महत्वाच्या बातम्या
-
उद्यापासून पूरग्रस्तांच्या खात्यावर 10 हजार रुपये जमा होणार | विजय वडेट्टीवार यांची माहिती
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. आज दुपारी १:३० वाजता पूरग्रस्ते चिपळूण आणि ४:३० वाजता महाड शहाराची ते पाहणी करणार आहेत. तत्पूर्वी, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत असल्याने मदत कार्यात विलंब होतो, त्यामुळे तूर्तास नेत्यांनी दौरे थांबवावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. परंतु, आज काँग्रेसचे नेते राऊत आणि आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत.
3 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये भूकंप होणार? | खडसेंप्रमाणे गेम होतोय, पंकजांनी शिवसेनेत जाण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव - सविस्तर वृत्त
फडणवीस राज्याचे मुंख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी स्वपक्षातील दिग्गज नेते आणि एखाद्या समाजाचा चेहरा असणाऱ्या नेत्यांना शिस्तबद्ध संपवण्याचा घाट घातला आणि तो प्रत्यक्षात देखील उतरवला आहे. पक्षांतर्गत सर्व ज्येष्ठ नेत्यांचं राजकीय महत्व संपूष्टात आणून आयात नेत्यांना पुढे करण्याचा सपाटा लावल्याची भावना राज्य भाजपात निर्माण झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग करण्यात आले | रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
पोलिस दलात क्रीम पोस्टिंग आणि बदल्यांतील भ्रष्टाचारावर निगराणी ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. शुक्लांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानींनी बाजू मांडली. सीआयडीच्या प्रमुख असताना शुक्ला यांना तत्कालीन पोलिस महासंचालकांकडून काही फोन नंबर्सवर निगराणी ठेवण्याचे आदेश मिळाले होते.
3 वर्षांपूर्वी -
मोठा संभ्रम | पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्रानं जाहीर केलेली ७०१ कोटीची मदत 2020 सालची
काल केंद्र सरकारने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०१ कोटीची मदत जाहीर केल्याचं वृत्त झळकलं. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केंद्राच्या तत्परतेचे गोडवे गाण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता आलेल्या वृत्ताप्रमाणे मोठा संभ्रम झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण स्वतः राज्य सरकारकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
IPS परमबीर सिंह यांच्यावरील गुन्ह्याच्या तपासासाठी SIT ची नेमणूक
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. परमबीर सिंह आणि इतर 5 पोलीस अधिकाऱ्यांवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेना आ. प्रताप सरनाईकांचा उपक्रम | रिकामा सिलेंडर आणा मोफत ऑक्सिजन भरा
आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहराची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी स्वखर्चातुन ‘ऑक्सिजन प्लांट’ उभारला आहे . पुढील 3 ते 4 दिवसात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. काल पालिका आयुक्त, तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘ऑक्सिजन प्लांट’मधून सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्याचे प्रात्यक्षिक झाले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्लांटची पाहणी केली.
3 वर्षांपूर्वी -
आगामी नाशिक आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी
महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसलेली आहे हे दिसून येतंय. मनसे नेते अमित राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.
3 वर्षांपूर्वी -
प. बंगालप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेगॅसस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी - नाना पटोले
बहुचर्चित पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील महत्वाचे राजकीय नेते, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन हॅक करण्यात आले आहेत. या लोकांवर हॅकिंगच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशी आदेश अद्याप दिले नसले तरी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने या हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही - देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा करू नका असं आवाहन केलं आहे. ते राज्याचं नेतृत्व करत आहेत. मी त्यांना गेली ४५ वर्षे ओळखतो. मुख्यमंत्री म्हणून ते लोकप्रिय आहेत, मात्र या नेतृत्वाकडून भविष्यात राष्ट्रालादेखील अपेक्षा आहेत. आजच्या दिवशी हे माझं म्हणणं मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो. राष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी नेतृत्वाची गरज भविष्यात लागली तर नेतृत्व करण्यास ते सक्षम आहेत. आणि ते करतील याची मला खात्री आहे.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
कोर्टाच्या सर्व सुनावणीला गैरहजर | आता न्यायालयाच्या 'या' निर्णयाने कंगना अडचणीत येणार
अभिनेत्री कंगना राणौत आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. अभिनेत्री कंगना आणि वाद हे समीकरण आहे. मात्र न्यायालयाने कंगनाला चांगलाच दणका दिला आहे. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा केला आहे. परंतु एकाही सुनावणीला कंगना न्यायालयात हजर राहिली नाही.
3 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस संदर्भातील वृत्त | ACB'कडून वृत्ताचं खंडन
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याबाबतच्या बातम्या माध्यमातून प्रसारित झाल्या आहेत. मात्र अशाप्रकारच्या बातम्यात तथ्य नसून परमबीर सिंह यांच्या विरोधात कोणतीही लूक ऑऊट नोटीस काढली नसल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांच्याबाबत आलेल्या बातम्या या हवेतील वावड्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
पोर्न प्रकरणात राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी | पोलिस अजून पुरावे गोळा करणार
पोर्न फिल्म बनवणे आणि ऑनलाइन वितरित केल्याप्रकरणी राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडी समाप्त झाल्यानंतर पोलिसांनी कुंद्राला कोर्टात हजर केले. यावेळी पोलिसांकडून कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. परंतु, आता चौकशी पुरे नवीन पुरावे गोळा करा असे म्हणत कोर्टाने कुंद्राला न्यायालयीन कोठडीत रवाना करण्याचे आदेश दिले.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिवसेनेच्या जाहिरातीचा १ वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल करत भाजप IT सेलचं बदनामी तंत्र
महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती कोपली असताना भाजप-सेनेने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नसल्याचे दिसून येते. आता भाजपने पुन्हा एकदा समाज माध्यमावर पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपने शिवसेनेने केलेल्या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर करत सेनेवर निशाना साधला आहे.
3 वर्षांपूर्वी -
जमिनीच्या वारस हक्कासाठी कसा कराल ऑनलाईन अर्ज? | या आहेत स्टेप्स
शेतजमीन ज्याच्या नावावर आहे अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचा हक्क मिळू शकतात आणि त्यासाठी शेतजमिनीवर वासाची नोंद करणे आवश्यक असते. अशा प्रकारची वारस नोंद ऑनलाईन पद्धतीने कशी करावी, याबाबत या लेखात माहिती घेणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
कोकणात ५ एम्ब्युलन्स, २५० डॉक्टरांची टीम पाठवणार | पवारांची माहिती
महाराष्ट्रात पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. कोल्हापूर, कोकण, सातारा, सांगली या भागात पूर आल्याने लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. लवकरच मदत जाहीर करण्याचं आश्वासन दिलं आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवली आहे. यावेळी अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादी पक्ष जीवनाश्यक वस्तू पुरवणार | पवारांची मुंबईत घोषणा
महाराष्ट्राला पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक कुटूंब देशोधडीला लागली आहेत. तर स्थानिक पातळीवरील छोटे उद्योग कोलमडून पडले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष, सामान्य लोकांनी मदतीसाठी हात पुढे केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
आमदार खरेदी प्रकरण | झारखंड पोलिस पथक मुंबईत | बावनकुळे, चरणसिंग, बेलखेडे चाैकशीच्या फेऱ्यात
झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी कट उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. या कटात सहभागी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, व्यावसायिक जयकुमार बेलखेडेंसह ६ जणांची पोलिस चाैकशी करणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
झारखंड सरकारमधील आमदारांची खरेदी| झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार
झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस आमदारांना ५० कोटी रुपये आणि मंत्री पदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
3 वर्षांपूर्वी -
गावखेड्यातील लोकांसाठी महत्वाचं | सावकारी व्यवसायाचे नियम आणि कायदा - नक्की वाचा
जुना सावकारी कायदा, 1946 सावकारांचे नियम करण्यास अपुरा पडतो. त्यामुळे प्रभावशाली व परिणामकारक नियम करणारा नवा कायदा तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. शासनाने चौकशी करून नवीन कायद्याचा मसुदा तयार केला. सदर मसुद्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राज्यात विधिमंडळासमोर विचार विनिमयासाठी व मंजुरीसाठी ठेवण्यात आले. सदर विधेयकाला दिनांक 22 एप्रिल 2010 रोजी राज्य विधिमंडळाची मान्यता मिळाली.
3 वर्षांपूर्वी -
भविष्यात आमची युती झाली तर त्यात गैर काय? | येत्या काही दिवसात राज ठाकरेंची भेट घेईन - सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील नाशिकमधील भेट बऱ्याच प्रयत्नानंतर घडून आली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत उभे होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या भेटीचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला होता.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो