महत्वाच्या बातम्या
-
Parambir Singh | परमबीर सिंग यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल | व्यापाऱ्याकडून ९ लाख खंडणी आणि महागडे फोन
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एका व्यापाऱ्यानं वसूलीसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांच्या नियुक्त्या | राज्यपालांकडून चर्चेचं निमंत्रण | वादाचा गुंता सुटणार?
१२ आमदारांच्या निर्णयावरून शिवसेना आणि राज्यपालांमध्ये चांगलंच राजकारण पेटलं आहे. पण हा वाद आता निकाली निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या महत्त्वाच्या निर्णयानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चर्चेचं निमंत्रण दिल्याची चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजीवनी काळे वडिलांसह कृष्णकुंजवर | तर राज ठाकरे पुण्यात | भेट नेमकी कोणाशी?
घरगुती हिंसाचार व जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेसाठी त्यांच्या पत्नीने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. संजीवनी काळे यांच्या खळबळजनक आरोपांनंतर गजानन काळे फरार झाले होते. गेल्या दहा दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांची दहा पथके गजानन काळे यांचा शोध घेत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेण्यासारखे - आ. अमोल मिटकरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातींमध्ये द्वेष वाढल्याचा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलाय. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Bank Job Alert | दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेत 100 लिपिक पदांसाठी भरती | पगार २५ हजार
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भरती. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 100 जूनियर लिपिक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एडीसीसीबीएल भरती 2021 साठी 04 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी म्हणजे देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड | दानवेंनी विखारी टीका
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा आज बदनापुरात पोहोचली. त्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर विखारी टीका केलीय. दानवे यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख देवासाठी सोडलेला वळू किंवा सांड असा केला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष आता पेटण्याची चिन्ह आहेत. दरम्यान, दानवे यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण द्यायचं कुठून? इंदिरा सहानी केसने हात बांधले | 50 टक्क्यांची कॅप बदला - संभाजीराजे
मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी छत्रपती आक्रमक झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच थेट राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकांनी बसावं माझ्यासमोर, होऊन जाऊ द्या चर्चा, असं आव्हानच खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
जळगाव | आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवणुकीची सेना-राष्ट्रवादीत खलबतं?
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात राज्यातील दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांच्याशी देखील गुलाबराव पाटलांचे फारसे जमत नाही. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी एकत्र भेट घेतली. रुग्णालयातून घरी परतल्यावर खडसेंची ही सदिच्छा भेट असली तरी अनेकांच्या या भेटीने भुवया उंचावल्या आहे.
4 वर्षांपूर्वी -
शुद्धीकरणासाठी ब्राह्मण हवा होता | आमच्याकडे भरपूर आहेत, घेऊन गेलो असतो - नारायण राणे
शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. त्यावरून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो. शिवसेनेकडे आहेत कुठे? आमच्याकडे मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
ही अतिशय संकुचित मानसिकता | एक प्रकारे बुरसटलेला तालिबानी विचार - देवेंद्र फडणवीस
नारायण राणे यांनी गुरुवारी मुंबईत बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट दिली. यानंतर काही स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्याचं समोर आलं. यावरून भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक संतप्त प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी अनेक स्मारकं पाहिली | पण बाळासाहेबांचं स्मारक दलदलीत, मी पँटवर करून आत गेलो - नारायण राणे
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं होतं. नारायण राणे यांनी आज या प्रकारावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना प्रमुखांच्या स्मृती स्थळाची अवस्था आधी पाहा.
4 वर्षांपूर्वी -
म्हणून पुढच्या वेळी..चड्डीत राहायचं ! | नितेश राणेंचं शिवसैनिकांना उद्देशून ट्विट
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनयात्रेला काल(२० ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. जनआशीर्वाद यात्रेवेळी सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. मात्र या प्रकरणावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. असं असतानाच नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी थेट नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Bhuvikas Bank | भूविकास बँकेची 348 कोटींची कर्जे माफ | 33,895 शेतकऱ्यांना लाभ - उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेची सरसकट थकीत शेती कर्जे माफ करण्याचा तसेच कामगारांची देणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना आणि ३ हजार २९६ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुलगुरू निवडीचे सर्वाधिकार आता राज्य सरकारकडे येणार? | राज्यपालांचे पंख छाटण्यासाठी आघाडी सरकारची योजना?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात मोठे बदल केले जाणार आहेत. कुलपती या नात्याने कुलगुरू निवडीचे राज्यपालांचे अधिकार आता राज्य सरकारकडे येतील.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणेंनी स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. जन आशीर्वाद यात्रेत नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे नावाप्रमाणे राज्याला उध्वस्त करायला निघालेत. जनतेचा प्रतिसाद पाहता, महाविकास आघाडीला कंटाळलेली आहे, असं राणे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Param Bir Singh | होमगार्ड्स बदली पासून रजेवर | आता फोन बंद | ठाणे पोलीस पुढच्या तयारीला...
ठाणे पोलिसांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर ५ दिवसांनी, सूत्रांनी सीएनएन न्युज18 ‘ला ते चंदीगड येथील त्यांच्या घरी उपस्थित नसल्याचे सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
Anil Deshmukh in Supreme Court | अनिल देशमुखांची ED बाबतीतली याचिका सुप्रीम कोर्टाकडून स्विकृत
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीकडून (सक्तवसुली संचालनालय) आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आले होते. याबाबत अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून आता हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईडीच्या कार्यालयात आपण चौकशीसाठी उपस्थित राहू, असे पत्र अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध केल आहे.
4 वर्षांपूर्वी -
MCGM Recruitment 2021 | मुंबई महानगरपालिकेत कम्प्युटर असिस्टंट पदांची भरती | थेट मुलाखत
MCGM भरती 2021. बृहन्मुंबई महानगरपालिकेला बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 06 DEO पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एमसीजीएम भरतीसाठी 20 ऑगस्ट 2021 रोजी वॉक-इन-सिलेक्शनसाठी येऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Jan Ashirwad Yatra | आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते, अशीच प्रगती कर | त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. मुंबई विमानतळावरुन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करुन ही यात्रा शिवाजी पार्कातील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळ येथे दाखल झाले. यावेळी नारायण राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. यासोबतच त्यांच्या स्मृतींनाही उजाळा दिला.
4 वर्षांपूर्वी -
वसुली प्रकरण | परमबीर सिंह चांदीवाला समितीसमोर आलेच नाही | आयोगानं ठोठावला दंड
परमबीर सिंह यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीत. सेवानिवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल (Chandiwal Committee) यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर उपस्थित न झाल्याने परमबीर सिंह यांना पंचवीस हजार रुपये असा दंड ठोठावण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप केले होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE