महत्वाच्या बातम्या
-
मुंबई महापालिका निवडणूक २०२२ | डिसेंबरमध्ये राहुल गांधी यांची शिवतीर्थावर सभा
काँग्रेस पक्षाची सभा डिसेंबरला शिवाजी पार्क मध्ये होणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होत आहे. डिंसेबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे येत्या 28 डिसेंबरला कॉंग्रेस स्थापना दिवशी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली वारी | संजय राऊत-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना सांगितला आहे. शिवसेना युपीएचा भाग नाही. मात्र, दिल्लीत राहुल गांधी आणि राऊत यांच्यात जवळकी वाढलेल्याचे चित्र दिसून आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो - नारायण राणे
राष्ट्रीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिवसेना नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपूर्वी भेटले होते आणि त्यानंतर राऊत आणि गांधी यांच्या फोटोची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. त्यावरून अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी या फोटोची खिल्ली उडवली आहे. राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. तो पक्ष रसातळाला जातो, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार
राज्यातील 25 जिल्हातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर 11 जिल्ह्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी आक्रमक मागणी आता होत आहे.
3 वर्षांपूर्वी -
हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या करतंय - आ. नितेश राणे
महाराष्ट्रात हिंदू सण साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. गेल्यावर्षीच्या परिपत्रकावरील तारीख फक्त बदलली. निर्बंध तेच असून हा हिंदूंवर अन्याय आहे, असं सांगतानाच ममता बॅनर्जी यांनी जी परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये निर्माण केली. तिच परिस्थिती ठाकरे सरकारला राज्यात घडवायची आहे, असा घणाघाती हल्ला भाजप आमदार नितेश राणे यांनी चढवला आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपची जोरदार तयारी | शहा-शेलार बैठकीत चर्चा
मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर बदल करण्यासाठी राजधानी दिल्लीत हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र या सर्व घडामोडीत वांंद्रे पश्चिमचे आमदार तथा भाजपचे मुख्य प्रताेद आशिष शेलार यांच्याकडे मुंबई महापालिका निवडणुकीची धुरा येण्याची दाट शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
इंधन दर, महागाई, बेरोजगारी मुद्द्यांवर निवडणुका कठीण | भाजप राज्यात आखतंय फक्त 'जात' युद्ध? - सविस्तर वृत्त
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची उद्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील शाळा सुरु होणार | काय आहे तारीख?
तब्बल दीड वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचा हालचालींना वेग आला आहे. १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
3 वर्षांपूर्वी -
2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल - देवेंद्र फडणवीस
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे-भाजप युती होण्याच्या चर्चेने जोर धरलेला असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत आमचं एकच इंजिन असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाटील-राज यांची भेट निष्फळ ठरलीय का? असा सवाल केला जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजप चंद्रकांतदादांना पदावरून हटवणार? | भाजप नेत्यांच्या दिल्लीवारीवर फडणवीसांनी दिली माहिती
पुढील वर्षी महाराष्ट्रात मुंबईसह इतर अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष तयारीला लागला आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यावर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीची देखील चाचपणी केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये देखील बदलांची चर्चा सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई बेस्टच्या ताफ्यात नव्या 175 इलेक्ट्रिक बसेस | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
बेस्टच्या ताफ्यात मिनी नंतर मोठ्या इलेक्ट्रिक बसेस आणण्यात आल्या आहेत. या इलेक्ट्रिक बसचे व माहीम बस स्थानकाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
3 वर्षांपूर्वी -
आता लोकच यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत म्हणतील 'लाव रे तो व्हिडिओ' | वडेट्टीवार यांचा टोला
आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टोलेबाजी केली. दोघांच्या भेटीचे व आतापर्यंतचे व्हिडिओ लोकच लावतील, सोशल मीडियावर आता “लाव रे व्हिडिओ” सुरू होईल असे म्हणत राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला.
3 वर्षांपूर्वी -
BREAKING | राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडलं हे मोदी-शहांना सांगणार - चंद्रकांत पाटील
काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याची चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंजवर भेट घेतली होती आणि त्यानंतर युतीच्या बातम्यांनी पुढं जोर पकडला होता. मात्र आज चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील तरुण नाराज झाले आहेत - हसन मुश्रीफ
मुंबई महापालिका निवडणुकीत संजय राऊतांनी निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. यासंदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले की, ‘स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् संजय राऊतांना कसलं आव्हान देताय, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे हिंदुत्वाचा अजेंड्यावर तीव्र करणार | त्यांच्या मनात परप्रातीयांच्या प्रती घृणा-द्वेष नाही - चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. राज ठाकरेंसोबत नाशिकला अचानक भेट झाली होती. त्यावेळेला त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि त्यावेळी त्यांनी घरी यायचं आमंत्रण दिलं होतं. घरी चहा प्यायला बोलावणं ही महाराष्ट्राची संस्कृती, पंरपरा आहे. त्यानंतरच्या आमंत्रणानंतर आज भेटायला आलो. या भेटीत परप्रांतीयांच्या भूमिकाबाबत चर्चा झाली. राज यांनी क्लिप दाखवली. युतीची नाही तर एकमेकांच्या भूमिकांसदर्भात चर्चा झाली.
3 वर्षांपूर्वी -
BMC निवडणूक २०२२? | मुंबईतून युपी-बिहारसाठी आणखी २ स्पेशल ट्रेन देणार - रावसाहेब दानवे
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका काही महिन्यांवर आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष आता मुंबई संबंधित विषयांकडे केंद्रित झाल्याचं पाहायला मिळतंय. कोरोना नियमावलीमुळे सामान्य लोकांसाठी बंद असलेली लोकल ट्रेन आणि मुंबई भाजपचं आजचं आंदोलन त्याचाच भाग असल्याचं म्हटलं जातंय. मात्र आता आपला मतदार कोण आणि त्यासंबंधित राजकारण देखील केंद्रस्थानी आलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
काय, तर जगाला हेवा वाटणार असा महाराष्ट्र घडविणार? कोणा बरोबर, तर चंद्रकांत पाटलांबरोबर - राजेश कदम
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी नंतर लगेचच माध्यमांवर युती संदर्भातील वृत्त झळकू लागली. मात्र हीच वृत्त राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांमध्ये जाताच त्यांनी सारवासारव आणि युतीच्या संदर्भात पूर्णविराम देणारं वक्तव्य केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
सर्वसामान्य जनतेला रेल्वे प्रवासाची मुभा द्या | भाजपचं मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जेलभरो आंदोलन
सर्वसामान्य जनतेला रेल्वे प्रवासाची मुभा मिळावी म्हणून भारतीय जनता पक्षाने आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जेलभरो आंदोलन केलं. चर्चगेट, चर्नी रोड आणि कांदिवली रेल्वे स्थानकात शेकडो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जमले. यावेळी आंदोलकांनी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रेलभरो आंदोलन केलं.
3 वर्षांपूर्वी -
राष्ट्रीय स्तरावर वृत्त प्रसिद्ध होताच चंद्रकांत पाटील यांच्याकडून राज ठाकरे यांच्या भेटीपूर्वीच सारवासारव आणि युतीला पूर्णविराम?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी नंतर लगेचच माध्यमांवर युती संदर्भातील वृत्त झळकू लागली. मात्र हीच वृत्त राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांमध्ये जाताच त्यांनी सारवासारव आणि युतीच्या संदर्भात पूर्णविराम देणारं वक्तव्य केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीस अडचणीत? | राज्यातील अधिकाऱ्यांचा दौरा पेगसस स्पायवेअर संदर्भात होता का? | हायकोर्टाचा सवाल आणि हे निर्देश...
महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा दौरा पेगसस स्पायवेअर संदर्भात होता का? मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेत सवाल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा दौरा पेगासस स्पायवेअर संदर्भात होता का? मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेत सवाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि जस्टिस जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी, डीजीआयपीआर आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस, राज्य सरकार सोबतच संबंधित अधिकाऱ्यांना 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो