महत्वाच्या बातम्या
-
शिवसेना खासदार अध्यक्ष असलेल्या सिटी को.ऑ. बँकेवर निर्बंध
सिटी को ऑप. बँकेच्या ग्राहकाला ६ महिन्यात केवळ एक हजार रुपयेच काढता येतील असे आरबीआयने सिटी को ऑप. बँकेवर निर्बंध घातले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्प म्हणजे सेना-भाजपची 'डील' : राधाकृष्ण विखे पाटील
कोकणातील बहुचर्चित नाणार रिफायनरी म्हणजे शिवसेना आणि भाजप मधली ठरवून केलेली ‘डील’ असून हे सेना – भाजपचे ‘मॅच फिक्सिंग’ आहे अशी थेट टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाणार प्रकल्पासंबंधित कार्यालय मनसेने फोडलं
नाणारवासियांच्या रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध असल्याने कालच्या सभेत राज ठाकरे म्हणाले नाणार रिफायनरी कोकणात होणार नाही म्हणजे नाही आणि अखेर आज मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईस्थित ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई पुण्यात कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चे
कठुआ-उन्नाव बलात्कार प्रकरणाचा सर्वच थरातून कडाडून निषेध केला जात आहे. मुंबई पुण्यामध्ये सुद्धा आज सुट्टीच्या दिवशी जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरण आणि यूपीतील उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ महामोर्चे काढण्यात आले.
7 वर्षांपूर्वी -
मनसेचं मुंबईत गरीब मराठी 'महिला सबलीकरण'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत १०० गरजू मराठी महिलांना ऑटो रिक्षाचे वाटप करण्यात करण्यात आले. मनसेचे उपाध्यक्ष अनिल झोळेकर यांच्या पुढाकाराने मुलुंड पश्चिमेकडील गरजू मराठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईतून फोन गेला, शिवसेनेच्या मंत्र्यांचा उपोषणातून काढता पाय
मोदीसरकारने आज केलेल्या उपोषणावर सामना मुखपत्रातून चौफेर टीका होत असताना शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री सुद्धा भाजपच्या खासदारांसोबत उपोषणात सामील झाले असल्याचे दिसले.
7 वर्षांपूर्वी -
दिल्लीत व राज्यात सत्ताधारीच उपोषणावर
बहुमताने निवडून आलेल्या सरकारवर अखेर उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. मुळात काँग्रेस राजवटीत सुद्धा भाजपने अनेकदा संसदेच काम रोखून धरलं होत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
7 वर्षांपूर्वी -
आशिष शेलार आणि शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची आज भेट झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
'राज' सेना धावली, पोलीस भरती निवाऱ्या विना उपाशी झोपणाऱ्या मुला-मुलीच्या मदतीला
मुंबईसह महाराष्ट्रात सध्या पोलीस भरती चालू आहे. परंतु एक विदारक चित्र मुंबई आणि नवी मुंबई परिसरात पाहावयास मिळत आहे आणि ते म्हणजे हीच दूर गावाकडून आलेली मुलं मुली शहरात कोणताच आधार नसल्याने उघड्यावरच रस्त्यावर उपाशी पोटी किंव्हा जास्त पैसे नसल्याने एखादा वडापाव खाऊन झोपत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
इयत्ता १० वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'भाजप-शिवसेना' ?
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या १० वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे गुणगान तर विरोधी पक्षांवर निशाणा साधण्याचा पद्धतशीर प्रयत्नं करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, कुचकामी मंत्र्यांची उचलबांगडी ?
एप्रिल महिन्याच्या शेवटी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यावेळी अनेक कुचकामी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता असून अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे साहेब उत्तर भारतीयांच्या मागे खंबीरपणे उभे : एकनाथ शिंदे
कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे मागाठाणेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी ‘उत्तर भारतीय सम्मान’ संमेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी उपस्थित उत्तर भारतीय समूहाला संबोधित करताना शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विश्वास व्यक्त केला.
7 वर्षांपूर्वी -
वाघाला आता रोखणे किंवा गोंजारणे अशक्य : उद्धव ठाकरे
मोदी लाट दिसताच तेलगू देसम पक्ष एनडीएमध्ये मध्ये शिरला आणि सध्या बाहेर पडला आहे. मात्र शिवसेना पक्ष म्हणजे पिंजऱ्यातला वाघ नाही, त्यामुळे वाघाला आता रोखणे किंवा गोंजारणे अशक्य असल्याची विधान करत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला प्रतिउत्तर दिल आहे.
7 वर्षांपूर्वी -
२०१९ निवडणुकीसाठी, शिवसेनेचं मुंबईतील 'उत्तरायण' चर्चेचा विषय
लवकरच येऊ घातलेल्या २०१९ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने ‘उत्तरायणाला’ जोरदार सुरवात केल्याने येणाऱ्या जाणाऱ्या मराठी माणसासाठी मुंबईतील गल्लोगल्ली दिसणारे हे बॅनर्स चर्चेचा विषय बनले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज्यातील ६ महापालिकांच्या पोटनिवडणुकीत भाजपला 'भोपळा'
राज्यातील महत्वाच्या सहा महापालिकांच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी आपले वर्चस्व अबाधित राखून स्वतःची ताकद सिद्ध केली आहे, परंतु भाजपला या सहाही जागांवर भोपळा हाती लागला आहे.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे मुंबईतील नेते बाबा सिद्दीकी ईडीच्या जाळ्यात
काँग्रेसचे मुंबईतील नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांना ईडीने दणका दिला आहे. बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील जवळ जवळ ४६२ कोटीची संपत्ती ईडीने म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाने ताब्यात घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
वडापावचं तेल जिरवण्यासाठी सर्वाधिक 'सामना'चा वापर : राष्ट्रवादी
सामना वृत्त पत्रातुन अजित पवारांवर टीका करताना त्यांचा उल्लेख दुतोंडी साप असा केला होता. त्याला प्रतिउत्तर म्हणून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने रात्री उशिरा सामना वृत्तपत्राची खिल्ली उडविणारी पोष्टरबाजी केली.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री नक्की 'लांडगे' असं कोणाला म्हणाले ?
मुख्यमंत्री फडणवीस भाषणा दरम्यान नक्की लांडगे कोणाला म्हणाले, एनडीएतून बाहेर पडून किंव्हा भाजपशी युती तोडून यूपीएतील घटक पक्षांच्या नेत्याची भेट घेणाऱ्या जुन्या मित्रपक्षांना की केवळ यूपीएतील जुन्या मित्र पक्षांना ?
7 वर्षांपूर्वी -
जनधन योजनेतील ६ कोटी खाती निष्क्रिय झाल्याचे गडकरी विसरले ?
मुंबईमधील बीकेसीतील महामेळाव्यात नितीन गडकरी यांनी जनधन योजनेअंतर्गत ३१ कोटी बँक खाती उघडल्याचे भाषणादरम्यान सांगितले खरे, परंतु जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या ३१ कोटी बँक खात्यांपैकी २० टक्के म्हणजे तब्बल ६ कोटी बँक खाती निष्क्रिय ठरली आहेत हे सांगायला ते विसरले.
7 वर्षांपूर्वी -
पवारांनी मोदींचा नाद करू नये, अन्यथा औषधालाही शिल्लक राहणार नाही
मुंबईमधील बीकेसीतील महामेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांवर टीका करताना म्हणाले की, पवारसाहेबांनी मोदींचा नाद करू नये, अन्यथा औषधालाही शिल्लक राहणार नाही.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरबाबत UBS ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN