महत्वाच्या बातम्या
-
निवडणुकांच्या तोंडावर मनसेत भूकंप होण्यास सुरुवात | राजन शिरोडकर यांचे पुत्र आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला पुन्हा एकदा शिवसेनेने जबर धक्का दिला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं आहे. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. आदित्य शिरोडकर यांच्या अचानक पक्ष सोडण्याने मनसेला धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईचा फोटो ट्विट करत सेनेला डिवचलं | नेटिझन्सकडून 'मामी हे नागपूर पहा' म्हणत व्हिडिओ, फोटोचा सपाटा
काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचा वेग मंदावला. रेल्वे सेवेसोबतच रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूकही जवळ आल्यानं महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते? | ED भाजपच्या इशाऱ्यावर नाचतंय - हसन मुश्रीफ
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणामध्ये ईडीने ही पहिलीच मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाशिकचा आसिफ आणि रसिका | लव जिहादच्या आरोपांनी मोडले लग्न | बच्चू कडूंनी घडवला समेट
नाशिकमध्ये होणाऱ्या एक आंतरजातीय विवाह सोहळ्याला लव जिहादचा रंग देत समाजातून होणाऱ्या तीव्र विरोधामुळे विवाह रद्द करण्याची वेळ मुलीच्या परिवारावर आली. अशात या मुलीच्या कुटुंबाची मंत्री बच्चू कडू यांनी भेट घेत कुटुंबाला मानसिक आधार देत पाठिंबा दर्शवला. इतकेच नाही तर मी लग्नात येऊन नाचेल, असेही बच्चू कडू यांनी म्हणत आंतरजातीय विवाह सोहळ्याला विरोध करणाऱ्याला तंबी दिली.
4 वर्षांपूर्वी -
SSC Result 2021 | वेबसाइट क्रॅश, हॉलतिकीटच दिलं गेलं नसल्याने क्रमांकच माहीत नाही, निकाल कसा पहावा?
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीच्या परीक्षा यंदा कोरोनामुळे न घेताच निकाल जाहीर करण्यात आला. परंतु परीक्षा न देताच उत्तीर्ण होण्याचा हा आगळा वेगळा आनंद द्विगुणीत होऊ शकला नाही. ज्या बोर्डाच्या वेबसाइटवर आपले गुण किती हे पाहण्यासाठी विद्यार्थी आतुर झाले होते. ती साइटच निकालावेळी क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पास की नापास कळण्यासाठी बोर्डातील अधिकाऱ्यांना पालक आणि विद्यार्थ्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधला असता थोडावेळात पाहता येईल असे जुजबी उत्तर देण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा
संगीत क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टी-सीरिजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अजित पवार आणि अनिल परबांविरुद्ध CBI चौकशी करण्याची मागणी | कोर्टात याचिका दाखल
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची नावे आपल्या जबाबात घेतली असून या दोघांवर गुन्हा दाखल करून, CBI कडे चौकशी करण्याची मागणी अॅड. रत्नाकर डावरे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, रस्ते आणि रेल्वे वाहतूक प्रभावित
शहरात गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहर विभागापेक्षा उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचले आहे. सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर तसेच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra ITI Admission 2021 | आजपासून प्रवेशप्रक्रिया सुरु | कसा कराल अर्ज
ITI ADMISSION प्रवेश सत्र 2021 साठी राज्यातील 417 शासकीय आणि 549 खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (ITI) आज प्रवेशप्रक्रिया सुरु झाली. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात आला. यंदा शासकीय आयटीआयमध्ये 92 हजार तर खासगी आयटीआयमध्ये 44 हजार अशा एकूण 1 लाख 36 हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
4 वर्षांपूर्वी -
दिल्लीत संसदेच्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आज (15 जुलै) संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पण यापैकी तीन मुख्य विषयांवर सर्वाधिक चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जवळपास अर्धा तास बैठक झाली. शरद पवार उद्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
बिग बी मनाचा मोठेपणा दाखवा | अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर मनसेची पोस्टरबाजी... काय कारण?
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जूहू येथील प्रतिक्षा बंगल्यासमोर काही पोस्टर लागले आहेत. विशेष म्हणजे हे पोस्टर त्यांच्या एखाद्या चित्रपटाचे नसून राज ठाकरे यांच्या नवनिर्माण पक्षाकडून लावण्यात आले आहेत. झाले असे की, बृहन्मुंबई महानगरपालिका जवळपास एका आठवड्यापासून अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील प्रतिक्षा बंगल्याची एक भिंत पाडण्याची तयारी करत आहे. अमिताभ बच्चन यांचा बंगला संत ज्ञानेश्वर मार्गावर आहे आणि बीएमसीला हा रस्ता रुंद करायचा आहे, यामुळे अमिताभ यांच्या बंगल्याची भिंत पाडावी लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
SSC Result 2021 | राज्यातील इयत्ता दहावीचा उद्या निकाल लागणार | असा ऑनलाईन चेक करा
राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येईल. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यातील शाळांना दहावीचे गुण संगणकीय प्रणालीत नोंदवण्याची मुदत उलटून गेली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै पर्यंत दहावीचा निकाल जाहीर होणं अपेक्षित होता. आता ताज्या माहितीनुसार उद्या निकाल जाहीर होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली | राज्यपालांकडे विविध मागण्याचे निवेदन दिले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या नेतृत्वात इंधन दरवाढीविरोधात मुंबईत सायकल रॅली काढण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाई जगताप आणि आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईतील हँगिंग गार्डन ते राजभवनापर्यंत सायकल चालवत राज्यपालांना निवेदन देण्यासाठी काँग्रेस नेते सायकलवरून राजभवनात गेले होते. यावेळी काँग्रेसतर्फे राज्यपालांना इंधन दरवाढीविरोधात निवेदन देण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही | त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही | फडणवीसांच्या या विधानाचा अर्थ काय?
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांच्यात आणि फडणवीसांदरम्यान सर्वकाही ठीक नसल्याचं अप्रत्यक्षरीत्या सूचित केलं होतं. त्यातून भाजपामध्ये त्यांच्या विरोधात अंतर्गत धुसफूस असल्याचं देखील अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट झालं आहे. तसेच मला नाराजी व्यक्त करायची असेल तर ही जागा देखील कमी पडेल असे म्हटल्याने त्यांच्या भविष्यातील बंड करण्याच्या शक्यता देखील निर्माण झाल्या होत्या. मात्र आता फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर त्यात भर पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्याचे मुख्यमंत्री अव्वलस्थानी आल्याने भाजपने दुःख वाटून घेऊ नये | तुमचे लाडके योगी आदित्यनाथ आहेत ५ नंबरला
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील 13 राज्यांमध्ये अव्वल मुख्यमंत्री ठरले आहेत. प्रश्नम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याच मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. “भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तर प्रदेशचं कौतुक करत असतात, पण या सर्वेक्षणात यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पाचवा नंबर आहे, हे भारतीय जनता पक्षाने विसरु नये” असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
पवारांच्या राष्ट्रपती पदाबाबतच्या वृत्तावर राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण | काय म्हटलं?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती होण्याच्या शर्यतीत असल्याची कालपासून राज्यभर, देशभर चर्चा सुरु आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | परमबीर सिंह यांच्याविरोधात मुक्त चौकशीचे ACB'ला राज्य सरकारकडून आदेश
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) मुक्त चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस निरीक्षक अनूप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. त्यासोबतच सिंह यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे अनेक गंभीर आरोप कले होते.
4 वर्षांपूर्वी -
OBC आरक्षण | छगन भुजबळ आणि फडणवीस यांच्यादरम्यान चर्चा | केंद्राकडील इम्पेरिकल डाटा...
ओबीसी आरक्षणावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. कारण याच विषयावरून पुन्हा राजकीय गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. मात्र या गाठीभेटी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आहेत हे विशेष म्हणावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा केली.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री पदासाठी उतावळे म्हणाले सेना-राष्ट्रवादीचा थरकाप उडाला | शेलार म्हणाले काँग्रेसला गांभिर्याने घेऊ नका - अनिल गोटे
नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता या सर्वाचा समाचार राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी घेतला आहे. यासंदर्भात बोलताना अनिल गोटे म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाचे अतिउत्साही आणि मुख्यमंत्री पदासाठी उतावीळ झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना असे काही वक्तव्य आले की, यांना हर्षवायूच होतो. त्यांनी वृत्तपत्रांना लगेच सांगितले की, “शिवसेनेचा व राष्ट्रवादी काँग्रेसचा थरकाप उडाला.
4 वर्षांपूर्वी -
प. बंगाल निवडणुकीनंतर आत्मविश्वास वाढला? | भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकणारच - चंद्रकांत पाटील
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या आधी त्यांनी काही वेळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यामुळे देशात पुन्हा एकदा तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. 2024 मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा. भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय