महत्वाच्या बातम्या
-
ओबीसींच्या आरक्षणासाठी मी शिवसेना सोडली, शिवसेना अडचणीत?
पुण्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना छगन भुजबळ यांनी भाषणा दरम्यान एक धक्का दायक खुलासा केला. भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठीच मी शिवसेना सोडली. परंतु भुजबळांचा हा दावा शिवसेनेला निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणू शकतो अशी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. कारण त्याचा दुसरा अर्थ शिवसेनेचा ओबीसी आरक्षणाला विरोध होता का अशी कुजबुज उपस्थितांमध्ये सुरु होती.
7 वर्षांपूर्वी -
शरद पवार व राज ठाकरे का एकमेकांना खंजीर खुपसतील? राजकीय संदर्भ नसलेले हे कॉपी-पेस्ट व्यंगचित्रकार कोण ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्राला एक राजकीय आणि वस्तुस्थितीवर आधारित संदर्भ असतो हा अनुभव आहे. त्यांनी त्या त्या परिस्थितीशी सांगड घालणारी व्यंगचित्र नेहमीच प्रसिद्ध केली आहेत. अगदी राष्ट्रीय ख्यातीचे व्यंगचित्रकार स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे असो की त्यांचाच व्यंगचित्रकारितेचा वारसा अधिक प्रगल्भतेने पुढे घेऊन वर्तमानावर बोट ठेवण्याची नेमकी कला या दोन्ही व्यंचित्रकारांनी नेहमीच जोपासली.
7 वर्षांपूर्वी -
मास्तर म्हणाले तू नापास होणार, पण झाला ना पठ्ठ्या पास आणि मास्तरांना ठसन म्हणून काढली मित्रांनी मिरवणुक
कांजूरमार्गमध्ये क्लासचे सर म्हणाले तू नापास होणार, पोरगं 51 टक्क्यांनी एसएससी पास झालं. मग काय क्लासच्या सराला ठसण म्हणून मित्रांनी त्याची मिरवणूकच काढली.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने आपलाच उमेदवार पळवून आपल्याच विरुद्ध उभा केला
ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना मुख्यमंत्री म्हणाले की, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मित्रपक्षाने आपलाच उमेदवार पळवून आपल्यासमोरच उभा केला. तरी आपण पोटनिवडणूक जिंकली, परंतु येत्या निवडणुकीत शिवसेनेपासून सावध राहण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.
7 वर्षांपूर्वी -
रावतेंवर प्रवाशी आणि एसटी कर्मचारी दोघेही नाराज
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एकबाजूनेच विचार करून जाहीर केलेली पगारवाढ एसटी संघटनांना मान्य नाही. तसेच एसटीच्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषित केली. परंतु ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांनी एसटी महामंडळाकडे ९ जूनपर्यंत लेखी स्वरूपात अर्ज करावा आणि कहर म्हणजे हे अर्ज स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याने सर्व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावते याच्या विरोधात एक खदखद आहे.
7 वर्षांपूर्वी -
मास्तर म्हणाले तू नापास होणार, पोरग पास झालं, मग काय मिरवणूक काढून थेट मास्तराला ठस्सन
एका खासगी क्लासच्या मास्तरांनी त्याच्या पठ्याला तू दहावीला काय पास होणार नाही म्हणून सांगितलं होत. मास्तर रोज हिणवायचे प्रगती बघून. पण मुलगा पण मोठा जिद्दी निघाला आणि ठासून अभ्यास केला आणि चक्क ५१ टक्के मिळवून दहावीला पास पण झाला. पठ्याला मेरिट मध्ये आल्याचा आनंद तर झालाच, पण मित्र पण जाम खुश झाले आपल्या दोस्तांवर आणि ठरलं तर मग थेट मिरवणूक काढून मास्तरांनाच ठस्सन दिली पठ्यानं.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या नजरेतून गळाभेट, भेट आणि मन की बात, पाठीत खंजीर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीची खिल्ली उडविली आहे. मुंबईतील भेटीत या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच स्वागत करत गळाभेट केली खरी, परंतु ज्याला निवडणूक प्रचारात अफजलखान म्हणून हिणवलं त्याची अखेर गळाभेट झाल्याने, त्यावरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक व्यंगचित्र प्रसिद्ध केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
टीडीपीच्या केंद्रातील रिक्त मंत्रिपदांवर सेनेचा डोळा ?
सत्तेत राहून भाजपला विरोध करत राहायचा आणि योग्य वेळ येताच स्वतःची ‘बार्गेनिंग पवार’ वापरून महत्वाची खाती पदरात पाडून घ्यायची रणनीती सध्या सत्ताधारी आपसातच करताना दिसत आहेत. ज्या चंद्रा बाबूंच्या तेलुगू स्वाभिमानाने केंद्रातील मंत्रिपदांना मागचा पुढचा विचार न करता लाथ मारली त्याच रिक्त झालेल्या मंत्रिपदावर दिखाऊ स्वाभिमान दाखविणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचा डोळा असल्याचे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून समजलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
केवळ मराठीच भावनिक राजकारण, ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही
सध्याची शिवसेना ही पूर्वीची बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. केवळ मराठीच्या नावाने भावनिक राजकारण करायचा पण त्यांच्यासाठी शिवसेनेकडून काही सुद्धा केले जात नाही हे वास्तव आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी थेट शिवसेनेचं नाव घेऊन केली आहे. यांनी मराठी माणसासाठी कधीच काही केलं नाही, त्यामुळे यांच्या कार्यकाळातच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला असं ते टीका करताना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर, 'मातोश्री'वरही माहिती?
शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर असून त्याची माहिती ‘मातोश्री’वरही आहे आणि मी स्वतः हे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असा धक्कादायक व खात्रीशीर दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवेंनी केला आहे. जालन्यामधील शिवसेनेत खोतकर जे करत आहेत त्याची माहिती मातोश्री वर असल्यानेच खोतकरांना मातोश्रीवर भेटीसाठी ३-४ तास वाट बघावी लागते असं सुद्धा ते म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
एस.एस.सी २०१८: दहावीचा निकाल ८ जूनला
उद्या म्हणजे ८ जूनला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर होणार आहे. तशी अधिकृत घोषणा बोर्डाकडून जाहीर करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अनधिकृत परप्रांतीय झोपडपट्टी धारकांची पोलिसांवर दगडफेक
कोपरखैरणे स्टेशन येथील बाळाजी मुव्हीप्लेक्स समोरील झोपडपट्टी हटवण्यासाठी गेलेल्या आपल्या पोलिसांवर तुफान दगड फेक, अनेक पोलीस बांधव जखमी.
7 वर्षांपूर्वी -
मराठी उद्योजकांना पुढे घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करेन: राज ठाकरे
मराठी उद्योजकांनी आक्रमक पने व्यवसाय करणे गरजेचे आहे असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र बिजनेस क्लबमध्ये मराठी उद्योजकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं.
7 वर्षांपूर्वी -
आज नारायण राणे 'मातोश्री'वरील भेटीगाठींवर भाष्य करतील
कालच भाजप आणि सेनेमधील दुरावा दूर करण्यासाठी आणि आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चर्चा केली.
7 वर्षांपूर्वी -
चंद्राबाबूंकडे जाण्याचं धाडस नाही झालं, पण मातोश्रीवर आत्मविश्वासाने गेले?
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन तब्बल दोन तासाहून अधिक वेळ चर्चा केली. परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे जर भाजप नेतृत्वाला खरोखरच जुन्या मित्र पक्षासोबत पुन्हा मैत्रीपूर्ण संबंध जोडायचे होते तर तो प्रयत्नं टीडीपी सोबत म्हणजे चंद्राबाबूंना भेटून दुरावा दूर करण्याचा प्रयत्न का नाही झाला, जसा शिवसेनेसोबत अगदी सहज झाला?
7 वर्षांपूर्वी -
युतीतले रुसवे-फुगवे दूर, २०१९ नंतर जनतेचे पुन्हां 'अच्छे दिन' येणार?
काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नियोजित वेळेनुसार सुद्धा ही चर्चा खूप लांबल्याने सर्व काही मनासारखं आणि सकारात्मक झालं असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
सेना-भाजपच्या राजकारणाने राज ठाकरेंवरचा विश्वास द्विगुणित ?
२०१४ मधील निवडणुकीत भाजप शिवसेनेने प्रचारादरम्यान एकमेकांवर तुफान चिखलफेक केली होती. मागील लोकसभेच्या निवडणूका असोत किंव्हा विधानसभेच्या निवडणुका, या दोन्ही पक्षांची आपसात भांडण करून प्रसार माध्यमांना स्वतःवर केंद्रित करण्याची रणनीती मतदाराला चांगलीच माहित झाली आहे. दोघे सुद्धा एकमेकांच्या पक्ष नैतृत्वाची भर सभेत वाटेल त्या थराला जाऊन उणीधुनी काढायचे आणि सत्तेचे मलई डोळ्यासमोर येताच पुन्हां ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्या वीणा करमेना’ अशी गत झाली होती.
7 वर्षांपूर्वी -
सेलिब्रिटीं संपर्कात, महागाईने होरपळणारा सामान्य 'संपर्क क्षेत्राच्या' बाहेर ?
सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानावर आहेत. अमित शहा आज मुंबईमध्ये प्रख्यात उद्योगपती रतन टाटा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची सुद्धा त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत. एकूणच देशभरातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल आणि कर्नाटकातील राजकीय कलाटणीने भाजपची झोप उडाल्याचे चित्र आहे.
7 वर्षांपूर्वी -
भीमा-कोरेगाव प्रकरणी धरपकड सुरू
एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना पुण्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे तसेच त्यांच्या सोबत इतर ३ जणांना सुद्धा अटक झाली आहे. सुधीर ढवळे यांना सकाळी ६ च्या सुमारास पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरून अटक केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
अफजल खान व उंदीर यांची उद्या गळाभेट : काँग्रेस
आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्री या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. परंतु भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना अनेक वेळा चिखलफ़ेक आणि बोचरी टीका केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या भेटीवर कॉग्रेसने ट्विटरवरून उपहासात्मक टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO