इतर सर्वच ठिकाणी राज ठाकरे भाजपला लक्ष करत आहेत. तसेच शिवसेनेला ते पूर्ण पणे दुर्लक्षित करत असल्यामुळे सेनेच्या अडचणी वाढत होत्या.
7 वर्षांपूर्वी -
ही विसंगत प्रतिक्रिया की विनोद? काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटते? रामदास कदम
दोन दिवसांपूर्वी लागू झालेल्या प्लास्टिक बंदीच इतरांप्रमाणे मनसेने सुद्धा समर्थन केलं, परंतु प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था आणि दंडाची रक्कम अशा त्रुटींवर मनसेकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्याला अनुसरून पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी ही विसंगत प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पावसाने मुंबईची 'तुंबई' झाल्यावर सत्ताधाऱ्यांचे एकमेकांवर दोषारोप
मुंबई शहरातील पहिल्याच पावसाने जागोजागी पाणी तुंबल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते सुद्धा दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा सुद्धा खोळंबा उडाला आहे. त्यातच जवाबदारी घेण्याऐवजी मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजप एकमेकांवर दोषारोप करण्यात गुंतले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव स्वबळावर लढतील, तर स्पष्ट भूमिका हे राज यांच वैशिष्ट आहे: शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली. मुलाखती दरम्यान पवारांनी भाजप विरोधातील महाआघाडी, शिवसेनेचा स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबत अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई वडाळ्यात दोस्ती पार्क येथे पावसाने रस्ता खचून वाहनांचे नुकसान
मुंबई शहरात काल पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक नैसर्गिक धक्के बसायला सुरुवात झाली आहे. तसाच प्रकार वडाळ्यातील अँटॉप हिल येथे संरक्षक भिंत खचल्याने मोठं नुकसान झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईत २३१ मिमी पावसाची नोंद, राज्यभर दमदार पाऊस
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये गेल्या २४ तासात २३१ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. काल पासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान
आज मुंबई व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जवळ जवळ ७० हजार इतकी मतदार निंदणी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे यंदा चौरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने मुंबईकरांना दाखवलेलं रेसकोर्सवरील थिमपार्कच स्वप्नं ठरणार मृगजळ?
मुंबईमध्ये कफपरेड मधील अरबी समुद्रात जवळजवळ ३०० एकर इतक्या प्रचंड जागेवर भरणा टाकून सेंट्रलपार्क उभारणारले जाणार असून, त्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपकडून मजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालिकेतील विरोधकांचा विरोध डावलून तो मंजूर करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पाबाबत चिडीचूप असणारे शिवसैनिक, आज इतरांना पर्यावरण व प्रदूषणाचे धडे का देत आहेत? सविस्तर
काल संपूर्ण महाराष्ट्रात प्लस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. वास्तविक प्लास्टिक बंदीला कोणत्याही पक्षाने आक्षेप घेतलेला नाही. निसर्गाला आणि प्रभूषणाला विशेष करून जल प्रदूषणाला कारणीभूत असणारा सर्वाधिक मोठा घटक म्हणजे प्लास्टिक हाच आहे. प्लास्टिकचा अतिवापर आणि त्यासाठी आवश्यक असणारी पर्यायी व्यवस्था ही आपल्याकडे उपलब्ध तरी होती का हा प्रश्नच आहे. पण एक विषय प्रकर्षाने समोर आला तो म्हणजे निसर्गरम्य कोकणातील विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आणि त्या प्रकल्पामुळे भविष्यात कोकणातील समुद्र, नद्या, शेतजमीन, जल संपत्तीवर कोणते दूरगामी परिणाम होतील या बद्दल कोणतीही वाच्यता न करणारे शिवसैनिक आज संपूर्ण महाराष्ट्राला समाज माध्यमांवर निसर्ग आणि पर्यावरणाचे धडे देत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सर्वसामान्य माणूस ५००० रुपये दंड कसा भरणार? - अविनाश जाधव मनसे
सर्वसामान्य माणूस ५००० रुपये दंड कसा भरणार? – अविनाश जाधव मनसे
7 वर्षांपूर्वी -
प्लॅस्टिकबंदी झाली पण खड्डेयुक्त रस्त्यांचे काय? - नितेश राणेंचा संतप्त सवाल
प्लॅस्टिकबंदी झाली पण खड्डेयुक्त रस्त्यांचे काय? – नितेश राणेंचा संतप्त सवाल
7 वर्षांपूर्वी -
पर्यायी व्यवस्थेशिवाय आजपासून प्लास्टिक बंदी लागू, दंड ५००० रुपये
प्लास्टिक बंदी ही निसर्गासाठी चांगली आहे यात काडीमात्र शंका नाही. परंतु सरकारकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था उभी न करता आणि तब्बल ५००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळणार आहे. परंतु आपल्या देशात मोठं मोठे दंड आकारून एखाद्या गोष्टीवर बंदी आणण्याच्या अनेक योजना अंमलात आणल्या ज्या कालांतराने अपयशी ठरल्या हा इतिहास आहे.
7 वर्षांपूर्वी -
सावधान! शिवसेनेतील तरुण आमदारांचा गट फुटीच्या उंबरठ्यावर?
शिवसेना पक्ष प्रमुखांनी स्वबळाचा नारा दिला खरा पण उद्या हाच नारा शिवसेना पक्ष फुटीला कारणीभूत ठरू शकतो अशा राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेत तरुण आमदार आणि वरिष्ठ आमदार असे दोन गट पडले असून मातोश्रीवर वरिष्ठ आमदारांचा दबदबा असल्याने तरुण आमदारांचा मोठा गट नाराज असल्याचे समजते.
7 वर्षांपूर्वी -
भिवंडीत शिवसेनेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश
भिवंडीमध्ये शिवसेनेला मनसेकडून खिंडार पाडण्यात आलं असून शहरातील प्रमुख आणि तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवास्थानी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. त्यावेळी राज ठाकरेंच्या व्यतिरिक्त मनसेचे नेते राजू पाटील हे देखील उपस्थित होते.
7 वर्षांपूर्वी -
तुम्ही सत्तेत सामील आहात, याची आठवण मतदारच शिवसेनेला २०१९ मध्ये करून देतील? सविस्तर
भारतीय लोकशाहीत सामान्य मतदार हा मतदान करतो ते संबंधित पक्षाने जाहीरपणे दिलेल्या विकास कामांवर आणि विविध आश्वासनांवर विश्वास ठेऊन. त्यानंतर निवडून आलेल्या पक्षाने सत्ता स्थापन करून त्या दिलेल्या आश्वासनांची आणि विकासकामांची पूर्तता करायची असते आणि जनतेने देशावर व राज्याच्या विकासाठी सोपविलेली ५ वर्षांची जवाबदारी खर्ची घालायची असते.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-शिवसेना गप्प, गुजरातचा महाराष्ट्राला तापी खोऱ्यातील हक्काचे पाणी देण्यास नकार
गुजरात राज्याने पार-तापी नर्मदा नद्याजोड प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काचे तापी खोऱ्यातील ४३४ दशलक्ष घनमीटर इतके पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्र पाठवून गुजरातने महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी द्यावे अशी विनंती केली होती. परंतु गुजरात सरकारने स्पष्ट नकार देत महाराष्ट्र सरकारची विनंती धुडकावून लावत मुख्यमंत्र्यांच्या विनंती पत्राला केराची टोपली दाखविली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जनतेने इंदिरा गांधींना धडा शिकवला होता, तसा मोदींनाही धडा शिकवेल: पवार
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आणीबाणीच्या काळातील इंदिरा गांधींचा दाखला देत हे वक्तव्य केलं.
7 वर्षांपूर्वी -
तरुण शिवसैनिकांना राजकारण उमगलं, साहेबांच्या स्वीय सचिवांबरोबर सेल्फीसाठी झुंबड
एखादा पक्षाध्यक्ष किंव्हा पक्षाचे मंत्री, आमदार किव्हा खासदारांसोबत सेल्फी काढण्यासाठी झुंबड करतात हे अनेकदा पाहिलं असेल. परंतु जेव्हा कार्यकर्ते उपस्थित पक्षाध्यक्ष, मंत्री, खासदार आणि आमदार यांच्यापेक्षा फोटो किव्हा सेल्फी काढण्यासाठी पक्षाध्यक्षांच्या खासगी सचिवांना किंवा पी.ए. ला प्राधान्य देतात तेव्हा सध्याचं राजकारण कोणाला जवळ करावं हे चांगलच उमगल्याच चिन्ह असं समजावं.
7 वर्षांपूर्वी -
मनसे व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विधानसभेत एकत्र आल्यास गणित बदलणार: सविस्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार असं जाहीर केलं असलं तरी राजकारणात सर्व काही शक्य असत. केवळ विषय येतो तो पक्षाची मिळती जुळती विचारधारा आणि दोघांचे मूळ मतदार कोण याचाच. त्याचा विचार करता भविष्यात जर ही युती झाल्यास ते अनेकांची गणित बिघडू शकतात. इतकंच नाही तर उद्या ह्या युतीने थेट कर्नाटक सारखा चमत्कार केल्यास आश्चर्य वाटायला नको.
7 वर्षांपूर्वी -
'ती मराठी माणसाची इच्छा', जातीपातीच्या ह्या विषारी वेली आत्ताच छाटा: राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र
व्यंगचित्राच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकारणावर अचूक बोट ठेवलं आहे. आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राज्यात जातीय राजकारणाने जोर पकडला आहे आणि त्याचे भविष्यातील गंभीर परिमाण ओळखूनच राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरबाबत UBS ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN