महत्वाच्या बातम्या
-
सेनेच्या डझनभर मंत्र्यांची सत्तेत कामगिरी तरी काय? आता पुन्हां एकहाती सत्ता?
सध्या भाजपसोबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत सामील असलेली शिवसेना आणि त्यांच्या डझनभर मंत्र्यांनी त्यांच्या अखत्यारीतील खात्यांमार्फत राज्यातील जनतेसाठी कोणती विकासाची कामं केली ते माहित नसल्याने शिवसेना हळुवार पणे भावनिक मुद्यांकडे वळत असल्याचे चित्र आहे. आज शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन असल्याने मुंबईतील गोरेगावमध्ये शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मातोश्रीवरील ते 'दार उघड बये दार उघड', होममिनिस्टर मिनिस्टर झाले
महाराष्ट्र शासनाने सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्ष पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने साहजिकच शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त होणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
फेरीवाला आंदोलनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा विरोध करताना काँग्रेस नेते संजय निरुपम यांची जीभ घसरली - समाज माध्यमांवर व्हायरल
फेरीवाला आंदोलनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा विरोध करताना काँग्रेस नेते संजय निरुपम यांची जीभ घसरली – समाज माध्यमांवर व्हायरल
7 वर्षांपूर्वी -
प्रादेशिक पक्षात देशात सेनेला सर्वाधिक देणग्या, सर्वाधिक देणगीदार बांधकाम क्षेत्रातील
सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला शिवसेना पक्ष हा संपूर्ण देशात प्रादेशिक पक्षांमध्ये राजकीय देणग्या मिळवण्यात अव्वल ठरली असल्याचे २०१६-१७ च्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आर्थिक ताळेबंदात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे अधीकृत रित्या उघड झालेल्या देणगीदारांच्या यादीत बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
फर्जंद टीमने मानले मनसे व राज ठाकरेंचे आभार, महाराजांच्या चित्रपटाला प्राईम टाईम शोज व स्क्रिन्स
छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या वीर मावळ्यांचा पन्हाळगड किल्ला सर करण्याच्या पराक्रमावर आधारित ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाला अप्रतिम प्रतिसाद मिळत असताना सुद्धा, पुन्हां प्राईम टाईम शोज व स्क्रिन्सचा अडथळा निर्माण झाला होता.
7 वर्षांपूर्वी -
सेना अशी जिंकते तर, मिलिंद नार्वेकरांच्या पत्नीचे मतदार यादीत ६ वेळा नाव: नितेश राणे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या पत्नीच नाव मतदार यादीत तब्बल सहा वेळा असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी पुरावा दाखल यादी सुद्धा ट्विट केली आहे. पुढे त्यांनी असं सुद्धा ट्विट करत म्हटलं आहे की, ‘म्हणजे मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेना अशी जिंकते तर!’.
7 वर्षांपूर्वी -
ओबीसीं'चा मुद्दा तापल्यास भाजप-सेनेची डोकेदुखी वाढणार? सविस्तर
ओबीसी समाजाला भुजबळांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्नं यशस्वी झाल्यास भाजप बरोबर शिवसेनेची सुद्धा डोकेदुखी वाढू शकते. कारण राज्यात ४० टक्क्यांच्या घरात लोकसंख्या असलेला ओबीसी समाज जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकवटला तर आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
आमदारांचा महिना महागाई भत्ताच ९१ हजार, मग एकूण पगार?
राज्यातील सर्वच पक्षातील आमदार सभागृहात भले एकमेकांची उणीधुणी काढू देत, परंतु आमदारांच्या वेतन वाढीवर लगेच एकी दाखवून एकमताने पाठिंबा देताना तुम्ही अनेक बातम्या वाचल्या असतील. त्यामुळे माहितीच्या अधिकारात ठाण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्राजक्त झावरे-पाटील यांना देण्यात आलेले आकडे धक्कादायक असून, एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमधील उच्च पदावरील अधिकाऱ्याला सुद्धा असा पगार आणि सुविधा मिळत नाहीत असा हा आकडा आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईतील उत्तर भारतीय संमेलनं आटपली, आता शिवसेनेला पुन्हा मराठीची आठवण
मागील काही दिवसांपासून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आणि मुंबईमधील उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोंढ्यांची मतं डोळ्यासमोर ठेऊन काही ठिकाणी शिवसेनेकडून उत्तर भारतीय संमेलनं भरविण्यात आली होती. कांदिवलीच्या मागाठाणे मतदारसंघात उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी भव्य ‘उत्तर भारतीय संमेलनं’ आयोजित केलं होत. त्याला शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी सुद्धा हजेरी लावून ‘उत्तर भारतियों के सन्मान मे शिवसेना मैदान मे’ असे संदेश दिले होते.
7 वर्षांपूर्वी -
वाढत्या महागाईत, शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत पाणी महागणार
शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत पाणीपट्टीत ३.७२ टक्क्यांनी वाढ झाली असून १६ जूनपासून ही नवी दरवाढ लागू होणार असून त्याला शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या स्थायी समितीतील प्रस्तावाला बहुमताने मंजुरी मिळाली दिली आहे. त्यामुळे महागाईत होरपळलेला सामान्य माणसाला अजून कठीण परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
महात्मा फुले यांच्या पगडीला शिवसेनेचा विरोध आहे का? राष्ट्रवादी
शिवसेनेने नुकतीच शरद पवारांच्या पगडी राजकारणावर सडकून टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणूनच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्नं केला आहे. शिवसेनेला प्रश्न करताना नवाब मलिक म्हणाले की, महात्मा फुलेंची पगडी म्हणजे समाजातील सामाजिक, शैक्षणिक विषमता दूर करणारा विचार आणि समतावादी विचारधारेच प्रतीक असल्याने त्याला शिवसेनेने विरोध करण्याचं कारण काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
कोण म्हणतंय राजा एकटा पडलाय?
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५० वा वाढदिवस असल्याने, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु सत्तेत नसताना सुद्धा सुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रचंड मराठी माणसाची आणि कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पाहून ‘राजा एकटा पडला’ आहे असं केवळ राजकारण न समजणाराच बोलू शकतो.
7 वर्षांपूर्वी -
राजा एकटा पडला आहे असं कोण म्हणेल हे चित्र पाहून? पहा VIDEO
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५० वा वाढदिवस असल्याने, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु सत्तेत नसताना सुद्धा सुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रचंड मराठी माणसाची आणि कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पाहून ‘राजा एकटा पडला’ आहे असं केवळ राजकारण न समजणाराच बोलू शकतो.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या सरकारमुळे नाही, तर मनसेमुळे मुंबईत पेट्रोलचे भाव ४ रुपयांनी कमी
काही महिन्यांपासून संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असून, त्यामुळे महागाईत सुद्धा प्रचंड वाढ झाल्याने सामान्यांची चांगलीच दमछाक होत आहे. केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पेट्रोलचे भाव कमी करण शक्य नसल्याचे म्हटले असताना राज ठाकरेंच्या मनसेकडून मुंबईकरांना एका दिवसाचा का होईना, पण दिलासा देण्याचा प्रयत्नं करण्यात आला असून त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेने भाजप-शिवसेनेच्या सरकारला सुद्धा एक अप्रत्यक्ष चपराक देण्याचा प्रयत्नं केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
कळलं का ? उद्योगपती व उद्योगपती प्रशाकीय अधिकारी, सगळंच सोपं झालं
नुकताच मोदी सरकारने खासगी क्षेत्रातील मोठ्या पदावरील व्यक्तींना प्रशासकीय सेवेचे दालन यूपीएससी परीक्षा न देता सुद्धा काबीज करता येईल असा गाजावाजा करत एक निर्णय प्रसिद्ध केला. परंतु त्यामागचं वास्तव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अचूक पकडलं असून तेच व्यंगचित्रातून मार्मिक पणे दाखवून दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
पु. ल. देशपांडेंबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही: राज ठाकरे
संपूर्ण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे याच्या जीवनावर आधारित चित्रपट सध्या दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. पु. ल. देशपांडे याच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे नाव ‘भाई-व्यक्ती की वल्ली’ असं करण्यात आलं असून, त्याच चित्रपटाचा काल राज ठाकरे यांच्या हस्ते पोस्टर लाँच करण्यात आला त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
7 वर्षांपूर्वी -
पवारांचं ‘पगडी’नाटय़ ठरवून व विशिष्ट समाजाला संदेश देण्यासाठीच
सध्या निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन जातीय समीकरण आखण्याचा प्रयत्नं अनेक राजकीय पक्षांकडून होताना दिसेल. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात हल्लाबोल यात्रेचा समारोप झाला. त्याला छगन भुजबळ हजर राहिले होते. त्यावेळी झालेल्या सत्कार कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पेशवेकालीन पगडी बाजूला सारुन यापुढे फुले पगडी वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला.
7 वर्षांपूर्वी -
तो VIDEO वायरल: उद्धव ठाकरेंनी स्वतःला २५ कोटींचा गंडा बांधून घेतला - शिशिर शिंदें
शिशिर शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर खूप वायरल होत आहे. त्यात मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे जे सध्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या सर्वच प्रसार माध्यमांमध्ये आल्या आहेत. या व्हिडिओ मध्ये त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राज्यसभेच्या उमेदवारीवरून खूप गंभीर आरोप केले होते.
7 वर्षांपूर्वी -
बाजीप्रभू, तानाजी मालुसरेंच्या चरणांची धूळ व्हावी असं कोणी आहे का? निवडणुकीच राजकारण?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आणि रयतेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या कोणत्याही मावळ्याशी एखाद्याची तुलना करावी हे तर लांबच, पण त्यांच्या चरणांची धूळ व्हावी इतकी लायकी असलेलं तरी कोणी उरलं आहे का ? केवळ निवडणुकीची आकडेवारी, जातीय समीकरण आणि विशिष्ठ समाजाच्या मतांना डोंळ्यासमोर ठेऊन, कोणत्याही व्यक्तीची तुलना ही स्वराज्यासाठी लढून स्वतःच रक्त आठवणाऱ्या महाराज्यांच्या कोणत्याही मावळ्यांशी करण कितपत स्वीकारावं ? कारण असाच प्रकार घडला आहे शिवसेनेकडून.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेना सरकारच्या मुंबई विकास आराखड्यात कोळीवाड्यांना स्थान नाही
मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाण यांची हद्दच अजून निश्चित नसल्याने भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने आखलेल्या मुंबईच्या नवीन विकास आराखड्यात मुंबईमधील एकाही कोळीवाड्याचा समावेश करण्यात आलेला नाही. एकूणच परिस्थिती अशी आहे की वरळी कोळीवाड्यानंतर आता सायन कोळीवाड्याला सुद्धा झोपडपट्टी घोषित करण्याच्या हालचाली सुरु आहेत असं चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO