महत्वाच्या बातम्या
-
Job Alert | मोरेश्वर महाविद्यालय जालनात 59 पदांची भरती
मोरेश्वर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भारती. मोरेश्वर आर्स्ट, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, भोकरदन जि. जालना यांनी 59 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी मोरेश्वर महाविद्यालय भरतीकडे अर्ज सादर करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | संगमनेर नगरपालिका महाविद्यालयात 48 जागा | थेट मुलाखत
संगमनेर नगरपालिका विज्ञान महाविद्यालय भरती 2021. संगमनेर नगरपालिका कला, डी.जे. मालपाणी कॉमर्स आणि बी.एन. सारडा सायन्स कॉलेजने लहान भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 48 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत 13 सप्टेंबर 2021 रोजी एसएनएससी भरती 2021 रोजी घेतली जाईल.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना आ. प्रताप सरनाईकांशी संबंधित NSEL प्रकरणी ईडीला हायकोर्टाचा दणका
शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांशी संबंधित एनएसईएल प्रकरणी ईडीला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. या प्रकरणातील आरोपी योगेश देशमुख यांचा जामीन रद्द करण्यासाठी तपासयंत्रणेनं दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. विकासक योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय समजले जातात. योगेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रींग प्रकरणी अटक केली होती.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | पेंग्विनच्या देखभालीसाठी काढले जाणारे टेंडर आयुक्तांनी केले रद्द
राणीबागेतील पेंग्विनसाठी काढले जाणारे १५ कोटींचे टेंडर पालिका प्रशासनाकडून मागे घेण्यात आले आहे. पेंग्विनची जास्तीत जास्त देखभाल महापालिका प्रशासनाच्या अखत्यारितच करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
देशमुखांवर आरोप केल्याने भाजपकडून परमबीरसिंग यांना जीवदान | म्हणून NIA च्या चार्जशीटमध्ये ते आरोपी नाहीत - राष्ट्रवादी
अँटिलिया प्रकरणात एनआयएने सादर केलेल्या चार्जशीटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आहोत परामबीर सिंहला वाचवलं जात आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना सिंह हे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारची दिशाभूल करत होते. सिंह यांना वाचवण्यासाठी भाजपने गृहमंत्र्यांवर आरोप केले. मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे परमबीर सिंह हा या सर्व घटनेचा मास्टरमाईंड आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळाचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचंच - देवेंद्र फडणवीस
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा मराठी माणसाचा पराभव असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. बेळगावचा निकाल म्हणजे मराठी माणसाचा विजय असून हा शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव असल्याचे म्हटल आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते पत्रकरांसोबत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा | महाराष्ट्रातही अशा शाळा सुरू करणार - आदित्य ठाकरे
देशात आणि जगात जे सर्वोत्तम असेल त्या पद्धतीचे शिक्षण मुंबईतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. भविष्यात राज्य शासनामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना असे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
अँटिलिया प्रकरणी तपासाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिंग यांनी सायबर तज्ज्ञाला दिली ५ लाखांची लाच
अँटिलिया स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात एका सायबर तज्ज्ञाने आपल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अँटिलिया घटनेच्या तपासाची दिशाभूल करण्यासाठी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवालाशी छेडछाड केली होती. यासाठी, परमबीरने त्या सायबर तज्ञाला 5 लाख रुपयांची लाच दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची तिसरी लाट आपल्या दारावर येऊन पोहोचली आहे | खबरदारी घेणं गरजेचं - महापौर
कोरोनाची तिसरी लाट दारावर येऊन पोहोचली आहे, असं म्हटलंय. “मी मुंबईत करोनाची तिसरी लाट आली आहे, असं म्हटलं नव्हतं. मंत्री नितीन राऊत म्हणाले होते, की नागपुरात तिसरी लाट आली आहे. त्यामुळे तिसरी लाट आपल्या दारावर आली असून खबरदारी घेणं गरजेचं आहे,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
धार्मिक टीकेसाठी सोशल मीडियावर १ वर्षापूर्वीचे फोटो व्हायरल | नेहमीप्रमाणे भातखळकर अग्रस्थानी
वरळीमध्ये एका मोठ्या हिरव्या रंगाच्या कटआऊटवर आदित्य ठाकरेंचा सफेद रंगाचा कुर्त्यामधला फोटो व्हायरल झाला आहे. फोटोच्या शेजारी ऊर्दू भाषेत ‘नमस्ते वरळी’ असा संदेश लिहिला आहे. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य प्रीती शर्मा मेनन यांनी हा फोटो टि्वट करत ‘भगवा झाला हिरवा’ असा संदेश लिहिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी? | मनसेचा युवासेनेला पोश्टरबाजीतून टोला
ठाकरे सरकार आणि त्यांचं पेंग्विनप्रेम सध्या चांगलंच चर्चेत आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला मात्र महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनेच आता आक्षेप घेतला आहे. या पेंग्विनसाठी लागणाऱ्या खर्चाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ठाकरे सरकारवर चांगलीच टीका करत मुंबईत पोस्टरबाजी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमराठी लोंढ्यांना खुलं मैदान | पण कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांची होणार RT-PCR टेस्ट
गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात लाखो चाकरमानी जातात. कोकणात कोरोना, डेल्टा प्लसचा या विषाणूचा प्रसार असल्याने मुंबईत परतत असताना चाकरमान्यांच्या आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातील. तसेच कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्याही पहिल्याच दिवशी आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
भाजप खासदाराच्या कुटुंबाकडून सुनेचा छळ आणि मारहाण | मदतीच्या याचनेनंतरही चित्रा वाघ शांत?
वर्ध्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रडत रडत व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादीकडे मदत मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे त्यांनी मदतीची याचना केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
GANPATI BAPPA 2021 | लालबागच्या राजाचा प्रसाद घरपोच मिळणार | बुकिंग आजपासून सुरु
संकटामुळे मागील वर्षाप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अनेक नियम आखून दिले आहेत. याच नियमानुसार आता मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा देखील विराजमान होणार आहे. पण यंदा लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना फक्त ऑनलाइनच घेता येणार आहे. पण असं असलं तरी भाविकांना लालबागच्या राजाचा प्रसाद हा घरपोच मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटणार | राणे आणि शिवसेनेकडून पुन्हा इशारे सुरु
कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत घोषणा केली आहे. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा राणे यांनी आज केलीय.
4 वर्षांपूर्वी -
मृत्यू झालेल्या माणसाच्या वारसांना नोकरी, मदत देण्यासाठी किशोर वाघ यांनी लाच घेतली, हे तुम्ही जनतेला सांगा
राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक युद्ध आता सुरुच आहे. कालच्या संघर्षानंतर चित्रा वाघ यांनी आज पुन्हा ट्विट करुन महेबूब शेख यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेला महेबूब शेख यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे. “असल्या 56 चित्रा वाघ आल्या तरी मला फरक पडत नाही आणि असल्या मांजरीला आणि बोक्यांना मी घाबरत नाही”, असा पलटवार महेबूब शेख यांनी केलाय.
4 वर्षांपूर्वी -
पुनर्विवाहानंतरही विधवा पत्नीचा पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार | हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
पतीच्या निधनानंतर विवाह केलेल्या पत्नीचा पुनर्विवाहानंतरही पहिल्या पतीच्या संपत्तीवर अधिकार असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.हिंदू वारसा कायद्याच्या कलम १० अंतर्गत विधवा पत्नी आणि आई दोन्ही पतीच्या निधनानंतर प्रथम वारसदारांमध्ये येतात.त्यामुळे आईचाही अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांच्याविरोधात जारी केले वॉरंट | डीजीपींना दिले पोहोचवण्याचे आदेश
चांदीवाल आयोगाने महाराष्ट्राचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आयोगाने 50,000 रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तसेच आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपींना हे वॉरंट देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
IAS-IPS अधिकारी आधी फडणवीसांची भेट घेतात | त्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर बेछूट आरोप केले जात आहेत. हे आरोप करण्याआधी काही आयपीएस आणि आयएएस अधिकारी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. त्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात आणि कारवाई देखील सुरू होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गैव्यवहारांविरोधात देशात कमिशन आहेत | ईडीच्या कारवायांचा मुद्दा संसदेत मांडणार - शरद पवार
मागील दोन-तीन वर्षांत देशात नवीन यंत्रणा लोकांना माहिती झाली आहे. त्या यंत्रणेचं नाव आहे ईडी. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही. कालच अकोल्यातून भावना गवळी नावाच्या शिवसेनेच्या खासदार आल्या होत्या. त्यांच्या ३-४ संस्था आहेत. ३ शिक्षणसंस्था आणि एक दुसरी छोटी संस्था आहे. त्याचा व्यवहारही २०-२५ कोटींच्या आत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE