महत्वाच्या बातम्या
-
Maharashtra Bandh | भाजप-मनसे बंदमध्ये सामील नसण्याचा अर्थ शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या घटनेला त्यांचा पाठिंबा - राऊत
लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे बंद पाळण्यात आला. हा बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेच्या नेत्यांनी केला. मात्र, या बंदमध्ये विरोधी पक्ष भाजप तसेच मनसेने सहभाग नोंदवला नाही. याच मुद्द्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी (Maharashtra Bandh) या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली. महाराष्ट्र बंदमध्ये सामील न होणे म्हणजेच शेतकरी चिरडण्याला पाठिंबा देणे आहे, असे म्हणत राऊतांनी भाजप तसेच मनसेवर निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या भाजपाला बंद पाळून नागरिकांची सणसणीत चपराक
आजचा महाराष्ट्र बंद पूर्णपणे यशस्वी झाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नागरिकांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांचे मारेकरी म्हणजेच भारतीय जनता पक्षाला सणसणीत चपराक लगावली आहे. बंदला विरोध करून (Maharashtra Bandh) भारतीय जनता पक्षाने आपला खरा शेतकरी विरोधी चेहरा दाखवून दिला आहे. उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु असून उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे बळी दिले जात आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
Rupali Chakankar | वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो, तसा बोलण्यातही | संवेदनाहिन मनाच्या अन अर्धवट ज्ञानाच्या
उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचारा निषेध म्हणून आज सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात सर्व ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. दरम्यान, आजच्या महाराष्ट्र बंदवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावलाय.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे - फडणवीस
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्ला करतानाच आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद (Maharashtra Bandh) आहे. या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील किंवा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | मुंबईत भाजपचे आमदार-खासदार असलेल्या भागातही बंद यशस्वी | व्यापारी ते सामान्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर येथे शेतकऱ्यांचे अमानुष हत्याकांड, वाढती महागाई शेतकरी विरोधी कायदे याच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षांनी आज सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक (Maharashtra Bandh) दिली आहे. या बंदला भाजपाने विरोध केला होता. मात्र त्यांतरही भाजपाच्या गड असलेल्या घाटकोपरमध्ये बंद पाळण्यात आल्याचे दिसून आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh Vs CBI | अनिल देशमुख यांचे पुत्र सलील आणि सुनेविरुद्ध सीबीआयचे अटक वॉरंट
आज सकाळी सीबीआयचे एक पथक दाखल त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी दाखल झाले आहे. ज्यामध्ये सहा अधिकारी असून एक महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे. सीबीआयचे पथक अनिल देशमुख यांचे पुत्र सलील आणि सुनेविरुद्ध अटक वॉरंट (Anil Deshmukh Vs CBI) घेऊन आलेले आहे. मात्र, विविध यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई सुरू झाल्यापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय अज्ञातवासात गेले आहेत. त्यामुळे आता सीबीआयचं पथक अटक वॉरंट संदर्भात काय निर्णय घेतं हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Crime Branch Notice To Parambir Singh | परमबीर सिंह यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत गुन्हे शाखेने धाडली नोटीस
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशीसाठी हजर (Crime Branch Notice To Parambir Singh) राहण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, सचिन वाझे आणि अन्य लोकांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला. अशात परमबीर सिंग यांच्या मुंबई येथील घराच्या बाहेर नोटीस चिकटवण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Bandh | 11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र बंद'ची हाक
11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक महाविकास आघाडीने दिली आहे. याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते. उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
Nitesh Rane Vs Khan Surname | कारण ते 'खान' आहेत? | त्या प्रकरणात नितेश राणेंनी सलमानला दाखवलेली सहानुभूती
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर आक्षेप घेत अनेक दावे केले आहेत. यावेळी भाजपवरही निशाणा साधला. यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर देत ‘खान’ असल्यामुळे नवाब मलिकांची आदळआपट सुरू आहे का, असा थेट सवाल (Nilesh Rane Vs Khan Surname) विचारला आहे.
4 वर्षांपूर्वी -
NCB Press Conference | सोडण्यात आलेल्यांबद्दलच्या प्रश्नात धर्म-जात हेतूच नव्हता | अधिकाऱ्याच्या उत्तरात 'राजकीय' कला
एनसीबीचे अधिकारी ग्यानेश्वर सिंग यांनी आज पत्रकार परिषद घेऊन क्रूझ पार्टीवरील कारवाईबाबतची माहिती (NCB Press Conference) दिली. आम्ही 8 लोकांना पकडलं आणि तिघांना सोडलं असं सांगितलं जात होतं. पण आम्ही 6 लोकांना सोडलं आहे. एनसीबी ही एक व्यावसायिक संस्था आहे. आम्ही जात, धर्म, पक्ष पाहून काम करत नाही. पुराव्याच्या आधारे आम्ही काम करतो. न्यायालयाच्या सुपरव्हिजनमध्ये काम करतो, असं सिंग यांनी स्पष्ट केलं.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Maritime Board Recruitment 2021 | महाराष्ट्र सागरी मंडळ (मुंबई) मध्ये 48 पदांची भरती
महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड भरती 2021. Mahammb मुंबई भरती. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मुंबई ने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 48 विविध पदांसाठी (Maharashtra Maritime Board Recruitment 2021) अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीसाठी येऊ शकतात, Mahammb’साठी 28 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित केले जातील.
4 वर्षांपूर्वी -
NCB Cruise Raided | NCB'चं पुराव्यानिशी भांडं फुटलं | समीर वानखेडेंचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्यासाठी मागणी
ड्रग्ज क्रुझ प्रकरणावर मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याप्रकरणाचा तपास करत असलेल्या एनसीबीच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले, ज्यादिवशी क्रुझवर छापेमारी (NCB Cruise Raided) करण्यात आली, त्यादिवशी समीर वानखेडेने माध्यमांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी 8-10 लोकांना पकडल्याचे सांगितले. मात्र, हे खोटे आहे. त्यात 11 जण होते.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai NCB officer Molestation Case | मुंबई NCB अधिकाऱ्याकडून तरुणीचा विनयभंग | गुन्हा दाखल
मुंबई ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात नॉक्टोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबी चांगलीच चर्चेत आली आहे. त्यानंतर आता मुंबई झोनल ऑफिसचे एनसीबी अधिकारी दिनेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Mumbai NCB officer molestation Case) झालाय. महत्वाची बाब म्हणजे हा गुन्हा विनयभंगाचा आहे. रेल्वेमध्ये प्रवास करताना सहप्रवासी तरुणीचा विनयभंग केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी ही 25 वर्षाची असून ती हैदराबाद ते पुणे प्रवास करत होती.
4 वर्षांपूर्वी -
NCB and Criminal Gosavi | फसवणूक, धमकी देणे असे ३ गुन्हे दाखल असलेला फरार गुन्हेगार NCB सोबत कारवाईत सामील
गोसावी कार्डेलिया क्रूझवरील कारवाईवेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीने सहभागी असल्याचे उपलब्ध व्हिडीओ व फोटोवरून दिसून येते. आर्यन खानला दंडाला पकडून नेताना तसेच त्याच्या समवेत सेल्फी घेणारा गोसावी हा (NCB and Criminal Gosavi) एखादा अधिकारी असावा असा समज झाला होता. त्यामुळे एनसीबीने सोमवारी तो खासगी व्यक्ती असून त्याचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
Arbaaz Merchant Alleges NCB | NCB नेच तिथे ड्रग्ज ठेवली | CCTV'त दिसेल | अरबाझचा आरोप
ड्रग्ज पार्टीचं प्रकरण सध्या राज्यभर गाजतं आहे. मुंबईतल्या क्रूझवर टाकण्यात आलेल्या NCB च्या छाप्यात ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट या दोघांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अशात आता अरबाझ मर्चंट याने जामिनासाठी अर्ज केला असून एनसीबीनेच क्रूझवर ड्रग्ज ठेवले असा (Arbaaz Merchant Alleges NCB) आरोप केला आहे. एवढंच नाही तर सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यात ही बाब दिसून येईल असंही सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Aryan Khan Bail Hearing | आर्यनसह ६ जणांना १४ दिवसांची कोर्ट कोठडी | जामिनासाठी अर्ज करू शकतात
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. आर्यनला जामीन मिळणार की त्याच्या कोठडीत वाढ होणार, याचा फैसला आज पुन्हा होणार होता. मुंबई – गोवा क्रूझवर 2 ऑक्टोबरला धाड टाकून NCB ने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला त्यांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर (NCB) अटक केल्यानंतर आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात (Aryan Khan Bail Hearing) आली होती.
4 वर्षांपूर्वी -
Mohan Delkar Family Joined Shivsena | मोहन डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाचा शिवसेनेत प्रवेश
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनं राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. डेलकर यांनी स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी केल्या होत्या. डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव लिहिलं होतं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मोहन डेलकर यांचे कुटुंबिय आज शिवसेनेत प्रवेश (Mohan Delkar Family Joined Shivsena) जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
4 वर्षांपूर्वी -
Kangana Vs Hrithik Roshan| आर्यनवरून आता कंगना मैदानात | म्हणाली माफिया त्याला पाठिंबा देत आहेत
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित शाहरुख खानचा मुलगा आर्यनला पाठिंबा दिला (Kangana Vs Hrithik Roshan) आहे. हृतिकने आर्यनला या कठीण काळातून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली आहे. हृतिकची पोस्ट समोर आल्यानंतर आता कंगना रनोटने आर्यन खानला पाठिंबा देणा-यांचा समाचार घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ZP Panchayat Election | राजकीय आरक्षण रद्द होऊनही OBC टक्का कायम | भाजपचे दावे फोल ठरले
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द (ZP Panchayat Election) झाल्यामुळे राज्यातील ६ जिल्हा परिषदांचे ८५ गट आणि ३८ पंचायत समित्यांमधील १४४ गणांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसीच उमेदवार दिल्यामुळे ओबीसीचा टक्का कायम राहिला आहे. त्यामुळे भाजपचे दावे आणि आंदोलनाचे स्टंट फसवे ठरले आहेत. विशेष म्हणजे त्यामुळे महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षावर विशेष परिणाम झालेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
Sameer Wankhede | लेखी, कायदेशीर कारवाई करणाऱ्या वानखेडेंना अटक केलेल्यांचा खात्रीलायक आकडाच माहित नाही
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर जोरदार राजकारण रंगू लागलंय. नबाव मलिकांनी आर्यन खान कारवाईवरून एनसीबीच्या आडूनही भाजपाला खडेबोल सुनावले होते. त्यालाच आता एनसीबीनं पत्रकार परिषद (Sameer Wankhede) घेत प्रत्युत्तर दिलंय. एनसीबीकडून ज्ञानेंदर सिंग आणि समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांचे आरोप खोडून काढलेत. विशेष म्हणजे आरोपांमधील मूळ प्रश्नाला बगल देत अधिकाऱ्यांनी भलतंच तुणतुणं वाजवल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE