महत्वाच्या बातम्या
-
५० टक्क्यांची मर्यादा? | केंद्र सरकार राज्यांना अधिकार देतंय की राज्यांच्या अडचणी वाढवतंय? | केंद्राचा हेतू काय? - सविस्तर वृत्त
संसदेत 127 वे घटनादुरूस्ती विधेयक सोमवारी लोकसभेमध्ये सादर केल्यानंतर भाजपने आपल्या सर्व खासदारांना 10 आणि 11 ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभेत हजर राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर 10 तारखेला (आज) लोकसभेत चर्चा होऊन विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचे २ डोस घेतले? | मग असा ऑनलाईन युनिव्हर्सल पास मिळवा | रेल्वे, बस, मेट्रो, मोनो ते मॅालसाठीही उपयोगी
लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी 15 ऑगस्टपासून रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात येणार असून, लवकरच ती सुरू करण्यात येणार आहे. पण ही यंत्रणा नक्की काम कशी करणार, याबाबत सर्वसामांन्यांच्या मनात गोंधळ आहे. त्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
4 वर्षांपूर्वी -
युपी निवडणूक | चंद्रकांतदादांना राज भेट नडली? | दिल्लीत ४ दिवस असूनही मोदी-शहांनी भेट दिली नाही
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत. रविवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक देखील झाली. दरम्यान, चार दिवसापासून दिल्लीत असणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मात्र अमित शहा यांनी भेट टाळल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्य पदाधिकाऱ्यांसह चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र त्यांना वेळ दिली गेली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | FYJC प्रवेशासाठीची CET मुंबई हायकोर्टाकडून रद्द
अकरावी प्रवेशासाठीची CET हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. 28 मे चा यासंदर्भातला अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे हायकोर्टाने सांगितले आहे. राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची याचिका केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. मुंबई हायकोर्टात राज्य सरकारतर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली.
4 वर्षांपूर्वी -
आ. प्रताप सरनाईकांना अडचणीत आणणाऱ्यांनो, त्यांच्या कामाशी स्पर्धा करून दाखवावी - मुख्यमंत्री
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठराखण केली. जे कोणी प्रताप सरनाईकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी प्रताप यांच्या लोकोपयोगी कामाशी स्पर्धा करून दाखवावी, असं आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिलं.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना मनसेसोबतच्या युतीवर चर्चाही नको - सविस्तर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजप आणि मनसे यांच्यातील युतीबाबतच्या चर्चांनी जोर धरला. परंतु, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांची याबाबत कुठेच वाच्यता झाली नसल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मौन बाळगणंच पसंत केलं आहे. इतकंच नाही तर सध्या ही भेट टाळता आली असती अशी केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची धारणा असल्याची माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
२ डोस घेतलेल्या मुंबईकरांना ६५ रेल्वे स्थानकांवर मिळणार पास | अॅप विषयी देखील महापौरांची माहिती
सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी दिली जावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. विरोधकांकडून यासाठी आंदोलन देखील केलं गेलं. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मुंबईच्या लोकलमधून प्रवासाची परवानगी दिल्याची घोषणा केली.
4 वर्षांपूर्वी -
सर्वच राज्यांची कोंडी | आरक्षणाची 50% मर्यादा उठवणं गरजेचं | SEBC प्रवर्ग ठरवला तरीही इंद्रा साहनी निकालाची अडचण
१०२ व्या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निर्माण करण्याचे अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करण्यासंदर्भात संसदेत विधेयक मांडले गेले आहे. मात्र केंद्र सरकारला उघडे पाडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कंबर कसली आहे. हे एसईबीसी प्रवर्ग तयार करूनही मराठा आरक्षण देण्यात अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन आता घटनेत नमूद असलेल्या आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याचे विधेयक अथवा प्रस्ताव मांडावा यासाठी आघाडी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपकडून OBC आ. संजय कुंटेंना पुढे करून पंकजा मुंडेंच्या राजकारणाला धक्का देण्याची खेळी? - सविस्तर वृत्त
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील बडे नेते दिल्लीत असून महाराष्ट्रातील नवीन प्रदेशाध्यक्ष निवडीवर सध्या खलबते सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले जळगाव-जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. संजय कुटे हे फ्रंटलाइन नेते नसले तरी ते मागील चार टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत. ते मूळचे बुलडाण्यातील आहेत. काही वर्षांपासून ते देवेंद्र फडणवीस यांचे खासमखास आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात मोहरमसंदर्भात मार्गदर्शक सूचना | मिरवणुका काढण्यास परवानगी नाही
मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून, मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
बिल्डरांनी रखडवलेले SRA प्रकल्प ताब्यात घेणार - जितेंद्र आव्हाड
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएचे प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका दिला आहे. आशय पत्र आणि बँकांकडून कर्ज घेऊनही बिल्डरांनी एसआरएचे प्रकल्प पूर्ण केले नाहीत. हे प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार असून एसआरए स्वत: लोकांना घरं बांधून देणार आहे, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे एसआरएतील घरांची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा माझी बहीण, अन्याय झाल्यास मला सांगावं मग बघू | जाणकरांचा पंकजा मुंडे विरोधकांना इशारा
राष्ट्रीय समाज पार्टी हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे 50 आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
दादर-नायगाव पोलिस वसाहतीतील कुटुंबीय राज ठाकरेंच्या भेटीला
दादरच्या नायगाव परिसरातील पोलीस वसाहतीतील नागरिकांना घर खाली करण्याची नोटीस अली आहे. पोलिस वसाहत धोकादायक असल्याने या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. यानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांकडून आक्रोश व्यक्त केला जात असून विरोधी पक्षनेत्यांनीही त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. दरम्यान पोलिसांचे कुटुंबीय आज याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झाले होते. राज ठाकरेंनी यावेळी त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावर केंद्राचा विचार सुरू | लोकसभेत माहिती, समितीचीही स्थापना
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोमवारी लोकसभेत दिली. एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात मेघवाल यांनी संसदेत ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना खासदाराची पदाधिकारी मेळाव्यात थेट राष्ट्रवादीला बुडवण्याची भाषा | वाद अजुन पेटणार?
महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल असल्याचं आमदार-मंत्री, पक्षातील नेते मंडळी दाखवतात. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा चित्र वेगळं आहे. कारण परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या एका स्फोटक व्हिडीओ क्लिपने राष्ट्रवादी-शिवसेनेतला संघर्ष अधोरेकित झालाय. एका मेळाव्यात खासदार संजय जाधव बोलत असताना ते राष्ट्रवादीवर असे काही घसरले की त्यांनी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा बाप काढला. एवढ्यावरच ते शांत बसले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला बुडविण्याची भाषा केली.
4 वर्षांपूर्वी -
लोकल रेल्वे प्रवास | राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्रं दिलं होतं | आज मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार
मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री आठ वाजता सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, आज (दि ९) कोरोना राज्य कृती दलाची बैठक बोलावली आहे. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे तेथील निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. प्रार्थनास्थळे, हाॅटेल आणि माॅल्स उघडण्यास काही अटींवर परवानगी देण्यात येईल. तसेच सामन्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी काही अटींवर मान्यता दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का देण्यासाठी अमित शहांची दिल्लीत बैठक?
विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे दोघेही दिल्लीत दाखल झाले आहेत. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे जयकुमार रावळ निरंजन डावखरे हे देखील दिल्लीत आज उपस्थित आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षात नेमकी काय खलबतं सुरू आहेत याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सदिच्छा भेटीआडून भाजप मनसे पदाधिकाऱ्यांना गळाला लावणार? | भाजप आमदार मनसे शाखेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भारतीय जनता पक्ष करणार नसल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. काही दिवस अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चांना चांगलाच उधाण आलं होतं. जिथे भाजप मनसे युतीची चर्चा आहे तिथे या दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची पंतप्रधानांना विनंती केली आहे | पण केंद्राची भूमिका अस्पष्ट - मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री आठ वाजता सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, आज (दि ९) कोरोना राज्य कृती दलाची बैठक बोलावली आहे. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे तेथील निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. प्रार्थनास्थळे, हाॅटेल आणि माॅल्स उघडण्यास काही अटींवर परवानगी देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र आरोग्य विभागात 2725 पदांची भरती | १०वी पास ते पदवीधर | ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि गट सी श्रेणीच्या 2725 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. आरोग्य विभाग भारती 2021 साठी पात्र आणि इच्छुक अर्जदार 06 ते 20 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH