महत्वाच्या बातम्या
-
Bigg Boss Marathi 3 | ग्रँड प्रिमिअरला अवघे काही तास शिल्लक | हे आहेत संभाव्य स्पर्धक
बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा ग्रँड प्रिमिअर आज (19 सप्टेंबर) संध्याकाळी सात वाजता होणार आहे. आपल्या खास शैलीत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांची शाळा घेणारे दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरच यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोचे शानदार प्रोमो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ‘बिग बॉस’च्या ((Bigg Boss Marathi 3)) घरात कोण दिसणार, याची चर्चा सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे. ग्रँड प्रिमिअरला अवघे काही तास शिल्लक असताना काही संभाव्य स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.
4 वर्षांपूर्वी -
वैभव खेडेकर मनसेचे कि राष्ट्रवादी पक्षाचे आहेत? | खेड नगरपरिषदेत इंधन घोटाळा कोणी केला? - रामदास कदम
वैभव खेडेकर मनसेचे पक्षाचे आहेत कि राष्ट्रवादी पक्षाचे आहेत? असा संभ्रम खेडच्या जनतेला पडला आहे त्यांच्या आरोपाना आपण भीक घालत नाही असा पलटवार माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दि. १८ रोजी खेड येथे पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर खोटे, दिशाभूल करणारे आरोप केले आहेत असे कदम यांच्या म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
लखोबा लोखंडे फेसबुक पेजवरून मविआ नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण | चॅलेंज देणाऱ्या अभिजित लिमयेला अटक
लखोब लोखंडे या फेसबुक पेजवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करणाऱ्याला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसानी अटक केली आहे. न्यायालयात हजर करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासले.
4 वर्षांपूर्वी -
Anant Chaturdashi 2021 | पुण्यात मानाच्या गणपतींसह मुंबईतील महत्त्वाच्या ‘श्रीं’चे साधेपणाने होणार विसर्जन
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीचा नेत्रदीपक सोहळा सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संकटामुळे झाकोळला आहे. तरीही मानाच्या श्रींसह महत्त्वाची गणेश मंडळे परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करत यंदाही साधेपणाने गणरायाला निरोप देणार आहेत. यंदा प्रथेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी दहा वाजता विसर्जन सोहळा सुरू होईल. त्यानंतर मानाच्या पहिल्या पाच गणपतींना महापौर मोहोळ स्वतः भेट देतील.
4 वर्षांपूर्वी -
लवकरच भाजपाला मोठं राजकीय खिंडार पडणार | भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करणार?
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, भारतीय जनता पक्षातील अनेक आमदार हे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे काही आमदार हे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुप्तचर यंत्रणांचा इशारा | मुंबई ट्रेनमध्ये विषारी वायू तर गर्दीच्या रेल्वे स्थानकावर भरधाव गाडी घुसवून प्रवाशांना चिरडण्याचं षडयंत्र?
नवी दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर आता या दहशतवादांकडून नवनवे खुलासे होत आहे. या दहशतवाद्यांच्या षडयंत्रबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दहशतवादांचा मोठ्या घातपाताचा कट होता. मुंबई आणि उत्तर प्रदेशमधील निवडणुका दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होतं, असंही समजतंय. त्यातच मुंबई लोकलही दहशतवाद्यांच्या निशाणावर होतीच मात्र रेल्वेत विषारी वायू सोडून घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता, अशी धक्कादायक माहिती प्रसार माध्यमांच्या सुत्रांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र ATS आणि मुंबई पोलिसांची मोठी कारवाई | दहशतवादी कारवाई प्रकरणी मुंबईतून एकाला अटक
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणासुदीत घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणाशी संबंधित आणखी एका जणास नागपाडा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयित आरोपीचे नाव झाकीर असे सांगितले जात आहे. महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत शुक्रवारी त्याला ताब्यात घेतले आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलंय ‘ते’ वक्तव्य - नाना पटोले
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर होते. आज एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी, असे विधान केले. यावेळी रावसाहेब दानवे देखील मंचावर होते. त्यावरून आता तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | MMRDA (मुंबई) मध्ये 05 पदांची भरती | पगार १ लाख ३२ हजार
एमएमआरडीए मुंबई भरती 2021. एमएमआरडीए, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 05 मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन अधिकारी पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 16 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज एमएमआरडीए भरती 2021 वर ईमेलद्वारे पाठवू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Bridge Collapse in Mumbai | मुंबई वांद्रे कुर्ला येथे पहाटे उड्डाणपुलाचा एक गर्डर निखळून खाली पडला | 14 कामगार जखमी
वांद्रे कुर्ला येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग कोसळला आहे. यामध्ये 14 कामगार जखमी झाले आहेत. यातील जखमी सर्वांना बीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आणि बचावकार्य सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
Kusum Solar Pump Yojana | कुसुम सोलर पंप योजना सुरु | प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
कुसुम सोलर पंप योजना सुरु झालेली आहे अशा आशयाची बातमी शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेली आहे. https://www.mahaurja.com/ या वेबसाईटवर या कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप घेण्याची इच्छा आहे त्यांनी वरील लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करायचे आहेत. ( ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करू शकता.)
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्रा. (MHADA) मध्ये 565 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज
म्हाडा भरती 2021. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 565 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार 17 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत म्हाडा भरती 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह यांना हायकोर्टाचा दणका | राज्य सरकारच्या चौकशीला आव्हान देणारी याचिका फेटाळली
परमबीर सिंह यांना चौकशीच्या प्रकरणात दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. परमबीर सिंह यांनी त्यांच्याविरोधातील चौकशीला आव्हान देत दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या याचिकेत केलेल्या मागण्यांबाबत हायकोर्ट निर्णय देऊ इच्छित नाही. त्यामुळे परमबीर यांनी योग्य त्या लवादापुढे जाऊन दाद मागावी. तसेच लवादानं हायकोर्टाच्या कुठल्याही निर्देशांच्या प्रभावाखाली न राहता स्वतंत्र सुनावणी घेत यावर निर्णय द्यावा असे निर्देश न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.ज. जमादार यांच्या खंडपीठानं आपल्या निकालात दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय हेतू साध्य करण्यासाठी न्यायालयाचा वापर होऊ नये | अनिल परब यांचे म्हणणे सुद्धा ऐकू - हायकोर्ट
परब यांच्यासह परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप करून सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका निलंबित आरटीओ अधिकारी गजेंद्र पाटील यांनी ॲड. व्ही. पी. राणे यांच्यामार्फत काही महिन्यांपूर्वी केली. याविषयी बुधवारी प्राथमिक सुनावणी झाली.
4 वर्षांपूर्वी -
OBC Reservation | ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार | मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडणार नाही. तामिळनाडू आणि इतर राज्यांच्या धर्तीवर हे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भुजबळ म्हणाले. न्यायालयात आव्हान दिले तर अध्यादेश टिकेल, असेही त्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
अभिनेता सोनू सूद आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर? | कार्यालयाची पाहणी
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या मुंबई येथील कार्यालयाचे आयकर विभागाने सर्वेक्षण केले. सूदशी संबंधित खात्यांच्या पुस्तकांसोबत छेडछाड केल्याचा दावा आहे तेव्हापासून आयकर विभाग सोनूच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करत आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. आयकर विभागाने सोनू आणि त्याच्या कंपनीशी संबंध असलेल्या 6 जागांचे सर्वेक्षण केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
दरेकरांना महिलांचा सन्मान करता येत नसेल तर करु नका | पण महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? - सुरेखा पुणेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर काल शिरुर दौऱ्यावर होते. राजे उमाजी नाईक यांच्या 230व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं होते. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | IREL मुंबईत 54 पदांची भरती | पगार ४० हजार
आयआरईएल लिमिटेड मुंबई भरती 2021. अणुऊर्जा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रण अंतर्गत आयआरईएल लिमिटेड ने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 54 पदवीधर प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ पर्यवेक्षक, वैयक्तिक सचिव आणि व्यापारी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 05 ऑक्टोबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी IREL भरती 2021 वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Delhi Terrorist Arrest | महाराष्ट्र ATS प्रमुखांची सविस्तर माहिती | आशिष शेलार यांचा उतावळेपणा देखील उघड?
एकही दहशतवादी मुंबईत आला नाही, त्यांचा कुणी साथीदारही आला नाही, महाराष्ट्रात कोणतेही स्फोटक सापडलेले नाहीत, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख विनित अग्रवाल यांनी दिले. मुंबईतील धारावीचा रहिवासी असलेला समीर कालिया उर्फ जान मोहम्मद शेख याचे 20 वर्ष जुने दाऊद कनेक्शन उघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली. देशात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने उधळून लावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सोमय्यांकडे भाजपचे प्रतिनिधी एवढंच पद आहे | भाजपने त्यांना ईडीचे प्रवक्ते पद तरी द्यावं - आ. रोहित पवार
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आघाडीतील नेत्यांना टार्गेट करून त्यांचे भ्रष्टाचार काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोमय्या यांना टोला लगावला आहे. भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्या यांना ईडीचं प्रवक्तेपद द्यावं, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काढला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON